Skip to main content

मनाच्या अंतर मनात.......

आयुष्याचा प्रवास ऐन उमेदी च्या वर्षात आल्यावर बऱ्या पैकी जीवना शी ओळख झालेली असते उमेदि ची म्हणाल तर ज्या वयात काही तरी करून दाखवन्या ची प्रचंड इच्छा शक्ति मनात असते साधारणता 22-28 या वयात,आणि मन ही भविश्या तिल आरा खडे बांधन्यात रम मान होउन जाते, कधी हळूच गेलेल्या 20-25 वर्षा तिल अत् भुत चांगल्या वाइट आठ वणी मध्ये गुंतुन जाते ,ये नाऱ्या भविश्या ला ही चांगल्या वाईट आठ वणी ची किनार च असतेजस जसे मोठे होत जाउ तस अनेक गोष्टी शी सबंध येतो , गोष्ट म्हणं न जरा चुकीच् ठरेल कारन सगळ आयुष्य निघुन जात तरी त्या गोष्टि ना आपण स्पर्श करू शकत नाही पन अचर्या ची बाब म्हणजे आपल आयुष्य अगदी शेवट च्या क्षना प

ललित लेखनाचा प्रकार

राम बहादुर थापा च्या केस च्या निमीत्ताने

Taxonomy upgrade extras

ओरीसातील बालासोर जिल्ह्यातील रासगोविंदपुर या गावात एक वापरात नसलेले विमानतळ होते. तिथे मोठ्या प्रमाणावर असलेल्या किंमती भंगारमालाची राखण करण्यासाठी दिबाकर व गोविंद या दोन चौकीदारांना नेमलेले होते. या विमानतळाच्या सभोवतालच्या परीसरात संथाळ इ.आदिवासींची मोठ्या प्रमाणात वस्ती होती. या लोकांचा भुताखेतांवर विश्वास होता व या उजाड विमानतळावर भुताखेतांचा वास आहे अशी त्या परीसरात समजुत पसरलेली होती. एक दिवस कलकत्त्याच्या चटर्जी फ़र्म कडुन एक जगतबंधु चटर्जी नावाचा माणुस त्याचा नेपाळी नोकर राम बहादुर थापा बरोबर येथील भंगारमाला च्या खरेदीसाठी गावात दाखल झाला.

ग्रेसफुल एजिंग

"ममा - ग्रेसफुल एजिंग चा अर्थ काय?" माझ्या १६ वर्षीय मुलीकडून हा प्रश्न अनपेक्षित होता. पण प्रश्न विचारल्यावर माझ्या डोळ्यासमोर माझ्या एजिंगची एकदम फिल्लमच चमकून गेली. म्हणजे केस काळे करायचा केलेला आटापिटा आणि पार्लरमध्ये भरमसाठ पैसे देऊन, पर्स रिकामी करुन आल्यावर घरी आरशात बघताना दिसणारे पांढरेशुभ्र केस पाहून होणारी तणतण. आतापर्यंत केलेले "फक्त कॉटेज चीझ डाएटींग" कुठे "नो बटाटा आणि भात डाएटींग", "पानात घेतलेल्याच्या अर्धच खायचा केलेला निश्चय आणि तो पूर्ण करण्याच्या भरात मूळातच तिप्पट भरुन घेतलेली प्लेट" ......... अन या सर्व सव्यापसव्यानंतरही "वाढता वाढता वाढे , भेदिले शून्यमंडळ" जाडी.

गुप्त डायर्‍या आणि सापडलेले संकल्प

२०१६ मध्ये ऐसीकरांनी काय संकल्प केले ते या धाग्यावरती कृपया सविस्तर लिहावेत. तुमच्यापैकी काहीजणांच्या गुप्त डायर्‍या सापडल्याने मला त्यांच्यात्यांच्या संकल्पाची छुपी माहीती अगोदरच मिळाली आहे एवढेच नाही तर काहींच्या संकल्पाचा कसा बाजा वाजला आहे तेदेखील सप्रमाण सिद्ध झाले आहे.
.
(१) मनोबा - यावर्षी एक जरी प्रश्न विचारला तर नावाचा मनोबा नाही.

फुसके बार – ०१ फेब्रुवारी २०१६ - जेवणावळींवरील अफाट खर्च, केस कापण्यासाठी योग्य दर, वगैरे

फुसके बार – ०१ फेब्रुवारी २०१६ - जेवणावळींवरील अफाट खर्च, केस कापण्यासाठी योग्य दर, वगैरे
.

१) लग्नातल्या जेवणावळी

मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. आजकाल आहेर आणू नये म्हणून सांगितले जाते. तर मग अशा कार्यक्रमांना सकुटुंब सपरिवार जाणे योग्य आहे का? आज पुण्यात अशा कार्यक्रमातील ताटाचा दर २०० ते ६०० रूपये आहे, तर मुंबईत त्याच मेनुसाठी हा दर ४०० ते १,००० आहे असे कळते. तुमची ‘हौस’ किती त्याप्रमाणे हा दर आणखीही वाढू शकतो.

प्रादेशिक राष्ट्रवादाचे सनई चौघडे

सध्या टेलिव्हिजनवर साऊथ डब चित्रपट मोठ्या प्रमाणात दाखवले जातात. त्यातला एक चित्रपट पाहण्यात आला. एक स्थानिक ‘तेलुगू’ डॉन (नागार्जुन) एका पाकिस्तानी डॉनचा बस्तान मांडण्याचा बेत कसा उधळून लावतो, असं काहीसं कथानक होतं. काही दिवसांनी मला त्या चित्रपटाची ‘तेलुगू’ प्रत बघण्याची संधी मिळाली. मूळ ‘तेलुगू’ सिनेमा बघितल्यावर मला धक्का बसला. कारण ‘डब वर्जन’मध्ये पाकिस्तानमधून आलेला खलनायक, मूळ तेलुगू सिनेमात मुंबईवरून आलेला दाखवला होता. हे धक्कादायक होतं...

ललित लेखनाचा प्रकार

शाकाहारवाद्यांची असत्ये आणि मांसाहाराचे सत्य

Taxonomy upgrade extras

इतरांनी काय करावं, कसं वागावं हे सांगण्याची माणसांना फार हौस असते. यात आपल्याला ज्याचा चांगला अनुभव आला आणि फायदा झाला ते इतरांना सांगावं असा सद्भाव मनात असल्यामुळे वैयक्तिक पातळीवर काही सांगावं हे ठीकच म्हणायचं. पण ते सांगतानाही आपला अनुभव तर्कसंगत होता का, जो फायदा झाला त्यातील कार्यकारण भावाची सत्यता खरीच आहे कां, हे मुद्दे महत्त्वाचे असतातच. ते तपासून मगच ती माहिती इतरांना देणे हा झाला ज्ञानप्रसार. सत्यता न पडताळता एखाद्या गोष्टीचा श्रध्दात्मक आग्रह धरून सांगत रहाणे म्हणजे अंधश्रध्देचाच प्रसार.

व्हर्जन

कोड करता करता कंटाळून सुमितने घड्याळात पाहिलं. पावणेचार. आजूबाजूला त्याने एक नजर टाकली. एक-दोघांना खुणेनंच “येतो का?” म्हणून विचारलं. पण नाही. एकटाच कॉफी घेण्यासाठी तो मशिनजवळ आला. बटन दाबून ‘मग’ भरेपर्यंत एकटक तिकडे पाहत राहिला. कॉफी आणि बिस्किटं घेऊन वळला आणि एकदम हबकलाच.

ललित लेखनाचा प्रकार