आपण स्वत:ला फसवणे टाळू शकतो का?

आत्मवंचना ही एक सर्व सामान्य, (सर्वमान्य?) व पटदिशी कळणारी गोष्ट आहे याबद्दल कुणाच्याही मनात शंका नसावी. परंतु तुम्ही स्वत:लाच कसे काय फसवू शकता असे विचारल्यास इतरांना फसविण्यापेक्षा ही गोष्ट फार सोपी आहे हे लक्षात येईल.

स्वत:ला प्रश्न विचारणे हे कुठलीही नवीन गोष्ट शिकण्याएवढी अवघड नसावी. आपण एकाच वेळी शिक्षकासारखे प्रश्नही विचारू शकतो व विद्यार्थासारखे उत्तरही देऊ शकतो. यात कुठल्याही प्रकारचा विरोधाभास नाही. परंतु आपण एकाच वेळी फसवणारे व फसणारे कसे काय असू शकतो? यासाठी (2G स्पेक्ट्रम, CWG, आदर्श, यासारख्या घोटाळ्यात अडकलेल्या व न अडकलेल्या व )अत्यंत मुरलेल्या, मग्रूर राजकारण्यासारखी व उच्चपदस्थांसारखी मानसिकता लागते. करून सवरून आपण त्या गावचे नाही हे शपथेपूर्वक सांगण्यासाठी आत्मवंचनेचाच त्यांना आधार मिळत असतो. मात्र असे करण्यासाठी एकाच वेळी तुम्हाला काही गोष्टी माहितही असाव्यात व काही माहितही नसाव्यात. त्यासाठी नरो वा कुंजरोवा स्थितीत असावे लागते. स्वत:च आपल्याच हातानी डोळ्यावर पट्टी बांधून घ्यायचे व मला दिसत नाही असे ठणाणा करायचे.

काही वेळा आत्मवंचना हा शब्दप्रयोग केवळ संवादासाठी व काही गोष्टींच्या स्पष्टीकरणासाठी वापरले जात असावे. या वेळी तुम्ही सत्य लपवत नसून सत्यापासून दूर जाण्याच्या प्रयत्नात असता. उदाहरणार्थ टीव्हीच्या रियालिटी शोमधील 'उभरती' गायिका स्वत:ला लतादीदी वा आशा भोसले अशी समजूत करून घेतलेली असते. वास्तवात स्वत:च्या वकूबाचा तिला अंदाज नसतो व इतर काय म्हणतात याकडे ती दुर्लक्ष करते. परमेश्वर ही संकल्पना केंव्हाच कालबाह्य झाली असून त्या काठीच्या आधारे आपल्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत हे माहित असूनसुद्धा येता जाता, उठता बसता नमस्कार - नवस करण्यात आपण आपल्यालाच फसवत असतो, हे आपल्या लक्षातच येत नाही.

कित्येक प्रसंगी व/वा कित्येक वेळा सामान्यांना माहितही असते व माहितही नसते या निष्कर्षापर्यंत आपण पोचत असतो. परंतु हे शक्य आहे का? समाजात वावरणारी माणसं एखाद्या अजश्र यंत्राच्या सुट्या भागासारखे असतात. परंतु हे सर्व सुटे भाग एकच आवाज काढत नाहीत वा एकाच नजरेने बघत नाहीत. सहस्र डोळ्यानी बघत असताना प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा, मतं वेगळी. आपली मनं म्हणजे भोवर्‍यात सापडलेल्या वेगवेगळ्या हितासक्तींचा, इच्छा - आकांक्षांचा, क्षमतांचा, उत्स्फूर्ततेचा, विचारांचा, अपेक्षांचा गोळाबेरीज असून त्यांचा एकमेकाशी काहीही संबंध नसतो. उत्स्फूर्तता आपल्याला रस्त्याच्या कडेच्या गाडीवरील भजी खाण्यास उत्तेजित करत असते, त्याचवेळी आपल्यातील विवेक त्यापासून लांब राहण्याची धोक्याची सूचना देत असते. (परंतु आपण विवेकाचा गळा दाबून टाकण्यात चाणाक्ष असतो!)

आत्मवंचन हे एक न सुटलेल कोडं आहे. कारण आपण स्वत:ला एक सोलो वादक समजून घेत असतो. आपल्याला काहीही वाजवण्याची मुभा आहे या (गैर) समजूतीत वावरत असतो. परंतु आपण एका मोठ्या वाद्यवृंदाचा भाग असतो हे सोईस्करपणे विसरतो. आपल्या या अट्टाहासापायी ऑर्केस्ट्राचा रसभंग होतो हे आपण लक्षातच घेत नाही.

तुमचा लाइफ पार्टनर तुमच्याशी एकनिष्ठ आहे, वा तुमच्या romantic सादाला प्रतिसाद देणारी तुमची प्रेमिका आहे, किंवा सगळ्यात कठिण चाचणी परीक्षा तुम्ही सहजपणे पास होऊ शकता या कल्पनाविश्वात तुम्ही असल्यास तुमचे काही तरी चुकते आहे याची तुम्हाला जाणीव आहे का? कदाचित तुम्ही याला 'हो' म्हणाल. परंतु आपण नेहमीच आपल्या (स्वच्छ) हेतूबद्दल आपल्या अपेक्षाबद्दल आपल्यालाच आपण फसवत असतो. व अशा प्रकारे फसवत असताना कुठल्याही थरापर्यंत जाण्याची आपली तयारी असते. अपेक्षाभंगाच्या क्लेशदायक सत्य स्वीकारण्याची आपली तयारी नसते. व खोट्या समाधानाच्या मागे जाण्यातच आपण धन्य समजतो.

परंतु काही प्रमाणात आत्मवंचना करण्यात काही चूक नाही. उलट त्यापासून आपल्याला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फुग्यासारखी फुगवून ठेवलेली सकारात्मक दृष्टी आपल्या अडी-अडचणीवर मात करू शकते. कठिण प्रसंगातून बाहेर काढू शकते. नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढू शकते. परंतु जेव्हा आत्मवंचना सकारात्मकतेच्या पलिकडे जावून पुराव्यांच्या विरोधात असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास भाग पाडते तेव्हा मात्र आपण आणखी जास्त अडचणीत सापडू शकतो. वाळूत तोंड खुपसून राहिल्यामुळे सत्य परिस्थितीचे भान येणार नाही. कडवे सत्य पचविण्याचे सामर्थ्य राहणार नाही. त्यामुळे वेळीच उपाययोजना करू शकणार नाही.

आपण सत्य परिस्थितीलाच धूसर करण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे व आपल्याला हवे तसा सत्याची व्याख्या बदलत असल्यामुळे आत्मवंचनेची (व आत्मवंचितांची!) भरभराट होते. ती माझ्यावर खरोखरच प्रेम करते या दिवास्वप्नात इतके गुरफटून जातो की सत्य काय आहे, त्याचे पुरावे काय आहेत याबद्दल विचार करण्यास फुरसत मिळत नाही.

आत्मवंचना ही स्व:तहून लादून घेतलेली प्रक्रिया असते. त्यापासून दूर राहण्यासाठी वस्तुनिष्ठ विचार करण्याची, प्राप्त परिस्थितीचे कठोर विश्लेषण करण्याची सवय लावून घ्यावी लागेल. माझ्या जागी दुसरा असल्यास त्याची प्रतिक्रिया काय असू शकेल याचा अंदाज घ्यावा लागेल. कदाचित या कामी एखाद्या चांगल्या, प्रामाणिक, परखड बोलणार्‍या मित्राचा सल्ला घ्यावा लगेल.

न कळत ठरवलेल्या उद्धेशांना सफल करणे वा पारदर्शक करणे कदाचित आत्मवंचनेमुळे शक्य होणार नाही. परंतु आपण प्रयत्न केल्यास निदान सत्य काय आहे हे तरी समजू शकेल. व त्यासाठी आपल्यातला (थोडातरी!) ताठरपणा सोडून द्यावा लागेल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

as

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वतःला फसवणे हे नकळतदेखील होऊ शकते. स्वतःला "फसवण्या"चे पुढील २० प्रकार बघू. हे आणि अश्या अनेक congnitive biases मुळे आपण कळत-नकळत फसत असतो. अर्थात स्वतःला फसवणे हे नेहमीच चुकीचे आहे किंवा नेहमीच बरोबर आहे, असे म्हणता येणार नाही.
१. Anchoring bias: सर्वप्रथम मिळालेल्या माहितीवर अतिविश्वास टाकणे.
२. Availability heuristic: उपलब्ध असलेल्या माहितीवर अतिविश्वास टाकणे.
३. Bandwagon effect: झुंडीबरोबर तसाच विचार करणे.
४. Blind-spot bias: स्वतःच्या बायसकडे दुर्लक्ष करणे.
५. Choice-supportive bias: स्वतः केलेली निवड योग्य मानणे मग भले त्यात दोष असले तरी.
६. Clustering illusion: रँडम गोष्टीत पॅटर्न शोधणे
७. Confirmation bias: आपला पूर्वग्रह आहे, त्याला अनुकूल गोष्टी ऐकणे व बाकी दुर्लक्ष करणे
८. Conservatism bias: जुन्या गोष्टी केवळ जुन्या आहेत म्हणून बाळगणे.
९. Information bias: उगीचच माहिती मिळवत बसणे. More information is not always better.
१०. Ostrich effect: वाळूत डोकं खुपसून बसलेल्या शहामृगाप्रमाणे, स्वतःच्या निर्णयाशी विसंगत गोष्टीकडे दुर्लक्ष करणे.
११. Outcome bias: Judging a decision based on outcome.
१२. Overconfidence: अनाठायी आत्मविश्वास
१३. Placebo effect: एखाद्या गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास टाकणे.
१४. Pro-innovation bias: स्वतः शोध लावलेल्या गोष्टीला जास्त लायकी आहे, असे समजणे.
१५. Recency: नुकतीच मिळालेली माहिती अचूक आहे, असे समजणे.
१६. Salience: focus on most easily recognizable features
१७. Selective perception: आपल्याला अपेक्षित निकालानुसार आकलन करणे.
१८. Stereotyping: पूर्वग्रह
१९. Survivorship bias: केवळ यशस्वी उदाहरणांकडे बघून मत बनवणे.
२०. Zero-risk bias: सुनिश्चित गोष्टीला प्राधान्य देणे.

अधिक माहितीसाठी इथे बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उगीचच माहिती मिळवत बसणे. More information is not always better.

मस्त वाक्य आहे. सही करु का? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा कॉन्ग्निटिव डिझोनन्स चा प्रकार असतो शेवटी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

छान आहे ती लिंक. विशेषतः स्मोकींगचं उदाहरण फार आवडलं. हे वाईट ते वाईट अमकं करु नका/तमकं रोज करा असे वागू नका तसे वागा इन फॅक्ट हा जो बाऊ केला जातो त्याची घृणा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण स्वतःला फसवणे टाळू शकतो का? - लक्षात येता क्षणी हो!!! नक्की टाळू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही गं टाळू शकत. ती गाढंव आणि बापलेकांची गोष्ट आहे ना तसं होतं. आपण आपल्या कुवतीपलीकडचं म्हणून काही सोडून द्यावं तर तुझी योग्यता या विषयावर ढीगांनी काय काय आदळत रहातं आपल्यावर. जणू काही आपण सर्वगुणसंपन्न आहोत आणि एका सकारात्मकतेचीच कमी आहे. आणि झेपत नसतानाही करत राहीलो तर मग आपल्या आवडीचंच कसं करावं याचे ही ढीगभर उपदेश. हो आणि त्यात यशस्वी होण्याची हमी असतेच. तेही चमकणारं यश. आपला आनंद, याला किंमतच नाही. कारण तुम्हा आनंदानं करताय तर त्यात यश मिळायलाच हवं हे समीकरण. आणि यश्=पैसा+नाव्+समाजमान्यता+कौटुबिक पातळीवर गुडीगुडी वैगेरे सगळच.
गुलबकावलीचं फूल शोधणं सोपं असावं त्यामानाने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile यामध्ये त्या व्यक्तीने स्वतःला कसे फसवले?
तिला तिच्या आवडी माहीत आहेत आणि अ‍ॅट द मोस्ट ती तिच्या आवडीनिवडी मारुन लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत राहील. पण त्याला स्वतःला फसवणं म्हणता येत नाही अंतरा.
____
माझ्या मते आपण स्वतःला नाही फसवु शकत. आपल्याला स्वप्नभंगांची, परिस्थितीची पूर्ण कल्पना असते आणि आपण जगाकरता नाटक करत राहतो कारण अन्य काही करण्याची हिंमत तरी नसते किंवा कुणाचे तरी हितसंबंध गुंतलेले असतात जे आपण दुखावणं कटाक्षाने टाळतो. पण आपण स्वतःशी प्रामाणिकच असतो.
___
आपण स्वतःला फसवु शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वताला फसवणे हा स्वताचाच चॉइस असतो, त्यामुळे टाळणे शक्य आहे.

दुसरे म्हणजे मनोबा म्हणतो तसे स्वताच्या मनाला फसवणे हा फक्त वाक्प्रचार आहे. प्रत्यक्षात असे शक्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वताला फसवणे हा स्वताचाच चॉइस असतो, त्यामुळे टाळणे शक्य आहे.

स्वताच्या मनाला फसवणे हा फक्त वाक्प्रचार आहे. प्रत्यक्षात असे शक्य नाही.

इतक्या ठामपणे हे असे म्हणता येणार नाही. शास्त्रज्ञसुद्धा स्वतःला फसवत असतात. This is the big problem in science that no one is talking about: even an honest person is a master of self-deception.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतक्या ठामपणे हे असे म्हणता येणार नाही. शास्त्रज्ञसुद्धा स्वतःला फसवत असतात

आपण स्वताला फसवतो आहोत हे इम्प्रेशन माणुस दुसर्‍यांना देत असतो.

मनोबांचे हे वाक्य बघा - स्वताच्याच खांद्यावर कोणाला चढता येइल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<खवचट मोड> हा लेख लोकांना समजेल असे लेखकाने समजणे ही आत्मवंचना आहे का? खवचट मोड>
कृपया हलकेच घेणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला पु. ल. देशपांडे लिखित " तुझे आहे तुजपाशी" या नाटकातील आचार्यांचे पात्रं आठवले.
शब्दं नेमके नाहीयेत पण मतितार्थ असा आहे. की --
एकदा एक भूमिका तुम्ही पत्करलीत की तिचा त्याग करता येत नाही. मग भले तुम्हाला त्यातला फोलपणा समजला तरी परतीचा मार्गं बंद असतो. सागरात लोटलेली नाव पुढेच न्यावी लागते. मागे फिरण्याचा प्रयत्नं केला तर तुम्हाला परत आत लोटायला असंख्यं लोक तुमच्या - मित्रं , भक्त, नातेवाईक, हितचिंतक, गुरू इ. अनंत स्वरूपात उभे असतात. या सगळ्यांचा विरोध तुम्ही जुमानला नाही तर तुम्ही एकाकी पडण्याची भिती असते. मग तुम्ही तात्वीक, कर्तव्यपरायणतेचा आव आणता, उसने अवसान आणून आपली भूमिका समरसतेने निभावण्याचे नाटक करता. याला आत्मवंचना म्हणा अथवा मजबुरी

तोरा मन दर्पन कहेलाए असं म्हणतात. मनात स्वच्छं उमटलेले प्रतिबिंब न पाहिल्याचे नाटक करत राहतात. कारण तसं न केल्यास स्वतः चा आत्माभिमान दुखावला जातो, इतरांच्या नजरेतील स्वतः साठीचा आदर उणावलेला बघावा लागतो. ते स्विकारायला फार मोठे धैर्यं असणे जरूरी असते. त्यापेक्षा आत्मंवंचना करून सत्यं नाकारणे आणि आपल्या दुराभिमानाला चिकटून राहणे तुलनेने सोपे वाटते.
काही लोक याला तडजोड म्हणतात तर काही त्याग म्हणतात. पण सगळ्याचा अर्थं एकच - तो म्हणजे आत्मवंचना

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

अगदी अगदी! आपल्याच प्रतिमेमधे आपण इतके गुरफटत जातो की गुदमरायला होत.आत्मपरिक्षण करुन तुम्हाला तुमच्या भूमिकेत काही बदल करावेसे वाटले तर तुम्हाला दुतोंडी ढोंगी गद्दार अशा दूषणांना सामोरे जावे लागते. कुठल्याही कल्ट मधे एखादा जर असा विचार करु लागला तर बूर्झ्वा बूर्झ्वा असे म्हणून त्याला कळापाबाहेर फेकले जाते.कट्टरतेत कमी पडला म्हणून कच्च मडकं आहे,कुंपणावरचे असे हिणवले जाते.मग तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे तसा तो वागत राहातो.ती त्याच्या अस्तित्वाची लढाई बनते.
मी या समाजधुरीण कट्टर लोकांना प्रश्न विचारतो कि विज्ञान तंत्रज्ञान बदलते आहे समाज बदलतो आहे मग तुम्हाला तुमच्यात बदल करावासा वाटत नसेल तर तुमच्यात व दगडात फरक काय?
काही झाल तरी भूमिकेला चिकटून राहणे म्हणजे तत्वनिष्ठ असणे मग भले जग बदलल तरी चालेल असे असेल तर तुमच्यात व सनातन्यात फरक काय राहिला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/