हा खेळ संख्यांचा! - नऊ
- 9 आणि 8 अशी 32व 23असलेली जोडी इतर कुठल्याही लागोपाठ असणार्या संख्येत सापडणार नाही.
- एखादी संख्या 9ने पूर्णपणे भागता येते की नाही यासाठी त्या संख्येतील आकड्यांची आडवी बेरीज करून 9 ने भागतात. शेष शून्य उरत असल्यास मूळ संख्येला सुद्धा 9 ने पूर्णपणे भागता येते. उदाहरणार्थ, 176328 या संख्येचे 9 विभाजक आहे की नाही हे शोधण्यासाठी प्रथम 1+7+6+3+2+8 = 27 ही बेरीज केली जाते. व या बेरजेचे 9 विभाजक असल्यामुळे 176328 या संख्येचासुद्धा 9 विभाजक आहे हे समजते.
- Read more about हा खेळ संख्यांचा! - नऊ
- 4 comments
- Log in or register to post comments
- 6461 views
गणपतीचा शोध
लोकहो,
लहानपणी मी गणपतीभक्त होतो. याचे प्रमुख कारण लंक्यांच्या स्कॉलरशिपच्या क्लास मध्ये संकष्टीला आणि गणेशोत्सवात अथर्वशीर्षाची २१ आवर्तने व्हायची. तेव्हापासून बर्यापैकी नियमित पणे अथर्वशीर्षाची आवर्तने मी करत असे. पण "गणपती विघ्नहर्ता नाही तो विघ्नकर्ता आहे, तेव्हा भजायचे असेल तर दूसर्या देवाला भज" असे आई म्हणायची. आईला असे कसे विचारले तर उत्तर देता येत नसे मग मला आईचा राग यायचा. पण मी मात्र माझी गणेशभक्ती मी नेटाने पुढे चालु ठेवली होती.
- Read more about गणपतीचा शोध
- 140 comments
- Log in or register to post comments
- 110629 views
ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व
ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व
लेखक - कै. गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर
प्रकाशक - डॉ. प . वि. वर्तक
बाबाराव सावरकरांनी लिहिलेल्या या एका अतिशय वादग्रस्त ठरू शकणाऱ्या विषयावरील पुस्तकाबद्दल लिहावेसे वाटले कारण विविध कारणास्तव लोकांपर्यंत पोहोचू न शकलेल्या या पुस्तकाविषयी, त्यात मांडलेल्या संशोधनाबद्दल वाचकांना कळावे. आंतरजालावर सर्फिंग करत असताना एके ठिकाणी या पुस्तकाविषयी माहिती कळल्यानंतर दुकानातून पुस्तक विकत घेताना यात काय विषय, कसा मांडला असेल या शंका वाचनानंतर दूर झाल्या.
- Read more about ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व
- 23 comments
- Log in or register to post comments
- 32391 views
कंजूष
काही माणसं स्वभावतःच कंजूष असतात. पैसे वाचविण्याच्या आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या विविध युक्त्या त्यांना सुचत असतात. "वाचवलेला पैसा म्हणजे मिळवलेला पैसा' असला भक्कम सुविचार कोणातरी कंजूष माणसाला सुचला असणार, असं आपलं मला नेहमी वाटत आलंय. सहजतेनं खर्च करणाऱ्या व्यक्तीला असला विचार सुचणं प्रथमदर्शनी अशक्य वाटतं; पण कोणास ठाऊक, कायमच कंजूष माणसासोबत राहताना कोणालातरी हे समजलं असेल.
- Read more about कंजूष
- 11 comments
- Log in or register to post comments
- 10888 views
फायदा आणि तोटा
Taxonomy upgrade extras
http://www.aisiakshare.com/node/606 या ३_१४ अदिती यांच्या धाग्यावर प्रतिक्रिया स्वरूप सदर ले़खन करीत आहे. प्रतिक्रिया तिथेच देता आली असती परंतु दोन कारणांमुळे स्वतंत्र ले़ख लिहीत आहे.
१. अदिती यांच्या मूळ ले़खापेक्षा माझा प्रतिसाद लांबलचक होण्याची शक्यता आहे.
२. मूळ ले़खात मांडलेल्या मुद्यांव्यतिरिक्त इतरही काही मुद्यांचा विचार करायचा असल्याने तिथे प्रतिसाद दिल्यास त्यावर "भरकटलेला" असा शेरा येऊ शकतो.
सर्वप्रथम अदिती यांच्या लेखाच्या शीर्षकाविषयी - "मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?"
- Read more about फायदा आणि तोटा
- 41 comments
- Log in or register to post comments
- 29310 views
धुलिवंदन
Taxonomy upgrade extras
७ तारखेला होळी झाली दुसरे दिवशी धुलिवंदन.
सहज विचार करता धुलिवंदन हा शब्द कसा आला असा प्रश्न पडला. जालावर शोध घेतला पण काही चांगली माहिती मिळाली नाही.
धुलिवंदन ह्या शब्दामागे काही लोककथा वगैरे आहे का?
सहज पडलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ना गवसल्याने धुलिवंदनाचा दिवस झाल्यावर हे आमचे वरातीमागून घोडे.
- Read more about धुलिवंदन
- 6 comments
- Log in or register to post comments
- 14029 views
अंबरात फिरुनिया उगवतो
अंबरात फिरुनिया उगवतो, हासरा राजस तारा
परिमळता देहातून गंधित, मोगरमोहर सारा................. || धृ ||
बालपणीचा काळ हरवला, गाव कुसाला सांगा
हिरवाईचा ऋतू परतता, फुलल्या रेशीम बागा
पूर्व दिशेला, भिजवुनि आल्या, कोवळ्या पाऊसधारा .........|| १ ||
स्वप्नांच्या गावात बोलले, बोल मनीचे कोणी
निळ्या बोलक्या.. डोळ्यांमधली, लाजलाजरी गाणी
छेडुनि गे_ला, केस मोकळे, कुठुनी रानचा वारा ..............|| २ ||
काचेच्या पानात अडकली, किरणे रंगीत बाई
तेजाच्या स्पर्शाने फुलली , आंधळी यौवनघाई
विश्वाच्या गर्भाशी घुमला, चैतन्याचा नारा ...................|| ३ ||
अंगण माझे फुलले हसले, तृप्तीने गं न्हाले
- Read more about अंबरात फिरुनिया उगवतो
- 5 comments
- Log in or register to post comments
- 7426 views
मैं तैनू फ़िर मिलांगी (अमृता प्रीतम) इतर भाषेतील रत्ने - भाग -३
प्रेम म्हणजे अनुभूती असते, असेच कधी तरी मी व माझा मित्र प्रेम या विषयावर चर्चा करत होतो. नवतारुण्याच्या उंबरठ्यावर आम्ही दोघे ही तेव्हा होतो त्यामुळे भावना महत्त्वाची की संबध महत्त्वाचे यावर चर्चा चालू होती, अचानक त्या चर्चे मध्ये आमचीच एक मैत्रीण सामील झाली. सर्व चर्चा ऐकल्यावर तीने फक्त आपल्या केबीन मधून एक डायरी घेऊन आली व खालील कविता समोर ठेवली, अमृता प्रीतम यांची.
मैं तैनू फ़िर मिलांगी
कित्थे ? किस तरह पता नई
शायद तेरे ताखियल दी चिंगारी बण के
तेरे केनवास ते उतरांगी
जा खोरे तेरे केनवास दे उत्ते
इक रह्स्म्यी लकीर बण के
खामोश तैनू तक्दी रवांगी
जा खोरे सूरज दी लौ बण के
- Read more about मैं तैनू फ़िर मिलांगी (अमृता प्रीतम) इतर भाषेतील रत्ने - भाग -३
- 16 comments
- Log in or register to post comments
- 16501 views
अंगाई: आली ग निज
आली गं निज, सांगुया तिज, आता नको मज खेळायचे!
अशा या राती, मायेची कुस, किती दिस असे मिळायचे?
जोजो गे जोजो, माझी सानुली, आता सार्यांनी निजायचे
चंद्र ही झोपे, चांदणी निजे, कशाला आपण जागायचे?
लागताच गं, मजला डोळा, छानशी ही बाग दिसतसे
वेचाया फुले, खेळाया मुले, मग कसे गं झोपायचे?
जोजो गं बाळा, मिटूनी डोळे, छानशी बाग स्वप्नी असे
झोपून बघ, बागेत मग, फुलामुलांसवे हसायचे
आता जराशी, आली ग झोप, तरिही सारे बघायचे
डोळे गं माझे, जरा मिटता, लगेच नाही हं पळायचे
- Read more about अंगाई: आली ग निज
- 15 comments
- Log in or register to post comments
- 13242 views
लावणी: शिटी मारून
( ही लावणी राजेंसाठी,
केवळ या कारणासाठी )
रती मी सुंदर आहे मदभरली अप्सरा
नका जवळ येवू नका ओळख दाखवू
मी नार नखर्याची होईल पाणउतारा }}}
(चाल सुरू)
भरल्या बाजारी गर्दी जमली
अहो भरल्या बाजारी गर्दी जमली
तिथं शिटी तुम्ही का मारता?
अहो पाव्हनं शिटी मारून
शिटी मारून
येड्यावानी काय करता? ||धृ||
- Read more about लावणी: शिटी मारून
- 2 comments
- Log in or register to post comments
- 4932 views