Skip to main content

साक्षात्कार

फर्रुखाबादच्या बस स्टँडवर गेलो तर कायमगंजला जाणारी बस गच्च भरली होती. मी कसाबसा आत शिरलो आणि उभा राहिलो. माझ्यानंतरही लोक चढत राहिले. कल्पना करता येणार नाही, इतक्या प्रमाणात बस आणखी आणखी भरत गेली. पुढच्या दरवाजाने कंडक्टर आला. एकेकाला पोस्टाच्या स्टँपच्या आकाराचं तिकीट देऊ लागला. मी मागच्या दरवाजाशी. गर्दीतून हा इथे कसा येणार, हा प्रश्न मला सुचतो आहे, तेवढ्यात तो उतरला आणि मागच्या दाराने शिरला. त्याने माझ्याकडे पाहिलं.

उंची सामान्य, अंगकाठी किरकोळ, वर्ण सावळा. एकूण वावर सर्वसामान्यासारखा. असा मी.

ललित लेखनाचा प्रकार

भारत आणखी पाच वर्षांची मोदी राजवट सहन करू शकेल?

Taxonomy upgrade extras

मोदी तासीर आतिष आतिश टाईम

टाईम मासिकामधील आतिष तासीर यांच्या लेखातील काही मुद्द्यांशी मी सहमत नसलो तरी या लेखाबद्दल अनेकांना अपार कुतुहल असल्याचे लक्षात येऊन मी त्याचा पूर्ण अनुवाद केला. तो फार सुंदर नसला तरी कामचलाऊ आहे. मोठा लेख आहे. जमलं तर वाचा.

भारत - जगातील सर्वांत मोठी लोकशाही आणखी पाच वर्षांची मोदी राजवट सहन करू शकेल काय?
- आतिष तासीर ९ मे २०१९

मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०१

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

ही बातमी समजली का - भाग १९४

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.

राजीव गांधी, भा नौ पो विराट, लक्षद्वीप, सुट्टी वगैरे...

राजीव गांधींनी आय एन एस विराट विमानवाहु नौकेचा टॅक्सी सारखा वापर केला होता, असा आरोप मोदींनी केल्यानंतर जालावर थोडी शोधाशोध केली. त्यात खालील माहिती मिळाली:

डिसेंबर १६, १९८७

राणी

समोरलं फायकसचं झाड उभं आडवं वाढलंय. गर्द निमूळत्या टोकदार पिंपळमुखी पानांनी तिच्या घराच्या भिंती धुरकटल्यात. हिरव्या कच्च पानात नाचणाऱ्या किरणांच्या पांढऱ्या उभ्या आडव्या रेषा थेट खिडकीवरल्या तावदानाशी संगनमत करतात. टीचभर घर झळाळतं.तिनं कौतुकाच्या दाणापाण्यात जगवलेली खुजी रोपटी झाडाच्या फांद्याफांद्यांतून डोकावणाऱ्या निळ्या भोट आभाळाचे तुकडे पाहत उगाच इतरतात. कोपऱ्यात दबा धरलेला बोचरा वारा तुकड्या तुकड्यातनं शिरत झाडाला गुदगुल्या करतो. झाडं हसतं. इतकं हसतं. हसून पार हिंदकळतं. कबुतरं -कावळे लाडं लाडं थिरकतात. चिमण्या मुरडतात.

पहाटवेळ

हरिततृणांच्या मखमालीचे गार गालिचे सभोवती
अम्बरघुमटी निळीजांभळी रविकिरणे प्रकाशती
विहंग उडती काळेकरडे काव काव काकारव करती
अल्लड पोरवयाचे विभ्रम दवबिंदूही दर्शवती
प्रातःकाळी एकमुखाने गंधर्वही स्वरे गाती
एक-दोन.. क्रम (पंक्तीप्रमाणे) वाचुनी वाचक रागवती

सध्या...

बसवतो मी तुला मानाने माझ्या सिंगल काट्याच्या थ्रोनवर.
खेळतो लुटपुट लढाई तुझ्या वत्सल विशाल थॅनोसशी.
मधल्या बोटानी तुझ्या चिंब लोकशाहीला मतदान करतो.
आणि...
शनिवारच्या तप्त दुपारी लिंचिंगविरहीत राज्याची क्लांत स्वप्नं बघत असतानाच माझा एंडगेम होतो.

-नील आर्ते

भ्ऊलोक-गुड्डूभ्ऊ

।।गुड्डूभऊ।।

( या चित्रणातील गुड्डूभाऊ हे पात्र वास्तविक आहे तरी कोणत्याही काल्पनिक वा स्वप्नील पात्रास पोटदुखी झाल्यास मले 'म्याट' करू नका रे बा! तथापि अनामिकता टिकवून ठेवण्यासाठी मी काही व्यक्ती आणि ठिकाणांची नावे बदलवली आहेत. )

जेव्हा तो डेरीजवळ आहे अशी खबर लागली, तेव्हा मैदानात बेंचवर बसलेली पोरं भामट्यासारखी सैरा-वैरा पळत सुटली. पळता पळता टकल्याची स्लीपरही निसटली... ती स्लीपर तो हातातच घेऊन जोडता जोडता पळत होता...

ललित लेखनाचा प्रकार