Skip to main content

अ‍ॅन्ड्रॉईडः अडखळती पहिली पाऊले

गूगल ने विकत घेतल्यानंतरही अ‍ॅन्ड्रॉईडचे मुख्य ध्येय तेच होते - एक असा प्लॅटफॉर्म जो कोणत्याही software इंजिनीअर ला मुक्तपणे त्याला हवा तसा वापरता येईल. त्यामागे अजून एक उद्देश हाही होता की अशी खुली बाजारपेठ उपलब्ध करून देऊन सेलफोन कंपन्यांची हुकुमशाही मोडीत काढणे. तो पर्यंत अमेरिकेत सेलफोन सेवादाते त्यांना हवे तसे फोन हँड्सेट निर्मात्यांकडून बनवून घेत होते. ह्याला कारण म्हणजे अमेरिकीतील कंत्राट पद्धत. तुम्ही तुमच्या सेवादात्याबरोबर २ वर्षे बांधिलकीच्या कंत्राटावर सही करायची आणि त्या बदल्यात तो सेवादाता तुम्हाला फुकट अथवा नगण्य किमतीत हँड्सेट देणार.

धाग्याचा प्रकार निवडा:

ये तो होना ही था!

Taxonomy upgrade extras

वसईसारख्या लहान शहरात रेल्वे स्टेशनजवळ मी पहिला डान्सबार पाहिला. नाचणार्‍या मुली, भोजपुरी अश्लील गाणी, अंधुक उजेड आणि सर्व टेबलं खच्चून भरलेली.
तेव्हा दुकानात ७० रु. ना मिळणारी बिअर इथं ३०० रु. ला मिळत होती. जसजसं मुंबईच्या दिशेचे बार पाहत गेले ही रक्कम ६००० पर्यंत गेली. कारण इतकंच की समोर मुली नाचताहेत.

वण्णियार-दलित संघर्ष आणि जातीपातीचं राजकारण

भारतातली जातीपातीची समीकरणं आणि त्यामागचे सामाजिक-राजकीय घटक किती गुंतागुंतीचे असू शकतात त्याचं एक उदाहरण सदानंद मेनन यांच्या भाषणाबद्दलच्या ह्या वृत्तांकनात सापडेल. त्याचंच ताजं उदाहरण म्हणून दक्षिणेत सध्या गाजत असलेल्या इलवरासन प्रकरणाकडे पाहता येईल. गेले काही महिने हे प्रकरण दक्षिणेत गाजत होतं. वण्णियार ह्या अतिमागास जातीतल्या एका तरुणीनं इलवरासन ह्या दलित तरुणाशी विवाह केल्याचं निमित्त झालं. तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. मग धर्मपुरी ह्या गावात दलित घरांवर हल्ले झाले. अखेर वण्णियार मुलगी आपल्या आईकडे रहायला गेली.

अ‍ॅन्ड्रॉईड: संस्थापक आणि स्थापना

इतरत्र पूर्वप्रकाशित

Andy Rubin
अ‍ॅन्डी रुबीन
Steve Perlman
स्टीव्ह पर्लमन

धाग्याचा प्रकार निवडा:

सर्वे आणि व्यवस्था

दोन आठवड्यापुर्वी एका सर्व्हेमधे सर्वेयर म्हणुन भाग घेतला. माझ्या जवळची व्यक्ती सर्व्हे ऑफिसर म्हणून काम करत होती. त्याबाबतची माझी काही विस्कळीत निरिक्षणे.

वेडपट व्हरमाँट

अमेरिकेच्या इशान्य टोकाची सहा राज्यं न्यू इंग्लंड म्हणून ओळखली जातात. पूर्वी भेटलेल्या एका प्राध्यापिकेमुळे त्यांच्यापैकी व्हरमाँट या राज्याबद्दल थोडं अधिक कुतूहल होतं. ही बाई पुण्याला आली होती तेव्हा नेहेमी पंजाबी ड्रेस घातलेली दिसायची. कापडही अगदी पक्कं भारतीय दिसायचं. एक दिवस चहाच्या वेळस गप्पा मारताना तिला समजलं की आम्ही दोघी मैत्रीणी स्वतःसाठी खरेदीला जाणार आहोत तर ही पण आली. निदान सात-आठ ड्रेससाठी कापड खरेदी केली. "घरी जाऊन शिवेन मीच!" मी आणखी चकीत झाले. कदाचित हे व्हरमॉंटही असेल बुवा भारताच्या बहुतांश भागासारखं गरम! तर ते ही नाही.

ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई

मंडळी खालील गीत हे अहिराणी भाषेत (खानदेशी नव्हे) लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. ही भाषा मला ऐकून ओळखीची आहे परंतु त्यावर माझे प्रभुत्व नाही. यास्तव काही शब्द कमीजास्त असतील तर ते सांगावेत. (अहिराणी भाषेबद्दल येथे माहीती आहे.)

ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई
तू मन्हाकडे का पाहत नाही?
ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई ||

तुन्हा गळा मा सोनानी माळ
तू पायमा बांधस चाळ
तू लाजत लाजत जाई
ग बाई तुन्ह नाव सुपडाबाई ||

एका बेवड्याने सांगितलेली बातमी

ड्रायव्हर गाडी चालवत होता. गाडीखाली कुत्र्याचे पिल्लू आले. गाडीत बसलेल्या माणसाला अकरा वर्षांनी दु:ख झाले.
ड्रायव्हर पिल्लू होता. गाडीखाली दु:ख आले. बसलेल्या माणसाला अकरा वर्षांनी चालवले.
अकरा वर्षांनी माणूस दु:ख चालवत होता. पिल्लाखाली गाडी आली. कुत्र्याचा ड्रायव्हर चालता झाला.
दु:ख अकरा वर्षांनी पिल्लू माणूस चालवत होते. गाडीला चालले.
माणूस म्हणाला पिल्लू दु:ख गाडीखाली आले. ड्रायव्हर गाडी चालवत होता.
माणूस कुत्र्याखाली आला. दु:ख चालते झाले गाडी घेऊन ड्रायव्हरसोबत.

ब्लॉगीचे श्लोक

ब्लॉगाधीश जो ईश सर्वांगुणांचा।
मुळारंभ आरंभ संशोधणाचा।
नमूं नटवरा मूळ चौफेर चर्चा।
धंदा खरा हा महामानवांचा।।1।।

मना सज्जना ब्लॉगपंथेचि जावें।
तरी अंतरी खाजवितो स्वभावें।
जनी निंद्य तें सर्व ओतूनि द्यावे।
जनी वंद्य तें सर्व फुल्यां घालावें।।2।।

प्रभाते मनीं ब्लॉग चिंतीत जावा।
पुढें वैखरीं ब्लॉग आधीं वदावा।।
अनाचार हा बौद्धिक सोडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो।।3।।

विनातर्क संदर्भ कामास ये रे।
मना सर्वदा फक्त बुध्दी नको रे।।
मनासी उगा नीति सांगू नको हो।
मना अंतरीं विचार अतिसार राहो।।4।।

मना सत्यसंकल्प विसरूनि जावा।
मना विकृतेतिहास पुन्हा वदावा।।

होतकरू फेस्बुकीसाठी विद्वता-प्रसिद्धी-तंत्र: (प्रथमच गाईड-रूपात)

विद्वान म्हणवून घेण्यासाठी सनातन विसाव्या शतकापर्येंत ज्ञानार्जन आणि इतर पारंपारिक परिश्रम घेणे अपरिहार्य होते. एकविसाव्या शतकातील पुरोगामी भासमान विश्वातही विद्वान म्हणवून घेणे ही देखील वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. अनेक विद्वानांना महा सामाजिक जालावर नावारूपाला आणल्यानंतर "फाटे कोचिंग क्लासेस"ने आपल्या अथक संशोधनातून गरीब होतकरू विद्वानांसाठी ही अभिनव कार्यपद्धती विकसित केली आहे. गरजूंनी तिचा लाभ घ्यावा आणि आपआपल्या विद्वत्तेचे चाँद फेसबुक वर कलेकलेने वृद्धिंगत करावे. भांडवल म्हणून एक फेसबुक अकाऊंट असणे आणि चार-दोन मित्र असणे आवश्यक आहे.