मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७४
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या आसपास आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----
इतरांना लिंका डकवायला विरोध न करणे म्हणजे स्वतः पिंका न डकवणे नव्हे.
मुद्दा काय आहे, कोण काय
मुद्दा काय आहे, कोण काय म्हणतंय हे काहीही समजून न घेता दिलेल्या प्रतिसादाला मी उत्तर देणार नाही.
Comprehension करिता फार क्लिष्ट असतात तुमचे मुद्दे.
उदा. पहा http://aisiakshare.com/node/5697#comment-145954
http://aisiakshare.com/node/5697#comment-145954
शिवाय मी (मुद्दाम?) समजून घेत असा तुम्ही अगोदरपासून गैरसमज करून घेता.
======================
तुम्ही माझ्या प्रतिसादाखाली दिलेला रिप्लाय मला नाही हे मला ठाउक आहे. मी देखिल उलट तसंच म्हणू शकतो का यावर केव्हाचा विचार करतोय पण ते लॉजिकली इन्कंस्टींट वाटतंय. असो.
साम्यं?
आता मला काही गोष्टींचा खुलासा हवाय, म्हणून हे थोडं जाहीर विचार करणं. प्रतिसादातल्या विस्कळीतपणाबद्दल माफ करा.
तैमूरलंगानं हल्ला केला त्या दिल्लीवर तुघलकांची सत्ता होती. सध्याचे तुघलक - मोदी - असा विचार केला तर भारत आणि इस्रायलची तुलना, अवकाश आणि काल या दोन्ही मिती एकत्र करता रास्त वाटते. म्हणजे काहीशे वर्षांपूर्वी दिल्लीत तैमूरलंगानं थैमान घातलं, त्याच दिल्लीत आता मोदी राज्य करतात. एडॉल्फनी ज्यांना त्रास दिला त्यांचे वंशज आता काही प्रमाणात इस्रायलात आहेत (रशियन, भारतीय, इत्यादी ज्यू इस्रायलमध्ये आहेतच आणि काही वंशज अमेरिका आणि अन्य जगात राहतात). पण तैमूरशी भारतीयांचं वैर असलंच तर ते काळ या मितीमध्ये बऱ्याच वेगळ्या ठिकाणी घडलं आणि एडॉल्फशी ज्यू लोकांचं वैर निराळ्या अवकाशात - निराळ्या देशातच, ठिकाणी घडलं.
Behind the Name: Meaning, origin and history of the name Adolf. From the Germanic name Adalwolf, which meant "noble wolf" from the Germanic elements adal "noble" and wulf. It was borne by several Swedish kings as a first or second name, most notably by Gustav II Adolf in the 17th century. (संदर्भ)
तर इस्रायली लोकांनी जर्मन भाषा आणि तिथल्या ख्रिश्चन राज्यकर्त्यांचा इतिहास कधीच आपलासा मानलेला नाही. भारताचं मात्र असं नाही. अगदी पंतप्रधानांची तुलनाही परदेशी वंशाच्या राजांशी होते; अकबराच्या कलासक्ततेबद्दल भारतीय प्रेमानं बोलतात. तुर्की, अफगाणी वंशांपर्यंत मुळं शोधता येतील असे लोक भारतात गुण्यागोविंदानं राहतात. तर ये बात हजम नहीं हुई!
शिवाय मोदी तुघलक नसतील तर मग तुलना कशाच्या आधारावर होत्ये, हे समजून घेणं आणखी कठीण जातंय. मदत कराल का?
तर इस्रायली लोकांनी जर्मन
तर इस्रायली लोकांनी जर्मन भाषा आणि तिथल्या ख्रिश्चन राज्यकर्त्यांचा इतिहास कधीच आपलासा मानलेला नाही
आम्हीतरी नाही मानला अफगणीस्तान आणि तुर्कस्थान चा इतिहास आपला वगैरे. तुम्ही तो तुमचाच इतिहास असल्यासारखे डीफेड करत असलात तर ते तुम्हाला शोभेसे आहे.
इतके वर्ष भारतालल्या वाळवंटी लोकांनी सुद्धा शक्यतो तैमुर, औरंगजेब, बाबर वगैरे नावे ठेवण्याचे टाळले होते.
तैमूरशी भारतीयांचं वैर असलंच तर ते काळ या मितीमध्ये बऱ्याच वेगळ्या ठिकाणी घडलं
नशिबच की तैमुरचे भारतियांशी ( म्हणजे खरे तर हिंदुंशी ) वैर होते हे तरी मुख्याध्यापक बाईना मान्य आहे. मला तर वाटले होते की तैमुर कीती संत माणुस होता असा तास बाई घेणार.
बॅटोबा - ७००-८०० वर्षापूर्वी ज्यानी लाखो लोकांची मुंडकी कापुन त्याच्या टेकड्या बनवल्या ते आता फार जुने झाले म्हणुन सोडुन द्यायला पाहिजे.
नशिबच की तैमुरचे भारतियांशी (
नशिबच की तैमुरचे भारतियांशी ( म्हणजे खरे तर हिंदुंशी ) वैर होते हे तरी मुख्याध्यापक बाईना मान्य आहे.
धन्यवाद.
बाकी सैफ आणि करीनाच्या ह्या आचरटपणाबद्दल ते बिचारं पोरगं आयुष्यभर (त्याला नांव बदलायचा चान्स मिळेपर्यंत) लोकांचे जोडे खाणार आहे.
तो जितक्या लवकर सज्ञान होऊन आपल्या आईबापाला जाब विचारेल तो सुदिन!!!
बॅटोबा - ७००-८०० वर्षापूर्वी
बॅटोबा - ७००-८०० वर्षापूर्वी ज्यानी लाखो लोकांची मुंडकी कापुन त्याच्या टेकड्या बनवल्या ते आता फार जुने झाले म्हणुन सोडुन द्यायला पाहिजे.
आंगाश्शी. या न्यायाने दोनेकशे वर्षांपूर्वीच्या पेशवाईचे संदर्भ सिलेक्टिव्हली काढून लाज वाटावी असे प्रयत्न होत असतात त्यांची काय वाट? ते बरं चालतं?
मुळात इस्राएलमध्ये अडॉल्फ का असावेत?
बोले तो, हिटलरचे एक सोडा, परंतु हिटलरपूर्व किंवा हिटलरच्या बापाच्या समकालीन युरोपीय/अश्कनाझी ज्यूंमध्ये आपल्या मुलाचे नाव सामान्यत: 'अडॉल्फ' असे ठेवण्याची प्रथा कितपत होती? (सेफार्दी ज्यू तसेच भारत/इथियोपिया/येमेन/इराण आदि राष्ट्रांतून इस्राएलला स्थलांतरित झालेले ज्यू किंवा ओटोमन काळापासून प्यालेष्टाइनमध्येच वास्तव्यास असलेले 'भूमिपुत्र' ज्यू यांचा तूर्तास विचार केलेला नाही, परंतु त्यांच्यातही मुलास 'अडॉल्फ' असे नाव ठेवण्याची प्रथा असण्याबद्दल, आपण ऐकले असल्यास कल्पना नाही, परंतु निदान मी तरी ऐकलेले नाही. आणि, हि.पू. काळातसुद्धा अश्कनाझी ज्यूंमध्ये 'अडॉल्फ' हे मुलास देण्याचे नाव म्हणून रूढ असल्याबद्दल ऐकण्यात आलेले नाही. म्हणजे, तो विकल्प अर्थात असावाच, परंतु त्या विकल्पाचा फायदा बहुधा कोणी घेत नसावे. असो.)
तर सांगण्याचा मुद्दा, मुळात आडातच नाही, तिथे पोहऱ्यात कुठून येणार?
(उलटपक्षी, इस्राएलमध्ये 'अडॉल्फ' हे नाव प्रचलित व्हावयास पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. कारण, 'अगर शिवाजी१ ना होते तो सुनति होती सब की'च्या चालीवर, 'अगर हिटलर ना होते तो ना होता इस्राइल'. बोले तो, प्यालेष्टाइनमध्ये ज्यूराष्ट्र स्थापन करण्याची (युरोपीय) ज्यूंची मागणी तशी बरीच जुनी, हिटलरच्या बऱ्याच आधीची आणि हिटलरच्या कृत्यांशी काहीही संबंध नसलेली आहे. परंतु तिला आंतरराष्ट्रीय बाजारात कोणीही भीक घालत नव्हते. पण हिटलरनंतर तिचा भाव वधारून मग इस्राएलची स्थापना होण्यास पाठिंबा मिळणे शक्य झाले. यास्तव वस्तुत: इस्राएली राष्ट्राने हिटलरास कृतज्ञतापूर्वक राष्ट्रपिता म्हणून घोषित केले पाहिजे, नि प्रत्येक राष्ट्राभिमानी इस्राएलीने आपल्या एका तरी मुलाचे नाव 'अडॉल्फ' असे अभिमानपूर्वक ठेवले पाहिजे. पण लक्षात कोण घेतो?)
..........
१ यांचे नाव उत्तर हिंदुस्थानात किती जणांना दिले जात असावे हा एक संशोधनाचा विषय ठरावा. (नाही म्हणायला मिंटो ब्रिजचे नाव बदलून शिवाजी ब्रिज केले खरे.) असो.
अवांतर
यावरून वाचलेला एक विनोदः
(In German)
A man goes to the municipal building and speaks to a clerk. He says that he's been living with a shameful name for too long, and he's finally had too much so he wants his name legally changed immediately.
The clerk looks at him in shock and asks, "What on earth could your name be to cause you to act this way?" To which the man answers, "My name is Adolf Fuckhead."
The clerk draws back and says, "Ah, I see what you mean, Herr Fuckhead. What shall your new first name be?"
तुमचा वाद काही मिटायचा नाही
तुमचा वाद काही मिटायचा नाही बहुतेक.
स्त्रिभृणहत्या नको कारण निसर्ग जो काही जुगार खेळतो त्यात ढवळाढवळ नको. दहा पंधरा वर्षांनी संतुलन बिघडलेलं दिसेल.
#नावातली गम्मत:- शारुखच्या एका एका कुत्र्याचं नाव एमिर आहे. अमिरच्या वाड्यात एका कुत्र्याचं नाव शारुख आहे यावर त्याला विचारलं तर त्याने सांगितले कुत्रा माझा नाही ,माझ्या आचाय्राचा आहे त्याला विचारा.ही श्टोरी सिनेब्लिट्झ अंकातली वाचलेली.
# आमच्याकडे येणाय्रा प्लंबरचं नाव ज्ञानेश्वर आहे.सटीप काम करतो.
# एका xxx yyy नावाच्या चोराला पकडल्याची बातमी आमच्या सहकाय्रांनी मुद्दामहून सायबाला वाचून दाखवली कारण सायबाचे तेच नाव होतं. "ह्या आमचो गावचो नाय , तो पलिकडचो!" - सायेब.
धाब्याची घरं
माझ्या आजोबांनी बांधलेले घर धाब्याचे होते. ते मी पाहिलेले आहे. ते घर 'धाब्याचे' असणे याबद्दलचे माझे आकलन सांगतो.
१. धाबे म्हणजे स्लॅब, वर थत्ते काकांनी म्हटले आहे तसे आडवे, गच्चीसारखे. माझ्यामते पूर्वी खेड्यात घर बांधत असतांना, बांधणार्याच्या बजेट नुसार घरांवर धाबे असावे, पत्रे आणि कौलं असावीत का नुसती कौलं किंवा पत्रे असावीत हे ठरत असावे.
२. हे धाबे बल्ल्या, फळ्या आणि माती या तीन गोष्टींनी बांधत असावेत. आमच्या घरातला जो समोरचा मोठा हॉल होता त्यात त्या धाब्याला आधार द्यायला ४ खांब होते हेही आठवतेय.
३. भिंती बांधून झाल्यावर त्यावर आडव्या बल्ल्या (उभे रोवलेले तासलेले खोड म्हणजे खांब आणि आडवे लावलेले ती बल्ली असे) टाकुन मग त्यावर फळ्यांचे छत बनवले जात असावे.
४. त्या छतावर माझ्यामते गोणपाट किंवा कोणतेतरी कापड अंथरले जात असावे अन मग त्यावर मातीचा मोठा थर टाकला जात असावा.
५. त्या मातीच्या थरावर कसलासा गिलावाही होता असे अंधुक आठवतेय. कदाचित ते शेणाने सारावलेलेही असावे.
६. पावसाचे पाणी त्या गिलाव्यावरून वाहून पन्हाळ्यातून खाली पडे. माझ्या अंदाजे वाहणारे पाणी ढाब्यात फार किंवा काहीच जिरत नसावे.
७. छताच्या फळ्या, बल्ल्या आणि खांब कसल्याश्या पॉलिशने रंगवलेले होते.
या धाब्यावर आदळआपट केली, पाय आपटून चालले किंवा मुलांनी उड्या मारल्या की ती खरेच दणाणत असे. कधीकधी फळ्यांच्यामधून मातीही निसटून पडे. छतावर होणाऱ्या आवाजाची तक्रार 'का उड्या मारता रे पोरांनो, माती पडतीये ना!' अशी होत असे. ती तक्रार करणारी माणसं पुढं शहरात येऊन सिमेंटच्या स्लॅबच्या घरात राहायला लागली तरी अगदी त्याच शब्दात करत, आणि ते घर न पाहिलेल्या तुलनेने लहान असलेल्या चुलत-मावस भावंडांना 'हि माती म्हणजे नेमकी कशी पडतीये' हे कोडे काही सुटत नसे.
हे धाबे घरातुन अगदिच नाही पण साधारण असे दिसे.

पण ते चित्र कडेपाट छपराचं
पण ते चित्र कडेपाट छपराचं (सिलिंग) आहे, यावर गच्ची नसणार. माडी असेल.
अगदी निव्वळ धाब्याचं ( आणि स्वस्तातलं)-
चार भिंती वर आणून त्यावर थोडी मोठी लाकडं एक फुटभर अंतर ठेवून बसवायची,
त्यावर तुरकाट्या आडव्या आणि जवळजवळ थर द्यायचा,
यावर गाळाचा,पांढय्रा मातीचा चिखल ओतायचा.,
धोपटून घट्ट करायचं. यावरचं पावसाचं पाणी खाली झिरपत नाही.वरती उन्हाळ्यात सांडगे पापड वाळवतात. मुलं नाचली तर धाबं दणाणतं,खाली माती पडते.
/* तुरकाट्या = तुरीच्या शेंगा काढून झाल्यावर वाळलेली झाडं.
माझ्या एका तेलुगु
माझ्या एका तेलुगु मैत्रिणीच्या मुलाचे नाव ज्ञानदेव होते. पालक किती प्रेमाने अशी नावे ठेवतात. प्रत्येकालाच वाटते आपले मूल भाग्यवान, बुद्धीमान, राजस व्हावे. त्याचे सर्व चांगले व्हावे :)
मला मात्र त्या नावाचे (मनातल्या मनात) हसू येई :(. आय मीन आपण शहरी मराठी लोक ज्ञानेश्वर वगैरे नावे फारसे ठेवत नाही म्हणुन . पण आहे छान नाव.
.
बाकी लाँड्रीला ते नाव :)
भयानक आहे.
मासे खरच आत्महत्या करतात, त्यांना मानसिक ट्रॉमा होतो असे या लेखावरुन दिसते. :( :(
http://www.ecowatch.com/sea-shepherd-captive-dolphins-2159549466.html
.
खरच वॉटरपार्क्सवरती काहीतरी निर्बंध हवेत.
कोण कोणास म्हणाले?
In reply to दोन दिवसांच्या बाळाला कर्करोग by अजो१२३
मुद्दा काय आहे, कोण काय म्हणतंय हे काहीही समजून न घेता दिलेल्या प्रतिसादाला मी उत्तर देणार नाही. फक्त श्रेणी देऊन काम भागलं असतं, पण 'परत आल्या-आल्या अजोंना निरर्थक श्रेणी मिळायला लागल्या आहेत' अशी तक्रार वाचली म्हणून मुद्दाम प्रतिसाद. माझा हा प्रतिसाद अजोंच्या प्रतिसादाखाली असला तरीही तो अजोंसाठी नाही.