Skip to main content

गुमराह

रात्रीचे १२ वाजायला आले असतील, बाहेर पावसाची रिपरिप चालू होतीच. आज बाहेर पाऊस असून देखील मला खिन्न खिन्न वाटत होते. खरेतर पावसाळा म्हणजे माझा आवडता ऋतू. आज नेहमीप्रमाणे कॅफे बंद झाल्यावर कावेरी मातेचे यथासांग दर्शन देखील झाले होते, त्यामुळे हा पाऊस आणि अंगावर येणारी मस्त हवा आवडायला काहीच हरकत नव्हती. पण का कोणास ठावुक आज मन लागत नव्हते येवढे खरे. अचानक रात्री १२ च्या सुमारास फोन वाजला. येवढ्या रात्री मला सहसा कोणाचा फोन येणे अशक्यच. त्यात जागा असल्याने दुसर्‍या रिंगलाच फोन उचलला. पलीकडून काही क्षण फक्त श्वासोच्छ्वासांचे आवाज ऐकू येत होते.

"पप्पी?"

आरक्षण नको..सन्मान हवा !

Taxonomy upgrade extras

या महिन्यात महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचे हक्क, जागृती, सवलती, समानता, विविध क्षेत्रातील भरीव कार्ये इ. संबंधी वेगवेगळया माध्यमातून पुष्कळ लिखाण प्रकाशित झाले. (त्यातील पुरुष लेखकांचे प्रमाण नगण्य आहे. ) तथापि काही भारतीय समाजात स्त्रीची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी आवश्यक असे काही पायाभूत मुद्दे अध्यापि चर्चिले गेलेले नाहीत असे वाटते.

विद्रोही

थांब तुकारामा असा पळू नकोस वैकुंठाला
विमान तुझे वळव आणि बघ जरा वाकून

अरे रामदासा ये तुझ्या गुहेतून बाहेर
कपडे घाल आधी, जेवलास का तू?

बास झाली तुझी झोप गौतमा, ऊठ आता
उघड डोळे, बघ जगाकडे, गेली का झोप?

अरे न्याना, उघड तुझी द्य़ानेश्वरी उलट पाने
लिही त्यात मांड्यांची रेसिपी, विसरलास का तू?

अहो फोटोतले गांधीबाबा, आता तरी सुधरा
उचला ती बंदुक, उडवा त्या कसाबला

रे माणसा माणसा, घे विवेकाचा ध्यास
जुनी झुगारूनी कात, पेटव क्रांतीची ज्योत

फेसबुक

(गेल्या वर्षी लिहिलेला हा लेख आहे. चर्चेसाठी इथे टाकतेय.)

गेल्या वर्षीची गोष्ट. फेसबुकने त्यांच्या प्रायव्हसी settings मध्ये काही बदल केला होता, त्याची बातमी रेडिओवर लागली होती. फेसबुक बघितले तर ऑर्कुट, माय स्पेस, ट्विटर सारख्या शेकडो सोशल नेटवर्किंग साईट मधली एक वेबसाईट; त्याच्या एवढ्या छोट्या बदलाची राष्ट्रीय बातमी झालेली पाहून मला आश्चर्य वाटले. म्हटलं बघूया अमेरिकेचं हे नवीन फॅड काय आहे ते!

भुतांच्या गोष्टी

आयुष्यात बरे, वाईट, कडु-गोड, आंबट-तुरट असे नाना प्रकारचे अनुभव प्रत्येकाच्याच वाट्याला येतात. त्याबरोबरच काही कडु-गोड, आंबट-तुरट लोकही भेटतात. काही लोकं आपल्या लक्षात राहतात तर काही प्रसंग! अशीच एक व्यक्ती माझ्या स्मरणात राहिलेली.

मी पप्पा

मी पप्पा
मी पप्पा तू मम्मी!
आपलं बाळ यम्मी यम्मी

बाळ आपलं गोरं गोरं लाल
टाळ्या वाजवून धरतंय ताल

कधी बसतं तर कधी हासतं
कधी रांगतं कधी उभं राहतं

छोटे छोटे तिचे कान
आवाजाकडे वळवी मान

हात तिचे बारीक इवलेसे!
बोटे तोंडात घाली कसे!

नजरेने ती सारे पाही
पण अजून काही बोलत नाही!

- पाषाणभेद

काशीबाई काशीबाई

काशीबाई काशीबाई
काशीबाई काशीबाई तुमच्या साडीचा कसोटा घट्ट खोचा
वारा येईल भसाभसा तर होईल मोठा लोचा ||धृ||

अशी कशी हो तुम्ही नेहमीच करता घाई
कामावर यायची उगाच करता नवलाई
भांडी निट घासा नाहीतर आणाल त्यांना पोचा ||१||

तुम्ही सांगून बोलून रजा घेत जा हो
न सांगता दांडी मारू नका हो
निट मी सांगते नका असे भांडू कचाकचा ||२||

नगरसेवक पुतण्या अन हवालदार तुमचा भाचा
तालेवार व्याही असून एक नाही काही कामाचा
सोन्याचा चमचा त्यांच्या तोंडी तुम्हां सांगती गवर्‍या वेचा ||३||

विहिर विचारी समुद्राला...

एक होती विहीर. चांगलीच मोठी होती तशी, म्हणजे गुगल मॅप्स वरून बघितल्यास तिचा 'व्यास' कळावा इतपत मोठी होती ती. खरंतर त्या विहीरीत अपवाद म्हणावा की आठवे आश्चर्य अशा तर्‍हेने वैविध्यपूर्ण प्राणी रहात होते, गुण्यागोविंदाने(?). पण मध्येच पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्यावर पाणी भरपूर वाढून खूप हलकळ्ळोल व्ह्यायचा विहीरीत पण तो लगेच थंडही पडायचा. वेगवेगळ्या प्रकृतीचे, स्वभावधर्माचे विवीध प्राणी त्यावेळी आपापले अस्तित्व जाणवून द्यायचा प्रयत्न करायचे आणि गोंधळ मजवून द्यायचे. खूप आवाज व्ह्यायच्या विहीरीत अश्यावेळी. पण क्वचितच त्या विहीरीच्या मालकाला ते जाणवून यायचे, ते प्रमाण अगदी नगण्यच म्हणा ना.

'मी पाहीलेला सूरयोदय'

संस्थळाचे दर्शनी पान या चर्चेत असणारे रोचक अवांतर या धाग्यात वेगळे काढले आहे.

(अधिक मोठ्या आकारातील चित्रासाठी दुवा.)