छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १२: पानी तो पानी हैं..
खरं तर नवं आव्हान देण्यासाठी विचार करायला फारसा वेळ नाही आहे पण हे सुदैवाने चटकन सुचलं.
'थोडासा रूमानी हो जाएँ' या कमलेश पांडे लिखित चित्रपटात श्री. धृष्टद्युम्नपद्मनाभप्रजापतिनीळकंठधूमकेतू बारिशकर यांचा पुढील संवाद ऐका -
.
(https://youtu.be/LytifZOOENw)
पावसाची नि पर्यायाने पाण्याची विविध रुपं अतिशय नज़ाकतीत बयाँ केली आहेत.
.
या वेळच्या आव्हानात तुमच्या कल्पनेतले, पाहण्यातले पाण्याचे वेगवेगळे ढंग नि रुपं, त्याच्या अस्तित्त्वाचे नि नसल्याचे परिणाम छायाचित्रात टिपायचे आहेत.
.
या निमित्ताने आरती प्रभूंची एक कविता आठवल्याशिवाय राहत नाही -
शेजारचा नाला, येता पावसाळा
थोर बळावला घरीदारी
संसार जाहला एक भातुकली
जळी तरंगली मांडावळ
खाटेवर आम्ही बैसलों बापुडे
पोर होड्या सोडी खिदळत
माय म्हणे मला, "बरे झाले झिला,
आळशाला झाला गंगालाभ."
बाईल हांसून, "मरतील.." म्हणे
".. पाण्यात ढेकूणे आयतीच."
मी मला म्हणालो, "पाण्यातले घर
नक्की मिळणार समुद्राला..."
पोर पाठ करी - 'समुद्राची जेंव्हा
वाफ होते तेंव्हा - ढग बने...'
-----------------------------------------------------------------------
नियमः
१. केवळ स्वतः काढलेली जास्तीत जास्त ४ छायाचित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करावीत. मात्र विषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
२. स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच, मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल. अन्यथा दिलेल्या चित्रांपैकी कोणतेही एक चित्र परिक्षक स्पर्धेसाठी म्हणून गृहित धरतील
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व परीक्षक असे चालू राहील.)
४. आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट २८ जून २०१५ रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. त्यानंतर लवकरच निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. या आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिप्पण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरावीकच निकष लावावेत असे, बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे, इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा शक्यतो एकच विजेता/विजेती घोषित करणे अपेक्षित आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दलचे मार्गदर्शन या धाग्यावर आहे.
--------
प्रतिक्रिया
अप्रतिम विषय आहे! निव्वळ सुरेख.
पाणीच पाणी - बा. भ. बोरकर
तृप्त पाणी तुष्ट पाणी कोंडलेले रुष्ट पाणी
वाकडे नाल्यानद्यांचे वेगवेडे पुष्ट पाणी
बावडीचे खोल काळे पारदर्शी मग्न पाणी
कोकरुसे नाचणारे खेळणारे नग्न पाणी
उंच काळ्या फत्तरींचे पांढरे फेसाळ पाणी
सागराच्या मस्तकीचे आंधळे विक्राळ पाणी
पावली घोटाळणारे लाडके तांबूस पाणी
साळीच्या काट्यांप्रमाणे टोचरे पाऊस पाणी
पाणीयाच्या उत्सवी या मातले पाणीच पाणी
आणि त्यांच्या प्रत्ययाने मीही पाणी मीही पाणी
झकास कविता. बोरकरांच्या कविता
झकास कविता. बोरकरांच्या कविता फारशा वाचलेल्या नाहीयेत, आता वाचायला हव्या. बादवे, 'लै भारी' अशी श्रेणी का नाहीये?
अवांतरः ऐसीवर पुढील श्रेण्या असत्या तर फार मजा आली असती
१. लै भारी
२. घंटा!!
३. कै च्या कै
४. असो
५. बरं मग?
६. बकीजालोक्या (बच्चे की जान लोगे क्या?)
७. बस्कर्पग्लेरुलायेगाक्या
अस्तु. इतके अवांतर पुरे.
बादवे, 'लै भारी' अशी श्रेणी
अ व्हेरी व्हेरी गुड क्वेश्चन!!!!

कदाचित श्रेणीकर्ते पुणेकर असावेत!!!
(भागो, पुणेकर आया!!!!)
बाकी बोरकरांच्या कविता गायल्या (किंवा गुणगुणल्या, डिपेंडिंग ऑन युवर आवाज!) तर त्या एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जातात!!!

भटा, तुला गायला हरकत नाही!!!!! काय मस्त आवाज आहे मेल्याचा!!!!
प्रकाटाआ
.
डुलुथ, मिनेसोटा (स्पर्धेकरता आहे)
.
.
पिंक फ्लेमिंगोज (मेनेसोटा झू)
आवडते पेन्टिंग
फोटो नाही पण हे पेन्टिंग इथे डकवायचा मोह आवरला नाही -
अरेरे!
बिचार्या नानाला पोटासाठी काय काय बकवास करावी लागली!!!!
फोटो नंतर....
चुकीचा विषय!
क्यालिफोर्न्यवाश्यांना पाणी हा विषय देऊन जखमेवर मीठच चोळलं म्हणायचं!
-Nile
जखमेवर मीठ..
पानी पानी रे, खारे पानी रे, नैनों में भर जा, नीँदे ख़ाली कर जा...
पाणी, किती रूपांत?
हे पाणी, आपणां सर्वांचं!! ओरेगॉन ब्लॅक सॅन्ड बीच!!

हे पाणी, त्याच्या नैसर्गिक मालकांचं! सान दियागो सी वर्ल्ड!!

आणि हे पाणी! माझ्या वारसाचा बाप का माल!!! नीट पोहायचं सोडून गाणं बोंबलतोय शिंचा, "लंडन ब्रीज इज फॉलिंग डाऊन, फॉलिंग डाऊन, फॉलिंग डाऊन!!!!!"

कॅमेरा: निक्कॉन डीएसेलार, लेन्सः जी काय त्याच्याबरोबर येते ती!
शेवटचा फोटो आवडला. विशेषतः
शेवटचा फोटो आवडला. विशेषतः टिप्पणी
नीट पोहायचं सोडून गाणं
लंडन ब्रिजवर असताना पुलाचं फॉलिंग डाऊन व्हायला लागलं तर असेच हात-पाय मारावे लागतील. तेव्हा तुमची तक्रार योग्यच आहे; त्याने गाणं म्हणायचं सोडून नीट पोहायला शिकलंच पाहिजे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
दंव
खिडकीच्या गजांवर लटकणारे थेंब,
गवताच्या पात्यांवर चकाकणारे थेंब…
खूप भिजल्याचा मार खाऊन
ओलेत्यानेच डोळ्यांमधून ओघळणारे थेंब…
(टीप: दंव हे शीर्षक दिले तरी कृपया या पोस्टीस "दवणीय" म्हणू नये…
पंबन पूल रामेश्वरम २०१४
कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||
विषय आवडला! नि विषयाची
विषय आवडला! नि विषयाची मांडणीही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
रेघा
फोटोंवर क्लिक केल्यास मोठ्या आकारातले फोटो दिसतील.
१. रेघा

२. दुष्काळ

(हा फोटो थोडा हलला/डीफोकस झाला आहे. पण २८ जूनच्या आत पुन्हा हा फोटो काढायची संधी मिळेल का नाही माहीत नाही, म्हणून.)
आणि हा स्पर्धेसाठी नाही. आधी एका फोटोस्पर्धेत दाखवून झाला आहे. पण मला आवडतो म्हणून पुन्हा एकदा.

(जुने फोटो बघताना लक्षात आलं, तलावात टाकलेल्या निर्माल्याचे फोटो काढायचे राहिले.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पहिला फोटो आवडला. दुसरा नीटसा
पहिला फोटो आवडला. दुसरा नीटसा कळला नाही. विशेषतः दुष्काळ का म्हटलं आहे ते कळलं नाही.
फोटोंवर क्लिक करून मोठा फोटो
फोटोंवर क्लिक करून मोठा फोटो बघता येईल.
दुसऱ्या फोटोत पिवळं पान आहे, दुष्काळामुळे आलेला पिवळा रंग. आता पाऊस आला तरी त्या पानासाठी उशीर झालाय. (ओला दुष्काळ असेल तर पाण्यामुळेच ते पान मरायला टेकलंय.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
दिसतोय काय?
व्यवस्थापन : दुरुस्त केला आहे.
आई ग!!! काय रंग आहे. वा!
आई ग!!! काय रंग आहे. वा!
दिसला ब्वा!!! Nikon D5100 50
दिसला ब्वा!!!
Nikon D5100
50 mm prime with micro extension tube
Exif details:
f/5.6
1/100 Sec.
ISO 800
@50 mm
दिसतोय काय?
@अमोघ - 'फोटो कसे चढवावेत' याबद्दल माहिती
छायाचित्र दिसत नाही.
'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दलचे मार्गदर्शन या धाग्यावर आहे.
संपादक, कृपया हा फोटो डिलीट
संपादक, कृपया हा फोटो डिलीट करावा. एकच फोटो तांत्रिक गोंधळामुळे दोनदा पोस्ट झाला आहे.
रस्त्यावरचं पाणी
फोटो पहिला- रस्त्यावरचं पाणी

फोटो दुसरा- भूतानमधली पारो नदी- अगदी थंड थंड पाण्यात जाण्याचा केलेला अट्टाहास फळाला आला

फोटो तिसरा- फेसाळत्या पाण्यासोबतचं दगडी पाणी

धुक्याचं पांघरुण घेत असलेलं
धुक्याचं पांघरुण घेत असलेलं प्रौढ पाणी

नाजूक फुलावरलं नाजूक पाणी

पाण्याशी पंगा घेणारे दगड की दगडांवर खवळलेलं पाणी?

भवतालचा रंग आपलासा करणारं पाणी

पंचमहाभूतामधील एक: पाणी.

वा:! पहिला फोटो मस्त आहे.
वा:! पहिला फोटो मस्त आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
शेवटचा फोटो खास आवडला - धोम
शेवटचा फोटो खास आवडला - धोम धरणाचा आहे ना?
धागा वर काढत आहे.
चित्र स्पर्धेसाठी नाही.
Camera: Motorola XT1032, ISO: 125, Exposure: 1/508 s, Aperture: 2.4, Focal Length: 4mm, Flash Used: No
आवडले.ते पाणी आता स्क्रीनवर
आवडले.ते पाणी आता स्क्रीनवर टप-टप गळेल असे वाटते.
स्पर्धेचा निकाल
पाण्याच्या द्रवावस्थेखेरीज इतर अवस्था टिपण्याचे प्रयत्न स्पर्धेत दिसले नाहीत म्हणून थोडा अपेक्षाभंग झाला.
मुळापासून यांचे दंव, ३_१४ विक्षिप्त अदिती यांचे 'रेघा'
अमोघ यांचा दंव , मनमानसी यांचे रस्त्यावरचं पाणी आणि अंतराआनंद यांचे धुक्याचं पांघरुण घेत असलेलं प्रौढ पाणी ही विशेष आवडली.
या वेळी विश्लेषण, स्पष्टीकरण द्यायला वेळ नसल्याने निकाल थोडक्यात जाहीत करतो आहे.
मुळापासून व अमोघ यांची चित्रे तांत्रिकदृष्ट्या उत्तम आहेत. ती शुभेच्छाप्रत्रांवर छापण्यास योग्य अशी वाटतात. पण म्हणूनच त्यांच्या गुळगुळीतपणामुळे मला ती प्रथम क्रमांकासाठी योग्य वाटली नाहीत (कृ. हलके घ्यावे). मला थोडा कच्चेपणा अधिक भावतो नि तसाच अपेक्षित होता जो अदिती, मनमानसी नि अंतराआनंद यांच्या उल्लेखलेल्या चित्रांत आहे. मनमानसी यांचे चित्र 'आये कुछ अब्र' या नंदन यांच्या मागील एका आव्हानासाठी अधिक उत्तम ठरले असते. अदितींच्या चित्रातली विरोधी गंमत आवडली.
या तिनही चित्रांत, अंतराआनंद यांनी दिलेले चित्र पाहताच 'पाणी' हाच शब्द डोक्यात येतो. तसेच पाण्याची दोन रुपं - जमिनीवरचं नि हवेत तरंगणारं - अशी दोन्ही एकाच चित्रात सामावली आहेत. चित्र पाहताच चालून थकलेले, तापलेले पायाचे तळवे या पाण्यात सोडून बसायचा मोह होतो. चित्रात कॉन्ट्रास्ट वाढवून अधिक चांगले दिसेल असे वाटते.
याच चित्राला प्रथम क्रमांक बहाल करण्यात येत आहे. अभिनंदन !
पुढील आव्हान अंतराआनंद यांनी द्यावे ही विनंती.
अंतरानंद यांचे अभिनंदन!
निकाल आवडला. पाण्याच्या द्रवावास्थेखेरीज इतर अवस्था टिपण्याचे प्रयत्न इथे टाकू की नको याबद्दल साशंक होतो. पण आता तुम्ही म्हटलेच आहे तर काही फोटो रसग्रहणासाठी देण्याचा मोह आवरत नाही. गेल्या हिवाळ्यात मिन्नेसोटा राज्याच्या उत्तरेला सुपिरियर सरोवराच्या काठाशी काही दिवस गेलो होतो तेव्हा फक्त बर्फाचीच काही अप्रतिम रूपं पाहायला मिळाली. या सहलीविषयी सविस्तर लिहायची इच्छा होती पण वेळेअभावी या पाणीदार विषयाच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतो.
१. अर्धवट गोठलेला सुपिरियर चा काठ आणि पार्श्वभूमीवर दिसणारे "Grand Marais" नावाचे डिसेंबरच्या थंडीत जवळपास निर्मनुष्य असलेले गाव…

२. बर्फरुपी रत्नांनी वेढलेलं बाकडं…

३. सरोवराच्या लाटा किनाऱ्यावर आदळल्या की त्यांतून उडणारे तुषार लगतच्या झुडूपांवर जाऊन पडतात आणि हाडं गोठवणाऱ्या थंडीत त्या फांद्यांना बिलगून नैसर्गिक जिवंत शिल्प तयार करतात. बर्फाचं हे असं रुप मी तरी पहिल्यांदाच पाहिलं…

४. जी गत किनाऱ्यावरच्या झुडुपांची तीच गत तिथल्या दगडांची…

या सहलीविषयी सविस्तर लिहायची
मुळापासून तुम्हाला विनंती, कृपया ह्या सहली विषयी लिहा. मी लेक-सुपेरियर ला दोनदा भेट दिली आहे त्यामुळे एक वेगळा आपलेपणा आहे त्या जागेबद्दल. त्या लेक बद्दल आणि जागे बद्दल बरंच काही अंतरजालावर लिहीलेलं आहेच पण ते लिखाण थोडफार विकीछाप म्हणता यावं अश्या पध्दतीचं आहे. पण आपल्या माणसाने त्या जागेबद्दल काही लिहीलेलं वाचायला फार आवडेल
निकाल आवडला. अंतरातैंचे
निकाल आवडला.
अंतरातैंचे अभिनंदन!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
धन्यवाद
धन्यवाद.
अंतराचे अभिनंदन.
अंतराचे अभिनंदन.
अनेक धन्यवाद.
अनेक धन्यवाद.
अभिनंदन आणि नवीन विषयाच्या
अभिनंदन आणि नवीन विषयाच्या प्रतिक्षेत
+१
सहमत
(+ किंचित उत्खनन)
काल हे चित्र टिपताना या
काल हे चित्र टिपताना या धाग्याची आठवण झाली -

फाटकाजवळ हा दिवा होता, त्यात पावसाच्या पाण्याचे थेंब नाचत होते. त्यांच्या रेषा दिव्याच्या प्रकाशात उठून दिसत होत्या. तेवढ्यात जवळच्या सिगारेटचा धूर त्यात मिसळला. शेगडीवरच्या वाफेचा भास झाला.
नूर की बूँद
मस्त कॅप्चर, ह्या गाण्यातली 'नूर की बूँद है, सदियों से बहा करती है' ओळ आठवली.
मला वेगळंच गाणं सुचलं - पानी
मला वेगळंच गाणं सुचलं - पानी में आग लगेगी, पत्थर भी पिघल जाएगा, देखो.....!!