जाग्रत, उत्तिष्ठ ...

अलिकडेच मी एका भयंकर पुस्तकाबद्दल ऐकलं. हे पुस्तक बऱ्याच लोकांना अभ्यासपूर्ण वाटतं. निदान तसं दाखवण्यात तरी लेखिका यशस्वी झाली असावी. पण या लोकांची माथी भडकवण्याचं काम हे पुस्तक करत आहे. या पुस्तकाचं नाव आहे 'सेकंड सेक्स'. आणि हे पुस्तक सिमॉन बुव्वा नावाच्या एका फ्रेंच बाईने लिहीलं आहे. स्वतःच्या नावाप्रमाणेच या पुस्तकात तिने पुरुष आणि धर्माविरोधात मोठा बागुलबुवा उभा केला आहे.

यात त्या बाईने पुरुषांवर, सगळ्या पुरुषांवर, फक्त तिला माहित असलेल्याच नाही, तुमच्या आमच्यावरही टीका केली आहे. या बाईने पुस्तकात पुरुषांचं गरीब, बिचारं आणि हास्यास्पद ठरवलेलं आहे. या बाईंच्या मते पुरुष इन्फिरिअॉरिटी कॉंप्लेक्सने पछाडलेले असतात म्हणून ते बायकांना दुय्यम दर्जा देतात. मग स्त्रियाच बांडगूळासारख्या त्यांच्या नवऱ्यावर अवलंबून असतात याचं काय? आम्ही सांगतो काय बायकांना शिकू नका, नोकरी करू नका म्हणून! गेली कितीतरी वर्ष आपल्याकडे मुलींना फुकटात शिकवत आहेत, आता तर इंजिनियरींगला आरक्षित जागाही ठेवलेल्या आहेत, तरीही काय दिवे लावलेत बायकांनी? किती कंपन्यांमधे बायका मान मोडून काम करताना दिसतात? अगदी कारकून बायकासुद्धा सतत चहा आणि चकाट्या पिटत असतात. अगदी जिममधे गेल्या तरी तिथेही गप्पा जास्त आणि व्यायाम कमी असतो यांचा. ते पण याच बाईने डोक्यात भरवलेलं खूळ असावं, की बायकांनी व्यायाम करावा.

दुसरं म्हणजे या पुस्तकात म्हणे खासगी मालमत्तेमुळे बायकांचं स्थान खालचं झालं असं लिहीलं आहे म्हणे. उलट पुरुषांचीच बायकांमुळे पिळवणूक होते. या काही कमावत नाहीत, तदुपरि लग्न करून देण्यासाठी हुंडा द्यायला लागतो, तो मुलाची आईसुद्धा मागते, पण मान अडकते ते मुलीच्या वडलांचीच. मुलीला किंवा मुलीच्या आईला हुंडा द्यायला लागत नाही. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्या तरीही जीव कोणाचा जातो, पुरुषांचा. तदुपरि या बायका म्हणतात की आमच्यावर अन्याय झाला आहे. 'सेकंड सेक्स' हे पुस्तक म्हणजे भांडवलशाहीविरोधी, परंपराविरोधी, विषारी, डाव्या विचारांच्या प्रसारासाठी पांघरलेला स्त्रीवादाचा बुरखा असावा अशी शंका येते.

मी असंही ऐकलं आहे की या बाईंनी कादंबऱ्याही लिहील्या. त्यातल्या स्त्रिया आणि पुरुषांचं नातं एवढं काही पॉझिटीव्ह दाखवलेलं नाही. स्वतः लग्न केलं नाही, मुलं होऊ दिली नाहीत, एक गर्भपातही केला तर कुठून या बाईला माणसातला, नात्यांमधला चांगुलपणा दिसणारे? एवढंच करून ही बाई थांबली नाही, अज्जीच बायकांना मातृत्त्व नाकारण्याचाही आग्रह या बाईने लिखाणातून केला. स्वतः आई न बनलेल्या या बाईला आई-मुलाच्या नात्यातलं पावित्र्य कसं समजणार आहे? कधीतरी भारतात येऊन गेली असती तर हिला अज्जीच समजलं असतं की आई-मुलांचं नातं किती सोज्ज्वळ आणि थोर असतं ते!

मला कधीकधी संशय येतो की हे पुस्तक या बाईंनी लिहीलंच नसावं. घरंदाज बायका या सज्जन, देवी असतात. कुठे आपल्या सावित्रीबाई आणि कुठे ही सिमॉन. मला तर संशय आहे की बाईचं नाव घेऊन कोणी डाव्या विचाराच्या पुरुषानेच हे पुस्तक लिहीलेलं आहे. मला तिच्या बॉयफ्रेंड, जॉन सार्त्र याच्यावर संशय आहे. या जॉनला डाव्या विचारांमुळे अटकही झाली होती; पण तेव्हा प्रेसिडंटचा वशिला असल्यामुळे तो सुटला. पण त्याला नोबेल पुरस्कार मिळाला असल्यामुळे तो हुशार होता असं मानायला जागा आहे आणि गर्लफ्रेंडच्या नावाने त्यानेच पुस्तकं लिहीलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारतात जिथे सावित्रीबाईंसारखी सती जन्माला आली तिथे या सिमोन नावाच्या बागुलबुवामुळे स्लटी सावित्र्या जन्माला येत आहेत. आज पुरुषच नाडला जात आहे, व्यवस्था आणि बायकांकडून. त्यापैकी व्यवस्था पूर्ववत करायला आपल्याला वेळ लागेल. पण सगळ्यात पहिले आपण आपल्या शिस्नाची सत्ता परत आणण्यासाठी बायकांना आपल्या खासगी आयुष्यातून पूर्ण वेगळं केलं पाहिजे. तसंही बायकांना आपलं कर्तृत्त्व, आपली शारीरिक ताकद यांच्यामुळे आपला तिरस्कार असतोच. प्रख्यात लेखक अॉस्कर वाईल्ड आणि पहिला कंप्यूटर बनवणारा अॅलन ट्यूरींग या लोकांना त्यांनी त्यांच्या आयुष्यातून बायकांना दूर केल्यामुळे फार जाच सहन करावा लागला. पण आता जमाना आपलाच आहे. या आणि अशा अनेक अनाम वीरांना आपण आपलं आदर्श बनवून आपली जीवनपद्धती बदलण्याची वेळ आलेली आहे.

आता अज्जीच वेळ आलेली आहे की पुरुषांनी या असल्या बायकांना धडा शिकवलाच पाहिजे. या एकाच बाबतीत आपण अमेरिका आणि अमेरिकन बायकांचं अनुकरण केलं पाहिजे. जशा अमेरिकन बायका 'पुरुष नकोत', म्हणून लेस्बियन होतात. आता त्यांचं अस्त्र त्यांच्यावरच उलटवलं पाहिजे. बायकांना टाळून आपण सगळ्या पुरुषांनी एकत्र येऊन गे बनल्याशिवाय हा अत्याचार संपणार नाही. पीडीत पुरुषांनो, गे बना.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पीडीत पुरुषांनो, गे बना.

(स्त्रियांशी) लग्न झालेले पीडित पुरुष गे कसे काय बनू शकतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> (स्त्रियांशी) लग्न झालेले पीडित पुरुष गे कसे काय बनू शकतील? <<

माझ्या माहितीनुसार भारतातले बरेचसे गे पुरुष स्त्रियांशी लग्न झालेलेच आहेत; हां, ते पीडित आहेत का आणि असतील तर त्यात ह्या बुव्वाबाजीचा (की बुव्वाबाईचा) हात किती ते मात्र मला माहीत नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बॉटबॉय हा आयडी कुणाचा असावा? किती पैसे लावणार लोकहो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओळखीचा वाट्टोय खरा!

तुम्ही ऑप्शन्स द्या मी जिंकणा-यावर पैसे लावते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

सतत नाव बदलणारे, ह्रस्वात लिहीणारे असतील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका शब्दाने कचरा केला, नाहीतर ओळखणं तसं अवघडच होतं.

अजो - यावर कौल काढा बुवा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कौलाच्या कल्पनेला पाठिंबा आहे. परंतु त्या एका शब्दाचा अतिरेक केल्यामुळे येणारी शंका अनाठायी आहे, इतकेच तूर्तास सांगणे कर्तव्य आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्लटी सावित्री हा शब्दप्रयोग फार्फारच आवडला. किंबहुना या शब्दामुळेच हा "मौजमजे"चा धागा चुकून "चर्चाविषय" म्हणून टाकला का अशी शंका वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखाचं शीर्षक वाचून अर्ली मॉर्निंग इरेक्शनबद्दल काहीतरी चटकदार (किंवा माहितीपूर्ण) असेल अशी आशा मनात ताठरली होती पण आत बाई नसून बुव्वा निघाल्याने गलिताश झालो.
कोणत्याही परिस्थितीत गे राहणे हाच विवाहित पुरुषांच्या जिवंत राहण्याचा आधार आहे; पण गे या शब्दाच्या एकचएक अर्थाचा उद्घोष करून गे राहायचीही चोरी करुन ठेवली आहे.
तसंही "एकमेका साहाय्य करु अवघे धरु सुपंथ" यापेक्षा "अ‍ॅकला चॉलो रे" किंवा "सेल्फ हेल्प इज द बेस्ट हेल्प" किंवा "अपना हाथ जगन्नाथ" यावर जास्त विश्वास असल्याने आम्हाला वगळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिळाली मिळाली .... श्रेणीद सुविधा मिळाली. या प्रतिसादाला "विनोदी" श्रेणी दिलेली आहे. विशेषतः - ताठरलेली आशा Wink तील अधोरेखित शब्दाबद्दल Smile .... ऐसी व्यवस्थापनाचे आभार!!
____________________

बाकी बॉट्बॉय जी, लेख फारच बाणेदार झाला आहे ;).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बूच मारले आहे. आशेला प्रिआपिझम तर नै ना झाला, अशी शंका आली Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile प्रिआपिझम म्हणजे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरारा!!! ब्येक्कार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

:जांभई देणारी स्मायली:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१
पण उचकावण्याचा प्रयत्नाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणता यावं. (कुणी उचकलं नाहिये, हा भाग वेगळा.पण प्रयत्न चांगलाच होता.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काय? कुणीच उचकलं नाही? म्हणजे बॉटबॉयच्या अस्तित्वानेही काही विधायक मोडतोड नाही झाली तर...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

;;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !