Skip to main content

झेन कविता

खरं तर "The Graduate" सिनेमा, पहाटे उठून पहायलाच नको होता. आता दिवसभर डोक्यात रहाणार शिवाय तरुण "Dustin Hoffman" आठवत रहाणार. सिनेमा चांगला होता प्रश्नच नाही. एका सुंदर मध्यमवयीन स्त्रीने, तिचा मुलगा शोभेल अशा तरुण मुलाला seduce करणे - त्याचं भांबावलेपण, क्षीण विरोध आणि त्या पार्श्वभूमीवरचा तिचा आत्मविश्वास, क्वचित जरब आणि हुकूमत - तिनेच त्याला भरीस पाडणं - त्याचं ते पहीलं निळ्या निळ्या पाण्यात पोहण्याचं साहस - निव्वळ intense आणि काव्यमय.
.

ललित लेखनाचा प्रकार

शिवस्वरूप खंडोबा - एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति"

इंद्रं मित्रं वरुणं अग्निं आहुः अथो इति दिव्यः सः सुऽपर्णः गरुत्मान् l
एकं सत् विप्राः बहुधा वदंति अग्निं यमं मातरिश्वानं आहुःl
(ऋग्वेद १/१६४/४६)

[सत्य स्वरूपी ईश्वर एकच आहे, पण ज्ञानीं लोक त्याला इंद्र, मित्र, वरुण आणि अग्नि असें म्हणतात. देवलोकीं राहणारा सुंदर पंखांचा पक्षीही तोच. जगातील विभिन्न जाती पंथातले लोक त्याला विभिन्न नावांनी ओळखतात. कुणी त्याला अग्नी, कुणी यम, कुणी खुदा, कुणी गॅाड, कुणी वाहेगुरू या नावाने ओळखतात. कुणी 'खंडोबा' या नावानेहि].

रॉकस्टार : फिर से उड चला

"फुकट तिकिटाच्या मोहाने माणूस काय काय करेल सांगता येत नाही रे. 'आ अब लौट चले' किंवा 'कोयला' जर मी २-२ वेळा थेट्रात बघू शकतो तर रॉकस्टार का नाही?", एरवीदेखील तिडीक आणणार्‍या लक्ष्मीकांत बेर्डे सुरात जेव्हा माझा मित्र मला हे सांगायला लागला, तेव्हा मला त्याच्या इंटरनेट कनेक्शनचा गळा घोटावासा वाटला. साली एवढीशी तर असते इथरनेट केबल. दोन मिनिटात खेळ खलास.

पण ती उर्मी आवरल्यावर मी त्याच्याच हातचं वडासांबार खाता खाता दोन मिनिटं आत्मचिंतन केलं. मला तरी पहिल्यांदा कुठे आवडलेला रॉकस्टार?
गाडीत सदैव ती रॉकस्टारी गाणी वाजवणार्‍या मित्राला मी "गाडी किंवा गाणी" असा अल्टिमेटम दिलाच होता ना?

समीक्षेचा विषय निवडा

प्रेस्टिट्यूट्स, मोदीद्वेष्टे, विचारजंती, सिक्युलर - बातम्या

अनेक लोक अनेक वेळा अनेक ठिकाणी काहीतरी निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्खपणाची विधानं करतात. कधीकधी या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणांपायी नसताना हातापायीही होते. कधी हे प्रकरण तिथेच न थांबता दंगे होतात, ऑफिसं तोडली जातात, हल्ले होतात, बसेस जाळल्या जातात, खूनही पडतात. आजकाल या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणा करण्यात प्रेस्टिट्यूट्स, मोदीद्वेष्टे, विचारजंती, सिक्युलरना ऊत आलेला आहे. तर हा धागा अशांची विधानं, कृत्यं, घोषणा वगैरेंची चेष्टा किंवा निषेध यांचं एकत्रित संकलन करण्यासाठी काढलेला आहे.

संघ दक्ष, बातम्यांकडे लक्ष

अनेक लोक अनेक वेळा अनेक ठिकाणी काहीतरी निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्खपणाची विधानं करतात. कधीकधी या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणांपायी नसताना हातापायीही होते. कधी हे प्रकरण तिथेच न थांबता दंगे होतात, ऑफिसं तोडली जातात, हल्ले होतात, बसेस जाळल्या जातात, खूनही पडतात. आजकाल या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणा करण्यात हिंदुत्ववादी, संस्कृतीरक्षक, कट्टर राष्ट्रवादी संघटनांना, आणि मोदीभक्तांना ऊत आलेला आहे. तर हा धागा अशांची विधानं, कृत्यं, घोषणा वगैरेंची चेष्टा किंवा निषेध यांचं एकत्रित संकलन करण्यासाठी काढलेला आहे.

नेता

बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

त्याच्या
एका हातात खंजीर आहे
दुसर्या हातात
नागाचा विषारी दंश आहे
एका क्षणी शिव्या देतो
दुसर्या क्षणी मधाळ बोलतो.
धृतराष्ट्री पुतळा तो
नेहमीच समोर ठेवतो.
तो मित्र आहे कि शत्रू
काहीच कळत नाही.
एक मात्र खरं
तो सीजर नक्कीच नाही
ब्रुटस असू शकतो कदाचित्
किंवा
नेताहि असू शकतो.

रक्तदाब, नाडीचे ठोके यांसंदर्भात शंका

Taxonomy upgrade extras

या प्रश्नांची गूगल करून उत्तरं मिळतील याबद्दल खात्री आहे. पण नक्की काय गूगल करायचं आणि कोणावर विश्वास ठेवायचा इथपासून थोड्या शंका आहेत, शिवाय बराच आळस आहे म्हणून इथेच धागा काढलाय.

सामान्य स्थितीतला माझा रक्तदाब आणि नाडीचे ठोके सरासरीपेक्षा कमी असतात. सहज चालण्याची जी गती आहे त्या गतीने तासभर चालत डेंटिस्टकडे गेल्यावर तिथे रक्तदाब, नाडीचे ठोके मोजले जायचे ते १२०/८०, ७२-७५ असे यायचे. रक्तदाब नियमितपणे मोजायचं उपकरण माझ्याकडे नाही. नाडीचे ठोके ट्रेडमिलवर मोजता येतात. वीसेक मिनीट ४.५ मैल/तास (~ ७.२५ किमी/तास) या वेगाने धावल्यावर ठोके ~ ९०/मिनीट एवढे असतात.

चेहेरे (भाग २)

मुखवटे - भाग १

खरडफळ्या‌वरची गौरी/महालक्ष्मी चर्चा वाचून काही महिन्यांपूर्वी काढलेले हे फोटो आठवले.

लहानपणी गौरी, गौरी जेवणं, त्यांच्या निमित्ताने झालेली हळदीकुंकू (विधवांना हळदीकुंकू लावायचं नसतं हे ज्ञान) हे सगळं आठवलं. त्या वयात जे नीट समजलं नव्हतं, हे सगळे देव असे एयरब्रश केलेले का असतात, या देवांच्या चेहेऱ्यावर एवढा बालिश निरागसपणा का असतो, हेही प्रश्न आठवले. त्या निमित्ताने हे दोन धागे.

१.

स्पर्धा का इतर?

मुखवटे (भाग १)

खरडफळ्या‌वरची गौरी/महालक्ष्मी चर्चा वाचून काही महिन्यांपूर्वी काढलेले हे फोटो आठवले.

लहानपणी गौरी, गौरी जेवणं, त्यांच्या निमित्ताने झालेली हळदीकुंकू (विधवांना हळदीकुंकू लावायचं नसतं हे ज्ञान) हे सगळं आठवलं. त्या वयात जे नीट समजलं नव्हतं, हे सगळे देव असे एयरब्रश केलेले का असतात, या देवांच्या चेहेऱ्यावर एवढा बालिश निरागसपणा का असतो, हेही प्रश्न आठवले. त्या निमित्ताने हे दोन धागे.

स्पर्धा का इतर?