यंदा कर्तव्य आहे
(शर्वरी कुणाची तरी वाट बघत एकटीच एका कॉफी-हाउस मध्ये बसलीय. तिने पंजाबी ड्रेस किंवा not too modern, not too traditional अशा पोशाख घातलाय. अधून-मधून घड्याळाकडे बघतेय, इकडे-तिकडे बघतेय, कॉफीचा सिप घेतेय.. तिच्यासमोर एक बझ्झर ठेवलाय, गेम शोमध्ये असतो तसला. एक तरुण आत शिरतो, इकडे-तिकडे बघतो आणि शर्वरीपाशी येतो. एकच मुलगा सगळ्या मुलांची भूमिका करतो. मुलाने बोलण्या-वागण्यातल्या विविधतेने पात्रांमध्ये रंगत आणावी).
मुलगा १: आपण शर्वरी का?
शर्वरी: हो. आणि आपण...अविनाश?
मुलगा १: हॅलो (मुलगा हात पुढे करतो).
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about यंदा कर्तव्य आहे
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3277 views
काही चित्रपटीय व्याख्या
संशोधनातील पुढचा भाग, खास जनहितार्थ. आधीच्या संशोधनाची लिन्क इथे आहे. गाणी वगैरे ऐकताना लोकांना प्रश्न पडतात की तेरी मैफिल मे म्हणजे नक्की कोठे. तेथे ही माहिती उपयोगी पडेल. गेल्या काही दिवसांत वाचकांनी "प्रेमात पडल्यावर सजदे नक्की कधी करतात?", "तिच्या मैफिलीत जायचे आहे. काय तयारी करून जाऊ?", "जानेजा जास्त भारी की जानेजहॉ?" असे अनेक प्रश्न विचारले. म्हणूनच हा लेखप्रपंच.
तर काही गाण्यांमधून व डॉयलॉग्ज मधून नेहमी ऐकू येणार्या शब्दांच्या व्याख्या.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about काही चित्रपटीय व्याख्या
- 19 comments
- Log in or register to post comments
- 27357 views
वलय (कादंबरी) - प्रकरण ७
प्रकरण ६ ची लिंक: http://www.aisiakshare.com/node/6463
--
प्रकरण ७
सोनी, सुप्रिया आणी रागिणी रहात असलेले ते वर्किंग विमेन्स हॉस्टेल असल्याने तेथे जायला यायला वेळेची बंधने नव्हती कारण मुंबई सारख्या शहरात आजकाल कामानिमित्त लोक दूर प्रवास करतात आणि आजकाल स्त्रीयासुद्धा पुरूषांच्या बरोबरीने दिवस रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात. पण हॉस्टेलवर कुणाला भेटायला बोलवायचं असेल तर मात्र नियम होते.
त्या दिवशी सुप्रिया पुण्याला गेलेली होती आणि रागिणी गेले दोन दिवस सूरजच्या फ्लॅटवर होती.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about वलय (कादंबरी) - प्रकरण ७
- Log in or register to post comments
- 6256 views
हॅना आरेण्ट आणि हुकुमाची ताबेदारी (Obedience To Authority)
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about हॅना आरेण्ट आणि हुकुमाची ताबेदारी (Obedience To Authority)
- 7 comments
- Log in or register to post comments
- 6916 views
सध्या काय ऐकताय / अलीकडे काय ऐकलंत? - १०
Taxonomy upgrade extras
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.
---
.
हे आज लतादीदींनी त्यांच्या फेबु पेज वर शेअर केलं होतं.
.
भिमण्णा व जसराज.
.
- Read more about सध्या काय ऐकताय / अलीकडे काय ऐकलंत? - १०
- 99 comments
- Log in or register to post comments
- 132727 views
आयायटी, दक्षिणा आणि MCPपणा
एके काळी अनेक मित्र-मैत्रिणींच्या घरी मी आणि भाऊ एकत्र जायचो. कधी जेवायच्या वेळेस असलो, तर त्या घरचे लोक जेवायला घालायचेच. काही घरांमध्ये भावाला बारकी दक्षिणाही मिळायची.
मला पैशांबद्दल असूया नव्हती, पण मला मान का नाही मिळत! एका जवळच्या मित्राच्या घरी भावाला पैसे मिळायचे; त्याच मित्राला विचारलं. तो म्हणाला, "तुला आता लग्न झाल्यावरच दक्षिणा मिळेल." मित्रही ओवाळून टाकलेला. आम्ही दोघं हसलो.
हा मित्र आयायटीमध्ये शिकलाय.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about आयायटी, दक्षिणा आणि MCPपणा
- 21 comments
- Log in or register to post comments
- 15302 views
वलय (कादंबरी) - प्रकरण ६
प्रकरण ५ ची लिंक: http://www.aisiakshare.com/node/6457
---
प्रकरण 6
एके दिवशी “चार थापडा सासूच्या” साठी रात्री तीन वाजेपर्यंत राजेशने लॅपटॉप वर लिखाण केले. जवळपास दहा एपिसोड तीन दिवसांत लिहून झाले होते. एपिसोडिक स्टोरी आणि स्क्रिप्ट अशा दोन्ही गोष्टी त्याने पूर्ण केल्या. रात्री जास्त वेळ जागून त्याने एकदम तीन एपिसोड पूर्ण झाले.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about वलय (कादंबरी) - प्रकरण ६
- Log in or register to post comments
- 3628 views
"असं वाटायचं"
(भाषांतर: मिलिंद पदकी)
आम्हाला वाटायचं की "हे सगळं " ठीक करण्यासाठी
साध्या बोलण्यातही व्याकरण-शुद्ध वाक्येच वापरावीत ,
चालताना किंवा स्कूटर वरून जाताना पाठीचा कणा
शक्य तेव्हढा ताठ ठेवावा,
अशांत आणि अराजकाच्या बातम्या धैर्याने झेलाव्यात
खोट्या मतदानासाठी पोलिंग बूथमध्ये घुसणाऱ्या गुंडांना
आरडा-ओरडा करून हाकलून लावावे
भूतकाळातील घटना आणि त्यांचे संदर्भ आठवणीत ठेवावेत
अकस्मात आनंदही उसळू द्यावा
चमचेगिरी सोडावी
आपापल्या कारणांनी विकल झालेल्या लोकांबरोबर
माणुसकीने वागावे
एव्हढे बास झाले.
- Read more about "असं वाटायचं"
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2074 views
आजचे दिनवैशिष्ट्य - १२
Taxonomy upgrade extras
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.
---
.
- Read more about आजचे दिनवैशिष्ट्य - १२
- 101 comments
- Log in or register to post comments
- 116926 views
दुसर्या एका डायरीतले दुसरे एक पान.
आज जेवणे जरा उशीरानेच झाली. आमच्या ह्यांना पोटात जरा गॅसेस झाल्यासारखे वाटत होते. जेवणाच्या सुटीत आले तरी लवकर पाटावर बसण्याचे काही होत नव्हते. दिवाणखाण्यात त्यांना छोटीकरवी निरोप पाठवला होता लवकर पाटावर या म्हणुन. नेमके हे असे होते. दुपारच्यावेळी सासरे, दीर, तिकडची स्वारी सगळे झी न्युज पहात बसतात आणी मग असा उशीर होतच रहातो. आपण मेहनतीने भजी बनवावी आणि ती गरम गरम ताटात जातील असे पहावे तर ह्यांचे असे. कालची उसळ बाधली असावी त्यामुळेच झाले असेल किंवा मग सकाळी केलेले दडपे पोहेही असतील. पण सकाळचे दडपे पोहे बाधायचेच असतील तर संध्याकाळ तरी लागेल. त्यामुळे ही उसळच... असे मला तरी वाटते.
- Read more about दुसर्या एका डायरीतले दुसरे एक पान.
- 22 comments
- Log in or register to post comments
- 14349 views
