Skip to main content

विद्यार्थ्याची चाचणी परीक्षेतील उत्तर व त्यावर परीक्षकाची टिप्पणी

ज्या दिवशी कुठल्याही प्रकारची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हापासून शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्व बाबींचे सुमारीकरण होत आहे, असे म्हणता येईल. विद्यार्थीकेंद्रित व्यवस्थेत विद्यार्थ्याची नाराजी पत्करून शिक्षणक्षेत्राशी संबंधित असलेल्या शिक्षक, पर्यवेक्षक, परीक्षक आदीना जगता येत नाही, हेही तितकेच खरे. विद्यार्थ्यांनी काहीही केले तरी त्यांचे कौतुक करणे गरजेचे ठरत आहे. म्हणून तर कोविडच्या साथीचे निमित्त साधून सर्व विद्यार्थ्यांना (नव्हे परीक्षार्थ्यांना!) कुठलीही परीक्षा न देता पुढील वर्गात ढकलण्यात येत आहे.

नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग २

या आपल्या गप्पांच्या मालिकेच्या पहिल्या भागात आपण केतकीकडून इकॉलॉजी म्हणजे काय, त्याच्या अभ्यासात कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात याविषयी ऐकलं. शिवाय पृथ्वीच्या इकॉलॉजीचा अभ्यास करताना पृथ्वीची विविध बायोम्स मध्ये कशी विभागणी होते ते देखील पाहिलं. या भागात आपण या गप्पा पुढे चालू ठेवू.

गोष्ट सांगा गणित शिकवा... ११

तुम्हाला माहीत आहे का, सबमरीनला ब्रेकच नसतात !
...

चिंट्या हळूच सायली आणि नेहाच्या कानात फुसफूसला... चिंट्या!!! काहीतरी बावळट बडबड करू नकोस. ब्रेक नसेल तर बोट थांबेल कशी? दोघी त्याचावर फिस्करल्या.
...

ललित लेखनाचा प्रकार

सुटका नाही

ज्या प्रश्नांना नसते उत्तर
तेच मला खुणविती निरंतर
अज्ञेयाच्या पल्याडून कुणी
म्हणते,"यातून सुटका नाही"

तीन मितींची भक्कम कारा
तिचे दार किलकिले उघडुनी
बघती प्रतिभावान थोडके
तेही म्हणती,"सुटका नाही"

तुंदिलतनु तुपकट ध्येयांची
हाक ऐकुनी शहारते मन
उनाड भटकी पायवाट मग
बिलगून म्हणते,"सुटका नाही"

सध्या काय वाचताय? - भाग ३०

एखादे पुस्तक आवडते; एखादा दीर्घ लेख आवडतो; वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते; त्यासाठी हा धागा. अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात आणि वाचावीशी वाटतात.

महामारीच्या ऐन तांडवातून ऑक्सफर्ड ते पुणे

कोरोनाच्या महासाथीमुळे परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांचे हाल झाले. अशाच एका विद्यार्थ्याच्या घरपरतीची ही चित्तवेधक कहाणी.

ललित लेखनाचा प्रकार

अजात : अरविंद जोशी

आज अतिशय जबरदस्त अशी डॉक्युमेंटरी पाहिली.

कॉपी पेस्ट ओळख :

१९३० च्या दशकात, वारकरी संप्रदायातील गणपती उर्फ हरी महाराज भभुतकर (जन्म १८८५-मृत्यू १९४४, रा. मंगरूळ दस्तगीर, जिल्हा अमरावती) यांनी त्यांच्या अनुयायांना त्यांच्या जाती सोडायला लावल्या.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे अनुयायी जातीच्या रकान्यात "अजात" लिहू लागले.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

‘Reality’ Shows!

‘रिअॅलिटी’ शो ‘Reality’ Shows
"Be grateful that you only see the outward man. Be grateful that you never see the passions, the hatreds, the jealousies, the malice, the sicknesses... Be grateful you rarely see the frightening truth in people."
-----Alfred Bester in The Demolished Man
तात्याचं लग्न होऊन चांगली सहा सात वर्षे झाली आहेत. त्याची बायको सुशी. दोघांचा संसार मजेत चालला आहे.

ललित लेखनाचा प्रकार

नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग १

असंबाधमं बध्यतो मानवानां यस्या उद्वतः प्रवतः समं बहु।
नानावीर्या ओषधीर्या बिभर्ति पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः।। अथर्ववेद

अर्थ: ही धरा जी आपल्या पर्वत, दऱ्या आणि पठारांच्या माध्यमातून मनुष्यांना आणि सर्व जीवांना आंतरिक आणि बाह्य दोन्ही प्रकारचे अनिर्बंध स्वातंत्र्य प्रदान करते. जी अनेक गुणांनी संपन्न अशा औषधी वनस्पतींना जन्म देते आणि त्यांचे पोषण करते. अशी पृथ्वी आम्हाला समृद्धी आणि आरोग्य प्रदान करो.

प्रस्तावना