सत्य नारायण कथा - सामाजिक समरसतेची कथा

काही वर्षांपूर्वीची गोष्ट, दिल्लीच्या दत्त विनायक मंदिरात सत्यनारायणाची कथा सुरु होती. मंदिराच्या प्रांगणात एक ग्रहस्थ काही लोकांसोबत सत्यनारायण कथेचा माखौल उडवित होते. मी हि तिथे पोहचलो. थोड्यावेळातच लक्ष्यात आले, हे ग्रहस्थ नुकतेच पुण्याहून परतले आहे, आणि तिथल्या एका महाविद्वानाची मुक्ताफळे आपल्या तोंडाने फेकत आहे. मी हि त्या चर्चेत शामिल झालो. एखादी कथा हजारों वर्षांपासून जनमानसात रुजलेली आहे, तर निश्चितच त्या कथेत सामान्यांना भावणार काही तरी असणारच. सत्यनारायणाची कथा सामान्य माणसाला सत्यमार्गावर चालण्याची प्रेरणा तर देतेच शिवाय सामाजिक समरसतेचा संदेश हि देते. समाजातील सर्व वर्गांना हि कथा एक सूत्रात बांधते.

हिंदू धर्मात सदैव दोन प्रवाह राहिले आहे. एक प्रवाह स्वत:चे वर्चस्व स्थापित करण्यासाठी समाजात दुही माजविण्याचे कार्य करतो, ज्याला आपण आसुरी शक्ती म्हणू शकतो तर दुसरा प्रवाह समाजात सौख्य निर्माण करणारा अर्थात दैवीय शक्ती म्हणू शकतो. सत्यनारायण कथा सामान्य लोकांसाठी आहे. सत्यनारायणाची कथा लोकांना सत्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते व समाजात सौख्य हि निर्माण करते. नवीन कामाची सुरुवात लोक सत्यनारायणाची कथा करून सुरु करतात. नवीन विवाहित जोडपे या कथेचे श्रवण करून आपला संसार सुरु करतात. सत्य आणि परस्पर विश्वास हे सुखी जीवनाचे सार आहे.

सत्यनारायण कथेतील पहिले पात्र एक दरिद्री ब्राम्हण आहे. हा ब्राम्हण दरिद्री का बरे असेल हा विचार मनात आलाच. जर ब्राम्हण जास्ती दक्षिणेच्या लालचाने पूर्व निश्चित यजमान सोडून दुसरी कडे जाईल तर काय होईल. त्याला पहिल्या यजमानाशी खोटे बोलावे लागेल. काही काळ ब्राम्हणाला जास्त दक्षिणा मिळेल. पण नंतर अधिकांश यजमान त्याला बोलावणे सोडून देतील. ब्राह्मण दरिद्री होईल. अश्याच एका दरिद्री ब्राम्हणाला नारद मुनींनी सत्याचरणाचा उपदेश केला. ब्राम्हणाची परिस्थिती बदलली. तो श्रीमंत आणि समृद्ध झाला.

दुसरे पात्र एक मोळीविक्या आहे अर्थात आजच्या पुरोगामी भाषेत म्हणायचे तर दलित समाजातला. तो ब्राम्हणाचा घरी येतो, कथा ऐकतो आणि प्रसाद हि भक्षण करतो. याचा अर्थ त्या काळी ब्राम्हणाच्या घरी हि दलिताचे स्वागत होत होते. दुसर्या शब्दांत सत्यनारायण कथेत अस्पृश्यतेचा निषेध केला आहे.

या कथेत अंगध्वज नावाचा राजा हि एक पात्र आहे. राजा म्हणजे क्षत्रिय. जंगलात गवळी समाजाचे लोक (वनवासी) सत्यनारायणाची कथा करीत आहे. राजा अंगध्वज त्यांच्या हातून प्रसाद स्वीकार करीत नाही. जातीपातीच्या भेदभावावर विश्वास ठेवणारा राजाच्या हातून प्रजेचे कल्याण संभव नाही. राजा प्रजेचा विश्वास गमावतो. परिणाम, राजाचे राज्य नष्ट होते. राजा अंगध्वजाला त्याची चूक उमगते. तो वनात राहणार्या गवळी लोकांसोबत सत्यनारायणाची पूजा करतो आणि त्यांच्या सोबत प्रसादाचे भक्षण करतो. अर्थात राजा अंगध्वज सामाजिक भेदभावाच्या नीतीचा त्याग करतो व जनतेचा विश्वास पुन: संपादित करतो. राजाने सामाजिक भेदभाव सोडून समस्त प्रजेशी भातृभाव ठेवला पाहिचे याचा बोध या कथेतून मिळतो.

या कथेत साधूवाणी (वैश्य समाजातला) हि एक पात्र आहे. हा व्यक्ती दिलेला शब्द न पाळणारा आणि सदैव खोटे बोलणारा आहे. हिंदीत एक म्हण आहे 'काठ कि हांडी बार बार नही चढती'. साधुवाणीला खोटे बोलण्यचे फळ भोगावे लागतात. कैद हि भोगावी लागते आणि व्यापारात नुकसान हि होते. शेवटी साधुवाणीला सत्य मार्गावर चालण्याचे महत्व कळते. वैश्याला (व्यापारीला) हि सत्य मार्गावर चालायला पाहिजे हा बोध या कथेतून मिळतो.

सारांश सत्यनारायणाच्या कथेत समाजातील सर्व वर्णांचे पात्र -ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, दलित आणि वनवासी आहेत. सामान्य माणसाला कळावे म्हणून कथेत अनेक चमत्कार हि आहेत. पण या चमत्कारांच्या मागचे कारण समजून सत्यनारायण कथेकडे बघितले तर कळेल हि कथा सर्वांनी सत्य धर्माचे आचरण करावे आणि जातिगत भेदभावाचा मार्ग सोडून बंधुभावाने राहण्याचा संदेश देते. त्या गृहस्थाना सत्यनारायण कथे कडे पाहण्याची वेगळी दृष्टी मिळाली. बिना वाचता, समजता पुरातन कथांचा विरोध करणे हि एक प्रकारचे अज्ञान आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ताई , तारा हि वालीची पत्नी होती. विपरीत परिस्थितीशी झगडत पतीचा वध करणार्याच्या हातूनच आपल्या पुत्राला युवराज पदी बसविले. अर्थात सुग्रीव नंतर अंगद हाच राजा होणार होता. राजनीती कुशल अश्या स्त्रीला महान नाही म्हणणार तर कुणाला म्हणणार.

बाकी इस्लाम स्वीकारल्या नंतर हि लोकांनी सत्यनारायण कथेचे पारणे करणे सोडले नसेल म्हणून सत्य पीर हि कथा अस्तित्वात आली असेल. तूर्त सत्य पिराची समाधी अथवा दर्गा मला तरी कुठे सापडला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ताई , तारा हि वालीची पत्नी होती. विपरीत परिस्थितीशी झगडत पतीचा वध करणार्याच्या हातूनच आपल्या पुत्राला युवराज पदी बसविले. अर्थात सुग्रीव नंतर अंगद हाच राजा होणार होता. राजनीती कुशल अश्या स्त्रीला महान नाही म्हणणार तर कुणाला म्हणणार.

बाकी इस्लाम स्वीकारल्या नंतर हि लोकांनी सत्यनारायण कथेचे पारणे करणे सोडले नसेल म्हणून सत्य पीर हि कथा अस्तित्वात आली असेल. तूर्त सत्य पिराची समाधी अथवा दर्गा मला तरी कुठे सापडला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग सत्यनारायणाचे अगोदरचे पुरावे सांगा. जर सत्यपिराबद्दल रिसर्च करू शकता तर याहीबद्दल अवश्य करू शकाल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पटाईतजी तुमचं ललित फार आवडतं. हे एकमेकांना पटविणे, मन वळविणे सोडून द्या. तुम्हाला वाटते न मंदोदरी सती का तर तिने नवर्‍याला कुमार्गावरुन परतविण्याचा कसोशीने प्रयत्न केला. किंवा कारण काही का असेना, मग तुम्हा सोडा ना. ते सर्वांना पटलच पाहीजे असे थोडीच आहे? का आपण सर्वचजण "लेखणी हे शस्त्र आहे" हा सुविचार फार गंभीरपणे घेऊन मतपरिवर्तनाचं "सतीचं वाण" (च्यायला परत इथेही सतीच शब्द आठवतोय) वगैरे घेतोय. आपण सगळेच स्वतःला, अति सिरियसली घेतोय.
.
मला या स्त्रिया पंचमहाकन्या वाटतात किंवा वाटत नाहीत याबद्दल काहीच मत नाहीये. पुराणातली वांगी पुराणात. ना ते लोक इथे येऊन प्रतिवाद करणारेत ना कोणाला नक्की माहीते की ते होते की नव्हते.
.
माझं म्हणणं एवढच की आपण डोकी कशाला फोडून घेतोय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुकवर सत्यनारळाचा एक फोटो दिसला. लक्षवेधक वाटला.

सत्यनारायण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फक्त स्लाइसच्या बाटलीने लक्ष वेधलं.. बाकी काय वेधक वाटलं यात??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय, मुख्यतः स्लाईसची बाटलीच. पुलंच्या भाषेत - जुन्या-नव्याचा संगम झाला पाहिजे.

खरंतर तांब्या, चौरंगावर अमराठी धाटणीचं झगरमगर कापड, झगमगीत कापडाखाली दिसणारा लाकडी चौरंगाचा पाय, चांदीची वाटी, त्या पारंपरिक पदार्थांसोबत चौरंगावर फक्त फळं, पानं आणि मोजकी फुलं, अशा पदार्थांसोबत भंगारात काढायचं प्लास्टिक, त्याचं स्लाईसचं लेबलही न काढलेलं, त्यामुळे बाटलीत पाणी आहे का नाही हे समजू नये, बाटलीत ठेवलेली ढब्बाडी आणि बिनवासाची, मान टाकलेली जर्बेऱ्याची फुलं (फोटोतून वास येत नाही पण फुलं बघून माळ्यांना समजतं), त्या पलिकडे पुन्हा पितळेची समई, विड्याचं पान आणि झेंडू ... ही रचना गंमतीशीर वाटली.

कदाचित डावीकडचं स्टीलचं पातेलंही अस्थानी वाटलं असतं. पण अलिकडच्या काळात एका भारतीय कलाकाराची इनस्टॉलेशन्स बघितली. तो स्टीलची भांडी वापरून शिल्पं बनवतो. अमेरिकन दुकांनात स्टीलची भांडी मिळतात ती बहुतेकदा भारतीय बनावटीची असतात. त्यामुळे ते लक्षवेधक वाटलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फ्रुट-फ्रुटावळीवरचे स्टिकर्स विसरलीस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि पेढ्याची प्लॅस्टिकची पुडी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लालेलाल भिंत आणि घसर(व)णारी फरशी सुद्धा!

बाकी हा सत्यनारायण आहे का शंका आहे. केळीचे खांब कुठायत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बापरे सत्यनारायण मांडणी शास्त्राचा किती तो अभ्यास!!
तुमच्या घरच्या सत्यनारायणाला फारच काटेकोर मांडणी असेल नै Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
अदिती सत्यनारायणाला बसली आहे (आणि भटजी आता हाताला हात लावा म्हटल्यावर तीने भटजींचे दोन्ही हात धरले) असं दृश्य समोर आले) ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अदिती सत्यनारायणाला बसली आहे

आणि मागे हात जोडून, नथ घातलेल्या,नऊवारीतल्या मेघना, अनु राव बसल्या आहेत असे त्या दृश्याचे एक्सटेन्शनही डोळ्यांसमोर आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून दोघी कुणीतरी घ्या म्हणजे ऐसीकर पंचकन्या होतील पूर्ण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुजा सांगायला कोण? घासुगुर्जी का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ऐसीच्या पंचकन्यांसोबत पुजा! अहो गुर्जींचं वय झालंय आता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

म्हणजे? वय झाल्यावर पथ्यं पाळणं बंद होतं का काय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पथ्य वाढतं गं वाढत्या वयानुसार Wink किती पथ्ये मेली मागे लागतात. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो

पुजा सांगायला कोण?

ऐसा पुछेला है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लहानपणी मला गोड शिरा खायला फार आवडायचा. पण सत्यनारळाचा प्रसाद मी झिडकारायचे. डालडाचा आणि केळ्याचा वास असतो त्या शिऱ्याला. लोकांच्या घरीच मी प्रसादाचा टिपिकल कागदी कप आईच्या हातात देऊन "हा शिरा चांगला लागत नाही. तू घरीच बनव. हा मला नको" म्हणायचे. आईने माझ्या मूल्यव्यवस्थेचं - शिरा छान, प्रसाद वाईट चवीचा - बरंच कौतुक केल्याचं आठवतं. (घरूनच ही शिकवणी तर मी नास्तिक होणार नाहीतर काय!)

सत्यनारळ वगैरे गोष्टी मी बाहेर बघूनच शिकले. ते काय सगळे सारखेच दिसतात, सत्यनारळ, मंगळागौर, हरहरताळका ... एकाच माळेचे मणी! पारंपरिक गोष्टी - चौरंग, तांब्या, सुपारी इ, देवाच्या मूर्ती असतील तर आणि फुलं. त्या सगळ्यात बाटली आणि मला आधी न दिसलेल्या प्लास्टिकच्या पिशवीचा भाग आणि फळांची लेबलं हे भाग नवे आहेत हे समजायला काही फार निराळे डोळे लागत नाहीत. आधुनिकत वस्तूंमधल्या हव्या तेवढ्या उचलल्या हे ठीक; पण मूल्यं आधुनिक बनत नाहीत याची मला गंमत वाटली.

एवढं करून तो फोटो गौरीहार का कायसंसं असतं त्याचा आहे असं कोणी म्हटलं तर मी ते ही मान्य करेन. फोटो लावणाऱ्याने सत्यनारळ म्हटलं होतं, मी री ओढली.

---

भटोबा, स्वारी हं. तो आधीचा प्रतिसाद बाळ सप्रेंना उद्देशून लिहायला हवा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अखंड बंगालच्या संस्कृतीतल्या वेगवेगळ्या प्रवाहांचा आढावा घेणारा हा एक दुवा :

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तारामतीला अबला म्हणू नये, या शब्दामुळे तिची बदनामी होते असा मुद्दा आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिच्यासाठी किंवा विरुद्ध आपण का भांडायचे ? कारण काही अक्षम्य सदस्य या पात्रांचा वापर समाजाला गैरसमजात लोटण्यासाठी करत आहेत, आणी हे तो पर्यंत ठीकही आहे म्हणूया(नाइलाजच). आज त्यांनी एका स्त्रिला पुन्हा पुन्हा टारगेट केले ज्याची जबाबदारी आपण सहज झटकुही शकतो जे तुम्ही करायचे सुचवतही आहात, पण ही प्रवृत्ती फोफावली तर हेच अक्षम्य सदस्य उद्या तुम्हला, मला अथवा कोणालाही जे आज अस्तित्वात आहेत त्यांना निराधारपणे टारगेट करायला सहज धजावतील, ठीक आहे इतर संस्थळाचर्चेसाठी ऐसी वापरायचे नाही हे मान्य केले आहे म्हणून आता एक जिवंत उदाहरण देता नाही. पण विरोध एखादी गोष्ट निराधारपणे लादणे याला आहे आणी राहील. एखादी गोष्ट योग्य चर्चेच्यानुशंगाने अथवा साधार समोर आणावी याला काहीच हरकत नाही पण उगा हिलरी क्लिंटन माझी मैत्रीण आहे अथवा मी बिन लादेनची गर्लफ्रेंड आहे म्हणून मी हवी तेव्हडी राळ ऐतीहासीक अथवा सध्यांच्या जिवंत व्यक्तींवर उडवु शकते(शकतो) हा माज तर नक्किच विरोध करण्याजोगा मी मानतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

ओके करा विरोध.. मला हे इतकं सांगूनही त्या विरोधकांना इतका भाव देणं पटलेलं नाही पण मी ज्यांना विरोध करतो त्यांना इतक भाव देणे तुम्हाला कधी पटणार नाही असेही होऊ शकते - होईलच!

तेव्हा ज्याची त्याची लढाई .. नि लढ बाप्पु! Smile मी गप बसतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अन आपली बाजु व्यवस्थीत समजुन घ्यायला वेगळा धागाही निघालेला आवडेल.

पण इथे हेच म्हणेन भारतीय स्त्रिबाबत वेळीच यां बेसलेस व दिशाभुल करणारि विधाने लिहणार्‍याना विरोध करणे आत्यावश्यक आहे. आजरुद्दीनच्या काळातील भारतीय क्रिकेट संघाची मानसिकता बाणायचा आपला सल्ला मी धुडकावत आहे. हा सल्ला देउन आपण गप बसत आहात यावर मी आपले आभार मानणे अपेक्षित आहे काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

मी कोणता सल्ला दिलाय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपला कुठलाही सल्ला दिला नाही. हुशार लोकांसमोर बोलताना माझी नेहमी फेफे उडते याचे हे अजुन एक उदाहरण. क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

शंभरी झाल्याबद्दल एखादा सत्य नारायण घालावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि त्यात त्या नवपंचकन्यांचे फोटो लावावेत. जमल्यास बुद्ध किंवा शिवाजीमहाराजांचा फोटो असावा. सेमच सगळे असावे पण आवर्जून "सत्यनारायणासारख्या ब्राह्मणी मनुवादी विधीचा आम्ही निषेध करतो" असे सांगत रहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

डॉल्बीची भिंत माझ्यातर्फे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

क्या बात, हे राहिलंच की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जमल्यास बुद्ध किंवा शिवाजीमहाराजांचा फोटो असावा.

फोटोपेक्षा बस्ट असावा आणि कोणी पंचकन्येने पुतळ्याच्या खांद्यावर रेलावे.

http://www.lokmat.com/storypage.php?catid=10&newsid=12342107

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग तर टीआरपीचीही सोय आपसूकच झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बादवे 'सत्यनारायणाची पूजा करणे' याला सत्यनारायण 'घालणे' हा शब्दप्रयोग कसा आला असेल. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देशावर 'गोंधळ 'घालतात' म्हणून. (कोंकण, विदर्भ, मराठवाडा येथेही घालत असतील. त्यांना अनवधानाने वगळल्याबद्दल गोंधळ घालू नये.)
ऐसीवर गोंधळ घातला नव्हता. म्हणजे घालायचा राहून गेला होता. म्हणून नड होती. आता सत्यनारायणाच्या निमित्तने सणसणीत-दणदणीत गोंधळ घातल्याने सर्व काही आल्बेल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजे शतकी धागे वगैरे.. सत्यनारायण पावतोय म्हणायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जा. जा. : समरसता म्हणजे काय बुवा? कलिंगडाचा रस किंवा फॉर द्याट म्याटर आंब्याचा रस आणि कडुलिंबाचा रस समप्रमाणात एकत्र केल्यास समरसता येते/होते काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती झाली फळांची समरसता.. सामाजिक समरसता म्हंजे आधी माणसं चार वर्णात वेगळी करायची.. आणि सत्यनारायण वगैरे घातला की प्रत्येक वर्णातील थोडी थोडी एकत्र आणून त्यांचा रस काढायचा.. शिरा आणि रस!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+100

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

पाने