फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६
.

१) एबीपीमाझावर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मिळणा-या मिसळीचे प्रकार दाखवत होते. नाशिकच्या एका ठिकाणच्या मिसळीमध्ये चिवडा, पोहे वगैरे काहीच नसते. मोड आलेली वेगवेगळी कडधान्ये, वेगवेगळ्या प्रकारची शेव, तर्री. मोड आलेल्या कडधान्यांवर एक निखारा ठेवलेली पणती, त्यापासून येणारा धूर आत कोंडावा म्हणून वरून झाकण. त्याचा वेगळाच स्वाद येतो. अशा प्रकारे आपल्याला हवे तसे कमी-अधिक तिखट करून घेता येते

मग ते झाल्यावर ठाणे, पुणे वगैरे टिकाणच्या.

इंग्रजी किंवा इतर कोणत्याही चॅनलवर अशा कार्यक्रमांमध्ये दाखवले जाणारे टीव्हीवाल्यांचे चवीचे रसिक सहसा सडपातळ नसतात; किंबहुना सडपातळ म्हणता येईल याच्या जवळपासही नसतात, यामागचे रहस्य काय असावे?

दुसरी गोष्ट म्हणजे हे खवैय्ये विविध पदार्थ चाखताना उऽऽऽम, वगैरे प्रशंसादर्शक, मादक आवाज काढत असतात, त्यावेळी त्यांच्या कॅमेरामनच्या तोंडाला किती पाणी सुटत असेल. की आधी कॅमेरामनचा पोटोबा शांत करून हे शुटिंग केले जाते? मला विमानतल्या हवाईसुंद-या, रेस्टॉरंटमधले वेटर्स यांच्याबाबतही नेहमी हाच प्रश्न पडतो. त्यांच्यापैकी कोणी पदार्थ वाढताना सारखे आवंढे गिळताना दिसत नाही.

यातला सर्वात मोठा व क्रूर विरोधाभास म्हणजे इकडे हे लोक मिटक्या मारत मिसळ खाण्याचे आधीच रेकॉर्ड केलेले चित्रीकरण दाखवले जात असताना खालच्या पट्टीत काश्मीरमधील कुपवाडात झालेल्ता चकमकीत एक चांदवडचा तर दुसरा विजापूरचा असे दोन जवान मृत झाल्याची व एक मेजर पदाचा अधिकारी गंभीर जखमी झाल्याची बातमी दाखवली जात होती.

यावेळी मात्र सांगलीकडचे कुपवाड आणि काश्मिरातले कुपवाडा यांच्यात गल्लत न करण्याइतके टीव्हीवाले शहाणे झालेले दिसत होते.

२) देशद्रोह म्हणजे नक्की काय ते एकदा ठरवण्याची वेळ आली आहे. देशद्रोह म्हणजे देशाबाहेरच्या शक्तींशी संधान साधून त्यांना संवेदनशील माहिती पुरवणे एवढाच आहे का?

‘कोणी पादले तरी तो देशद्रोह समजला जाईल’ अशी पोस्टही या निमित्ताने पाहण्यात आली. त्यांना हा प्रश्न खडसावून विचारला पाहिजे. केवळ इतरांचा द्वेष करायचा या एकमेव भुमिकेतून विविध पक्षात विभागलेले दलित एकत्र येऊन इतरांचा द्वेष पसरवण्याच्या स्वत:च्या अजेंड्यात साथ देत नाहीत म्हणून थयथयाट करणारे हे महाभाग कळतनकळत या देशद्रोह्यांनाच साथ देत आहेत. त्यामुळे ख-या देशद्रोह्यांवर टीका केली तरी यांच्या पोटात दुखताना दिसते. त्यातूनच कोणी पादले तरी त्याला हे सरकार देशद्रोह समजेल काय अशा हास्यास्पद फुसकुल्या हे महाशय फोडताना दिसतात.

या महाशयांच्या वॉलवर त्यांचे समविचारी मित्र इतर जातीयांचा द्वेष करणा-या कमेंट्स सर्रास महात्मा फुले इत्यादींच्या नावावर नियमितपणे खपवताना दिसतात आणि त्याला यांची अजिबात हरकत नसते. मी कुठल्याही जातीच्या आधारावरील संघटनाविरूद्ध आहे, कारण ते एकूण समाजाच्या हिताचे नाहीच. पण हे महाशय ब्राह्मणांच्या एकत्र येण्याच्या आवाहनांच्या पोस्ट्स वेचून वेचून एकत्र करतात व त्यावर त्यांचे समविचारी मित्र वर उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मणविरोधी कमेंट्स करतात. याला अर्थातच यांची हरकत नसते. मात्र इतरत्र ब्राह्मणांवर जहरी टीका करणा-या पोस्ट्सही इतरत्र सर्रास दिसत असताना त्यात मात्र यांना काही वावगे दिसत नाही. यांच्या स्वत:च्या वॉलवर हा एकांगी प्रकार नेहमीच जळत असताना यांची देशद्रोहाबद्दलची किंवा देशविरोधाची संवेदनाच बधीर झालेली दिसते यात काय आश्चर्य?

जेएनयुमधील विद्यार्थ्यांचे वर्तन देशविरोधी घोषणा वा दहशतवादावरून फाशी झालेल्यांच्या समर्थनार्थ घोषणा देणे हे देशद्रोही वर्तनच समजले पाहिजे. या पार्श्वभुमीवर जेएनयुमध्ये देशविरोधी स्वरूपाच्या घोषणा देणा-यांवर कारवाई करण्याची केन्द्र सरकारच्या भुमिकेचे स्वागतच करायला हवे. त्याचबरोबर या देशद्रोह्यांच्या समर्थनासाठी वेगवेगळे मुखवटे चढवून कोण पुढे येते यावरदेखील लक्ष ठेवले पाहिजे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे हैद्राबाद विद्यापीठातील त्याच्या संघटनेने याकूब मेमनच्या फाशीला मानवतेच्या आधारावर समर्थन करण्याच्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले गेले किंबहुना पाठीशी घातले गेले. असे समर्थन करण्याच्या उद्योगांमुळे तोही देशद्रोही होता का असा प्रश्न विचारला गेला. डॉ. आंबेडकरांचे नाव तुमच्या संघटनेला देता, त्यांचे कार्य जरूर पुढे न्या, मात्र त्यांच्या नावाची ढाल पुढे करून तुमचे सगळेच उद्योग पवित्र करून घेतले जातील या भ्रमात राहू नका हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली आहे.

अभाविपचे कोठे चुकत असेल, तर ते जरूर दाखवून द्या, त्यांच्या हातून काही गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य घडत असेल, तर ते करणा-या त्यांच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर जरूर कारवाई करा. मात्र ते करतात ते सगळेच चूक आणि आम्ही राजकीय चळवळीत असूनही वेळ आली की सोयीप्रमाणे दलित, कम्युनिस्ट वगैरे चेहरे मिरवणार आणि स्वत:ला सरसकट निर्दोष, अभागी म्हणवून घेणार. हे यापुढे फार काळ चालेल असे वाटत नाही.

मुळात या मुलांना या वाटेने जाण्यास प्रोत्साहन देणारे कोण आहे हे शोधायला पाहिजे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे निमित्त झाल्यामुळे हैद्राबाद विद्यापीठात दिवसभर ‘उपोषण’ करणारा नाटकी पप्पू काल जेएनयुमध्येही आला, कारण येथेही भाजपचा निषेध करण्याची संधी त्याला दवडायची नव्हती. मात्र ज्या विद्यार्थानी तेथे देशविरोधी घोषणा दिल्या त्याबद्दल तो काही बोलला नाही.

या लोकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य नेहमी देशद्रोह्यांच्या किंवा दहशतवाद्यांची भलावण करण्यातच कसे खर्ची होते, हा प्रश्न कोणालाच कसा पडत नाही?

जेएनयुसारखी विद्यापीठे ही डावे विचार असलेल्यांचा बालेकिल्ला मानली जातात, त्यामुळे डी. राजा, सीताराम येचुरी हे तेथील कारवाईवरून चिडणे साहनिकच आहे. पण कुठली कृत्ये देशहिताची नाहीत हे समजण्याइतकी समज कॉंग्रेसकडे; जो राष्ट्रीय पक्ष म्हणवतो; नसावी? पप्पूच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्ष म्हणून किती दिशाहीन झाला आहे याचेच हे लक्षण आहे.

जेएनयुमधून पास झालेल्या आर्मीतल्या बुजुर्ग निवृत्त अधिका-यांनीही तेथे चाचलेल्या देशविरोधी उद्योगांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे व असेच प्रकार चालू राहिले तर आम्हाला या विद्यापीठाकडून मिळालेल्या पदव्या परत कराव्या लागतील असे त्यांनी सांगितले आहे.

३) द्रमुक – कॉंग्रेसची हातमिळवणी देशाला लुटणारे पुन्हा एकत्र

तामिळनाडुतल्या आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी द्रमुक व कॉंग्रेसच्या युतीची आज घोषणा झाली. याच दुकलीने मनमोहनसिंग यांच्या स्वच्छ प्रतिमेच्या आड देशाला लुटले होते. लुटले होते हा शब्दही तोकडा ठरावा इतके लुटले होते.

२जी घोटाळे उघड झाल्यावर द्रमुकचे तोन मंत्री थोडाकाळ गजाआड गेल्यामुळे या दोन पक्षांमध्ये वितुष्ट असल्याचे चित्र होते. मात्र आता निवडणुका जवळ आल्या की हे दोन्ही लुटारू पुन्हा एकत्र आलेले आहेत.

या मैत्रीवरून पप्पूला कोणी विचारल्याचे ऐकिवात नाही. त्याच्या पक्षाने च द्रमुकने केलेल्या लुटालुटीची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे काही बोलणे योग्य नसल्याचे कारण पप्पू देईल.

इकडे अशा अभद्र युत्या, तिकडे पंजाबात भाजपही अकाली दलाशी असलेली युती सोडेल अशी चिन्हे नाहीत. अकाली दलानेही पंजाबला व पंजाबातील तरूणांना देशोधडीला लावण्यात कसलीच कसर सोडलेली नाही. महाराष्ट्रात यापूर्वी भाजप शिवसेनेच्या भ्रष्टपणाच्या व गुंडगिरीच्या दावणीला बांधलेला होता, तोच प्रकार त्यांच्याबाबतीत पंजाबमध्ये झाला आहे. पंजाबात अमरिंदरसिंग यांच्या नेतृवाखाली कॉंग्रेसचे सरकार येऊन त्यांनी तरी तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी इच्छा आहे.

४) थॅचर यांच्या ख्रिसमसचे जबरदस्तीचे पाहुणे

टिम बेल हे ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे मित्र व सल्लागारही. त्यामुळे सलग जवळजवळ १२ वर्षे त्यांना थॅचर यांच्या निवासस्थानी ख्रिसमस साजरा करावा लागला.

पहिल्या वर्षी त्यांना जेव्हा यासाठीचे निमंत्रण मिळाले तेव्हा त्यांना कोण आनंद झाला होता. पंतप्रधानांच्या घरचा ख्रिसमस. परंतु त्यानंतर सलग एवढी वर्षे त्यांच्याकडेच ख्रिसमस साजरा करावा लागल्यामुळे व त्यात अगदी तोचतोचपणा असल्यामुळे व एकूणच रडाळपणा असल्यामुळे ते इतके कंटाळले होते की आता थॅचर पंतप्रधानपदी न राहतील तर बरे असे त्यांना झाले होते.

५) व्हॅलेंटाइन डे आपल्याकडे का साजरा करावा? अगदी कोणी पती पत्नी नसले तरी एकमेकांचे वाढदिवस असतात. त्याव्यतिरिक्त साजरे करायला सतत काही ना काही निमित्त लागते हेच त्यामागचे कारण असते. पतीपत्नींना एकमेकांच्या वाढदिवसाशिवाय लग्नाचा वर्धापनदिन तरी असतो, आमचे काय ही प्रेमींची अडचण असावी.

पण एखाद्या दिवशी ठरवून आपले प्रेम व्यक्त करायचे यातच कृत्रिमपणा येत नाही का? की तो कृत्रिमपणाही आजकाल आवश्यक झाला आहे?

प्रतिक्रिया

पीडीपीबरोबर युती करणे म्हणजे हे सगळे पॅकेज बरोबर येतेच. अन्यथा त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालायची का हेही सांगा. कॉंग्रेस त्यांच्याबरोबर असती तर टीकेचे धनी ते झाले असते. भाजपला इतर ठिकाणच्या मुद्द्यांवरून जरूर झोडपा. काश्मीरच्याबाबतीत मात्र त्यांच्याबद्दल थोडा अधिक संयम व विवेक दाखवावा हे यासाठीच म्हटले आहे.
देशद्रोहीपणाबद्दल म्हणाल तर कॉंग्रेसने युती केली तेव्हाही वेगळी परिस्थिती नव्हती. तेव्हा कॉंग्रेसने तेव्हा या शब्दाचा उल्लेख केला नाही म्हणजे हे सगळे त्यांना मान्य होते असे समजण्याचे कारण नाही.

पीडीपीबरोबर युती करणे म्हणजे हे सगळे पॅकेज बरोबर येतेच. अन्यथा त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालायची का हेही सांगा. कॉंग्रेस त्यांच्याबरोबर असती तर टीकेचे धनी ते झाले असते. भाजपला इतर ठिकाणच्या मुद्द्यांवरून जरूर झोडपा. काश्मीरच्याबाबतीत मात्र त्यांच्याबद्दल थोडा अधिक संयम व विवेक दाखवावा हे यासाठीच म्हटले आहे.
देशद्रोहीपणाबद्दल म्हणाल तर कॉंग्रेसने युती केली तेव्हाही वेगळी परिस्थिती नव्हती. तेव्हा कॉंग्रेसने तेव्हा या शब्दाचा उल्लेख केला नाही म्हणजे हे सगळे त्यांना मान्य होते असे समजण्याचे कारण नाही.

फुसके बार – १७ फेब्रुवारी २०१६ थम्सअपची चोरी, चहा - एक प्रतिकाराचे हत्यार, आपला विकास-त्यांचे मरण, सेक्युलर शिवाजीराजे
.

१) माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेली आठवण.

पुण्यातल्या पेठेतल्या तिच्या घरी तिच्या आत्या-आज्या वगैरे ज्येष्ठ महिलांच्या भिशीचा कार्यक्रम चालू होता. पत्ते खेळत होत्या. तेवढ्यात घरात एक चोरटा शिरला व त्याने सु-याचा धाक दाखवला. आजींपेक्षा कमी वयाच्या इतर महिला होत्या, त्याच आजींपेक्षा घाबरल्या. आजींनी प्रसंगावधान दाखवत शेजारीच असलेल्या कपातला चहा त्या चोरट्याच्या चेह-यावर फेकला. त्यांचे पाहून इतर जणींनी पण त्यांची नक्कल केली. पण हाय रे दैवा.

पत्ते खेळण्याच्या नादात आणून जवळच ठेवलेला गरमगरम चहाही ब-यापैकी थंड झाला होता. चोरट्याने एका हाताने मस्तपैकी चहाने ओला झालेला चेहरा पुसला आणि तो या सात-आठ जणींच्या अंगावर जे काही सोने होते ते केवळ सु-याच्या धाकाने उतरवायला लावून ते घेऊन पसार झाला.

२) जवळचे तुफानी संपले तरी त्याखेरीज इतर काही प्यायचे नाही या हट्टापोटी सलमानखान भर समुद्रातून दुचाकी चालवून रस्त्यावर आल्यावर आणखी स्टंटबाजी करत एका ट्रकमधील तुफानीची बाटली वरच्यावर उचलतो अशी एक मुर्खासारखी जाहिरात सध्या चालू आहे.

जाहिरातींनाही कुठलेही कायदे मोडू नयेत हे बंधन असते. म्हणूनच दुचाकींच्या जाहिरातींमध्येही त्यातील मुलींचे सौंदर्य व्यवस्थित दिसेल अशी हेल्मेट्स घालणे भाग असते.

येथे मात्र हे महाशय ती तुफानीची बाटली चक्क चोरतात.
शिवाय हे तुफानी थंड करून प्यायचे असते असे म्हणतात. ट्रकमधील तुफानी थंड नसते. याकडे ज्याचीत्याची आवड म्हणून दुर्लक्ष करता येईल, पण हे महाशय दिवसातून अनेक वेळा करत असलेल्या या राजरोस चोरीचे काय? मुळात ट्रकवाल्याला पैसे देऊन त्यांनी ही बाटली विकत घेतली हे आपल्यापासून लपवलेले गुपीत आहे की काय? की थेट तुफानीच्या मालकांनीच त्यांना अशी चोरी करण्याची परवानगी दिलेली आहे असे समजायचे? की अशा पद्धतीने तुफानी पिण्याचा अट्टाहास करणारे मूर्ख असे आपण समजायचे?

३) समीक्षा व निष्कर्ष

लेखकाने जे लिहिलेले असते, ते समीक्षक किंवा वाचक तो लेखकाचाच वैयक्तिक दृष्टीकोन किंवा मत म्हणून पहात असतील का?

लिखाणातला एक काल्पनिक प्रसंग उदाहरणार्थ: मुले लहान असताना तरूण आईवडील कॅनडा-अमेरिकेला मायग्रेट होण्यासाठी जातात. बोलण्याच्या ओघात ते सांगतात की आम्हाला मुलगा आहे. मुलगा असल्यामुळे तिथल्या डेटिंग वा अर्ली सेक्सच्या कारणांमुळे (ही कारणे किती योग्य-अयोग्य हा मुद्दा नाही) आम्हाला काही फरक पडणार नाही. कारण अखेर मुलगेच आहेत ते. आम्हाला मुलगी असती तर मात्र आम्ही याबाबतीत हजार वेळा विचार केला असता.

तर असे हे मत त्या लेखकाचे वैयक्तिक मत समजले जाईल का? की तो गोष्टीतल्या पात्राचा आविष्कार म्हणून समजले जाईल?

एखाद्या लेखकाच्या बाबतीत आज लिहिलेल्यातली एखादी गोष्ट भविष्यात कुठल्यातरी निमित्ताने कोणाच्या तरी नजरेस पडून त्यावरून या लेखकाचे डोके असेच चालते बरे का, असे म्हणून त्यावरून संशयकल्लोळ उडू शकतो काय?
असे झाल्याची काही उदाहरणे सांगता येईल का?

४) डॉ. निलेश हेडा यांच्या अनेक अभ्यासू पोस्ट्सपैकी ही एक. आपणा शहरी लोकांसाठी विकास म्हणून जे असते, त्यापोटी काही जणांची उदरनिर्वाहाची दोरीच कशी तुटू शकते व आपल्यापर्यंत त्याची गंधवार्ताही पोहोचत नाही याचे त्यांच्या स्वत:च्या निरिक्षणातून आलेले जळजळीत उदाहरण. ही उदाहरणे आहेत मध्य प्रदेशातली व आपल्या महाराष्ट्रातलीही. आपल्याही जवळपास असे होत नसेल याची आपल्याला तरी खात्री आहे का?

नष्ट होत चाललेले परिस्थितिकीय परिघ

आमाझीरिया हे मध्यप्रदेशातल्या सिवनी जिल्ह्यातील एक छोटसं गाव. रुडयार्ड किपलिंग नावाच्या लेखकाने ‘जंगल बुक’ या पुस्तकात गौरवलेला हा मोगलीचा प्रदेश. सपेरे, बंसोड आणि गोंड अशा तीन आदिवासी जमाती या छोट्याशा ३० ते ४० झोपड्यांच्या गावचे रहिवासी. या गावातील ‘सपेरे’ ही जमात सापांचा खेळ करून आणि वनौषधी देऊन उपजीविका करतात. ‘बंसोड’ बांबूच्या वस्तू बनवतात, तर ‘गोंड’ शेती आणि जंगलातील वनोपजांवर अवलंबून आहेत. गावातले हे तीनही मानवी समूह तीन वेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहेत. त्यांच्यात संसाधनांसाठी कोणतीही स्पर्धा नाही. आपापल्या संसाधनांवर पारंपरिक पद्धतीने हे तीनही समूह अवलंबून आहेत. आपापले सामाजिक ‘निश’ सांभाळून आहेत.
परिस्थितीकी शास्त्रात ‘इकॉलॉजीकल निश’ (Niche) नावाची संकल्पना आहे. ही सर्वसमावेशक अशी संकल्पना जशी मानवेतर जीव समूहांना लागू पडते तशीच ती मानवी समाजातील विविध घटकांनासुद्धा लागू पडते. जीव भरपूर असतात पण, संसाधनं मर्यादित असतात. अशा परिस्थितीत सीमित संसाधनातून उपजीविका चालवणे प्रत्येक जीवाला भाग असते. या प्रयत्नातून मग जगण्याच्या विविध पद्धतींचा जन्म होतो. जर सारे जीव एकाच प्रकारच्या पद्धती वापरायला लागले तर संसाधने टिकणार तर नाहीच पण, जीवाजीवात प्रचंड स्पर्धा होऊन साऱ्या निसर्गाचाच तोल ढळू शकतो. निशची संकल्पना सांगते की, परिसंस्थेत प्रत्येक सजीवाची एक विशिष्ट अशी भूमिका, जागा असते आणि त्याच्या त्या खास जागेमुळे त्याचे आणि अन्य सजीवांचे संसाधनासाठीचे संघर्ष टळतात. सोप्या शब्दात सांगायचे तर मांसाहार करणे ही वाघाची निश आहे, तर मासेमारी ही मासेमारांची निश आणि शेती करणे ही शेतक-यांची. आमाझीरियातील तीनही समूहांच्या आपापल्या निश आहेत. ते इतरांच्या संसाधनांवर अतिक्रमण करत नसल्यामुळे त्यांच्यात संघर्ष होत नाहीत.
आता परिस्थिती बदलायला लागलीय. पूर्वीच्या संसाधनांवर अवलंबून असणे आता शक्य राहिलेले नाही. सापांची संख्या कमी झाली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा आलाय. सापांचा खेळ करणेही शक्य नाही. त्यामुळे या लोकांनी आता काय करावे? हा मोठा प्रश्न आहे. मी जेव्हा पहिल्यांदा या गावात गेलो तेव्हा, लोकांमध्ये एकप्रकारची भीती होती. हे वनविभागाचे अधिकारी असावेत, अशा साशंक मनाने लोक माझ्याकडे बघत होते पण, त्यांना हळूहळू विश्वास यायला लागला. लोक जमू लागले आणि बोलू लागले.
‘साब, आपने जब कानून बनाया तब हमको पुछा नही, आपने जब कीटनाशक निकाला तब भी हमको पुछा नही.. अब सांप कम हो गये, अब वन विभाग हमारे सांप पकडकर ले जाते है, हमको जीने का कोई सहारा नही रहा.’
आमाझीरियापासून ६०० कि.मी. अंतरावर असलेल्या अकोला जिल्ह्य़ातले पारधी हेच म्हणणे मराठीत सांगत होते. प्रश्न एकच होता. नैसर्गिक संसाधने कमी झाली आहेत. नैसर्गिक संसाधने हिरावून घेण्यात आली आहेत. निशचं अतिक्रमण केलं गेलं आहे.
पारधी हे परंपरेने काळवीट, ससे, मोर, तितर, बटेर यांची शिकार करून उदरनिर्वाह करणारे. शिकार शाश्वतपणे चालत राहावी म्हणून त्यांचे अनेक पारंपरिक नियम आहेत. (उदा. गरोदर मादीची शिकार करू नये वगैरे) पण, आता परिस्थिती बदलली आहे. आता बाजारपेठेच्या प्रभावाने आधुनिक बंदुका, प्रखर प्रकाशाचे झोत टाकणा-या विजे-या, हातबॉम्बचा वापर करून पारध्यांव्यतिरिक्त इतर लोकही शिकार करायला लागले आहेत.
एक प्रभावशाली गट स्वत:च्या निशचा परिघ वाढवून दुस-या गटाच्या निशवर आक्रमण करू लागला आहे. सिवनी आणि अकोला या दोन्ही जिल्ह्यांचा प्रश्न संसाधने कमी होणे, पारंपरिक निश नष्ट होणे हा आहे. संसाधने कमी होण्याला कोण जबाबदार आहे? सपेरे, बंसोड की पारधी? मला वाटतं यापैकी कोणीही नाही. जबाबदार आहेत ते बाजारपेठेची भूक भागवणारे, संसाधनांचा अविवेकी वापर करणारे मानवी घटक. पारंपरिक लोकांच्या शिकारीच्या किंवा संसाधनांना काढण्याच्या पद्धती इतक्या साध्या असतात की, कितीही प्रयत्न केला तरी त्यातून फार काही हाती लागत नाही.
जशी लोकसंख्या वाढत गेली. माणसाची भूक ही वाढत गेली. शहरे वाढवण्यासाठी जंगले दूर हटवली गेली, शहरात रोषणाई करण्यासाठी गावातल्या संसाधनांना वापरुन तयार होणारी वीज बाहेर पाठवली गेली. गावातले पाण्याचे साठे शहराकडे वळविण्यात आले. मुठभर राजकारण्यांचे आणि बिल्डर्सचे खिसे भरण्यासाठी धरणे बांधली गेली. आपली शहरातली सारी मिजास खेड्यातुन वाहणा-या संसाधनांवर अवलंबून आहे. खेड्यांना नागवून आम्ही शहरवासी भरजरी शृंगार करुन बसलो आहोत.
असा विचित्र खेळ आपल्या देशात नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असणाऱ्या लोकांसोबत त्यांची संसाधने गावातून शहराकडे हिरावून घेण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे संसाधनांचेही नुकसान होत आहे. पूर्वी आसपासच्या संसाधनांबद्दल एक प्रेमाची भावना स्थानिक लोकांमध्ये होती. आपलं जंगल, आपली नदी, आपले तळे म्हणून त्याची जोपासना केली जायची. संसाधनांना वापरण्यासाठी समाजाने निर्माण केलेले काही पारंपरिक नियम होते. पण, हे सारं आता बदलायला लागलं आहे.
इंजोरी, मानकोपरा ही अडाण नदीच्या काठावर वसलेली गावं. वाशिम जिल्ह्य़ातून यवतमाळ जिल्ह्यात वाहत जाणारी अडाण नदी पैनगंगेला जाऊन मिळते. माझ्या पीएच.डी. च्या निमित्ताने या नदीच्या काठावर वसलेल्या भोई आणि धिवर लोकांशी संवाद साधता आला. अडाण नदीवर कारंजा शहराजवळ धरण बाधलं गेलं. नदीतील माश्यांवरचा भोई लोकांचा हक्क संपला. धरण झाल्याने वाहती नदी थांबली.
आर्णी तालुक्यातील चिमटा गावातील लोक अडाण आणि पैनगंगेच्या संगमावर मासेमारी करत होते. दुपार झाली होती. सकाळपासून दुपारपर्यंत अंदाजे दोन किलोच्या आसपास त्यांनी मासे पकडले होते. चार लोकात दोन किलो मासे, प्रती मानशी अर्धा किलो! चाळीस रुपये किलो या बाजारभावाप्रमाणे १० रुपये प्रती व्यक्ती ही त्यांची दिवसभराची कमाई! काठावर धनाढ्य लोकांच्या शेती होत्या. पाच अश्वशक्तीच्या मोटारीने संपूर्ण नदी जानेवारीतच कोरडी करण्याचे उद्योग सुरू होते. एक धिवर म्हातारा व्यथित होऊन सांगत होता, ‘आता संपूर्ण नदी कोरडी होणार. पुढचे सहा महिने कसं जगावं? हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. नदीच्या आसपासची जंगल कटाई, नदीकाठच्या शेतीत कीटकनाशकांचा अतोनात वापर, शेतीसाठी नदीच्या पाण्याचा अविवेकी वापर, मासेमारीसाठी विषांचा प्रयोग, परदेशी माशांची पैदास अशा अनेक कारणांनी नदीतील माश्यांची संख्या अतोनात कमी झाली आहे. याचा भुर्दंड भोई, धिवर, केवट, मल्लाह यासारख्या लोकसमुदायांना सोसावा लागत आहे.’
एकूणच काय तर, आधुनिक विकासाने पारंपरिक निसर्गाधारित लोकांची निश पद्धतशीरपणे संपवली आहे.

५) शिवकालाचे अभ्यासक गजानन मेहेंदळे यांच्या भाषणाचा हा व्हिडियो तुम्ही जरूर पाहिला असेल.

शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरूद्ध नव्हते. तरीही त्यांना आजच्या संदर्भात अपेक्षित सलेल्या ‘सेक्युलर’पणाच्या मखरामध्ये बसवण्याचा जो उद्योग सुरू आहे, त्यामध्ये त्यांच्या सैन्यात लाखो मुस्लिम होते, वगैरे दावे अलीकडे केले जात आहेत. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचा दाखलाही या संदर्भात अनेकदा दिला जातो. मात्र गजानन मेहेंदळेंनी एका कार्यक्रमात केलेल्या या भाषणात हे प्रकार बहुतांशी अगदी खोटे आहेत व शिवाजीराजांकडे अगदी मर्यादित मुस्लिम सरदार/सेवक होते असे सांगितले आहे.
याबद्दलचे वास्तव काय आहे? सदर व्हिडियोतील भाषण किती तारखेचे आहे याची मला कल्पना नाही व ते जर बरेच जुने असेल, तर त्यानंतर काही पुरावे नव्याने मिळालेले आहेत का याची मला कल्पना नाही.
तेव्हा या विषयातील तज्ञांनी या विषयावर प्रकाश टाकावा ही विनंती. याचा उपयोग काय, वगैरे प्रश्न यामध्ये नको. तूर्त फक्त तथ्यांबद्दल.

या व्हिडियोची लिंक https://www.youtube.com/watch?v=LbZ5p2IIZD0

कुतूहल: उपयोगाबद्दल का नको? माहिती विचारली की तिच्या हेतूंबद्दल प्रश्न आलेच. तुम्ही म्हणालात म्हणून ते बंद कसे होतील तत्काळ?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पारधी हे परंपरेने काळवीट, ससे, मोर, तितर, बटेर यांची शिकार करून उदरनिर्वाह करणारे. शिकार शाश्वतपणे चालत राहावी म्हणून त्यांचे अनेक पारंपरिक नियम आहेत. (उदा. गरोदर मादीची शिकार करू नये वगैरे) पण, आता परिस्थिती बदलली आहे. आता बाजारपेठेच्या प्रभावाने आधुनिक बंदुका, प्रखर प्रकाशाचे झोत टाकणा-या विजे-या, हातबॉम्बचा वापर करून पारध्यांव्यतिरिक्त इतर लोकही शिकार करायला लागले आहेत. एक प्रभावशाली गट स्वत:च्या निशचा परिघ वाढवून दुस-या गटाच्या निशवर आक्रमण करू लागला आहे. सिवनी आणि अकोला या दोन्ही जिल्ह्यांचा प्रश्न संसाधने कमी होणे, पारंपरिक निश नष्ट होणे हा आहे. संसाधने कमी होण्याला कोण जबाबदार आहे? सपेरे, बंसोड की पारधी? मला वाटतं यापैकी कोणीही नाही. जबाबदार आहेत ते बाजारपेठेची भूक भागवणारे, संसाधनांचा अविवेकी वापर करणारे मानवी घटक. पारंपरिक लोकांच्या शिकारीच्या किंवा संसाधनांना काढण्याच्या पद्धती इतक्या साध्या असतात की, कितीही प्रयत्न केला तरी त्यातून फार काही हाती लागत नाही.

बोकड, कोंबड्या यांच्या पैदाशी खलास कशाकाय झाल्या नाहीत ? हे दोन तर देदणादण कापले जातात (मटण्/चिकन साठी) ? म्हंजे काळवीट, ससे, मोर यांच्या कितीतरी पटीने कापले जातात. कोंबडीचे तर अंडे सुद्धा खाल्ले जाते. मग कोंबड्या नामशेष कशाकाय झाल्या नाहीत ?

पूर्वीच्या संसाधनांवर अवलंबून असणे आता शक्य राहिलेले नाही. सापांची संख्या कमी झाली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा आलाय. सापांचा खेळ करणेही शक्य नाही.

पण हे गेली कित्येक शतकं होतच आलेलं नाहीये का? अनेक उद्योगधंद्यांचं स्वरूप बदललं. एकेकाळी कोंबड्यांच्या झुंजी, बकऱ्यांच्या टकरी लावण्याचा उद्योग काही लोक चालवत. त्यावर कायद्याने बंदी आली आणि ते बिचारे बेरोजगार झाले. एकेकाळी खांद्यावर पाणी वाहून नेणारे पखालवाले होते, त्यांचे उद्योग पाट, कालवे, टॅंकर वगैरे आल्यावर बसले... नक्की कुठे कणव करायची आणि नक्की कुठे 'हे असं होणारच, व्हायलाच हवं' असं म्हणायचं हे समजत नाही.

नवे बदल होतच जाणार.
लाईफ इज नेव्हर स्टॅटीक.
बदलत्या जगाबरोबर रहायला प्रत्येकालाच नवे स्कीलसेट्स शिकावे लागणार.
परंपरागत असे काही मिळण्याची अपेक्षा आता कुणीच न ठेवणे उत्तम.

(मात्र इथे पाणी अडवून , त्याचा शेतीसाठी हवा तसा उपसा करून नंतर नदी कोरडी ठक्क करायला सक्त विरोध! किंवा अश्याप्राकारचे पर्यावरणाचे नुकसान करायला विरोध. हा विरोधही पोकळच नाही का पण! आमचं मुंबईतलं घर खाजण जमिनीत कोळ्यांच्या पोटावर पाय देत बनवलेल्या बिल्डींगमध्ये होतं. आमचं पुण्यातलं घर तर शेतजमिनीची वसाहत करून बांधलेल्या जमिनीवर आहे. माझं या गावातलं घर जिथे आहे तिथे पूर्वी छान मोरांची वस्ती आणि अगदी घनदाट जंगल होतं.)

अंदमानात एका विशिष्ट आदिवासी जमातीला प्रयत्नपूर्वक सेग्रिगेट ठेवलं जातं, त्यांचा जीन पूल प्रिझर्व करायला.
एका अर्थाने हे त्या जमातीचे संरक्षण, तर दुसर्‍या अर्थाने हे त्यांच्या बाकीच्या समाजात मिसळून जाण्यास अडथळा, त्यांना मुख्य समाजधारेपासून बाजूला ठेवल्यासारखं वाटतं.

अंदमानात एका विशिष्ट आदिवासी जमातीला प्रयत्नपूर्वक सेग्रिगेट ठेवलं जातं, त्यांचा जीन पूल प्रिझर्व करायला.

असं लीगली करता येतं? कोणालाही असं ठरवून करण्याचा हक्क असतो?

होय. अंदमानातील जारवा जमातीशी संपर्क करायला अन्यांना बंदी आहे, असे वाटते.

भारतीय घटनेतच आदीवासी त्यांच्या विविध जमातींना व त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करायला सरकार बांधील आहे बहुधा. शोधायला हवे!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पाने