१) Autism.. स्वमग्नता..

तुम्ही दुकानात खरेदी करत आहात/ लायब्ररीत पुस्तकं पाहात आहात/रेस्त्रोंमध्ये जेवत आहात  व अचानक तुम्हाला एका बर्‍यापैकी मोठ्या दिसणार्‍या बाळाचा रडण्याचा किंवा टेंपर टॅंट्रम्सचा, फतकल मारून  हातपाय आपटत बसलेल्या, विचित्र हातवारे करणार्या  मुलाचा आवाज आला तर तुमची प्रतिक्रिया काय होते? "काही शिस्त लावत नाहीत पालक" .. "आमच्या काळी असं नव्हतं ब्वॉ! काहीएक वावगं वागण्याची टाप नव्हती आमची!" .. वगैरे वगैरे..

पण आपण असा कधीच विचार करत नाही की कदाचित त्या मुलाला काही sensory processing disorder असेल, त्याला ऑटीझम असू शकतो. आपल्या साठी जे अतिशय नॉर्मल आहे, ते त्याच्यासाठी फार डीस्टरबिंग असू शकते. उदाहरणार्थ: भल्या मोठ्या  सुपरमार्केट मधील लांबच लांब पसरलेले  फ्लोरोसंट लाईट्स. कधी विचार केला होता तुम्ही, की त्या लाईट्समुळे एखाद्याला प्रचंड unsettling वाटू शकते? ओके, तुम्ही म्हणाल सगळे नखरे आहेत, इतकं काय?

मी माझ्या समजुतीनुसार सांगते, कारण मला ऑटीझम नाहीये, परंतु माझ्या मुलाला आहे. समजा  तुम्हाला हाताला फोड आला आहे व खाज सुटली आहे.  पण तुम्हाला सांगितले गेले कि खाज सुटेल, पण मुळीच लक्ष देऊ नकोस तिकडे. जमेल तुम्हाला? किंवा समजा, पाठीवर अशा ठिकाणी खाज सुटली आहे कि तुमचा हात पोचत नाही तिकडे, किती अस्वस्थता येते अशा वेळी? एखाद्या डावखुर्या व्यक्तीला कात्री दिली वापरायला जी पूर्णपणे उजव्या हाताचा वापर करणार्यांसाठी आहे, किती अवघड जातं साधं काम?  मग एखाद्याच्या पूर्ण सिस्टीमनेच या आपल्या नेहेमीच्या वातावरणाविरुद्ध असहकार पुकारला तर कसं वाटेल??

आता जरा Autism बद्दल पाहू. Autism यालाच मराठीत बर्यापैकी सेल्फ-एक्स्प्लेनेटरी 'स्वमग्नता' असा शब्द आहे. ही एक मुळात Neurological Disorder आहे. होतं काय याच्यात? तर बर्याच केसेसमध्ये  मुल इतर मुलांसारखेच हेल्दी, हसरं खेळतं, सर्व Physical Developmental Milestones व्यवस्थित पूर्ण करणारे असते. पण दीड ते दोन वर्षाचे झाले कि मात्र काहीतरी गडबड आहे हे कळू लागते. नजरेला नजर मिळवत नाही फार. त्याला आवडणार्या गोष्टी वगैरे हाताच्या बोटाने point करत नाही. हाक मारली तर अजिबात respond करत नाही. कधीकधी ही मुलं खूप hyper active असतात. (मुलं ही एनर्जी खूप असल्याने आपल्यापेक्षा हायपरच असतात कायम, पण ऑटीझम असलेली मुलं ही प्रचंड हायपर असतात. बुड एका जागी टेकवून बसली आहेत शांतपणे हे खुपक दुर्मिळ चित्र!) गाड्यांशी खेळत असतील तर इतर मुलांसारखे vroom vroom आवाज करत pretend play समजणे फार अवघड जातो त्यांना.  चाकाशीच तासान तास गरगर फिरवत खेळत बसतात. बर्याच मुलांमध्ये Obsessive compulsive disorder सारखी लक्षणं असतात. खूप वेळेस ती मुलं त्यांची खेळणी, कार्स, प्राणी वगैरे ओळीने लावत बसतात. तो सिक्वेन्स बिघडला तर Tantrums.  बर्याचदा सेन्सरी इंटीग्रेशन डीसऑर्डरमुळे त्यांचा  pain threshold  बराच जास्त असतो. मार बसला तरी कळत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट :  non verbal. ऑटीझम असलेल्या मुलांना बोलतं करणे हे नामुमकीन नसले तरी मुश्कील नक्कीच असते. कधी  त्यांचे ओरल मसल्स कमकुवत असतात त्यामुळे त्यांचा ब्रेन आज्ञा देत असतो ती पाळणे जिभेला व तोंडाला जमत नाही. जी बोलतात पण बाकीची ऑटीझमची लक्षणं आहेत त्यांना Asperger's syndrome आहे असं म्हणतात. त्यांना बोलता येत असले तरी संभाषणकौशल्य नसते. खूप वेळेस लीटरल अर्थ काढला जातो. त्यामुळे जोक्स किंवा बिटवीन द लाईन्स असे अर्थ काळाने अवघड जाते..

what-is-autism ASD

Autism ही स्पेक्ट्रम डीसऑर्डर आहे. Diagnostic and Statistical Manual-IV, Text Revision (DSM-IV-TR) यामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार या  spectrum मध्ये वरील चित्रात लिहिलेल्या  Disorders  येतात. अधिक माहिती : http://www.cdc.gov/ncbddd/autism/hcp-dsm.html

यावर उपाय काही आहे ?
डॉक्टरांच्या मते ही  lifelong disorder आहे. हा का होतो, माहीत नाही. हा बरा होतो का? तर नाही. मग आपल्या हातात काय उरते? हताश होऊन बसायचे का? आपलं क्युट , एरवी बुद्धीमान असलेले बाळ असं सतत आपल्यापासून तुटलेले असण्याची सवय करून घ्यायची का? तो कधीच आपल्याकडे प्रेमाने येऊन आपल्याला  "I love you Aai-Baba" असं म्हणणार नाही असं गृहीत धरायचे का? त्याला बोलता येत नसल्याने त्याला येणार्या फ्रस्ट्रेशन आपण नुसते पाहायचे का? तो कधी हायपर, फ्रस्ट्रेट  होऊन अनसेफ बिहेवियर करेल, आपल्याला मारेल, चावेल ... आपण करायचे तरी काय?

आहेत. आपल्याला करता येण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्याबद्दल मी पुढील पोस्टमध्ये व माझ्या ब्लॉगवर लिहीतच राहणार आहे.  खूप व प्रचंड प्रमाणात रिसोर्सेस आपल्याला उपलब्ध आहेत (निदान आम्ही अमेरिकेत राहात असल्याने इथे उपलब्ध आहेत. मला खरोखर भारतात कसे आहे याची कल्पना नाही) मी मला माहीत असलेल्या  सर्व  strategies, माहिती लिहिणार आहे. मी आंतरजालावर खूप शोध घेतला, पण मराठीतून माहिती बरीच कमी आहे याबद्दल. त्यामुळे याच्यावर लिहिण्याचे मी ठरवले. कारण मी गेले २ वर्षं तरी रोजच्या दिवसाला ऑटीझम फेस करत आहे. नुसता फेस नाही करत आहे तर,  त्याबद्दल सतत पुस्तकं, मासिकं, मेडीकल रिपोर्ट्स मी वाचत आहे. मुलाच्या थेरपीस्टस, डॉक्टर्स यांच्याशी बोलत आहे. स्वत:चे ज्ञान अपटूडेट ठेवायचा प्रयत्न करत आहे.  Jenny McCarthy म्हणते तशी मी Mother Warrior आहे. Smile

- स्वमग्नता एकलकोंडेकर ( Who says, you don't have a right to have a sense of humor when you are parent to a child with an autism?)

Without a doubt, this is all written just for the information purpose. It is just a journal of our journey of my son’s Autism. Some things could be wrong or incorrect as I am still learning, and basically because I am not the Medical Doctor. If by reading this blog makes you concerned about your child, you can talk to your doctor about it. If you are planning to try some of the methods or strategies mentioned in the blog, PLEASE keep in mind that it is completely your responsibility and you would always consult your Doctor before proceeding.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

पुढच्या लेखांच्या प्रतिक्षेत.

आणि तुमच्या लढ्याला मनापासून शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असंच म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय माहितीपूर्ण आणि संयत लेखन.
स्वमग्नतेतले रोजच्या आयुष्यात घडणारे प्रसंग दिल्याने प्रश्नाची ओळख जास्त चांगली होते आहे.
या विषयावर मराठी मध्ये खरोखरच लेखन कमी आहे. तुमचा प्रयत्न स्तूत्य आहे. पुढे नक्की लिहा. वाचत आहे.

या विषयाचे मराठी विकिपान https://mr.wikipedia.org/wiki/स्वमग्नता
यामध्ये तुमच्या लेखातील काही मजकूराची भर कदाचित घालता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-निनाद

तुम्हाला शुभेच्छा. अच्युत गोडबोलेंचे 'मुसाफिर' वाचा. त्यात त्यांनी त्यांच्या मुलाच्या ऑटिझमविषयी अतिशय सकारात्मक लिहिले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

अच्युत गोडबोले नको रे बाबा!
फार बोर मारतो - इतका मी मी मी वाचण्याची हिम्मत नाही!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-निनाद

अच्युत गोडबोले नको रे बाबा!
फार बोर मारतो - इतका मी मी मी वाचण्याची हिम्मत नाही!!

हे एकवेळ मान्यही होईल. (बोरची प्रत्येकाची व्याख्या सांभाळूनही) पण मुलगा ऑटिस्टिक आहे हे समजल्यावर पहिल्यांदा धक्का, मग 'व्हाय मी?' सिंड्रोम, (त्यातून आलेली व्यसनाधीनता) मग त्याच्यावरील उपचारासाठीची वणवण, मग त्याच्या उपायांवरील मर्यादांचा स्वीकार आणि मग त्या नैराश्यातून बाहेर पडणे- या सगळ्या अवघड प्रक्रियेत हातभार लावणारे दुसरे पुस्तक माझ्या वाचनात नाही. इथे प्रश्न गोडबोले (आणि त्यांचे लिखाण - बाय दी वे, इतक्या पटकन एकेरीवर येणे हे काय 'कूल' पणाचे लक्षण आहे की काय?) चांगले की वाईट हा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

ऐसीवर स्वागत!

अश्या लेखनाला रोचक म्हणतानाही हात थरथरतो!
पण वाचायला नक्की आवडेल.

नक्की लिहित रहा! आम्ही वाचतो आहोतच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यापूर्वी 'सानिया' यांनी काढलेल्या स्वमग्नतेच्या धाग्यावर मी एक प्रतिसाद दिला आहे. तो अवश्य पाहावा.
माझ्या मित्राला जुळी मुले झाली. एक मुलगा, एक मुलगी. मुलगा स्वमग्न निघाला. गेले काही वर्ष त्याने आणि पालकांनी 'सन राइज़्' हा कार्यक्रम अवलंबिला. आज तो मुलगा ९ वर्षाचा आहे आणि इतर मुलांच्या शाळेत जातो, इतरांप्रमाणेच अभ्यास-खेळ, इ, बाबी करतो. त्यामुळे स्वमग्नतेवर ताबा मिळविता येत नाही ही गोष्ट खरी नव्हे.

या कार्यक्रमात -
१. कुठल्याही वयाच्या स्वमग्न व्यक्तीला भाग घेता येतो. लहान वयातच कळल्याने उपचार शक्य आहेत, मोठे झाल्यावर 'सुधारणे' दुरापास्त होते, वगैरे गोष्टी खर्‍या नाहीत.
२. भाग घेतल्यापासून पहिल्याच महिन्यात अविश्वसनीय बदल घडतात.
३. पालकांनाही अर्थातच भाग घ्यावा लागतो कारण मुलांबरोबरच प्रशिक्षण पालकांचेही होते.
४. एकदा कार्यक्रम करून झाल्यावर पालकांवर तो नेहमीच्या रोजच्या जगण्यात काही काळ तरी कायम चालू ठेवण्याची जबाबदारी असते. मुलांत बदल होईपर्यंत पालकांना ते कामाच्या व्यापामुळे वा इतर कुठल्या कारणांनी शक्य झाले नाही तर अश्या वेळी पुन्हा एकदा हा कार्यक्रम करणे फार उपयुक्त ठरते.

तुम्हांला हवा असल्यास मित्राचा दूरध्वनी क्रमांक देऊ शकतो. दोनच दिवसांपूर्वी आमचे नेमके याच विषयावर बोलणे झाले आणि मी त्याची परवानगी घेतली आहे. तो या कार्यक्रमाची माहिती, त्याचे स्वत:चे अनुभव देण्यास उत्सुक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिती बद्दल आभार.

सदर व्यक्तीला (तुमच्या मित्राला) ऐसीवर येऊनही माहिती देण्यास उद्युक्त करता येईल का? इथे लिहिल्यास आपापल्या फेसबुकवर वगैरे ऐसीची मंडळी प्रसार करू शकतील. शिवाय ऐसीवरही एका महत्त्वाच्या विषयावर उपयुक्त लेखन होईल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्याला मी वर्षभरापूर्वीच 'ऐसी..' वर लिहिण्याविषयी विचारले होते. त्यावेळी त्याचा या कार्यक्रमाविषयीचा आणि आलेल्या अनुभवांविषयीचा स्वत:चा ब्लॉग चालू होता आणि इतरही बरेच व्याप होते म्हणून त्याला मराठीत लिहीणे शक्य झाले नव्हते. त्याच्या ब्लॉगचा दुवा मी आधीच्या स्वमग्नतेच्या धाग्यावरही दिला होता. मित्राला याविषयी मराठीत लिहायला उद्युक्त करण्याचे काम मी करतो आहे. पाहू त्याला कधी शक्य होते ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद! मी स्वमाग्नातेवर शोध घेत असताना मला येथील धागा व तुमचा प्रतिसाद मिळाला होता. (तुमच्या मित्राचा ब्लॉगदेखील मी वाचत असते.)
Son-rise प्रोग्रेम बद्दल मी गेले वर्षभर वाचत आहे. मला त्यांचे बेसिक तत्व आवडते व आम्ही ते थोडेफार पाळतो. (जॉईनिंग द किड्स व्हेन दे आर स्टिमिंग.स्टिमिंग - विचित्र हातवारे, पळापळ अथवा गोल गिरक्या. ) आम्हाला मुलाचा आय काँटॅक्ट सुधारल्यासारखा वाटतो त्या काळात.

तुमच्या मित्राशी आम्ही संवाद साधू शकतो. पण त्यांचा मुलगा व्हर्बल आहे. हाय फंक्शनिंग ऑटीझम दिसतो तो. आमचा मुलगा बोलत नाही(अजुनतरी). पण आम्ही नक्कीच भविष्यात त्यांना संपर्क साधू. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण त्यांचा मुलगा व्हर्बल आहे. हाय फंक्शनिंग ऑटीझम दिसतो तो. आमचा मुलगा बोलत नाही(अजुनतरी)
...............मित्राशी बोलताना त्याने 'सन् राइज़्' कार्यक्रमात आलेल्या २२ वर्षांच्या स्वमग्न एका व्यक्तीचे उदाहरण दिले होते. इतक्या वर्षांत न बोललेल्या / क्वचित बोललेल्या या व्यक्तीने पहिल्या आठवड्यातच २-३ वाक्ये उच्चारली. त्याच्या नातेवाईकांना हर्षवायू व्हायचा बाकी होता. तेव्हा माझ्या मागल्या प्रतिसादातील
२. भाग घेतल्यापासून पहिल्याच महिन्यात अविश्वसनीय बदल घडतात.
या ओळीकडे विशेष लक्ष वेधू इच्छितो. तेव्हा केवळ वर्तनातील फरकांमुळे तुलना करू नये ही विनंती. सांगण्याचे कारण असे की हा कार्यक्रम राबविणार्‍यांना या बाह्य वर्तनांतील फरकांपलिकडे जाऊन काही असे सामायिक तत्त्व सापडले आहे ज्यामुळे ह्या तुलना फक्त वरवरच्या ठरतात. तुमचा या क्षेत्रातला अभ्यास साहजिकच अधिक आहे. मात्र अनेकदा चिकित्सेपेक्षा प्रत्यक्ष अनुभवांनी आलेली समज अधिक मोलाची ठरते.
तुमच्या या प्रवासासाठी अभीष्टचिंतन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थँक्यु! असे प्रतिसाद व अशा सक्सेस स्टोरीज वाचून नव्याने उभारी येते. Smile
माझा नवरा सन राईज प्रोग्रॅम बद्दल बरंच वाचतो आहे. त्याचा एक उपयोग आम्हाला खरंच खूप होतो, मुलाला आम्ही अचानक इंटरेस्टींग वाटू लागलो. त्यामुळे आमच्याही आशा बर्‍याच वाढल्या आहेत सन राईज प्रोग्रॅम कडून. बघूया भविष्यात काय लिहीले आहे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या सकारात्मक attitude ला सलाम. तुमचा लढा नक्कीच सफल होईल ही शुभेच्छा !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय डेरिंग असते लोकांचे. लैच जबरदस्त.

शुभेच्छा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वाचनखूण साठवली आहे.
ही सकारात्मक्/अहिंसक लढाई सुरु ठेवायला तुम्हाला बळ मिळो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

स्वमग्नते विषयी जागृती झाली तर लोकांचा पहाण्याचा दृष्टीकोन बदलेल. कारण आपण दिलेल्या रेस्टॉरंट मधील उदाहरण हे समजावून घेण्याची क्षमता ही अज्ञानामुळे नसते. पालकांनी ही या गोष्टी समाजाबरोबर शेअर केल्यास त्यांच्यावरील ही ताण कमी होण्यास मदत होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

शुभेच्छा! स्वमग्न / शारिरीक अपंगता असलेल्या व्यक्ती अगदी घरातच असल्यामुळे थोडाफ़ार अनुभव आहे. अतिशय सुंदर काम करत आहात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

शुभेच्छा.

आपल्याला करता येण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्याबद्दल मी पुढील पोस्टमध्ये व माझ्या ब्लॉगवर लिहीतच राहणार आहे.

हे वाचायला आवडेल, तसेच या आजारावर होणारे निरनिराळ्या उपचार-प्रयोगांबद्दलही माहिती दिलीत तर अधिक उत्तम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी Mother Warrior आहे.

प्रेरणादायी ओळ आहे. फार आवडली.

डॉक्टरांच्या मते ही lifelong disorder आहे.

हे वाक्य जरा जास्त चिकिस्तून घ्यावे. असल्या वाक्यांनी माणूस जास्त खचतो. माझ्या ए डी एच डी आहे शाळेतल्या शिक्षिका म्हणाल्या. अभ्यासक्रमाकडून मुलांच्या बुद्धीकडून अतिच अपेक्षा होत्या. काही मुले त्या पूर्ण ही करत. पण आम्ही या भ्रमात फसलो कि मुलात काहीतरी कमी आहे. बर्‍याच डोक्टरना दाखवले. कितीतरी टेस्ट केल्या. उपचार असा कोणताच केला नाही. या डोक्टरचे हे मत, त्याचे ते मत. हा याच्याकडे पाठवतो, तो याच्याकडे. बायकोला कोण कंट्रोल करणार? ती मुलाला काहीतरी चांगले होईल म्हणून त्या होमिओअपॅथी वाल्यांच्या साखरगोळ्याही देऊ लागली. हा सगळा खर्च त्याच्या शिक्षणाच्या खर्चाइतका होऊ लागला. "आम्ही मुलाकडे सहानुभूतीने वैगेरे (जसे अपंग असता तर्)पाहू लागलो." त्याचे लेखन इतर मुलांपेक्षा फार वाईट. वर्गात मुळीच लक्ष नाही. प्रार्थनेला थांबणे नाही. खेळात सहभाग नाही. म्हणजे नाही म्हणजे नाहीच असे नाही पण तो अपेक्षेप्रमाणे सगळे करत नसे. प्रार्थनेला जाईल, पण नीट शांत थांबणार नाही, हलेल, बोलेल , इ.
माझ्यामते मुलात माझ्या मुलात काहीच खोट नव्हती. शाळेच्या बौद्धिक अपेक्षा, शारीरीक अपेक्षा न पूर्ण करणे म्हणजे खोट नव्हे. त्या अपेक्षा मला अवाजवी वाटत होत्या. सात विषय, दर आठवड्याला चाचण्या, प्रचंड होमवर्क. आणि त्याच्या आईला हे पटेचना हे नाही केले म्हणजे मुलात काही नैसर्गिक गडबड आहे असे नव्हे.
मग मी विषय हलक्याने घेतला. मला डोक्टरांनी सांगीतले होते कि ५-६ वर्षांनी हा प्रकार जाईल. चिंता करू नका. नंतर आम्ही अजून एका डॉक्टरकडे गेलो. तो खूपच तज्ञ, छान, इ इ वाटला. (तसा मी डोक्टरांची तुलना करत नाही. त्यांनी सांगीतलेले उपचार गुप्चुप घेतो. डॉक्टरांत मतभिन्नता आढळली तर चर्चा करतो आणि जो समोर आहे त्याच्या मतानुसार जातो.)पण त्याने सांगीतले कि मुलाला आत्ताच उपचार करायला हवा, अन्यथा त्याला आत्ता गमावलेली कौशल्ये नंतर न येण्याची खूप शक्यता आहे. (ही डॉक्टरांची विधान करण्याची शैली आहे.)म्हणजे तो कधी लिहू, वाचू शकणार नाही. अगोदर शांत असलेला (५-६ वर्षे उलटायची वाट पाहणारा) मी पून्हा प्रचंड अस्वस्थ झालो.

त्यांनी पुन्हा टेस्ट करवल्या, आणि नियमित उपचारांठी एका डॉक्टरकडे धाडून दिले. पण हा डॉक्टर औषधे देईना. अजून या हॉस्पिटलात यांच्याकडे जाऊन टेस्ट करा म्हणायला लागला. पण तो वॉरियर स्पिरिट माझ्याकडे नव्हता म्हणा. दिल्लीतल्या २-३ प्रतिष्ठित क्लिनिक, २-३ प्रतिष्ठित सरकारी रुग्णालये, २-३ खासगी रुग्णालये धूंडाळून ही नक्की काही मार्ग नाही म्हणजे चिडचीड आहे. मी उपचार सोडून दिले. बायको करेल ते करेल. तसेही पैसे जाण्याव्यतिरिक्त साखरगोळ्यांचे अन्य परिणाम नसतात म्हणे.

मी विकिपेडीया, इ वाचतो. पण त्यात मी केवळ 'पालकांनी अशा मुलांसोबत कसे वागावे, इ' माझ्या कंट्रोलमधे असलेल्या गोष्टीच अंमलात आणतो/गंभीरतेने वाचतो. विकिपिडिया वाचायचा माझा उद्देश डॉकटरांना उपचार करायला शिकवणे हा नसतो. ही माझी वृत्ती बदलू शकत नाही. डॉक्टरने उपचार करावे वा उत्तम मार्गदर्शन करावे (या शहरात, या इस्त्पितळात, या वैद्याकडे जा). असे होत नाही तर काय करणार. मी पून्हा गप्प बसलो. पण अंतर्मनात दु:खी होतो.

नंतर मी विचार केला कि असं दु:खी असायचं कारण नाही. आपल्या मुलाला इतर जास्त क्षम मुलांशी भिडवायची गरज नाही. त्याला शिकवताना आम्हाला जो जोर यायचा तो मी कमी केला. काय कमी आहे मुलामधे असा विचार केला. एकाग्रता नाही म्हणावे ३-४ तास सतत टीव्ही पाहतो, गेम्स खेळतो, स्क्रिबलिंग करतो. लिहावेच ही अपेक्षा का? मला आज कोणी जापनिज लिहि /शिक म्हणाले तर? तो छान बोलतो, खेळतो, गप्पा मारतो, त्याला ३-४ भाषा येतात, खातो, खोड्या करतो, लोभ करतो, लहान मुले करतात ती प्रत्येक गोष्ट करतो. मग लिहायला आले पाहिजे ही नैसर्गिक अपेक्षा आहे का? नाही असे वाटायचे पण दु:ख असे असायचेच.

शेवटी बायको पण वॉरियर मदर निघाली. तिने रोज वॉर फूटिंगवर प्रयत्न केले. ३-४ तास विथ पेशन्स. आज ईशान्य लिहू शकतो. वॉरियर मदरची त्याचे अक्षर निव्वळ भिकार आहे म्हणून रड चालू आहे. पण मला खात्री आहे कि या रडीला अर्थ नाही. आणि डॉक्टरांच्या विधानांनी दु:ख करायचे थांबवले आहे. माझा वैज्ञानिक दृष्टीकोन टोन डाऊन केला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

थँक्स तुमच्या प्रतिसादासाठी.
मी पुढच्या लेखांमधून लिहीणारच आहे. पण डॉक्टरी सल्ल्यावरच विसंबून राहील्याने काही होत नाही. अशा केसेसमध्ये पालकांना एक्स्ट्रा कष्ट घ्यावेच लागतात. इंटरनेटवरील सपोर्ट गृप्स, इतर मुलांना काय अडचणी आल्या, त्या कशा दूर झाल्या इत्यादी. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डाएट. अमेरिकेमध्ये एडीएचडी, ऑटीझम असलेल्या मुलांसाठी ग्लुटेन फ्री-कॅसिन फ्री डाएट फायदेशीर ठरते असं म्हणतात. त्याबद्दल माहिती काढा. कदाचित तुमच्या मुलाला फायदा होईल. त्याला बाकी किती काय काय येतंय. ट्रस्ट मी. त्याला खूप येतंय ऑलरेडी. तो बोलतोय?! इकडे माझा मुलगा बोलला तर मी बाकी सगळ्या क्वर्क्स माफ करायला तयार आहे. कृपया त्याच्या कलाने घ्या. त्याच्यासमोर कधीही चिंता व्यक्त करू नका. एडीएचडी असो नाहीतर एएसडी असो - मुलाला आनंदी व पोषक पालकत्व मिळालेच पाहीजे. Smile [ सॉरी,प्लीज डोंट माईंड.. पण हे फक्त तुमच्यासाठी नाहीये.इन फॅक्ट ही माझी स्वतःसाठीची मेंटल नोट आहे. ताण-तणाव, स्ट्रेस, वेगवेगळ्या थेरपीजना इकडेतिकडे घेऊन जाणे, या सगळ्यात पिचून जायला होते. पण इन्फ्रंट ऑफ हीम, ऑल्वेज वेअर द हॅपी फेस! स्वतःला बजावावेच लागते.. Smile ]

पण इन एनी केस, प्लीज प्लीज.. होईल बरा. काही नाही सगळी थेरं आहेत, अशा वळणावर कधीही जाऊ नका. एडीएचडी हा वरवर पाहाता आजार वगैरे वाटत नाही. पण त्या व्यक्तीला खरंच तेव्हढं अस्वस्थ किंवा अटेंशन/एकाग्रता गोळा करणे अवघड जाते. वाचा: लेखात लिहीलेले डावखुर्या माणासास कात्री. हे समजून घेतले पाहीजे. त्यासाठी आपल्याकडचे फेवरिट उपाय शांती करू, मुंज होऊदे.. प्लीज नको.
होमिओपथी - ज्याचे त्याचे मत. माझे मत ५०-५० आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think the future of psychotherapy and psychology is in the school system. We need to teach every child how to rarely seriously disturb himself or herself and how to overcome disturbance when it occurs.
Albert Ellis

शालेय अभ्यासक्रमात मानसशास्त्र विषयाला लवकरच समाविष्ट करण्यात येइल असं दिसतये.
वाई ला गरीब गावातल्या मुलांनसाठी भारत विद्यालय नावची शाळा आहे.शाळेत ग्राममंगलचा अभ्यासक्रम आहे .एकदा MKCL च्या सायली तामणे सोबत जाण्याची संधी मिळाली. तेव्हा त्या आठवी च्या मुलांना थियरी ओफ कॉन्फ्लीक्ट शिकवीत होत्या. शाळेत शि़क्षकांना काका-मावशी आणी व्यवस्थपकांना बाबा म्हणन्याचा प्रघात आहे.
नक्की एकदा भेट द्यावी अशी शाळा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यात लिहिलेल्या गोष्टी पटण्यासारख्याच आहेत. गंमत म्हणजे, या स्पेक्ट्रमचा आवाका एवढा मोठा आहे, की प्रत्येक मूल वेगळे असते. एकाला लागू पडणारी उपचार पद्धती दुसर्‍याला लागू पडेलच असे नाही, त्यामुळे दुसर्‍यांच्या उपचारांकडे मार्गदर्शक तत्व म्हणून पाहत प्रत्येकाला आपापल्या मार्गावरून एकटे चालावे लागते. अशावेळी आप्त, मित्र, शिक्षक यांच्या साथीनेच बळ मिळते.

काही बाबी नमूद कराव्याश्या वाटतात, त्याम्हणजे, स्वमग्नता म्हणजे एकलकोंडेपणा असेलच असे नाही. अनेकदा स्वमग्न मुलांना इतरांमधे सामिल होण्याची इच्छा असते, पण कसे सामिल व्हावे, हे उमगत नाही. त्यांच्यापरीने ते इतरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात, पण इतरांची संवाद करण्याची तर्‍हा वेगळी असल्यामुळे अनेकदा ते लक्षातच येत नाही आणि दरी वाढत जाते. उदाहरण द्यायचे झाले, तर "अजून पोळी हवी आहे का?" या प्रश्नाचे उत्तर 'हो/नाही' हे आपल्याला अपेक्षित असते, तेव्हा जर समोरचे मूल उत्तर न देता गप्प राहिले, तर आपला संयम सुटतो, पण त्या मुलाच्या दृष्टीने, होकाराचा अभाव म्हणजेच नकार असू शकतो, ही शक्यताच आपण विचारात घेत नाही.

सेन्सरी प्रोसेसिंगबद्द्ल म्हणाल, तर आपल्या सर्वांमधेही बर्‍याच खोडी असतात, पण आपले वागणे समुहात न खपण्याइतके वेगळे नसल्यामुळे त्यांकडे डोळेझाक केली जाते अथवा आपण त्यावर प्रयत्नपूर्वक मात करू शकतो. या मुलांना ते सहज शक्य नसते. अनेक थेरपींचा वापर करून मात्र त्याची तीव्रता कमी करता येते. सेन्सरी प्रोसेसिंग समजून घेण्याकरता सोप्या भाषेत लिहिलेले 'Rising a sensory smart child' पुस्तक मला आवडते. तुम्ही एव्हाना हे वाचलेही असेल.

तुमच्या लढ्याकरता शुभेच्छा!

लिहित्या रहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थँक्स तुमच्या प्रतिसादाकरता.
आमचा मुलगा एकलकोंडा नाही आहे. खूप अफेक्शनेट, सोशल होऊ शकतो, पण त्याला कळत नाही नक्की काय करायचे. मग तो माझ्या मानेला भयंकर घट्ट मिठी मारतो- इतकी घट्ट की मी चोक होऊन खोकायला लागते. त्याला कळत नाही तो किती प्रेशर टाकतोय. हायपोटोनिया वगैरे..
मी असे नाव घेतले कारण मला पेननेम हवे होते. शिवाय माझा मुलगा असा नसला तरी मी बाकीची मी ऑटीझम झालेली मुलं पाहीली ती अक्षरशः त्यांछ्याच जगात लॉस्ट होती.

आपल्या सर्वांनाच सेन्सरी प्रोफाईल असतो. मी सेन्सरी ओव्हररिस्पॉन्सिव्ह आहे असं म्हणीन कारण मला काहीकाही आवाज सहन होत नाहीत. किंवा फुट मसाज वगैरे अजिबात चालत नाहीत. नवरा सेन्सरी सिकिंग आहे असं म्हणीन. कोणी केसातून हात फिरवत बसते, कोणी पाय हलवत बसते. सगळ्या गोष्टी थोड्याफार फरकाने असतातच सगळ्यांच्यात. प्रमाण कमी अधिक झाले की गडबड होते. Smile

रेझिंग सेन्सरी स्मार्ट चाईल्ड अतिशय सुंदर पुस्तक आहे. मी माझ्या ब्लॉगवरती सर्वा वाचलेल्या व आवडलेल्या पुस्तकं/वेबसाईट्सची लिंक देणार आहे भविष्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहितीपूर्ण लेख. स्वमग्नतेचे तोटे खूपच असतील पण त्याची काहीतरी positive बाजूदेखील असेल अस वाटत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

हो! पॉझिटीव्ह बाजू आहे ना! कधीकधी ही मुलं खरोखर बुद्धीमान असतात. एखाद्या विशिष्ट विषयात ते बाकी सेम वयाच्या मुलांपेक्षा खूपच मास्टरी मिळवलेले असतात. बर्‍याच जणांना आकडेमोड, मोठी-अवघड गणिते काही सेकंदात सोडवता येणे इत्यादी जमते.(रेन मॅन मुव्ही पाहीला का? अर्थात त्यात परिपूर्ण चित्रण नाहीये. किंवा मी असं म्हणीन ही स्पेक्ट्रम डीसॉर्डर असल्याने प्रत्येक मूल वेगळं.)

माझ्या मुलाची स्पेशलिटी आहे - आल्फाबेट्स, वर्ड्स.. तो दिड वर्षाचा असताना त्याला सगळे अप्परकेस्,लोअरकेस अल्फाबेट्स येत होते. अर्थात तो बोलत नसल्याने आम्हाला आयपॅडच्या अ‍ॅप्लिकेशन्स वरूनच कळायचे त्याला किती येते आहे ते. आता तीन वर्षाचा आहे, आयपॅडवरच्या स्टोरीतेलिंग अ‍ॅप्समधल्या स्टोरी वाचणे हा अतिशय आवडाता उद्योग. तसेच पुस्तकांमधून फोन कुठाय, बलून कुठाय असं विचारले की तो त्य त्या वर्डवर हात ठेवतो. (त्याला अर्थातच चित्रंदेखील माहीती आहेत. बट ही प्रिफर्स वर्ड्स).. लॅपटॉपवर टाईप करत बसणं हा दुसरा स्पेशल आवडता उद्योग. एलिफंट , झायलोफोन, अ‍ॅनिमल्स असे मोठे मोठे शब्द पठ्ठ्याला टाईप करता येतात.. Smile
माझ्या सध्याच्या स्ट्रॅटॅजीमध्ये लिहून दाखवणॅ हा महत्वाचा भाग आहे. मी प्रत्येक वाक्य बोलताना त्याच्या मॅग्नेटीक डुडल पाटीवर लिहून दाखवते. कधी कधी व्हॉट डू यु वाँट टू इट? असं तोंडाअने बोलून मी पाटीवर लिहून त्याला ऑप्शन्स देते. वॉफल्स/ ओटमील. तो त्यातून ऑप्शन सिलेक्ट करतो. असं आमचं कम्युनिकेशन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0