Skip to main content

दोन उदास चेहरे

प्रेमासारख्या प्रकरणांच्या आठवणींचा दरवाजा सगळ्या शक्यतांचे द्वार बंद झाल्यावर आपोआप खुलतात.एका वयाच्या पावसाबरोबरच जुन्या प्रियेसीला याद करण्याचा मौसम सुरू व्हायला लागतो. मी खिडकीजवळ बसलो आहे. आणि बाहेर पाण्याबरोबरच आठवणींचा पाऊस कोसळू लागलाय. मन असं काही चिंब भिजून जातंय की, त्याचा कुणालाही पत्ता लागणं शक्य नाही. पण आता कुणी टपकलंच तर मात्र लपवणं कठीण होऊन जाईल.सालं भयंकर आहे सारं.

पिवळ्या पुस्तकांना संग्रालयात पाठवा

आमची प्रेरणा-पिवळ्या दिव्याला संग्रालयात पाठवा
हे विडंबन कृपया हलकेच घ्या. मूळ लेखाविषयी आम्हाला आदर आहेच.

दिवाळीचा फराळ : बेसन आणि खोबर्‍याचे लाडू

नमस्कार मंडळी,
सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा !!!

दिवाळी म्हटलं की रांगोळी, दिव्यांच्या रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजी सोबत आठवतो तो दिवाळीचा फराळ. तसा मी लहानअसल्या पासून तिखटखाऊ. फराळातल गोडं धोड सहसा आवडत नाही. अपवाद म्हणजे बेसनाचे लाडू.
तर आजची सुरवातच या आपल्या लाडक्या बेसनलांडूंनीच करु.

साहित्य :

गोष्ट

एक गोष्ट लिहीन म्हणतो
पहाटेच्या कोवळ्या उन्हात
आनंदाने डोलणार्‍या फुलांची

सूर्य माथ्यावर येऊन थांबेल तेव्हा
जगांची अदलाबदल सुरू झालेली असेल
जुन्या वाटा बुजून नवीन रस्ते बनू लागलेले असतील
काठांवर फुलारून येत असतील
मोहांच्या नवीन मालिका

सुरू झालेली प्रत्येकच गोष्ट
संपणारी असते कधीतरी
तशा संपू लागतील या मालिका देखील,
कधी तरी, दिवसाच्या शेवटच्या प्रहरात

रात्रींच्या अंधारात;
सगळेच दुवे हरवून जातील, बुडून जातील
आठवणींच्या गल्लीबोळा
रस्ते, घरे आणि नदीकाठ

सभोवताली जमून येतील
सांगण्याजोग्या हजार गोष्टींचे ढीग
वर्षांबरोबर वाहत आलेली सुख दःखे
आणि काहीबाही

सौदा - भाग ५

सौदा - भाग १
सौदा - भाग २
सौदा - भाग ३
सौदा - भाग ४

विक्रमने गाडी सरळ घरी नेली. घरात मामी आणि दिलआंटी हजर होत्याच. आपली डिलिवरी इथेच होणार हे अनघा समजून चुकली होती. या सर्वांच्या तावडीतून सुटायला आता कोणताच मार्ग शिल्लक नव्हता. अनघाच्या डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखे झाले आणि नंतर काय घडते आहे त्याची शुद्ध तिला राहिली नाही....

आता पुढे...


मराठी विश्वकोष जालावर सादर

आत्ता म.टा. वर विश्वकोश जालावर सादर झाल्याची बातमी वाचत होतो. तिथूनच मराठी विश्वकोषाची साईट उघडली. पण मध्येच म.टा. वरची बातमी कुठे गेली कुछ पता नहीं. त्यामुळे विश्वकोषाच्या साईटवरुन अध्यक्षांचे मनोगत चोप्य-पस्ते केले आहेत.

मराठी विश्वकोष आता जालावरही उपलब्ध झाला आहे. सध्या एक खंड उपलब्ध दिसतो; लवकरच इतरही उपलब्ध होतील अशी सूचनाही आहे.
मराठी विश्वकोष जालावर उपलब्ध झाल्याने मराठीतील संदर्भ शोधण्याचे काम फारच सुलभ होईल. लवकरच पूर्ण खंड जालावर पडोत ही अपेक्षा.

ई- दिवाळी अंक

सांगली / वार्ताहर: दिवाळी अंक ही महाराष्ट्रीय संस्कृतीची आगळीवेगळी खासीयत आहे. दीपोत्सवात वाचनप्रेमी आणि साहित्यिकांना दिवाळी अंकाची विशेष मेजवानी असते. शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या मराठी दिवाळी अंकांचे स्वरुप बदलत असताना त्याची नेटवरसुद्धा भरारी वेगात सुरू आहे. आता तर त्याने पॉडकास्ट हे श्राव्य माध्यमाचं रूप घेऊन दाखल झाला आहे. ई- दिवाळी अंक नवोदितांच्या लिखाणाने आणि चौफोर विषयाने सजला आहे.