Skip to main content

मार खाल्ला आहे का?

आपण आयुष्यात दणकून मार खाल्ला आहे का?

आईबाबांकडून.. जास्त शक्यता..

अन्य कुठे बाहेर?

कॉलेजात. पोरीच्या लफड्यात?

दंगलीत.. उगाच बाजूला उभे असताना..

गुंडांकडून.. कोणाच्या मधे पडल्यावर.

त्यासोबतच उलटही... म्हणजे आपण कोणाला कधी मनसोक्त हग्यामार दिला आहे का?

नंतर वाईट वाटलं का?

वेळ न येवो अशी शुभेच्छा..

यापूर्वी आली असल्यास साग्रसंगीत सांगावे.. विनंती..

दिवाळीनिमित्त शुभेच्छा...!!

सौदा - भाग १

लेखनप्रकारः गूढकथा

* एका सुप्रसिद्ध इंग्रजी कथेवरून ही कथा बेतलेली आहे. हे भाषांतर नव्हे. लिहिता लिहिता गोष्ट त्या कथेकडे झुकू लागली म्हणून त्या कथेच्या दिशेनेच लिहिली. ज्यांच्या डोक्यात मूळ कथा येईल त्यांनी थोडा धीर धरावा. या कथेच्या शेवटी मूळ कथेला श्रेय देण्यात येईलच.
.
.
.


"झालीस का गं तयार?" निलिमाताईंनी अनघाला हाक दिली.

श्री गणेशा - मराठी मेनू

नमस्कार मंडळी,
एक 'चमत्कृती' घेऊन दाखल होत आहे 'ऐसी अक्षरे' च्या टीम मध्ये. सुरवात गोडानेच करावी हा प्रघात मोडून जरा झणझणीत मेनू घेऊन आले आहे.
असो, तर आज ख़ास मराठमोळा मेनू घेउन प्रत्यक्ष सहभागी व्हायचं ठरवलं.

सुरवात वांग्याच्या भाजी ने करू.

वांग्याची भाजी : साहित्य -
५-६ हिरवी वांगी,
लसुण ५-६ पाकळ्या (अगदी मोठ्या असतील तर ३-४) ,
कोथिम्बिर १/२ वाटी बारीक़ चिरून,
दाण्याच कूट १ वाटी
चवीनुसार जिरे पूड, धणे पूड, तिखट, मिठ, फोडणीसाठी तेल, जीरे, मोहरी, हिंग, हळद, कडीपत्ता

आणखी एक संकट

अवकाशात निकामी उपग्रहांचा कचरा साठत असताना आता हा कचरा पृथ्वीवर आदळू लागल्याने पृथ्वीवासियांच्या डोक्यावर आणखी एका संकटाची तलवार टांगली गेल्याने चिंता वाढली आहे.
गेल्याच महिन्यात नासाचा अपर एटमोस्फेअर रिसर्च सॅटेलाइट पॅसिफिक महासागरात कोसळला होता. आता जर्मनीच्या अंतराळ संशोधकांनी निकामी झालेला आणखी एक उपग्रह या आठवड्यात पृथ्वीवर आदळणार असल्याचे सांगितले आहे. परंतु तो नेमका केव्हा आणि कधी पडणार हे स्पष्ट केले नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे.

पाथ्स ऑफ ग्लॉरी

काही चित्रपट पाहुन झपाटल्यासारखे होते. मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटते. आपण नि:शब्द होतो. स्टेनली कुब्रिक दिग्दर्शित पाथ्स ऑफ ग्लोरी हा असाच एक चित्रपट. लोलिता, आइज वाइड शट, क्लोकवर्क ऑरेंज असे एकापेक्षा एक वादग्रस्त आणि भडक चित्रपट बनवणार्‍या कुब्रिकने पाथ्स ऑफ ग्लोरी सारखी दर्जेदार कलाकृती देखील सादर केली आहे.

पाथ्स ऑफ ग्लोरी याच नावाच्या Humphrey Cobb लिखीत कादंबरी वर आधारीत आहे. चित्रपटाला पहिल्या महायुद्धातील जर्मनी आणि फ्रान्स यांच्यामधल्या एका लढाईची पार्श्वभूमी आहे. पण हा युद्धपट मात्र नाही. लढाईमागचे राजकारण हाच या चित्रपटाचा विषय आहे.

अक्षरप्रेमी

नमस्कार.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 'अक्षरप्रेमी' नावाच्या नव्या मराठी उन्माद ब्लॉगची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

परसूंकीच बात है...

"क्यों मियां, कब देते टीवी? भोत दिनां हो गये ना..."
"परसूं आजाव साब, तबतलक पक्का रेडी करके रैता."
"ऐसा घुमाव नक्को मियां, ये तुम्हारे परसूं का एक कौनसातोबी तारीख बताव"
"पक्का परसूं, साब. परेशान नै हुनाजी"
-किंवा -
"ये परसूंकीच बात है, हिंया सामनेईच ठैरा था जॉर्ज बुश!"
"कुछ तो बी बोलते क्या? उन्हें आके भोत सालां हो गये ना"
"हौला है क्या रे? परसूं बोलेतो अपना हैदराबाद का परसूं रे. नया आया क्यारे हैदराबादमें?"

जुन्या हैदराबादेत 'परसूं' या शब्दाला फार्फार महत्त्व आहे.
परसों म्हणजे परवा. कालच्या काल किंवा उद्याच्या उद्या.