Skip to main content

जेवण

सर्वप्रथम एखादी बरीशी पदवी मिळवावी; एकापेक्षा दोन बऱ्या, दोनापेक्षा तीन बऱ्या. पदव्या. पण एकसुद्धा पुरेल. मग एक नोकरी शोधावी. व्यवसायही चालेल. पदवी आणि नोकरीचा संबंध असण्याची गरज नाही. मग एक बुवा शोधावा. तो बरा असला पाहिजे, बरा अर्धा नसला तरी चालेल.

मग एखादा शुक्रवार निवडावा. आधी आठवडाभर नाकावर टिच्चून नोकरी, व्यवसायाचं काम करावं. आपण चिक्कार काम केलं की कोणाचं ना कोणाचं नाक टिचतंच. कुणाचं, ते महत्त्वाचं नाही. शुक्रवारी दुपारी कामातूनच सवड काढून डुलकी काढावी आणि डुलकी काढल्याचं जाहीर करावं. ह्यातून आपण आठवडाभर खच्चून काम केलंय, हे साटल्यपूर्ण पद्धतीनं व्यक्त होतं.

धुमकेतू - NEOWISE C/2020 F3

सध्या आकाशात एक नुकताच शोधलेला धुमकेतू साध्या डोळ्यांना दिसत आहेत. धुमकेतुचे नाव C/2020 F3 (NEOWISE) असे ठेवण्यात आले आहे.

धुमकेतु नुकताच सुर्यामागून प्रदक्षिणा पुर्ण करून परतीच्या मार्गाला लागला आहे. संपुर्ण प्रदक्षिणेचा काळ साधारण सात हजार वर्षे इतका आहे. सुर्याच्या अजून जवळ असल्याने विषववृत्ताजवळील ठिकाणांहून धुमकेतू दिसणे सध्या अजून थोडे अवघड आहे.

सध्या सुर्योदया अगोदर 30-40 मिनिटे बरोबर ईशान्येस पाहिल्यास धुमकेतू दिसू शकते. दोन-तीन आठवड्यांनी संध्याकाळी सुर्यास्तानंतर दिसेल, पण जस जसा लांबा जाईल तस तसा तो फिका दिसू लागेल. तेव्हा, लवकरात लवकर पाहणे इष्ट.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अंडी आणि सफरचंदं

कोरोनाचा हाहा:कार मार्च-एप्रिलच्या काळात सुरू झाला आणि जगभरातल्या सगळ्या सेवाभावी संस्था झडझडून कामाला लागल्या. दहा हात कमी पडतील अशा झपाट्याने लोकं काम करत होते/आहेत. परदेशाबरोबर भारतालाही या कोरोनाचा फटका बसायला सुरुवात झाली होती. रोज सगळीकडे देशोधडीला लागलेल्या मजुरांच्या बातम्या, उद्या खायला काय अशी चिंता पडलेल्या साध्यासुध्या लोकांच्या बातम्या वाचून काळजी वाढायला लागली होती. परदेशात असताना स्वत:च्या देशाबद्दल असे काही वाचले की, मोठी अस्वस्थता येते, आणि अशावेळी उचलून पैसे देणे हा मदत करण्याचा एक ठोस उपाय असतो.

ललित लेखनाचा प्रकार

१८९७ माणदेश । औंधातला प्लेग

भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी, अर्थात बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांची थोडीफार ओळख मराठी वाचकांना असेलच. आचार्य अत्र्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ नाटकाची प्रेरणा ज्यांच्यावरून घेतली ते, किंवा व्ही.शांताराम यांचा ‘दो ऑंखे बारा हाथ’ ज्या खुल्या तुरुंगाच्या संकल्पनेवर बेतला होता ती संकल्पना राबवणारे, औंधात हायस्कूल आणि बोर्डिंग काढून त्यात माडगूळकर बंधू, साने गुरुजी, शंकरराव खरात यांच्यासारख्या गुणी विद्यार्थ्यांना आश्रय देणारे, किर्लोस्कर, ओगले प्रभृती मराठी उद्योजकांना मदत करणारे, वगैरे त्यांच्या ओळखी अनेक आहेत.

ललित लेखनाचा प्रकार

करोना फोटोफीचर - स्वॉब सेंटर - मंदार देशपांडे

करोनाच्या काळात स्वॉब टेस्टिंग हा प्रकार आपल्या परिचयाचा झाला. जिथे स्वॉब घेतले जातात त्या केंद्रात काम करणाऱ्यांना सतत PPE घालून वावरावं लागतं नाही तर त्यांना संसर्ग होण्याचा धोका संभवतो. मंदार देशपांडे या पुण्यातील फोटोग्राफरने अशाच एका केंद्रात काढलेले हे फोटो आपल्याला बातम्यांच्या पलीकडचं वास्तव दाखवतात.

स्पर्धा का इतर?

१५ ऑगस्टला करोना लस उपलब्ध? - डॉ. मृदुला बेळे

आपली ‘स्वदेशी’ लस स्वातंत्र्यदिनाला येणार म्हणून जनता कृतकृत्य झाली आहे. तर अनेक डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ मात्र इतक्या कमी कालावधीत ही लस येणं अशक्य आहे, असं म्हणत आहेत. या पार्श्वभूमीवर जरा या दाव्यांची सत्यासत्यता तपासून पाहण्यासाठी हा लेखप्रपंच.

(कायमच) तहानलेल्या अवस्थेत असलेली आताची पिढी

photo 1 आपण आपल्या भोवताली थोडे लक्षपूर्वक पाहत असल्यास बाटलींची संगत जन्मल्यापासून मृत्युच्या दारापर्यंत आहे की काय असे वाटू लागते. बाळ जन्मल्यानंतरचे काही महिने (की दिवस!) वगळता स्तनपानाऐवजी दुधाची बाटली बाळाच्या तोंडात कोंबून आई कामाला जाते.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

राजा अलर्क

राजा अलर्क श्रीदत्तात्रेयांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक शिष्य गणला जातो. त्याच्या आईचे नाव मदालसा आणि वडिलांचे नाव ऋतुध्वज असे होते. राणी मदालसा ही श्रीदत्तात्रेयांची अत्यंत उच्च श्रेणीची भक्त होती राज्यपद प्राप्त झाल्यावर अलर्क राजधर्माप्रमाणे आणि नीतीने राज्य करीत होता. त्याच्या आईचा उपदेश त्याला प्राप्त होत होता. कालांतराने राजा अलर्क ऐष-आरामामध्ये गर्क झाला. खाणे, पिणे, नाचगाणे, चैन, विषयोपभोग यात इतका बुडाला की त्याला राज्यकारभाराचा विसर पडला. प्रजेकडे दुर्लक्ष झाले. सगळीकडे अराजक माजले. त्याला सुबाहू या नावाचा एक मोठा भाऊ होता. त्याच्या कानावर ही गोष्ट गेली.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

लेग पीस

वाईट हस्ताक्षराला कोंबडीचे पाय म्हणायची प्रथा कोणत्या शतकात आणि कोणत्या प्रदेशात सुरू झाली, याविषयी ठोस माहिती उपलब्ध नाही. पण ही प्रथा (कुप्रथा म्हणावं का?) प्राचीन वगैरे नसून सांप्रतकाळातीलच असावी, असा माझा कयास आहे. त्याला कारण ही आहे. आपल्याकडे अनेक ऋषीमुनींनी विपुल लेखन करून ठेवलं आहे. चार वेद, शेकडो महाकाव्यं, हजारो ग्रंथ आणि बरंच वाङ्मय हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध आहे. यातल्या एकातही हस्ताक्षराला कोंबडीचे पाय म्हटल्याची माहिती सापडत नाही. आता इतक्या ऋषींमधे सर्वांचीच अक्षरं म्हणजे मोत्यांच्या माळा, असं असणं तर शक्य नाही. एखादा तरी मुनी आपल्या माळेतला असेलच की.

कोव्हिड

http://archive.is/7TCsc
SARS-cov-2 चा पूर्वज. विषाणू नैसर्गिक की प्रयोगशाळेत बनवलेला आणि तिथून निसटलेला - चर्चा चालू आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स