अपर्णा रामतीर्थकर

मन यांनी "सो बॅड दॅट इटस गुड" वर्गातील अपर्णा तीर्थकर यांचा युट्यूब वरील १ तासाचा १ व्हिडीओ पाहीला.काही गोष्टी पटल्या तर काही नाही. स्त्रियांनी स्त्रियांना समजावून घावे/ सन्मान द्यावा/सासूशी आपुलकीने वागावे हे मुद्दे पटण्यासारखे वाटले.
अंगभर कपडे घालावे/रांगोळी यावी/मुलींनी उंच स्वरात बोलू नये - हे काही मुद्दे वाद होण्यासारखे आहेत म्हणजे काहींना पटतील तर काहींना नाही.
पुरषाचा घरात धाक असावा ही बाब मला आक्षेपार्ह वाटली नाही. नवरा घरातून पळून गेलेल्या अमेरीकन स्त्रिया पहाण्यात आहेत. बेबंद (हवे ते खा/ल्या/वागा) असे जीवन जगणार्‍या या स्त्रिआयांच्या आयुष्याला विशेष वळण पाहीले नाही. कोणी विचारेल हवे तसे खा/ल्या/वागा यात वावगे काय? तर मला नक्की सांगता येणार नाही. पण एकमेकांवर अंकुश महत्त्वाचा असतो या विचारांची मी आहे. तेव्हा मला त्यात वावगे वाटते.

बाकी अपर्णाताईंच्या कथनानुसार त्या घेत असलेली वृद्धांची काळजी, कुटंबव्यवस्था ढासळू नये म्हणून त्या घेत असलेले अथक परीश्रम हे मला कौतुकास्पद वाटतात. लिव्ह इन का काय ते ग्लॅमरस वाटत असले तरी सिंगल पेरेंटींग किंवा म्हातारपणी एकाकीपण तितकेसे ग्लॅमरस नसावे असा कयास आहे.

मुलीच्या संसारातील, मुलीच्या आईचा अनाठाई हस्तक्षेप या विषयावरचे त्यांचे मत अतिशय अत्यंत पटण्यासारखे आहे. खरच अशा मुली पाहीलेल्या आहेत ज्यांची आई सकाळी ६ वाजल्यापासून ते १० पर्यंत फोनाफोनी करुन, नको ते सल्ले देऊन, संसाराची वाट लावते. समोरचे ताट द्यावे पण बसायचा पाट देऊ नये हा (अर्थात म्रुत्यूपत्र करा पण जीवंत असेपर्यंत मुलाना इस्टेट देऊन टाकू नका) वृद्धांना दिलेला सल्लाही तसाच पटण्यासारखाच आहे.

अस्वल यांच्या धाग्यावर अपर्णाताईंवर माफक टीका झालेली आहे. ती येथे सांगोपांग येऊ द्या. मला तरी माझी मते तपासून पहाण्याची संधी मिळेल. का प्रतिगामी शिक्का मारुन उगाच एखाद्याला(अपर्णाताई) झोडायचे? कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी झटण्यात, प्रवाहाविरुद्ध पोहण्यात आक्षेपार्ह काय आहे ते कळले तर बरे होईल.

अर्थात वर सांगीतल्याप्रमाने, मी एकच व्हिडीओ पाहीला आहे. अन्य अजून पहायचे आहेत.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

मुळात लग्न करणं- न करणं, लिव्हीनमध्ये राहणं-न राहणं यालाच स्वतंत्ररीत्या मूल्याचा दर्जा देता येणार नाही. त्यामुळे रामतीर्थकर बाईंच्या (हास्यास्पद) बडबडीचा संदर्भ नसेल तर ही चर्चा व्यर्थ आहे. > +१. किंवा मग हे प्रतिसाद, चर्चा अतिशहाणांच्याच लिव्हइन की लग्न (की दोन्ही अमानुष थरार ;-)) धाग्यावर हलवणे ठीक होइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडक्यात सारांशः विचार करुन निर्णय घेणारे आणि विचार न करता निर्णय घेणारे असे दोन गट आहेत. विचार करुन निर्णय घेणारे विचार न करणाऱ्यांपेक्षा थोडेसे बरे हे मत मी तात्पुरते मानायला तयार आहे. मात्र मूळ विधानात निष्कारण लग्नाची पावशेर टाकली असल्याने वाद वाढला.

लग्न करणारे व लिवइनवाले हे विचार करणाऱ्या व न करणाऱ्या अशा दोन्ही गटांमध्ये असू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> लग्न करणारे व लिवइनवाले हे विचार करणाऱ्या व न करणाऱ्या अशा दोन्ही गटांमध्ये असू शकतात. <<

शक्यता नाकारता येत नाही. मात्र, लिव्ह-इन करणारे विचार न करणाऱ्या गटात बसण्यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे : विचार न करता प्रवाहपतित होऊ इच्छिणाऱ्यांसाठीचा एक लिव्ह-इन प्रवाह त्यासाठी अस्तित्वात असायला हवा. भारतात अद्याप तरी तसा, म्हणजे प्रवाहपतितोत्सुकांसाठीचा लिव्ह-इन प्रवाह दिसत नाही असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

येथे लिव्ह इन वादी असणार्‍या अनेकांची विचारझेप समान नागरी कायदावादी लोकांच्या विचारझेपेइतपतच आहे असे अनेकदा वातते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ROFL
एका वाक्यात अनेक जोडे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अगागागागागागागागागा ROFL ROFL ROFL

थत्तेचाचांना एक साष्टांग दंडवत _/\_

त्यातून नवीन म्हणही बनवता येईलः लिबरलांची धाव लिव्ह-इनपर्यंत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

<येथे लिव्ह इन वादी असणार्‍या अनेकांची विचारझेप समान नागरी कायदावादी लोकांच्या विचारझेपेइतपतच आहे असे अनेकदा वाटते.>

हेच वाक्य 'विचारझेप' च्या जागी 'विचारझोप' घालून वाचा. कदाचित अधिक अन्वर्थक वाटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रतिसादाच एकतर लॉजीक गंडलय किंवा अॅनालॉजीतरी.
ज्यांना समाननागरीकायदावादी म्हणलय, ते बहुसंख्येच्या जोरावर आपले कायदे अल्पसंख्यकांवर लादू पाहतात ना? मग इथले लिव्हइनवादी तसे करतायत असं वाटतय तुम्हाला आणि पाच मार्मिक देणार्याँना?
मलातर उलटच वाटतय. म्हणूनच वरच्या एका प्रतिसादात म्हणल की एवढं थ्रेटनिंग का वाटत प्रोलग्नवाल्यांना? इतर बाबतीत (समलैंगिकता, सनाका इ) अल्पसंख्यकांची बाजू घेणारे या बाबतीतच बहुसंख्य प्रतिगाम्यांच्या बाजूने का आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>प्रवाहपतित असण्याचा निर्णय विचार न करताच घेतलेला असतो हा फार मोठा गैरसमज आहे. प्रवाहपतित असण्याचे अनेक फायदे असतात. सर्वजण करतात त्यामागे (कदाचित) समूहाचा शहाणपणा असू शकल्याने तोच मार्ग स्वीकारल्यास यश मिळण्याची शक्यता वाढू शकते असा विचार (मुकी-बिचारी कुणीही हाका प्रकारची) जनता करत नसावी की काय?

शिवाय खूप विचार करून (प्रवाहाप्रमाणेच) लग्न करणे योग्य* आहे असा निर्णय घेतलेला असू शकतो.

*पक्षी- तुमच्या प्रतिसादात 'यश मिळण्याची शक्यता वाढू शकते' असा मुद्दा आहे त्याच्या पुढे जाऊन "यश मिळणारच आहे" अशी खात्री पटलेली असते असे म्हणणे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

या रामतीर्थकर बाईंनी एका अ‍ॅवॉर्ड विनिंग शिक्षिकेचे उदाहरण दिलेले आहे. त्या शिक्षीकेचा सासरा रामतीर्थकर बाईंच्या संस्थेत येऊन खायला मागतो. ही शिक्षिका फ्रीज व स्वैपाक घरास कुलुप लावून निघुन जाते. आणि मग रामतीर्थकर बाई प्रश्न विचारतात की - उपयोग काय तुमच्या अ‍ॅवॉर्ड चा ?

तो सासरा एकदम सद्गुणाचा पुतळा आहे की एक खलपुरुष आहे ते मात्र गुलदस्त्यातच ठेवले रामतीर्थकर बाईंनी.

तो सासरा जर धोपटून काढायच्या लायकीचा असेल तर ?

तो सासरा - किंवा एकंदरीत वयाने मोठी असलेली व्यक्ती हे परफेक्ट शिवाय दुसरे काही असूच शकत नाही - असे रामतीर्थकर बाईं थेट म्हणत नाहीत - पण तसेच दिसतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो सासरा जर धोपटून काढायच्या लायकीचा असेल तर ?

कशावरून? आपल्याजवळ याचा काही पुरावा आहे काय?

तो सासरा - किंवा एकंदरीत वयाने मोठी असलेली व्यक्ती हे परफेक्ट शिवाय दुसरे काही असूच शकत नाही - असे रामतीर्थकर बाईं थेट म्हणत नाहीत - पण तसेच दिसतेय.

तत्त्वतः सासरा चांगला वा वाईट, सज्जन-गुणी किंवा हलकट, कसाही असू शकेल. मात्र, त्या सासर्‍याच्या स्वघोषित वकील या नात्याने, त्या सासर्‍यास गोत्यात आणेल असे कोणतेही विधान करण्याचे बंधन बाईंवर नाही. त्या पाचवी घेऊ इच्छितात.

अशा परिस्थितीत, सासरा 'धोपटून काढायच्या लायकीचा आहे' (व्हॉटेवर द्याट मे मीन) हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर येते. त्याकरिता आवश्यक तो तपास स्वबळावर करून योग्य तो पुरावा आपण जरूर सादर करू शकता. अन्यथा, आपण तसे सिद्ध करू न शकल्यास, 'प्रिझम्प्शन ऑफ इनोसन्स' सासर्‍यास लागू पडते, एवढ्याच बाबीकडे नम्रपणे निर्देश करू इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सीदंति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति...

(धोपटून काढण्याच्या लायकीचा खलपुरुष) गब्बर Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रामतीर्थकर बाई कुटुंबसंस्था टिकवणे म्हणजे ती एका विशिष्ट पद्धतीनेच टिकवणे -बाईनेच हे केलं पाहिजे नि पुरूषानीच ते केलं पाहिजे- या एका साच्याचा पुरस्कार त्या करतात जो अजिबात पटत नाही. या 'साच्याच्या' विरोधात मी आहे.
त्या जे कौटुंबिक प्रश्न आजच निर्माण झाल्यासारखा आव आणतात तो खोटा आहे. पूर्वीच्या काळी-अगदी त्यांची आई जेव्हा चार भिंतीत 'ब्रेनवॉश्ड समाधानी' आयुष्य जगल्या तेव्हाही कौटुंबिक कलह होतेच-थोड्या वेगळ्या प्रकारे ते दिसत असतील किंवा व्यक्त होत असतील. मुळात या प्रश्नांना सोडवायचे असल्यास कुटुंबाचा जो जीव घुसमटेल इतका विळखा आहे तो सैल करणे हाच उपाय आहे असं मला वाटतं. ही साचेबद्ध कुटुंबसंस्था बळकट असतानाचा नेमका कोणता 'गोल्डन पिरिएड' होता जो आता अचानक जातोय असं वाटतय ?

माणुसकी सोडून वागू नये हे मान्यच आहे. पण त्यांचा फक्त तेवढाच मुद्दा नाहिये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवरा घरातून पळून गेलेल्या अमेरीकन स्त्रिया पहाण्यात आहेत. बेबंद (हवे ते खा/ल्या/वागा) असे जीवन जगणार्‍या या स्त्रिआयांच्या आयुष्याला विशेष वळण पाहीले नाही.

ह्या स्त्रिया नवरा पळून गेला म्हणून बेबंद वागल्या, की त्या बेबंद होत्या म्हणून नवरा पळून गेला? शिवाय बेबंद म्हणजे नेमक्या कशा वागतात ह्या स्त्रिया?
मुद्दा असा की जे बेबंद वागतात (मग ते पुरूष असोत की स्त्री) त्यांच्यावर खरंच कुणाचा धाक असणार आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

त्या लग्नाआधीपासून बेबंद नव्हत्या याची खात्री आहे का? जर हो, तर लग्नामुळे बेबंद झाल्या नाहीत कशावरून? जर नाही, तर त्या नवरोबाची अक्कल काय धोबीघाटावर कपडे धुवायला गेल्ती का लग्न करताना?

-बेबंदशहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

पण कोणाच आयुष्य बेबंद आहे की नाही हे ठरवणारे आपण कोण टिकोजीराव? बेबंदची वैश्वीक व्याख्या आहे का काही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे नाईल ने ठरवलेलं दिसत नाही. सारिका ह्यांनी ठरवलेलं दिसतंय, तेव्हा त्यांना टिकोजीबाई हा खिताब देण्यात यावा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

त्याऐवजी 'टिकोजीम्याडम' किंवा 'टिकावतीदेवी' चालेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओ बायका फाटक्या तोंडाच्या असतात माहीत नै का तुम्हाला? म्हणून मी Nileलाच टिकोजीराव म्हणणार. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुमचा आणि त्याचा अक्ष आहे का? Wink

गंभीरपणे: 'आपण' म्हणलय मंजे त्यात मीदेखील आलेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओ हॅलो, टिकोजीराव हा आमचा ट्रेडमार्क आहे. तो वापरणार्‍या तुम्ही कोण टिकोजीम्याडम Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होक्का? पण बायका स्वार्थी असतात. त्यामुळे कोणाचाही ट्रेडमार्क हिसकावून घेऊन, फुकटात वापरतात.
बादवे टिकोजीराव हा शब्द कुठून आला? तो जसा वापरला जातो त्यामागे काही कथा असेल असं वाटतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टिकोजीरावी नही चलेगी नही चलेगी!!!

तदुपरि शब्दाची व्युत्पत्ती ठाऊक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

टीक-टिका-टिकली हे शब्द आपल्याला परिचित आहेत. (वज्रटीक हे एका पारंपारिक दागिन्याचे नाव आहे.) 'टिका लागणे' म्हण्जे प्रसिद्ध होणे. 'टिक्याचा धनी' म्हणजे अधिकार, विद्या, संपत्ति ह्यांपैकी काहीहि जवळ नसताना विनाकारण महत्त्व मिळालेला पुरुष. ह्याचाच पर्यायी शब्द म्हणजे टिकोजी अथवा टिक्कोजी. (संदर्भ मोल्सवर्थ).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह! बहुत धन्यवाद सरजी. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अधिकार, विद्या, संपत्ति ह्यांपैकी काहीहि जवळ नसताना विनाकारण महत्त्व मिळालेला पुरुष
............असे लोक मग टीकेचे* धनी होतात. Smile
*टीका : टीका-टिप्पणीवाला टीका

'टिकमार्क' इंग्रजी शब्ददेखील येथूनच आला असावा काय ? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिसलेली टीका ती मिष्टिका हेही आत्ताच लक्षात आले Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

टीक-टिका-टिकली हे शब्द आपल्याला परिचित आहेत. (वज्रटीक हे एका पारंपारिक दागिन्याचे नाव आहे.) 'टिका लागणे' म्हण्जे प्रसिद्ध होणे. 'टिक्याचा धनी' म्हणजे अधिकार, विद्या, संपत्ति ह्यांपैकी काहीहि जवळ नसताना विनाकारण महत्त्व मिळालेला पुरुष. ह्याचाच पर्यायी शब्द म्हणजे टिकोजी अथवा टिक्कोजी. (संदर्भ मोल्सवर्थ).

पण याच न्यायाने सगळ्याच बायका लग्नानंतर झक मारत टिकोजीणबाई बनवल्या जातात त्याचं काय? काहीही अधिकार नाही, पण कपाळावर शिक्का आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्सं कस्सं? नवरा जिवंत असल्याचा सन्मान आणि कुंकू लावण्याचे अधिकार असतात की!

-- आपली नम्र,
छप्पन टिकली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अधिकार नाही? सवाष्ण म्हणून बोलावलं जाण्याचा, दांपत्य म्हणून बोलावलं जाण्याचा अधिकार आहेच. कोंकणस्थांकडे बोडणातहि सहभाग घेता येतो. हे अधिकार किरकोळ आहेत काय? बोडक्यांना बोलावतं का कुणी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टिकली हा शब्द तिलक किंवा टिळक या शब्दांशी संबंधित असण्याची शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाय नाय.

टिकली चा संबंध टिकलिंग (गुदगुल्या करणे) शी आहे. ती जिथे लावली जाते त्याच्या मागे आत्मा असतो. व आत्म्याला गुदगुल्या करायला नको का कोणी ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

टिकलीच्या गोंदाचा कारभार अनागोंदी होतो आहे आजकाल. टिकली चिटकली नाही म्हणून टाकली, असेच पुष्कळदा होते.

पूर्वीच्या काळची टिकली टिकली, म्हणूनच "टिकली" म्हणून नावाजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रामतीर्थंकर बै काही(ही) वाचत असतील याची शक्यता कमीच तरी समजा त्यांनी ही चर्चा वाचली तर त्यांना आनंदातिशयाने [(अधिक) वेडाचा] झटका येऊ शकतो (होय तर.. आनंदातिशयच! त्यांच्या एरवी एकतर दुर्लक्ष नैतर पूर्णपणे स्वीकार केले जाण्याची शक्यता असलेल्या विचारांवर इतके मंथन त्यांनी कल्पिले नसावे! Blum 3 )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यांच्या एरवी एकतर दुर्लक्ष नैतर पूर्णपणे स्वीकार केले जाण्याची शक्यता असलेल्या विचारांवर इतके मंथन त्यांनी कल्पिले नसावे!

विनाप्रश्न पूर्ण स्वीकार याखेरीज दुसरा कोणताही पर्याय अशा मंडळींना बहुधा स्वीकारार्ह नसावा, अशी अटकळ आहे. विचारमंथन वगैरे तर महत्पाप!

(होहो, हे फार सरसकट विधान आहे, माहीत आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असो!! कदाचित लिव्ह-इन या टोटली परक्या संकल्पनेची मला भीती वाटते, अन पारंपारीक कुटुंबव्यवस्थेबद्दल अति-आदर वाटतो या एकमेव कारणाने अपर्णाबाईंचे बरेच नकारात्मक मुद्दे नजरेआड झाले असावेत. शहराजाद व अदितीचे विशेष आभार. त्यांच्या विश्लेषणात्मक प्रतिसादातून दुसरी बाजू नीट मांडली व तेदेखील आक्रमक न होता. निळे, अस्मि यासारख्या (अन्यही तरुण लोक असतील , मला माहीत नाही) नव्या पीढीची मते ऐकायला मिळाली. एकंदर अंगावर धावून न येता सर्वांनीच विचार मांडले याबद्दल सर्वांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>निळे, अस्मि यासारख्या (अन्यही तरुण लोक असतील , मला माहीत नाही) नव्या पीढीची मते

निळे यांचा अतर्भाव तरुण लोकांत केल्याने डोळे पाणाव्ले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अपर्णाआईंना ट्यार्पी मिळाला!
सर्वांचे अभिनंदन..
अवांतर - उद्या असाच एखादा अर्पण रामतीर्थकर पुरुषांना जर ह्याच गोष्टी सांगू लागला तर काय मजा येईल! Biggrin Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उद्या असाच एखादा अर्पण रामतीर्थकर पुरुषांना

अपर्णेचा पुरुषी काऊंटरपार्ट शंकर हवा ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शंकर सीतातिर्थकर?? दॅट ईज मेस्ड अप ऑन सो मेनी लेव्हल्स!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्याआधी या बाईंचे भाषण ऐकायचे असे ठरवून जे स्वपीडन (की काय) करून घेतले त्याला तोड नाही! बाई हीच बाईची शत्रू असते याच्यावर विश्वास बसावा असे भाषण आहे.
बाई नुसत्या फेकूच नाहीत तर महाचलाख आहेत, माणसं जपा म्हणून सांगताना आपल्याला आयुष्यात (नवरा आणि मुलगा सोडून...अर्थातच) भेटलेल्या प्रत्येक माणसाचा इतका उघड आणि भयंकर अपमान करताना आपल्या विचारातल्या महाभयंकर विसंगती इतक्या चलाखीने लपवितात की त्याला तोड नाही. शिवाय "मी माझ्या नवर्याला घाबरते" हे जे त्या म्हणतात ते धडधडीत असत्य असले पाहिजे! हे भाषण "इट्स सो बॅड ..." धाग्यात शोभून दिसेल असेच आहे याबद्दल खात्री पटली पण त्यांच्या 'भयंकर' विचारांना टाळ्या पिटणारी माणसे पाहून मळमळायला लागले.
त्यातले "चांगले तेवढे घ्या" असे म्हणणे म्हणजे नक्की काय घ्या हे कळलेच नाही. बरं... अनेक सनातनी विचारांची माणसे असतात पण निदान स्वतःच्या विचारांशी तरी प्रामाणिक असतात. इथे ही बाई एकीकडे "बायकांना शिकविणे किंवा शिकलेली बायको करणे अनावश्यक आहे" वगैरे म्हणताना स्वतःचे शिक्षण मात्र कान किटेपर्यंत ऐकवत बसते, आधी घरचं (म्हणजे नवर्याचं आणि मुलाचं) करायचं म्हणते आणि मग नवरा संधिवाताने घरी असताना मी ४७५ दिवस सगळीकडे भाषणे देत (समाजहितासाठी हो!) फिरते म्हणून सांगते. त्यांच्या विचारांचा प्रतिवाद करत बसणे वगैरे म्हणजे कुठून सुरवात करायची असे होऊन जाते पण त्यांना "जे काही आजकालचे आहे" त्याबद्दल आणि एकूण शहरी स्त्रीयांबद्दल जी घॄणा वाटते ती पाहून खरंच काळजी वाटली. एवढा संताप, एवढी घृणा पसरविणारी असली भाषणे ऐकणारी आणि टाळ्या पिटणारी माणसे नक्की कोणत्या युगांत वावरतायत? स्त्रीयांवर होणारा अन्याय थांबविणारे कायदेच कुटुंबव्यवस्था मोडीत काढतायत असले जे काही भयंकर निष्कर्ष त्या काढतायत ते पाहून बोलतीच बंद झाली.
माझा वैयक्तिक लग्नव्यवस्थेवर विश्वास आहे पण हे भाषण ऐकल्यापासून मला माझीच मते परत तपासून घ्यावीशी वाटायला लागलीत Smile आणि आता तातडीने ब्रर्म्युडा घालून, वाईनचा ग्लास भरून घेत नवर्याला घर साफ करायला सांगून कोचावर लोळत मस्त सिनेमा पहावासा वाटतोय!
सारिका, तुम्हाला एक प्रामाणिक प्रश्न...तुम्हाला यातले नक्की काय घ्यावेसे वाटले? त्या सांगत असलेल्या प्रत्येक तथाकथित 'चांगल्यामागे' मला अतिशय 'अन्यायकारक', 'स्वस्तुती करणारी', द्वेषाने भरलेलीच भाषा दिसतेय. 'मी म्हणते म्हणून' आणि 'मी सोडून बाकी सर्व मूर्ख' ही शैलीतर खासच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सासूशी नीट वागावे व कोणाचा तरी धाक हवा हे दोन मुद्दे मला पटले होते. तसेच व्यावसायीक शिक्षणासोबत मुलींना घरकाम यावे हादेखील. अर्थात पुरषांनाही स्वयंपाक यायला पाहीजे हे खरे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणाचातरी नव्हे...नवर्याचा धाक म्हणाल्या त्या! मला तर धाक म्हणजे 'कोणत्यातरी पद्धतीच्या हिंसेची भिती' असेच वाटत असल्याने कुटुंबातल्या कोणालाही कोणाचा धाक असावा हेच चुकीचे वाटते. आता 'आदर असणे' ही वेगळी गोष्ट आहे आणि ती लादता येत नाही कमवावी लागते.
असो. तुमचे मत वेगळे आहे याची कल्पना आहे पण समाजकार्याच्या बुरख्याआड आणि 'आपल्या थोर थोर' संस्कृतीचे गोडवे गात ही प्रतिगामी विषवल्ली पसरविणार्या या व्यक्ती मलातरी फार घातक वाटतात म्हणून मुद्दामून मत मांडले. अशा विचारांच्या लोकांना रोज तोंड द्यावे लागत असेल त्या स्त्रीयांबद्दल प्रचंड सहानुभूती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणाचातरी नव्हे...नवर्याचा धाक म्हणाल्या त्या!

फक्त नवर्याचा नव्हे..... बापाचा आणि भावाचाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अपर्णाबाईंना हव्याहव्याशा वाटणार्‍या अनेक बाबी सौदी अरेबियासारख्या देशात अस्तित्वात आहेत. उदा. नवरा, बाप, भाऊ, मुलगासुद्धा असा कोणी पुरुष बरोबर असल्याशिवाय स्त्रियांना घराबाहेर पडणे प्रतिषिद्ध आहे. बायकांना फार शिक्षण देऊन लाडावून न ठेवता त्यांची लग्ने लवकरात लवकर लावून देण्याचा तेथे समाजमान्य प्रघात आहे. बायकांनी अंगभर बुरखा घालूनच समाजात हिंडणे तेथे सक्तीचे आहे, साहजिकच अपर्णाबाईंचे bête noire असे बर्म्युडा, घरातले गाउन इतरांसमोर घालणे इत्यादि आउट. तेथेहि स्त्रियांनी ऑफिसात वगैरे जाऊन उचापत्या करण्याऐवजी घर आणि मुले सांभाळावी हे योग्य मानले जाते. इ.इ.

तसेहि भारतातील मुस्लिम मुलींमधील बुरखा घालण्याची वाढती प्रथा त्यांना अनुकरणीय वाटते असे त्यांचे शब्द मी ऐकले आहेत.

ही त्यांच्या दृष्टीने आदर्श स्थिति सौदी अरेबियामध्ये अस्तित्वात असतांना त्या तेथेच का जाऊन राहात नाहीत असा प्रश्न पडावा पण ह्याचेहि उत्तर त्यांच्याच भाषणात मिळते. ब्राह्मण सोडून सर्व अन्य हिंदु जातीबद्दलहि त्यांना तिरस्कार आहे, कमीत कमी त्या जातींकडे त्या condescension च्या भूमिकेतून पाहतात हे स्पष्ट जाणवते. साहजिकच मुस्लिमांबद्दल त्यांच्या मनात अतीव तिरस्कारच असणार हे उघड आहे.

तेव्हा एकीकडे चालू मुस्लिम चालीरीतींचे कौतुक आणि दुसरीकडे मुस्लिम द्वेष एकत्र कसे राहू शकतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>इथे ही बाई एकीकडे "बायकांना शिकविणे किंवा शिकलेली बायको करणे अनावश्यक आहे" वगैरे म्हणताना स्वतःचे शिक्षण मात्र कान किटेपर्यंत ऐकवत बसते,

हॅ हॅ हॅ..... शिकल्यामुळे बायकांचे काय होते त्याचा पुरावाच नै का या बै म्हणजे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी सोडून बाकी सर्व मूर्ख

हे आवडलं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कळ्ळे नाही. "मी सोडून बाकी सर्व मूर्ख" हा टोमणा मला असेल तर मी आधी त्या बाईंचे दीड तासाचे प्रवचन कशाला ऐकले? का इथे सगळेच तसे वागतात असे म्हणायचे आहे? दुसर्याची मते ऐकून मत प्रतिवाद करणे आणि आपल्या मतातल्या विसंगतीदेखील न तपासता आपली मते केवळ स्वतःची आहेत म्हणून इतरांवर थोपविणे एकाच पारड्यात बसते का? हलकेच घ्यायचा प्रयत्न केला होता पण त्यातही कारणमिमांसा काही पटली नाही Sad

अय्यो..तुमच्या आयडीवरून आत्ता ट्यूब पेटली..विनोदबुद्धी कमीच बघा आम्हा बायकांना Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अपर्णा रामतीर्थकर बार्इंचा उपदेश ब्राह्मण समाजासाठी आहे. ब्राह्मणांनी ब्राह्मण वकीलच लावावा म्हणजे ब्राह्मणांचा पैसा ब्राह्मणांच्या घरात राहील, असे त्या म्हणतात. पण, त्यांच्या विवेचनाचा मुख्य रोख हा नाही. त्या संस्कार आणि परंपरा याबाबत जेव्हा अत्याग्रह धरतात, त्यासाठी विविध पातळ्यांवरचा युक्तिवाद करतात, तेव्हा त्यांना म्हणायचे असते की, ब्राह्मण मुलींनी ब्राह्मण मुलांशीच विवाह करायला हवा. फेसबुकावर कार्यरत असलेल्या विविध ब्राह्मण गटांमध्येही हा एक कॉमन इन्सिस्टन्सचा विषय सध्या दिसून येतो. हा मुद्दा इतका तीव्र आहे की, अनेक फेसबुकी ब्राह्मण गटांनी या विषयावर चर्चा करण्यासच बंदी घातली आहे.

या समस्येमागील कारणे समजून घेतली पाहिजेत. आंतरजातीय प्रेम विवाह करणार्‍या मुलींत ब्राह्मण मुलींचे प्रमाणात सर्वाधिक आहे. १० कुटुंबांमागे किमान एक कुटुंब मुलगी दुसर्‍या जातीतील तरुणासोबत पळून गेल्याचे दु:ख झेलत असते. (हे माझे निरिक्षण आहे.) दु:ख झेलत असते, असा शब्दप्रयोग मी जेव्हा करतो, तेव्हा माझा प्रेमविवाहाला विरोध आहे, असे कोणी समजू नये. मात्र, आपला समाज हा आजही कंझर्वेटिव्ह आहे, हे ही समजून घेतले पहिजे. मुलगी परजातीतील तरुणासोबत जाते, तेव्हा तिच्या कुटुंबाला प्रचंड मानहानी सोसावी लागते. धाकट्या बहिणी लग्नाच्या असतील, तर संकटेच संकटे उभी राहतात.

ब्राह्मण मुलींचे प्रेम विवाह करण्याचे प्रमाण जास्त का आहे?
लग्नाचे वाढलेले वय हे एक कारण त्यामागे आहे. माझ्या निरीक्षणाप्रमाणे ब्राह्मणांमध्ये मुलींच्या लग्नाचे सरासरी वय २४ वर्षे असावे. इतर जातींत ते १६ ते १८ च्या पुढे नाही. वय वाढल्यामुळे वैयक्तिक निर्णय घेण्याची समज वाढत जाते. त्यातून प्रेम विवाह घडतात. मुलींच्या परजातीतील प्रेमविवाहांमुळे ब्राह्मण समाजात समस्या निर्माण झाल्या आहेत. बेताची स्थिती असलेल्या तरुणांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत. माझ्या एका मित्राचा भाऊ ४५ वर्षांचा झाला आहे, त्याचे अजून लग्न झालेले नाही. मुलींची लग्ने १८ व्या वर्षीच करून टाकायला हवीत, असे जेव्हा अपर्णाबाई म्हणतात, तेव्हा त्यामागील ही पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. रामतीर्थकर बाई लोकप्रिय का होत आहेत, याचे कारणही याच समस्येत आहे.

परजातीतील मुलांशी ब्राह्मण मुलींनी लग्न करावे की करू नये, हा वादाचा मुद्दा आहे. तथापि, माझे वैयक्तिक मत असे आहे की, ब्राह्मणच नव्हे, तर सर्वच जातीतील मुला-मुलींनी आपल्या जातीतील जोडीदार निवडणे अधिक श्रेयस्कर आहे. प्रेमविवाहाने कुटुंबाची होणारी ससेहोलपट विदारकच असते. शिवाय, प्रेमविवाह केल्याने जाती संपतील, असे जर कोणाला वाटत असेल, तर तो एक भ्रम आहे. जोपर्यंत हा देश राहील, तोपर्यंत जाती राहतीलच. त्यामुळे उगाच भाबडेपणा उराशी बाळगण्यात काहीच अर्थ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्राह्मण मुलींचे प्रेम विवाह करण्याचे प्रमाण जास्त का आहे?

लग्नाचे वाढलेले वय हे अन्य समाजांतही आहेच-पण अजूनही शिक्षणाचा प्रसार म्हणावा तितका नाही-विशेषतः स्त्रियांमध्ये. त्यामुळे अन्य समाजातील पुरुष शिकतात, पण स्त्रिया तेवढ्याच संख्येने शिकत असाव्यासे वाटत नाही. प्लस ब्राह्मण समाजात लिबरलपणा तुलनेने जास्त आहे. त्यामुळे वरील गोष्टी परस्परपूरक आहेत.

शिवाय, अनुलोम विवाह जरी ग्राह्य मानला (स्मृत्याधारे), तरी उच्चजातींतील लोकांचा अहंपणा म्हणा किंवा अजून काही म्हणा, तुलनेने उच्चजातीत जन्मलेल्यांना अन्य जातीतील स्त्रियांचे अपील इतके नसते. यात जन्माधारित जातिश्रेष्ठत्वाचा व तज्जन्य अहंपणाचा मुद्दा अर्थातच लै महत्त्वाचा आहे-पण त्याचबरोबर शिक्षणाचा कमी प्रसार व त्यामुळे अन्य समाजातील मुलींचे तुलनेने रडारवर कमी येणे हाही एक मुद्दा आहे.

असे असले तरी ब्राह्मण मुलीच का, मुलेही अन्य जातीय प्रेमविवाह करताना पाहिलीत अलीकडे.

याला कौंटरपार्ट म्हणून पाहिल्यास, अमेरिकेतही बहुधा आंतरवंशीय विवाह करणार्‍यांत गोर्‍या स्त्रियांचे प्रमाणच जास्त असावेसे वाटते. तसे असेल तर त्यामागची कारणेही सिमिलरच असावीत.

बाकी, आंतरजातीय विवाहाने जाती नष्ट होणार नाहीत हे एकदम पटेश.

आंतरजातीय विवाहांत, कल्चरल फरक लैच मोठा असेल तरीही धक्का बसतोच-त्यात परत न्यूक्लिअर कुटुंबात राहणार्‍या मुलीचे एकत्र कुटुंबात ट्रांझिशन झाले तर. शहरांत हा फरक तितकासा जाणवत नसावा. पण अशा किंवा यासदृश फरकामुळेही त्रास झाल्याची थोडी उदा. पाहिली आहेत. ब्राह्मण किंवा अन्य उच्चजातीय मुलींकडे 'अ‍ॅज़ अ कॉन्क्वेस्ट' म्हणून पाहणे आणि विवाहानंतर जाणूनबुजून त्रास दिल्याचीही उदा. आहेत. वर्षानुवर्षांच्या अन्यायाचा तथाकथित बदला त्या मुलीला त्रास देऊन घेणे हाही काही लोकांचा अजेंडा असतो.

तेव्हा स्वजातीय काय किंवा परजातीय काय, लोक पारखून घेणे महत्त्वाचे. पण परजातीय लग्नांत हाही एक कांपोनंट असेल हे लक्षात घेणेही विचारार्ह आहे. अशी उदा. कमी असली तरी आहेत हे महत्त्वाचे. आता यावरून कुत्र्याला चावणारा माणूस आणि त्याबद्दलची जनजागृती इ.इ. कुणी आणू पाहत असेल तर अवश्य आणो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आंतरजातीय विवाहांत, कल्चरल फरक लैच मोठा असेल तरीही धक्का बसतोच

+१
पण असा शॉक बसणे एकंदर सामाजिक हिताच्या दृष्टीने चांगले की वाईट? दोन्ही घरांमधील चांगले ते ते वेचून मुलगा-मुलगी पुढे जात असतील तर चांगलेच. दोन्ही कुटुंबे चांगल्याकरता बदलत असतील तर उत्तमच की.

बाकी जातीव्यवस्था रहाणारच आहे या मुद्द्याशी सहमत आहे. पण जातीव्यवस्थेचे निर्मूलन व्हावे या "उदात्त" हेतूने कोणी "प्रेम"विवाह करत नसावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शॉक बसण्यात इंट्रिन्सिकली चांगले-वाईट काही आहे असे मला वाटत नाही.

तदुपरि

जातीव्यवस्थेचे निर्मूलन व्हावे या "उदात्त" हेतूने कोणी "प्रेम"विवाह करत नसावे.

होय. पण विठ्ठलराव घाट्यांच्या आत्मचरित्रात एक सिमिलर उदा. आहे. तो विवाह बहुधा आंतरजातीय नव्हता, पण पुनर्विवाह होता एका विधवेशी. अन पुनर्विवाह करणाराने मुद्दाम सांगितले होते की कुरूप विधवा शोधा म्हणून-नैतर समाज म्हणेल की रूपावर भाळून विवाह केला म्हणून. विवाह यथावकाश झाला अन संसार ठीकठाक झाला असेही नमूद आहे.

सांगायचा मुद्दा असा की असेही काही नग असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उच्चजातीय मुलींकडे "अ‍ॅज ए क्वांक्वेस्ट गिफ्ट" म्हणून पाहण्याची मानसिकता घेऊन जगणारे एक पात्र अरूण साधू यांच्या "सिंहासन"मध्ये आहे. हा एक दलित नेता असून, मंत्रिपद मिळवून ब्राह्मण मुलीशी विवाह करणे ही त्याची महत्त्वाकांक्षा आहे.
हजारो वर्षांच्या अवमानाचा बदला म्हणून उच्चजातीय मुलींशी लग्न करणे या मानसिकतेतून निर्माण झालेला संघर्ष एस. एल. भैरप्पा यांच्या "दाटू" या कादंबरीत आला आहे. "दाटू"चा "जा ओलांडूनी" नावाने मराठी अनुवाद उपलब्ध आहे. सुमा कुलकर्णी यांनी बहुधा तो केला असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. रोचक विषय आहे "दाटु" चा. यावच्छक्य मिळवून अवश्य पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्लस ब्राह्मण समाजात लिबरलपणा तुलनेने जास्त आहे.

पटायला जरा कठीण. ब्राह्मण तरुणांनी ब्राह्मणेतर तरुणींशी विवाह केल्याचे प्रमाण नगण्य आहे. बाहेरच्या मुली ब्राह्मण कुटुंबात स्वीकारल्या जात नाहीत. ब्राह्मण मुली बाहेरच्यांसोबत गेल्यास "जाऊ द्या", असे म्हणून या मुलींना कायमचे विसरण्याचा प्रयत्न केला जातो.

इतर सर्व मुद्दे योग्य. पुर्ण सहमत. "उच्चजातीय मुलींकडे 'अ‍ॅज़ अ कॉन्क्वेस्ट' म्हणून पाहणे" हा मुद्दा लक्षणीय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परत "फक्त मुलींकडेच" कॉन्क्वेस्ट म्हणून पहाण्यामागे पुरुषप्रधान मानसिकता व वस्तुकरणच असावे.
मुली, मुलांकडे नाही बघत ते "प्राइझ/ कॉन्क्वेस्ट" या दृष्टीने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्राह्मण तरुणांनी ब्राह्मणेतर तरुणींशी विवाह केल्याचे प्रमाण नगण्य आहे.

ब्राह्मण समाजात मुलींच्या आंतरजातीय विवाहापेक्षा मुलांचे आं.जा.वि. प्रमाण कमी असेल असे मलाही वाटतेच-पण मग मुलींनी प्रेमविवाह करणे हा लिबरलपणाचा एक पैलू नाही काय? बाकी कायमचे विसरणे इ. अगदी नसले तरी ते अजून म्हणावे तसे पचनी पडत नाही हे खरेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>बेताची स्थिती असलेल्या तरुणांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत. माझ्या एका मित्राचा भाऊ ४५ वर्षांचा झाला आहे, त्याचे अजून लग्न झालेले नाही.

बेताची स्थिती असलेल्याने सुमारे वय वर्षे २६ ते ४५ या काळात दुसर्‍या जातीतली मुलगी लग्नासाठी स्वीकारण्याचा विचार केला नाही का?
बेताची स्थिती असली तरी लग्न करीन तर (गोर्‍या-घार्‍या) ब्राह्मण मुलीशीच असा गंड होता काय? हा प्रश्न त्या विशिष्ट व्यक्तीस लागू नाही त्याचे लग्न झाले नाही म्हणून दु:ख करणार्‍यांसाठी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गोरी-घारी इ.इ. तूर्तास बाजूस ठेवू. तशी अपेक्षा असण्यात चूक काही नाही बट देन मार्केट हॅज़ इट्स रूल्स. ते एक असोच.

पण लग्न स्वजातीतच करेन हा 'गंड' कसा काय? ब्राह्मण मुलींच्या अपेक्षा अवास्तव वाढल्यात असे काहीसे यावरून ध्वनित होते. ते कितपत खरे असावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुलींच्या अपेक्षा अवास्तव वाढल्यात असे काहीसे यावरून ध्वनित होते. ते कितपत खरे असावे?

तुम्ही अजून मुली पाहायला सुरुवात केली नाही वाट्टं. पाण्यात पडल्यावर नाकातोंडात पाणी जातेच. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यायला. अँड आय थॉट इथे तसे बोलणे अनकूल आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१.
आणि एक मुद्दा म्हणजे 'लग्न झाले नाही' असे गृहीतच धरले जाते बर्याचदा. 'लग्न केले नाही कारण करावेसे वाटले नाही' म्हणजे बाय चॉइस अविवाहीत राहणार्या व्यक्तीपण असतात की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'लग्न केले नाही कारण करावेसे वाटले नाही' म्हणजे बाय चॉइस अविवाहीत राहणार्या व्यक्तीपण असतात की.

ज्यांना मुलीच मिळत नाहीत, त्यांच्यासाठी "बाय चॉईस अविवाहित राहिलो", ही एक छान सबब आहे. "बाय चॉईस अविवाहित आहोत", असे म्हणणार्‍यांकडे यापुढे संशयाने बघायला लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर आहे तुमचं. नक्कीच काहीतरी झोल असणार. संशयाने पाहायलाच हवं. कर्तव्य आहे ते एका जागरुक नागरीकाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेताची स्थिती असलेल्याने सुमारे वय वर्षे २६ ते ४५ या काळात दुसर्‍या जातीतली मुलगी लग्नासाठी स्वीकारण्याचा विचार केला नाही का?

असा विचार केला असता तर समस्या का निर्माण झाली असती? ज्या अर्थी समस्या आहे, त्या अर्थी लोक असा विचार करू धजत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्राह्मण मुलींचे प्रेम विवाह करण्याचे प्रमाण जास्त का आहे?

हे माझे स्वतःचे मत नाहीः नेमाड्यांच्या एका कादंबरीत ब्राम्हण मुलांकडे भरपूर पैसा नसल्याने ब्राम्हण मुली इतरजातीय श्रीमंत मुलांशी स्वखुशीने विवाह करतात असे एका सिनीकल पात्राच्या तोंडातून आलेले वाक्य आहे. (मूळ वाक्य थोडे हिंसक व अश्लील आहे. नक्की वाक्यरचना आठवत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमाड्यांच्या कुठल्या कादंबरीत आले आहे, हे वाक्य?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगदेवाचा एक मित्र हे वाक्य म्हणतो. बहुदा चांगदेवाच्या एका ब्राम्हण मित्राचे लग्न बरेच दिवस जमत नसते त्यावरुन चाललेल्या चर्चेत हा टोला अब्राम्हण मित्र मारतो असे आठवते. (फार वर्षांपूर्वी वाचले आहे. ) वाक्याचा मथितार्थ तोच आहे. प्रसंग वेगळा असू शकेल. (मराठ्यांच्या श्रीमंत हेंद्र्या पोरांबरोबर बामनाच्या मुली लग्न करतात आणि तुमच्यासारखे कारे राहतात अशी काहीशी वाक्यरचना आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हूं... चांगदेव पाटील हे नेमाड्यांच्या बिढार, जरिला, झूल आदी कांदबर्‍यांचा नायक आहे. मी कॉलेजात असताना कोसला एका दमात वाचली होती, पण पुढच्या कादंबर्‍या वाचवल्या गेल्या नाही. त्या खुप असल्याचे माझे तेव्हा मत झाले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या खुप असल्याचे माझे तेव्हा मत झाले होते.

एकावेळी एकच वाचायची. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या खुप असल्याचे माझे तेव्हा मत झाले होते.

हे वाक्य "त्या खुप कंटाळवाण्या असल्याचे माझे तेव्हा मत झाले होते." असे वाचावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवड आपली आपली. मला तर कोसलापेक्षा चांगदेवच्याच कादंबऱ्या आजकाल चांगल्या वाटतात. तत्कालीन समाजाची परिस्थिती फार चांगल्या पद्धतीने या कादंबऱ्यांमध्ये आली आहे.
न्हापु दाकए नचूवा लायढाका तव्याह.!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.न्हापु दाकए नचूवा तव्याहापा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टेलउ कान रे लूबो Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...णप म्हीतु बै कारिसा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वैयक्तिक 'निरीक्षणांवरून' लोक काय काय चर्चा करतात अन काय काय निष्कर्ष काढतात हे पाहून अचंबा वाटतो! आधी तुमची निरीक्षणं बरोबर आहेत का याची खात्री तर करून घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

माझे वैयक्तिक मत असे आहे की, ब्राह्मणच नव्हे, तर सर्वच जातीतील मुला-मुलींनी आपल्या जातीतील जोडीदार निवडणे अधिक श्रेयस्कर आहे. प्रेमविवाहाने कुटुंबाची होणारी ससेहोलपट विदारकच असते.

आमच्या कुटूबात मागच्या पिढीपासूनच परजातिधर्मात लग्ने झालेली आहेत. कोणाचीही ससेहोलपट झाली नाही.
मला वाटते,घरातल्यांची प्रगल्भता, स्वःच्या संसारात इतर गोष्टींनी फारक पडू न देणे आणि कदाचित आर्थिक स्वावलंबन यामुळे खूप फरक पडू शकतो.
अशा लग्नांनीनेजाती नष्ट होत नाहीत, पण भेद कमकुवत होऊ शकतात. पण जाती नष्ट व्हाव्या अशा उदात हेतूने फारसे लोक अशी लग्ने करत असतील असे वाटत नाही. आपल्याला आवडलेली व्यक्ती परजातीतील असली तरी जोडीदार म्हणून योग्य वाटणे हेच बहुतांश परजातीत्ल्या लग्नांचे आरण असावे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(शक्ती कपूर ष्टाईल) आऊ....दोनशे!

(सरपंच निळू फुले ष्टाईल) अपर्णाआईंचं अभिनंदन

अजोंच्या एकही प्रतिसादाविना दोनशावर पोचलेली चर्चा हा ऐसीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहायचा क्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>>> अजोंच्या एकही प्रतिसादाविना दोनशावर पोचलेली चर्चा हा ऐसीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहायचा क्षण आहे.
--- 'अजो'ड कामगिरी Wink

१. अ-जोडचा शब्दशः अर्थ लिव्ह-इन/अविवाहितही होऊ शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा, धट्टीकट्टी गरीबी चांगली" च्या तालावर शिवाय "मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरे" च्या तालावर
"तडजोडीच्या लग्नापेक्षा, स्वतंत्र लिव्ह इन परवडले" Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राम'तीर्थ'कारणी लागले, लोक प्राशन करुन बरळायला लागलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

पाने