तीन हायकू -
१.
पाऊस धारा
पडती हाती गारा
... ओंजळ रिती
२.
कुटील कावा
मनांत रंगवावा
... देवळात मी
३.
नाच मोराचा
हैदोस पावसाचा
... माझी समाधी
.
- Read more about तीन हायकू -
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3127 views
सौंदर्यलहरी - कल्याणी विशेषांकातील उतारा
श्री. विश्वास भिडे यांच्या एकोहम या ब्लॉगवरती "आदि शंकराचार्यांवरचा कल्याणी विशेषांक" वाचत होते. "सौंदर्यलहरी" या रचनेचे रसग्रहण वाचतेवेळी फार सुरेख उपमा वाचनात आल्या. डॉ प्रमोद ग लाळे यांनी हे रसग्रहण केले आहे. मी केवळ त्या रसग्रहणातील काही भाग ऐअकरांकरता जसाच्यातसा येथे उधृत करत आहे. संपादकांना अयोग्य वाटल्यास हा धागा उडवावा.
____________________________________________________
- Read more about सौंदर्यलहरी - कल्याणी विशेषांकातील उतारा
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3890 views
अरभाट आणि चिल्लर
"घ्या, आणखी पोहे घ्या" बाबुअण्णा म्हणाले.
"पुरे हो. दोनदा घेतले की बाबुअण्णा" मी पोह्याचा डिशमधले उरलेले सगळे पोहे चमच्याने गोळा करुन तोंडात टाकत म्हणालो. पोहे खरेच चविष्ट झाले होते. एकदम झणझणीत. नारळ आणि कोथिंबीर भरपूर घातलेले, तळलेले शेंगदाणे घातलेले, लिंबू पिळलेले दडपे पोहे. बाबूअण्णांच्या भाषेत आलेपाक. सोबत खारे दाणे. दडपे पोहे, खारे दाणे, मोडाची मटकी, चहा... बाबुअण्णांच्या आवडीचा नाश्ता. माझ्याही. धारवाडी पेढ्यांच्या डिशला तर अजून हातही लावलेला नव्हता.
- Read more about अरभाट आणि चिल्लर
- 16 comments
- Log in or register to post comments
- 11821 views
चावडीवरच्या गप्पा – साहित्य संमेलने आणि सरकार
“सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असे पुन्हा विचारायची वेळ आली आहे”, घारूअण्णांनी तणतणत चावडीवर हजेरी लावली.
“ऑ?”, नारुतात्या.
“अहो, सरकार संवेदनाशून्य झाले आहे. समाजाची सांस्कृतिक जडणघडण नावाची काही चीज आहे की नाही? साहित्यिकांची कदर राहीलेली नाही”. घारूअण्णांचा तांबडा चेहेरा लालेलाल झाला होता.
"अहो काय झाले ते सांगाल का? का उगाच सकाळी सकाळी घशाच्या शिरा ताणताय!", इति नारुतात्या.
“अहो साहित्य संमेलनाविषयी काही जिव्हाळा नाही ह्या सरकारला. साहित्य संमेलनं म्हणजे मराठी भाषेची शान. त्याला अनुदान देणे कर्तव्य आहे सरकारचे, नव्हे, तो साहित्यविश्वाचा हक्कच आहे ”, घारुअण्णा.
- Read more about चावडीवरच्या गप्पा – साहित्य संमेलने आणि सरकार
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2736 views
विद्वजनांचा सहवास
Taxonomy upgrade extras
तसा मी स्वतःला सामान्य माणूसच समजणारा. तरीही मला विद्वजनांचा सहवास लाभला. अनेक साहित्यिक खेळाडू, गायक, वादक अशा नाना प्रसिद्ध व्यक्तिमत्वांना मी माझ्या घरी बोलावतो. नेम ड्रोपिंगचा आरोप नको म्हणून नावे घेत नाही पण खूपच कॄतार्थ वाटते आहे. कॉलेजमधे ज्या गायकाची मैफिल ऐकण्यासाठी थंडी पावसातुन मी जायचो आज तोच कलाकार माझ्या घरी छोटिशी मैफिल भरवतो तेव्हा उर अभिमानाने भरुन येतो. तुमच्यापेकी कितीजणांना असे भाग्य लाभले आहे?
- Read more about विद्वजनांचा सहवास
- 17 comments
- Log in or register to post comments
- 13136 views
एक उत्कृष्ट लघुनिबंध
लोकवाङमय गृह या प्रकाशन संस्थेतर्फे 'आपले वाङमय वृत्त' हे मासिक मुखपत्र चालवलं जातं. त्यांच्या वेबसाइटवर म्हटल्याप्रमाणे ‘केवळ एखाद्या प्रकाशन संस्थेचे मुखपत्र’ असे या मासिकाचे स्वरूप नाही. एकूणच वाचनसंस्कृतीचा प्रसार व गुणात्मक विकास व्हावा हा ‘आपले वाङमय वृत्त’च्या प्रकाशनामागचा उद्देश आहे. या आपल्या प्रतिमेशी इमान राखत त्यात अत्यंत दर्जेदार लेखन येत असतं. मी गेले काही अंक चाळले ते सर्वच चांगल्या, वेगळ्या जातकुळीच्या नवीन कवींच्या कविता, वैचारिक लेख, जगप्रसिद्ध शिल्पांची चित्रं, परिणामकारक छायाचित्रं यांनी नटलेले आहेत.
- Read more about एक उत्कृष्ट लघुनिबंध
- 5 comments
- Log in or register to post comments
- 7656 views
मानवी शरीर आणि भारतीय संस्कृती (भाग २)
गेल्या भागात ४० वर्षांपूर्वीच्या नट्यांचे फोटो दिले होते. नंतरच्या काळात सोनाक्षी आणि विद्या आल्या तरी काही शेंबड्या पोरांना देशी कलाकृतींचे महत्त्व कळलेले नाही म्हणून आता १००-१५० वर्षे मागे जाऊ पण भारतातच राहू. (चड्डीतच राहुच्या धर्तीवर)

आजकालच्या स्त्रियांनाही आवडतील असे सहा आठ प्याकवाले आमचे चड्डीतले पुरातन जय-विरू... स्वारी! जय-विजय

- Read more about मानवी शरीर आणि भारतीय संस्कृती (भाग २)
- 12 comments
- Log in or register to post comments
- 12421 views
Civilisation
केनेथ क्लार्क (१९०३-१९८३) हा एक प्रसिद्ध ब्रिटिश लेखक, संग्रहालय संचालक, निवेदक आणि सुप्रसिद्ध कला-ईतिहासकार होता. ऒक्सफर्ड महाविद्यालयात ईतिहास विषय घेऊन त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. १९३३ साली, वय अवघे ३० असताना तो नॆशनल गॆलरीचा संचालक म्हणून नेमला गेला. तिथे त्या पदी निवड झालेला तो सर्वात तरूण संचालक होता. १९४६ साली लिखाणाला वेळ देण्यासाठी त्याने हे पद सोडलं आणि १९४६-१९५० ह्या काळात तो ऒक्सफर्डमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत होता. त्याला खूप मान-सन्मान मिळाले,पण त्याचं नाव झालं ते १९६९ साली बी.बी.सी.ने प्रसारीत केलेल्या सिव्हिलायझेशन ह्या मालिकेमुळे.
- Read more about Civilisation
- 4 comments
- Log in or register to post comments
- 5377 views
आंदोलक आणि भविष्य
Taxonomy upgrade extras
बिपिन कार्यकर्ते यांच्या वांग-मराठवाडी धरणासंबंधीच्या लेखावरून मनात उठलेले फ़ुटकळ विचार.
------------------------------------------------------
या लेखाखालचा डिसक्लेमर जरूर पहावा.
अशा आंदोलनाची माहिती वाचताना नेहमी आंदोलकांची बाजू न्याय्य वाटते. (बहुतेक वेळा असतेच).
- Read more about आंदोलक आणि भविष्य
- 12 comments
- Log in or register to post comments
- 12772 views
सीरियात चाललेली उलथापालथ
सीरियात चाललेली उलथापालथ
सीरियात सध्या चालू असलेल्या उठावाबद्दल चर्चा करण्याआधी आपल्याला सीरियाचा (सीरियन अरब प्रजसत्ताक) थोडा परिचय करून घ्यायला हवा. कारण त्याशिवाय परिस्थितीचे नीट आकलन होणार नाहीं. या देशाचे भूगोलातील स्थान मध्यपूर्वेत आहे व ते नकाशा क्र. १ मध्ये दिलेले आहे. या देशाच्या उत्तरेला तुर्कस्तान असून पश्चिमेला लेबॅनॉन आणि भूमध्यसागर आहे. दक्षिणेला जॉर्डन व इराक असून पूर्वेलाही इराक आहे. या देशाची सीमा कुठेही इराणशी जोडलेली नसली तरी इराकमधून हे देश जोडलेले आहेत.
- Read more about सीरियात चाललेली उलथापालथ
- Log in or register to post comments
- 5353 views