नाथ संप्रदाय - माहिती हवी
मराठी विकिपीडियावर नाथ संप्रदायाबद्दल जरासा मजकुर आहे अर्थात त्यात भर टाकण्यास खूप सारा वाव आहे. मी स्वतः यावर लगेच काम करणार नसलो तरी दत्त संप्रदाया बद्दल वेगळा दुवा काढतो आहे त्या निमीत्ताने नाथ संप्रदायावरही हा दुवा काढला आहे, इतर मंडळी नाथ संप्रदाय विषयक चर्चा आणि लेखन पुढे चालू ठेवण्याचे स्वागतच असेल.
आपले या धाग्यावरील लेखन प्रताधिकारमुक्त आहे असे गृहीत धरले जाईल.
- Read more about नाथ संप्रदाय - माहिती हवी
- Log in or register to post comments
- 3166 views
जुन्या मराठीचे नमुने
कलकत्त्याजवळील सेरामपूर छापखान्यामध्ये मिशनरी कामाचा भाग म्हणून अनेक पुस्तके देशी भाषांमधून छापली जात. मराठी शब्दकोश, व्याकरण अशी काही पुस्तके १८०५ ते १८२५ च्या काळामध्ये तेथे छापण्यात आली. 'A Grammar of the Mahratta Language' नावाचे एक पुस्तक १८०५ साली W. Carey, Teacher of the Sungskrit, Bengalee and Mahratta Languages in the College at Fort William ह्यांनी तेथे छापवून घेतले. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये Vidyunath, Cheif Mahratta Pundit in the College at Fort William ह्यांनी लेखकास साहाय्य केले असा उल्लेख आहे. (इंग्रज सत्ताधारी कामास उपयुक्त म्हणून शिक्षक नेनून त्यांच्याकडून देशी भाषा शिकत असत. संस्कृत, मराठी, बंगाली अशा भाषांसाठीच्या शिक्षकांस 'पंडित' आणि फारसी, उर्दू, अरेबिक ह्यांच्या शिक्षकांस 'मुन्शी' असे म्हणत असत. 'हॉब्सन-जॉब्सन' अशा मजेदार नावाच्या शब्दकोशात इंग्रजांच्या वापरातील पण हिंदुस्तानी भाषांपासून निर्माण झालेल्या शब्दांचा संग्रह आहे. तेथे 'मुन्शी',चा उगम अरेबिक 'मुन्सिफ'पासून दाखविला आहे. साधारणतः ह्याच दर्जाचे एतद्देशीय लोक न्यायखात्यातील सर्वात खालच्या पातळीवरच्या 'मुन्सिफ' ह्या हुद्द्यावर नेमले जात.) व्यापारी पत्रव्यवहारासाठी Moorh लिपीचा उपयोग सर्वत्र केला जात असला तरी Devu Nuguri लिपि सर्व वरच्या दर्जाच्या पुस्तकांसाठी वापरली जाते आणि व्याकरणातील बारकावे दाखविण्यासाठी ती अधिक उपयुक्त आहे म्हणून पुस्तक त्या लिपीमध्ये आहे असाहि उल्लेख प्रस्तावनेमध्ये आहे. पुस्तक books.google.com येथे e-book ह्या स्वरूपात येथे उपलब्ध आहे.
पुस्तकाच्या अखेरीस काही पानांवर भाषा कशी बोलली आणि वापरली जाते ते कळावे म्हणून काही संवाद छापले आहेत. मोल्सवर्थ-कँडी आणि त्यांचे पंडित ह्यांनी वळण लावण्यापूर्वी मराठी भाषा कशी होती हे दिसावे, तसेच तत्कालीन व्यवहारांची माहिती व्हावी अशासाठी त्यातील दोन संवाद खाली चित्ररूपाने चिकटवीत आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about जुन्या मराठीचे नमुने
- 14 comments
- Log in or register to post comments
- 9130 views
मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास
- Read more about मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास
- 32 comments
- Log in or register to post comments
- 26192 views
कृष्णा नदी
मराठी विकिपीडियावरील कृष्णा नदी बद्दलच्या ज्ञानकोशीय लेखात माहिती जमा होण्यास बराच कालावधी लागला आहे.
- Read more about कृष्णा नदी
- 21 comments
- Log in or register to post comments
- 30249 views
मराठी चित्रपटांची/मालिकांची मुलगा-सून द्वेष्टी मानसिकता !!!
Taxonomy upgrade extras
"सून-मुलगा अति नालायक आणि वाईट असतात पण आई-वडील-नणंद-जावई ही माणसे देवापेक्षाही श्रेष्ठ आणि आदर्श माणसं असतात" असा संदेश देणारे मराठी चित्रपट बंद होत आहेत आणि मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक प्रगल्भ होत आहेत असे मला वाटायला लागले असतांनाच मध्यंतरी एक "स्वातंत्र्याची ऐशी तैशी" हा चित्रपट आला आणि वाटलं की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहाणार म्हणजेच मराठी चित्रपट हे सून-मुलगा द्वेष्टेच राहाणार!! असे हे चित्रपट नाण्याच्या केवळ एकाच बाजू साठी बनवले जाणारे चित्रपट असतात. नाण्याला दुसरी बाजू असते हेच मुळी त्यांना मान्य नसतं.
- Read more about मराठी चित्रपटांची/मालिकांची मुलगा-सून द्वेष्टी मानसिकता !!!
- 28 comments
- Log in or register to post comments
- 15635 views
११वीचे ऑनलाईन प्रवेश
या वर्षीच्या ११वीच्या ऑनलाईन प्रवेशामध्ये जे असंख्य हास्यास्पद प्रकार झाले आहेत, त्याची फारशी दखल वृत्तपत्रांनी घेतलेली दिसत नाही. प्रवेशसमिती विद्यार्थी आणि पालकांचा असंतोष दाबुन ठेवण्यात यशस्वी झालेली दिसते.
महाविद्यालयातील जागांचे समान वाटप फक्त विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित आहे. अध्यापकवर्गाचे समान वाटप असे होऊ शकेल का? तसं झालं तर शिक्षणातील हाल-अपेष्टांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी समान वाटेकरी होतील.
- Read more about ११वीचे ऑनलाईन प्रवेश
- 22 comments
- Log in or register to post comments
- 8670 views
पर्सनल फायनान्स - भाग २ - प्रतिशब्द
या भागात इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द एकत्र लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.
म्हणजे १ index (सूची?) तयार होईल. आधी इंग्रजी शब्द लिहित आहे, म्हणजे सॉर्टिंगला सोपे पडेल.
माझ्या अंदाजाने भाषांतर केले आहे, चुकले असेल तर कृपया दुरुस्त करावे.
annuity =
asset allocation =
bond =
bonus =
car insurance =
credit card =
debit card =
disability insurance =
estate planning =
health insurance =
home loan = गृहकर्ज
income tax = आयकर
inflation =
insurance = विमा
interest rate = व्याजदर
investment property =
life insurance = आयुर्विमा
loan = कर्ज
micro-lending =
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about पर्सनल फायनान्स - भाग २ - प्रतिशब्द
- 4 comments
- Log in or register to post comments
- 7217 views
पर्सनल फायनान्स - भाग १ - अनुक्रमणिका
प्रेरणा: हा लेख आणि ही टिप्पणी आणि मन्दार यांनी मला केलेली खरड.
प्रस्तावना:
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about पर्सनल फायनान्स - भाग १ - अनुक्रमणिका
- 8 comments
- Log in or register to post comments
- 12764 views
ओळख विकिपर्यटन प्रकल्पाची
विकिपर्यटन (अथवा विकिव्हॉयेज) हा विकिपीडियाच्या बन्धूप्रकल्पांच्या यादीतील त्यातल्या त्यात नवीन प्रकल्प. विकिपीडियातही भौगोलीक प्रदेशांची माहिती असतेच पण विकिपीडियातील संबंधीत लेखांना ज्ञानकोशीय परिघाच्या मर्यादा येतात. विकिपीडियात वर्णनात्मक अलकांरीक लेखन, विशेषणे यांना टाळल जात, विकिपीडियात संदर्भांची/दुजोर्याची बर्याचदा गरज असते. त्या शिवाय प्रेक्षणीय काय ?
- Read more about ओळख विकिपर्यटन प्रकल्पाची
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2975 views
Candy Crush Saga...
Candy Crush Saga --- १
निक्षून नाही बजावूनही
शिवशिवणार्या हातांनी
स्क्रीन टच करून
कॅण्डीज् सरकवायला, जेलीज् उडवायला
सुरुवात केलीच!
न राहिले वेळाकाळाचे भान...
एकेक लेव्हल अनेकदा हरत
जात राहिले पुढे पुढे,
मन मात्र अडकले-थिजलेले
जिथल्या तिथेच !
Candy Crush Saga --- २
दिले भिंतीवर डकवून माझे आत्ताचे स्टेटस म्हणून!
फुटल्या उकळ्या
आनंदाच्या, निर्मितीच्या, उत्सर्जनाच्या...
तेवढीतरी भरपाई झालीच, हरलेल्या खेळींची!
- Read more about Candy Crush Saga...
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3024 views