करोना : आज ‘मास्क’वर बोलू काही...
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले जात आहेत तेव्हाच सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अनेक कारणांनी मास्क वापराच्या संदर्भात उलटसुलट मतप्रवाह प्रसृत झाले आहेत. प्रस्तुत लेखात मास्कचं महत्त्व सोप्या शब्दांत मांडायचा प्रयत्न केला आहे.
- Read more about करोना : आज ‘मास्क’वर बोलू काही...
- 5 comments
- Log in or register to post comments
- 8157 views
बागकामप्रेमी ऐसीकर २०२०
मला २०१९ पर्यंत नारळाचं झाड आणि क्याक्टस - एवढा ढोबळ फरक ठाऊक होता.
आणि वडाचं झाड.
बाकी झाडं जवळपास सारखीच वाटायची. म्हणजे फार तर मोठी-मध्यम-छोटी इतका फरक समजायचा.
पण मोठे लोक जसं एखाद्या झाडाखाली उभं राहून - "कलमी आहे, पानंच बघा ना!" वगैरे म्हणून माना डोलावतात, तसलं काही कळत नाही.
निव्वळ पानं बघून झाड ओळखणं तर जादू वाटते.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about बागकामप्रेमी ऐसीकर २०२०
- 83 comments
- Log in or register to post comments
- 74281 views
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: करोना चॅप्टर ३० मे २०२०
शुक्रवारी मित्राशी पुन्हा एकदा कन्फर्म केलं.
तो म्हणाला आज थोडं काम असल्यामुळे शनिवारी निघेल त्या पोरांना घेऊन.
म्हटलं ठीक आहे तीनही मजूर पोरांचं आधार-कार्ड, मेडिकल सर्टिफिकेट वगैरेचे फोटोज वगैरे रेडी करूयात तोवर.
सगळी तयारी करून मी शेळ्यांची स्वप्नं बघत पुन्हा शुक्रवारी झोपलो.
शनिवारी उठल्या उठल्या मित्राचा मेसेज,
"बायको अजिबात हो म्हणायला तयार नाहीये, सॉरी"
भरोशाच्या म्हशीला टोणगा #$%^
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: करोना चॅप्टर ३० मे २०२०
- Log in or register to post comments
- 2541 views
कौतुक कुणाचं करावं ?
कौतुक कुणाचं करावं ?कौतुक कुणाचंही करावं
पहिल्या पावसात चिंबलेल्या मृदगंधाचं करावं ,
न्हालेले केस झटकताना होणाऱ्या तिच्या विभ्रमांचं करावं , फेसाळत्या किंगफिशरच्या पहिल्या चरचरीत घोटाचं करावं ,
बॅट्समनला क्रिझबाहेर खेचणाऱ्या बेदी , प्रसन्ना च्या फ्लाईट चं करावं ,
बॅट्समनच्या पुठ्ठयामागून काटकोनात चेंडू घुसवणाऱ्या शेन वॉर्नचं करावं ,
- Read more about कौतुक कुणाचं करावं ?
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2816 views
रॅन्डम व्यवसाय (१)
"अरे, किती वर्षांनी भेट झाली. आणि खरं सांगू का, या स्कूल रियुनियनला भेट झाली नसती तर तुला ओळखलंच नसतं!"
"स्वाभाविक आहे रे. वीस वर्षांनंतर भेटतोय आपण. दहावीच्या रिझल्टनंतर पहिल्यांदाच. तू अमेरिकेतच होतास ना एवढी वर्षं!"
"अरे तेवढंच नाही. तू रापलायस केवढातरी. आणि तुझी हेअरस्टाईल? अगदी रास्ताफारियन झालास लेका!"
"आमच्या ड्रेस कोडचा भाग आहे रे."
"ड्रेस कोड? तू नेमकं काय करतोस?"
"पोतराज आठवताहेत? कडकलक्ष्मीची पूजा करणारे आणि स्वत:वर आसूड ओढून घेणारे?"
"म्हणजे??? तू तसं करतोस की काय?"
- Read more about रॅन्डम व्यवसाय (१)
- 1 comment
- Log in or register to post comments
- 1924 views
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: करोना चॅप्टर २८ मे २०२०
"टॅक्सीनामा"ची पुढची काही प्रकरणं लिहून तयार होती पण टाकायची इच्छाच मरगळल्यासारखी झाली.
पायपीट करणाऱ्या अश्राप जीवांचे हाल बघवेनात.
आपलं टॅक्सी चालवणं म्हणजे एक सुरक्षित उच्चभ्रु पोराचा गिमिकी चूष असल्यासारखं माझं मलाच वाटायला लागलेलं.
तसंही ते लॉकडाऊनमध्ये पॉजवर गेलेलं...
आतून काही छान वाटेना...
शनिवार-रविवार माझ्या गाडीतून साधारण २ (/३?) लोकांना ८ ते १० तासांचा ड्राइव्ह करून पोचवण्याचा ऑप्शन मांडला.
पण आपण काय सोशल मिडीया इन्फ्लुएन्सर वगैरे नसल्याने आधी कोणाचा फारसा प्रतिसाद आला नाही.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: करोना चॅप्टर २८ मे २०२०
- 7 comments
- Log in or register to post comments
- 6027 views
सद्गुरूवाचोनी सापडली सोय
बालपणीचा काळ सुखाचा
असे जरि कुणी म्हणती
काळ-काम-वेगाच्या गणिते
तेव्हा छळिले किती !
मात्र अता सद्गुरू म्हणती की
"काळ असे हो भास"
ऐकुनी अमृतवाणी, सोडिला
सुटकेचा निश्वास
झंझट "काळा"चे गेले की
"काम-वेग" मग उरे
गणित गहन त्याचे सोडविण्या
अहोरात्र मी झुरे
काम-वेग गणिताची चर्चा
कशी सदगुरूपाशी?
(अध्यात्माच्या शिखरावर ते!
का भ्रष्टावे त्यांसी?)
अध्यात्मातील पेच नवा हा
रोज अम्हाला छळतो
रजनीशांचे ग्रंथ उशाशी
घेऊनी सध्या निजतो!
- Read more about सद्गुरूवाचोनी सापडली सोय
- 10 comments
- Log in or register to post comments
- 7325 views
आस
अशाच या कातरवेळी
निशब्द असावा
आसमंत सारा
त्यासमयी रवि तु
क्षितिजाच्या कुशीत निजावा
रवि तुज निजवताना
वारा ही गाई झुळझुळ गाणे
ती लुकलुकणारी कोर ही
बघ तुज कथा सांगे
अशाच एका कातरवेळी
बघ. कोण पणती
त्या तुळशीसमोर लावे
मंद अश्या त्या प्रकाशात
माझा ऊर भरुन वाहे
तेव्हा दुरवर कोठेतरी
मज ऐकु येते ती किणकिणारी घंटा
'आस' लागे मनास कान्हा
तसाच ऐकु येईल का रे मज
एक दिन तुझा मधुर पावा..
-दिप्ती भगत
(९मे, २०२०)
- Read more about आस
- 10 comments
- Log in or register to post comments
- 5102 views
रेंगाळतो आहे..
आजतोवर वाचलास तु
हा एक योगायोग आहे
एक नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे
भरल्यापोटीचे तुझे भुकेचे डोहाळे
काही केल्या संपत नाहीत
डोळे उघडुन बघ जरासे
गरजुंची आज दैना आहे
एक नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे
अपेयासाठी रांगा लावुनी
काय तु कमावतो आहेस?
आज तु वाचलास परि
तु उद्याचे बुकींग करुन ठेवतो आहेस
जीवाचा आटापिटा करत
तुझ्याच हितासाठी
देव स्वतः झुंजतो आहे
तरीही क्षुल्लक कारणे देऊन
तु रस्ते धुंडाळतो आहेस
क्षणभर नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे..
- Read more about रेंगाळतो आहे..
- Log in or register to post comments
- 1378 views
पत्रकारांच्या नोकऱ्या जाताहेत
Taxonomy upgrade extras
गेल्या तीन महिन्यांत दैनिकांची छपाईच बंद झाली, त्यामुळे खप नाही, जाहिराती नाहीत आणि उत्पन्न नाही म्हणून खर्च कमी करा हे धोरण राबवले जात आहे. लॉकडाउन संपल्यावर ताबडतोब दैनिकांचे उत्पन्न पुन्हा मूळपदावर येईल, अशी शक्यता नाही परंतु म्हणून अशी कत्तल करणे, हे मात्र माणुसकीला धरून नाही.
- Read more about पत्रकारांच्या नोकऱ्या जाताहेत
- 37 comments
- Log in or register to post comments
- 31798 views