कशाकशाचा बाजार असावा/नसावा?
Taxonomy upgrade extras
गेल्या दोनतीन चर्चांच्या निमित्ताने हा प्रश्न सध्या ऐसीवर ऐरणीवर आला असला तरी तो कायमच सर्वच मानवजातीला पडलेला प्रश्न आहे. काय खरेदी करावं? काय विकावं? काय विकणं योग्य नाही? काय खरेदी करणं योग्य नाही? हा नुसता बाजार, खरेदीविक्रीचा प्रश्न नाही. कारण खरेदी विक्री व्यापार सर्वसाधारण जनव्यापाराचा एक उपसंच आहे. समाजात वावरताना एकमेकांशी काय प्रकारचं आदानप्रदान व्हावं, हा नीतीमत्तेचा आणि कायद्याचा प्रश्न आहे.
- Read more about कशाकशाचा बाजार असावा/नसावा?
- 81 comments
- Log in or register to post comments
- 37274 views
नार्सिससचा स्वप्नदोष
काचेच्या भांड्यातल्या गोल्डफिशसारखा
विहरतो तो स्वच्छंद लिमिटेड अवकाशात
अन् तापलेल्या सूर्याच्या तोंडावर मिटून कवाडं
प्रतिबिंब पाहतो काचेत अॅनिमिक प्रकाशात
बांधलेल्या आखीव मॅग्नेटिक रस्त्यांवर
गुळगुळीत मॅगलेव्हने जाताना भर वेगात
ऑटोपायलटवर टाकलेल्या आयुष्याला
रस्ता सोडून जायचं येतच नाही मनात
क्षणात रंग बदलणार्या बत्तीस बिटी भिंती अन्
आकार बदलत्या नॅनो फर्निचरच्या गराड्यात
कंटाळाच भरून राहिलेला असतो मख्खपणे
त्याच्या वेल इंजिनिअर्ड पिळदार शरीरात
चौघांचं चौकोनी चतुरस्र कायदेशीर कुटुंब
पसरलेलं जगभर ताणून एकेका कोपर्यात
स्वतंत्र, स्वतःचा असतो तो संपूर्णपणे
- Read more about नार्सिससचा स्वप्नदोष
- 15 comments
- Log in or register to post comments
- 11545 views
हायकू -
१) लहरी वारा
पानांची सळसळ
सशाचा छळ
२) ढगांची हूल
पावसाची चाहूल
भुई निष्प्राण
३) वाऱ्याची गती
निसर्गाची संगती
मन बेभान
४) पाऊस गाणी
धरतीची कहाणी
ऐकते बीज
५) कावळा पाही
चिमणीचं सदन
खुनशी मन
.
- Read more about हायकू -
- 5 comments
- Log in or register to post comments
- 5373 views
गर्भधारणेचे बाजारीकरण
जननक्षमतेचा व्यापार
धाग्याचा प्रकार निवडा:
- Read more about गर्भधारणेचे बाजारीकरण
- 23 comments
- Log in or register to post comments
- 26709 views
" धन्य आज दर्शनाने तुझ्या - "
'
नाम जपलं विठ्ठलविठ्ठल, मी तुला पहाया
रोज मूर्ति बघणे छंदच मनातून माझ्या ||
आज दर्शनाने झाली धन्य धन्य काया
डोळियाचं फिटलं पारणं जीव नाही वाया ||
चाल चालुनी शिणली रे जर्जर ही काया
ध्यास घेतला होता मी, काळजामधुनी या ||
तूच ध्यानि तूच मनी रे पंढरिच्या राया
शेवटी मला पावला देवा तूच विठू राया ||
व्हावं सोनं देहाचं ह्या, वाटले मना या
डोळियाचं पाणी माझ्या, गेलं नाहि वाया ||
धन्य आज दर्शनाने तुझ्या पंढरीत मी या
आनंदानं लोटांगण हे पायावर तुझिया ||
- Read more about " धन्य आज दर्शनाने तुझ्या - "
- Log in or register to post comments
- 2331 views
किंवा असंही असेल
मी डोअरबेल वाजवली आणि पाहिलं की एक डोळा
संशयानं पाहतो आहे माझ्याकडे काहीवेळ स्तब्ध आतून
मला वाटलं की मी चुकीच्या दाराशी आलेय
मी वळत असताना उघडलं दार तर प्लास्टिकचा चेहरा होता
सुंदर सुरकुत्या गमावलेला मला घरात बोलावणारा
रेकॉर्डेड मेसेज सारख्या आवाजात
वाटलं की मी चुकीच्या घरात आलेय
पाणी पिऊन निघाले न जाणे कोणती झाडं होती कडेला
काही रिकामे फास लटकत होते वार्यावर आणि काही
फासांच्या गळ्यांत माणसं होती अजून न उतरवलेली मृत
की मी चुकीच्या रस्त्यावर आलेय
मी उघड्या डोळ्यांनी पाहत होते सगळे आकार
रक्त आणि चिखल आणि घाणीने भरलेले
ऐकत होते कानांनी सगळे मोठे आणि सूक्ष्म आवाज
- Read more about किंवा असंही असेल
- 9 comments
- Log in or register to post comments
- 5822 views
असंच काहीसं होईल...
असंच काहीसं होईल,
चुकून कधी पुन्हा आपली भेट झाल्यावर…
कदाचित, असंच काहीसं होईल,
तुझ्या नजरेला नजर माझी भिडल्यावर…॥ धृ ॥
होईलंच कधी ना कधी भेट,
आयुष्याच्या वेड्या एखाद्या वळणावर…
ओठांवर असेल माझ्या जरासे हसू,
अन असंख्य ओले प्रश्न डोळ्यांच्या काठावर… ॥ १ ॥
चोरशील तू नजर जराशी,
मी काही बोलावयास गेल्यावर…
ओठ शिवले जातील माझे पुन्हा,
तू असं काही वागायला लागल्यावर…॥ २ ॥
तसं तुला काही सुचणार नाहीच,
अन मला देखील नाही काही उमगणार…
बरीच जुनी ठिगळं जातील उसवली,
अन बऱ्याच खोल जखमाही ठस-ठसणार…॥ ३ ॥
जराशी असशील तू बावरलेली,
अन जरा असेन गोंधळलेलो मीही…
- Read more about असंच काहीसं होईल...
- Log in or register to post comments
- 2341 views
अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी
२० तासात ६० हजार हिट्स मिळवणारी एकमेव विनोद सांगणारी वेबसाईट बंद पडण्याची ही कदाचित एकमेव घटना असेल.
- Read more about अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3189 views
जादूटोणा विधेयक आणि वारकरी
आषाढीची वारी चालू असल्यामुळे सध्या वारीविषयीच्या बातम्यांचा सुकाळ आहे. धर्म-जातिभेद वगैरे विसरून वारकरी कसे वारीत सामील होतात, आय.टी.तले लोक कसे दिंडी काढतात वगैरे बातम्यादेखील त्यामुळे फोफावल्या आहेत. पण ह्याच काळात जादूटोणाविरोधातल्या सरकारी विधेयकाला विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात स्थान मिळेल ह्याची शक्यता नाहीशी झाली आहे, आणि त्यामागे वारकरी मंडळींपैकी एक लॉबी कार्यरत आहे.
- Read more about जादूटोणा विधेयक आणि वारकरी
- 28 comments
- Log in or register to post comments
- 11129 views
एक अनुभव
पुण्यातली एक नामांकित दणकट शैक्षणिक संस्था. अध्यक्ष कुलगुरुंच्या कुस्तीत बर्याचदा हापटी खाल्लेले. पण तरीही दणकट. त्यांच्या सात आठ शाळा आणि चार काँलेजच्या कार्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्याँना त्यांनी स्पष्ट आदेश दिलेत. कुठलाच माहिती. अधिकाराचा अर्ज घ्यायचा नाही. जाऊन कितीही आरडा ओरडा करा तिथले कर्मचारी अर्ज घेतच नाहीत. आणि आपली चिडचिडी अवस्था मस्त एण्जाँय करतात. असाच अर्ज घेऊन गेलो. जानेवारी २०१२ ला. आवक/जावकच्या कोणीतरी दातार जोशी की बर्वे बाईँना अर्ज दिला. त्यांनी घेतला वाचला आणि ठेवला.
मी म्हटलं ओसी ?
ओसी नसते.
आं ?
हो. आम्ही देत नाही.
लिहून द्या तसं.
- Read more about एक अनुभव
- 6 comments
- Log in or register to post comments
- 9433 views