"ॐ श्री शतायुषी स्तोत्र"
भीमरूपी महारुद्र / हनुमान तो वीरभद्र
त्यासि वंदून हे स्तोत्र / ठेविले जे जगापुढे
शतायुषी कसे व्हावे / कोलेस्टेरॉल मोजावे
आणि त्यासी रोखावे/ दोनशेच्या आत ते
रुधिरमात्रा त्याची येते / अन्नातुनी वीस टक्के
आणि बाकी ऐंशी टक्के / शरीरचि बनवे पां
प्राणिज पदार्थ नच खावे/ लाल मांस टाळावे
चिकन तेही कमी खावे / कोलेस्टेरॉल सर्वत्र
कमी स्निग्धांशाचे दूध / एक टक्का दोन टक्के
लक्षात ठेवावे पक्के / डेअरी मध्ये जाताना
बाकी ऐंशीचे काय / त्यानेच बुडत्यात पाय
स्टॅटिन औषधे माय / त्याच्यासाठीच बनविली
रक्तदाब मोजावा / अती चढू नच द्यावा
- Read more about "ॐ श्री शतायुषी स्तोत्र"
- 4 comments
- Log in or register to post comments
- 7482 views
कृपादृष्टी
काळा आणि गोरा / दोघे ते बेघर
पांघराया पेपर / टाइम्सचा
झोपायला होता / फुटपाथ दगडी
गरम शेगडी / कुठे नाही
कचऱ्यात मिळाला / चिकनचा तो तुकडा
लॉट्रीचा आकडा / लागला की!
उंच इमारती / आभाळी चढती
बडे विसावती / त्यांच्यामध्ये
त्यांवर ते दिसे / मोकळे आभाळ
विराट सकळ / फांकलेले
बर्फाळ ती थंडी / चढू जी लागली
शुद्ध हरपली / दोघांचीही
दोघांवर होई / "त्या"ची कृपादृष्टी
मोठी हिमवृष्टी / सुरु झाली
सकाळी मिळाली / थडगी ती सुंदर
एकाला शेजार/ दुसऱ्याचा
पोलीसवाला म्हणे / माझीच ही गल्ली
कशी सापडली / चोरांना ह्या. .
xxx
- Read more about कृपादृष्टी
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4226 views
"वाग्युद्ध" (विंदांची क्षमा मागून!)
ट्रम्प ने उचलला भला मोठा सोटा
म्हणाला मी बायबलचा देवच जणू मोठा!
किमनेही उचलला मोठा थोरला गोटा
म्हणाला मी तुझ्याहून सेनापती मोठा!
चिंचेवरल्या माकडाने त्यांचा ओढला पाय,
म्हणले " आधी हेअर कट्स सुधाराल काय"?
- Read more about "वाग्युद्ध" (विंदांची क्षमा मागून!)
- Log in or register to post comments
- 1732 views
"पतीच्च समुप्पाद"
भाषा पाहिजे, संस्कृति नको
भांडवल पाहिजे , संस्कृति नको
बहुराष्ट्रीय बाज़ार पाहिजे , संस्कृति नको
भूमंडलीकृत व्यापार पाहिजे , संस्कृति नको
पॅंटी बरोबर शर्ट पाहिजे
शर्टखाली बनियन
आकाश मोजायची ताकद पाहिजे,
आणि जगाच्या अजस्त्र बाजारात मिळाले तर
हवे आहे माणसाच्या जगण्यासाठी
थोडेफार अगत्य !
सकल भूमंडलाच्या विचार-यात्रेसाठी
हवे आहे एक यान
- हीन किंवा महान
पतीच्च समुप्पादाच्या वर्तमानकालीन व्याख्येसाठी
हवा आहे एक नवा व्युत्पन्न बुद्ध !
- Read more about "पतीच्च समुप्पाद"
- 11 comments
- Log in or register to post comments
- 12103 views
डाळिंब-हृदय
पहिल्याच डेट -भेटीच्या दिवशी त्याने जेंव्हा आपले
डाळिंब-हृदय उघडून प्लेटवर ठेवले तेंव्हा तिच्या कपाळावर
सूक्ष्मशी आठी उमटली ("फार लवकर होतंय हे!). निर्विकार
काट्याने जरा बऱ्या दिसणाऱ्या बिया ती उकलत राहिली,
शिक्षण, ते घेताना झालेला त्रास, पैशाची टंचाई,
भावाने केलेली फसवणूक, इंग्रजी साहित्यातला इंटरेस्ट,
तासाभराने तिने प्लेट बाजूला सरकवली, वेटरला खुणाविले ,
"नाही, मी मोबाईल नंबर देत नाही कुणाला ,
इमेल आहेना माझी तुमच्याकडे- आणि सध्या ना,
जरा बिझीच आहे मी" म्हणत उठली.
दुसऱ्या दिवशी मैत्रिणीने डेटबद्दल विचारल्यावर म्हणाली
- Read more about डाळिंब-हृदय
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3785 views
ही बातमी समजली का - भाग १६६
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.
- Read more about ही बातमी समजली का - भाग १६६
- 123 comments
- Log in or register to post comments
- 126544 views
संबंध मानवी मुंडक्याचे दुसऱ्या एका कबंधावर आरोपण
इटलीचे सर्जिओ केनावेरो आणि चीनचे शाओपिंग रेन हे दोन शल्यविशारद डिसेंबर २०१७ मध्ये पहिले संबंध मानवी मुंडक्याचे दुसऱ्या एका कबंधावर आरोपण करणार अशी बातमी गाजत होती. मेंदूकडून मज्जारज्जूमधून (spinal cord) शरीराच्या निरनिराळ्या भागांकडे सुमारे २ कोटी मज्जातंतू (axons) जातात. त्यामुळे मुंडक्याचा योग्य तो मज्जातंतू कबंधाच्या योग्य त्या तंतूला जोडणे हे आजच्या तंत्रज्ञानाला अशक्य आहे, त्यामुळे चुकीची जुळणी होऊन पेशंटला अतोनात यातना होत राहतील, त्यामुळे या उद्योगात पडू नये, अशी इतर सर्व तज्ज्ञांची धारणा होती.
- Read more about संबंध मानवी मुंडक्याचे दुसऱ्या एका कबंधावर आरोपण
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4839 views
"किंडल" (आणि इतर इ-बुक्स) वर सहजपणे लेख लिहून जगभर विकता येतात.
हे सर्व माननीय सदस्यांस माहिती असेलच. पण तरीही:
अमेझॉन "किंडल" (आणि इतर ईबुक फॉरमॅट्स) वर सहजपणे लेख लिहून जगभर विकता येतात.
- Read more about "किंडल" (आणि इतर इ-बुक्स) वर सहजपणे लेख लिहून जगभर विकता येतात.
- 26 comments
- Log in or register to post comments
- 30218 views
वलय (कादंबरी) - प्रकरण १
(सिने टीव्ही श्रेत्रावर आधारित माझ्या "वलय" या कादंबरीचे दर सोमवारी आणि शुक्रवारी एक प्रकरण येथे क्रमशः प्रसिद्ध करण्यात येईल - निमिष सोनार)
कादंबरी वाचायला सुरुवात करण्याआधी –
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about वलय (कादंबरी) - प्रकरण १
- 2 comments
- Log in or register to post comments
- 5316 views
ॲडव्हर्स सिलेक्शन बद्दल .....
यापूर्वी आपण मोरल हझार्ड बद्दल चर्चा केली. मोरल हझार्ड चा भाऊ आहे ॲडव्हर्स सिलेक्शन. कारण दोघांच्या मुळाशी एकच संकल्पना आहे. ॲडव्हर्स सिलेक्शन हे समजायला थोडे गहन आहे. तेव्हा उदाहरण देऊन सांगतो. सेकंड हँड कार चे मार्केट डोळ्यासमोर आणा. आता सेकंड हँड कार घेऊ इच्छीणाऱ्या ग्राहकासमोर एकाच मेक व मॉडेल च्या दहा सेकंड हँड गाड्या उपलब्ध आहेत असं समजा. आता या ग्राहकाला हे कसं कळणार की यातली कोणत्या गाडीचा दर्जा उच्च आहे व कोणत्या गाडीचा दर्जा खराब आहे ते ? ती माहीती फक्त विक्रेत्याकडेच असणार व विक्रेता खरं सांगेल हे कशावरून ? परिणामत: ग्राहक हा सरासरी किंमतीपेक्षा जास्त दाम द्यायला अनुत्सुक असेल.
- Read more about ॲडव्हर्स सिलेक्शन बद्दल .....
- 16 comments
- Log in or register to post comments
- 16238 views