Skip to main content

दोन बातम्या, दोन प्रतिक्रिया

दोन विषयांत उघड असा काही संबंध नसताना कधीकधी निव्वळ त्यांच्या एकापाठोपाठ एक मांडणीमुळे त्यांच्यात काही साम्यस्थळं दिसू लागतात. तसंच काहीसं गेल्या आठवड्यात झालं. अनुज बिडवे या भारतीय मुलाची काही दिवसांपूर्वी परदेशात झालेली हत्या आपल्याकडे चांगलीच गाजली. गेल्या आठवड्यात न्यायालयानं या प्रकरणात शिक्षा सुनावली. आपल्या प्रसारमाध्यमांत मारेकर्‍याचं वर्णन हे मानसिक संतुलन बिघडलेला अशा प्रकारचं दिसलं. उदाहरणार्थ, 'लोकसत्ता'त २८ जुलैला पहिल्या पानावर आलेली ही चौकट पाहा -

आपलं नशीबच.......!

मॅथ्यू हॅरिसन या लेखकाचे The 7 Laws of Magical Thinking हे पुस्तक आजकाल Best Seller list वर गाजत आहे. या लेखकाने काही काही वेळचे आपले अविवेकी वर्तन आपल्याला सुख समाधान व मानसिक शांती मिळवून देण्यास कसे कारणीभूत होते याचे विश्लेषण केले आहे. त्यावरून आपल्यातील बहुतेकांचा नशीबावर भरपूर विश्वास आहे, असा निष्कर्ष त्यानी काढला आहे. काही जण योगायोग असे गोंडस नाव देवून आपला नशीबावर विश्वास नाही असे दाखविण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु मनातल्या मनात मात्र नशीबाला कोसत असतात.

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ४ : सावली

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे: सावली
प्रकाशामधे अडथळा आल्यामुळे पडलेली...आणि मायेची, प्रेमाची, दु:खाची सावली वगैरे...सर्व कल्पनांचं स्वागत.
सर्वांना शुभेछा !

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे प्रकाशित करता येतील.

स्पर्धा का इतर?

शब्द .. शब्द .. शब्द ..

.

शब्दांच थैमान
डोक्यातल्या कप्प्यातून
घुटमळतात शब्द
तेच मनांत कधीपासून -

डोकावतात
संधी साधत बेटे
लेखणीतून घरंगळत
पहुडतात कागदावर
कविता बनून !

.

बरड

नवीन काहीच नाही. दिवस आपल्या गतीने निघून चाललेत. बरेचदा काही विचार येतात, आणि मी थबकतो. मग मी पुन्हा चालू लागतो. हे चालणं अथक आहे, अमर आहे, अजर आहे. चालण्याची प्रक्रिया किती जुनी आहे. चालताना वाटेत कोण कोण भेटून जातं. उंच उंच झाडे. काही पाने पायथ्याशी निश्चल पडलेली. सुबक रस्ते. रस्त्यांच्या दगडी किनार्‍यांवरून चालताना काही प्राचीन भास होतात. मला वाटतं मी अठराव्या शतकातल्या युरपियन देशात चालत आहे. मग मी विचार करतो की दोनशे वर्षांनंतर मी कुठे असेन वगैरे. पुन्हा आजचे शतक. हे भास तसे नवीन नाहीत. औरंगाबादेच्या जुन्या वास्तूंच्या सान्निध्यात मला हे जुनेपण नेहमीच जाणवलेलं.

Bodies revealed: मृतदेहाकडे बघण्याचा आणखी एक दृष्टीकोन

इथेही काही लोकांना भीतीदायक, किळसवाणे, ओंगळ वाटू शकतात असे फोटो आहेत. पहाण्याची इच्छा नसल्यास स्क्रोल करू नये.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
चीनी लोकांनी पुरी, अलाहाबादची गंगा वगैरे भागांचे काढलेले फोटो सध्या आंतरजालावर गाजत आहेत. त्यावरून काही महिन्यांपूर्वी (अगदी दमडा मोजून) पाहिलेल्या एका प्रदर्शनाची आठवण झाली. प्रदर्शनाचं नाव Bodies revealed.

"आयमाय"

कालचाच प्रसंग.

माझ्यातल्या माकडाने उत्क्रांतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.

सकाळी ११ च्या सुमारास बॅंकेत जाण्याच्या उद्देशाने मी घराबाहेर पडलो तेव्हा आमच्या घराच्या गेट समोर एका मंद्बुद्धी चालकाने भली मोठी बोलेरो वाट अडवून उभी केली होती. गाडीने पूर्ण रस्ता अडवला होता. ड्रायव्हर आसपास कुठेही दिसत नव्हता. मला माझी गाडी बाहेर काढायची असती तर कपाळाला हात मारून घेण्याशिवाय दूसरा कोणताही पर्याय नव्हता.

एका म्यानात दोन तलवारी

सकाळी नऊ वाजता चीफ डिस्ट्रिक्ट मेडीकल ऑफिसर डॉ कर यांचा फोन आला. कलेक्टरांनी उचलला. "गुड मॉर्निंग सर. मला लगेच भेटायचंय, येऊ का?" "गुडमॉर्निंग डॉक्टर. या. काय अर्जंट? " कलेक्टर उत्तरले. "सर मी चाललो तुमच्या जिल्ह्यातून. मी एकही क्षण इथे थांबणार नाही. माझ्यावर काय अ‍ॅक्शन घ्यायची ती घ्या. " उत्तेजित स्वरात डॉक्टर बोलले. कलेक्टर म्हणाले, "लगेच या डॉक्टर. बोलू आपण."

*********

आसाम दंगल

Taxonomy upgrade extras

गेला जवळपास आठवडाभर आसाममधील कोक्राझार जिल्हा धार्मिक दंगलीच्या वणव्यात होरपळत आहे. चाळीसएक लोकं मृत्यूमुखी पडले आहेत. बोडोभूमी प्रादेशिक परिषदेचे मुख्यालय असलेला हा जिल्हा. सदर दंगलीला बांगलादेशमधील विस्थापित कारणीभूत आहेत असे सांगितले जात आहे. इतक्या दिवसांनी शेवटी आज आसामच्या मुख्यमंत्र्यांना यात लक्ष घालायला वेळ मिळाला आहे. उद्या पंतप्रधानही भेट देणार आहेत (म्हणे).

याच विषयावरचे काही दुवे:
लोकसत्ता अग्रलेख

हिंदू धर्माभिमान्यांसाठी...

Taxonomy upgrade extras

भारतीय संस्कृतीच्या रक्षणाचा मक्ता घेतलेल्या संस्था आणि संघटनानी संस्कृतीच्या स्वच्छतेसाठी काही केलेले दिसत नाही.

गंगेच्या घाटांवर केल्या जाणार्‍या अंत्यसंस्कारांबद्दल मी बरेच ऐकले होते पण ते फारच सौम्य होते. ते इतके भयानक आहे हे फकत परदेशी लोकांमुळे कळले.

कृपया आमीर खानच्या पुढाकाराची वाट बघू नका

अधिक काही लिहीण्यासाठी माझ्यापाशी शब्द नाहीत. कमकुवत मनाच्या लोकांनी ही छायाचित्रे पाहू नयेत.

(खालील धाग्यावर काही हिडीस वाटतील अशी अर्धवट राहिलेल्या, कुजलेल्या प्रेतांची चित्रे आहेत. असं पाहण्याने ज्यांना त्रास होतो अशांनी ही लिंक उघडू नये - संपादक)