Skip to main content

मराठी रंगभूमीच्या तीस रात्री - मकरंद साठे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' - 'रात्र दहा'
मकरंद साठेलिखित 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' या पुस्तकाचं काल पुण्यात प्रकाशन झालं. मकरंद साठे यांनी त्या प्रसंगी बोलताना पुस्तक लिहिण्यामागचा आपला विचार थोडक्यात मांडला. त्यांच्या मते साहित्यामागे 'मी कोण' असा प्रश्न असतो (किंवा असावा). मराठीतला एक नाटककार या नात्यानं त्यांना असा शोध घ्यावासा वाटला. चांगलं नाटक कशाला म्हणायचं असाही प्रश्न त्यांच्या मनात होता. मराठी नाटकाच्या इतिहासाचा धांडोळा घेतल्याशिवाय या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत असं वाटल्यामुळे त्यांनी त्याचा अभ्यास सुरू केला. मराठी नाटकाचा इतिहास महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय इतिहासाशी घट्ट बांधलेला आहे आणि आजच्या वास्तवाच्या आपल्या आकलनाशीही त्याचा गहिरा संबंध आहे असं जाणवलं म्हणून 'मराठी नाटकाचा सामाजिक-राजकीय इतिहास' असा विषय ठरवला. पुढच्या पिढीला आपल्या आकलनाचा फायदा व्हावा अशी इच्छा असल्यामुळे पुस्तकाचं प्रकाशन तरुण रंगकर्मींच्या हस्ते झालं. धर्मकीर्ति सुमंत, इरावती कर्णिक, मनस्विनी लता रवींद्र यांनी पुस्तक प्रकाशित केलं.

मांजराने केला उंदराला फोन...

मांजराने केला
उंदराला फोन
उंदीर म्हणाला
"हॅल्लो कोण ?"

मांजर म्हणाले
म्याँव म्याँव म्याँव
उंदराने घेतली
बिळामधे धाव...

लावुन घेतले
बिळाचे दार
तुटली रेंज अन
कटला कॉल

कटला कॉल पण
फुटला घाम
बिळात होते नागोबा
करीत आराम

- ग्लोरी

त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -२

मी मराठीवर पूर्वप्रकाशित.
त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -१

मंदिराच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम.

चेहर्‍यावरून यक्षिणी असावे असे वाटत नाही, राक्षसिणी असावी शक्यतो ;) पण सजावट यक्षिणी सारखी आहे.

मी या शाळेत जाणार नाही

मी या शाळेत जाणार नाही

दुर आहे शाळा घरी लवकर येता येत नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही

भिती मला वाटे शाळा नवी मोठी
आठवते मला शाळा जुनी छोटी
नविन शाळा मला मुळीच आवडत नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही

जुने मित्र माझे फार होते ग चांगले
बट्टी होई आमची जरी भांडण झाले
ह्या शाळेत मला मुळी कुणी मित्रच नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही

मोठे मोठे वर्ग येथे मोठा आहे फळा
नव्या मुलांना जुनी मुले करती कोंडाळा
भंडावून सोडी सारे मी केविलवाणा पाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही

लहानच आहे मी काही मोठा नाही झालो
उगीचच मागच्या वर्गात पहिला मी आलो

नव्या दृष्टीकोनाच्या मिमचे लागणदार

Taxonomy upgrade extras

"डाऊन वुइथ नॉस्टॅल्जिया" वर विचार करता करता माझा मेंदू मिम्सच्या ( मराठी मनुके?) बाबतीत विचार करू लागला. ज्याप्रमाणे जनुके व्हायरससारखी असतात आणि स्वतःच्या प्रतिकृती तयार करून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतात त्याप्रमाणे विचारांचे हे मिम्सही व्हायरससारखे असतात आणि एका डोक्यातून दुसर्‍या डोक्यात स्वतःच्या प्रतिकृती तयार करून स्वतःचे अस्तित्व टिकवू पाहतात.

बुद्धी

बुद्धी आचके देत होती त्यापूर्वी थोडा वेळ मी हा प्रश्न केला होता.
हे असं का?
मग उत्तर मिळालं -
हे मला विचारतोस?
माझ्या हाताने मी एकही बाण सोडलेला नाही.
माझ्या उर्मीने मी एकही बळी घेतलेला नाही.
माझी स्वयंसिद्ध अर्चना तू थांबवलीस.
आणि आता तुझे भोग माझ्या माथी मारतोस?
तुझा बळी जातोय तोही माझ्यामुळे नव्हे.
गंमत इतकीच की तुझं असणं माझ्या असण्यावर अवलंबून आहे.
आणि तुला वाटतं की माझं जाणं तुझ्या हातात आहे.

हताश होऊन मी म्हटलं,
माय माझी, मी नाही गं ते केलं.
तू मला सगळं दिलंस. माझ्या भल्याकरताच दिलंस.
पण माझ्या अबोध दुःखाच्या वेळी मात्र तू मला एकटं टाकायला नको होतंस.

किरणोत्सर्ण, खाणी-अणुभट्ट्या आणि आरोग्य

'डॉन'मधे आज ही बातमी वाचली. भारतातील एकमेव युरेनियमच्या खाणीभोवतालच्या गावांमधे पाण्यातून रेडीयोअ‍ॅक्टीव्ह पदार्थांचा प्रादुर्भाव आरोग्यावर होऊ लागला आहे असे बातमीतील रिपोर्ट नमूद करतो. नुकत्याच झालेल्या फुकुशिमा येथील अणुभट्टीच्या दुर्घटनेमधे असा प्रादुर्भाव 'अपघात' किंवा 'नैसर्गिक आपत्ती' असल्यास होऊ शकतो हे जगाने पाहिले.

आठवणीचे छोटे छोटे तुकडे -मालेगाव क्याम्प .!!

घर नं -. ३३
सोनार गल्ली
मटण मार्केट जवळ
मालेगाव क्याम्प ,मालेगाव
जिल्हा ;-नासिक
पत्ता अजून पाठ आहे. आता आम्ही मोठे झालो होतो. पाचवीत गेलो होतो. मिरजे वरून सरळ मालेगावात आमचा तंबू पडला होता. ट्रकमध्ये सामान नि आम्ही आख्खे कुटुंब.सोनार गल्लीत घर घेतले होते.
एकदम जुने नि अंधारलेले.
आम्ही म्हणालो -
बाबा किती अंधार आहे ..?
छी... कसले हे घर....!!
गल्लीत एक घर बांधून तयार होते. माडीचे. चौकशी केली. घर मालक आले.
विचारले. मालक घर भाड्याने द्यायचे म्हणाला.
भाडे ठरले. पसंत पडले.
नि आमचे सामान सरळ त्या नव्या घरात उतरविले गेले .

बिच्चार्‍या, उगी उगी

__________ बिच्चार्‍या, उगी उगी__________.

गरीब बिचारा शोधतोय तो
सायबिणीचे पडके घर -
मी म्हणतो, "विचार, जवळ
चांगला बार असला तर..."
.
बुरसट चिरे न्हाते-धूते
अश्रू भले सुकवू नको
कुळाचारांस आसूसले
भाव भले आटवू नको
.
म्हटले कोणी : "रिबेलो
मूळचे अहो, त्या वाडीचे"
पात्रांव, छ्या! रिबेलो
आहेत सांगा किस झाडीके?
.
ब्रागांस, कून्य, नोरोन्या
कसची गोत्रे, कसची कुळे,
ईश्वराच्या डोळ्यापुढे
बामणांचेही गू पिवळे
.
.
.
सोड बाबुश - पीच थोडी
दर्जेदार काजूफेणी
सोनसळी फेसाळणारे
उसळणारे जादू-पाणी
.

मुघल ए आजम

जोधा अकबर रिलीज होणार होता तेंव्हा उसळलेली रणधुमाळी लक्षात राहिली होती. तेंव्हाच विचार मनात आला ह्या आधी ही असे प्लॉट असणारे अनेक चित्रपट येऊन गेले आहेत आणि असा विचार करताना पहिले नाव डोळ्यासमोर आले ते म्हणजे मुघल ए आजम. हा चित्रपट मी दोन्ही कृष्णधवल आणि रंगीत अशा प्रकारात पहिला आहे. पहिल्यांदा जेंव्हा हा चित्रपट पाहिला तेंव्हा लक्षात राहिली ती मधुबाला (अकबराच्या शब्दात हसीन लौंडी), दुर्गा खोटे आणि कमळातून प्रेमपत्रे पाठवलेला प्रसंग. भारतात तयार होवून प्रदर्शित झालेल्या आणि तयार होण्यास सर्वात जास्त वेळ लागलेल्या दोन चित्रपटापैकी (पाकीझा आणि मुघल ए आजम) एक चित्रपट.