बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- कै. मा.श्री. रिसबूड

सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही? या कै. मा.श्री. रिसबूड यांच्या पुस्तकातील प्रकरण. हे प्रकरण टाकावे कि नाही? याबाबत रिसबूड साशंक होते. अंनिस यावर काय विचार करेल असाही मुद्दा होता. पण मी हे प्रकरण पुस्तकात असावे याबद्दल आग्रही होतो. त्यानुसार त्यांनी हे प्रकरण पुस्तकाच्या शेवटी समाविष्ट केले.

बुद्धिवादाचा एक पंथ होऊ नये
-मा.श्री रिसबूड
भूत-भावी घटना प्रत्यक्ष जाणणे या संदर्भात मी मांडलेले विचार व दुसरेही काही विचार कदाचित काही बुद्धिवादी मंडळींना पटणार नाहीत.माणसाचा स्वभाव असा आहे की तो एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला बांधली जाते.मग तो दुसया तहेच्या प्रतिपादनाचा विचार अलिप्तपते करू शकत नाही. निदान बुद्धिवादी मंडळींचा तरी असा कर्मठ पंथ बनू नये असे मला वाटते.मी है। का म्हणतो ते सांगण्यासाठी पुढील उदाहरणे देतो :
‘विश्वाचा गाडा आपोआप आपल्या नियमानुसार चाललेला आहे, त्याच्यामागे कसलीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही.'
‘स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदूत आहे, अन्यत्र स्मृती असू शकत नाही.'
वरील दोन्ही विधाने बुद्धिवादी मंडळी अनेकदा करतात.मी श्रद्धाळू वगैरे नसलो तरी मला ही विधाने पटत नाहीत.का पटत नाहीत ते सांगतो.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जडवाद' या पुस्तकाचा संदर्भ मी घेत आहे. पृष्ठ ३२ वर त्यांनी असे प्रतिपादन केले आहे की, अचेतन व अजीव द्रव्यातून जाणीवयुक्त सचेतन पिंड निर्माण होतो.द्रव्यात प्रथम जीव निर्माण होतो आणि नंतर जाणीव निर्माण होते.पृष्ठ ६३ वर ते म्हणतात की, ‘विश्वाच्या गतिस्थितीला परमात्म्याची गरज नाही. कारण प्राण्याच्या व मनुष्याच्या देहात पृथक् चैतन्य वस्तू आहे याला कोणतेच प्रमाण उपलब्ध होत नाही.या चैतन्य वस्तूवरूनच विश्वचैतन्याची ‘उत्पत्ति' होते. (उत्पत्तीऐवजी ‘कल्पना उत्पन्न वाचावे असे शुद्धिपत्रात म्हटले आहे)
अणूंच्या गर्भात चेतना तर असतेच म्हणून त्यांना अचेतन म्हणता येत नाही. अणू अजीव, जाणीवविरहित असतात इतके खरे. सृष्टीच्या नियमानुसार अणूंचे मॉलीक्यूल बनतात व हे मॉलीक्यूल विशिष्ट तहेने एकत्र जमले की तिथे तत्पूर्वी नसलेला जीव निर्माण होतो. शास्त्रीबुवांचे प्रतिपादन असे आहे की, जीवसृष्टीची पुढची पायरी म्हणजे चेतन सृष्टी. चेतन म्हणजे जिच्या ठिकाणी बुद्धी किंवा जाणीव आहे अशी सृष्टी. (जाणीव हा शब्द महत्त्वाचा आहे) जीव व नंतर जाणीव निर्माण होण्याची क्रिया सृष्टिनियमानुसार आपोआप होते असे त्यांचे म्हणणे आहे. हा त्यांचा युक्तिवाद आपण पुढे नेऊ.
गर्भाशयात असलेली एक सजीव पेशी. ती दुस-या एका पेशीशी संयोग पावते व मग तिचे विभाजन सुरू होते.एकाचे दोन,दोनाचे चार असे होता-होता लाखो पेशी --सर्व अगदी एकसारख्या - जमून एक पुंज तयार होतो. या पुंजात जीव आहे पण जाणीव नाही असे समजायचे.
लवकरच मग असा एक क्षण येतो की त्या क्षणी त्या पुंजातली कुठली तरी एक पेशी ठरवते की मी डोळा हे इंद्रिय बनवणार. हे तिला आपोआपच निसर्गनियमानुसार समजते ! मग ती पेशी दुभंगते व तिची दोन अधुके-दोन्ही एकसारखीच होतात.त्यांतल्या एका अर्धकाला कळते की आपल्याला डावा डोळा व्हायचे आहे. दुस-याला कळते की आपल्याला उजवा डोळा व्हायचे आहे. मग त्या पुंजात कशी कोण जाणे,पण एक मध्यरेषा ठरवण्यात येते व त्या रेषेच्या डावीकडे एक अधुक सरकू लागते व उजवीकडे दुसरे अर्धक सरकू लागते. हेसुद्धा
आपोआप होत असते ! त्या दोन अर्धकांना हे ठाऊक असते की त्या काल्पनिक मध्यरेषेपासून किती दूर जाऊन थांबायचे. त्याप्रमाणे ती थांबतात.यामुळे चेहरयावरची सिमेट्री साधणार आहे हे त्यांना ठाऊक असते - आपोआपच ठाऊक असते. कारण तिथे जाणीव नाही !
मूत्रपिंड, कान, फुफ्फुसे, किडन्या, वृषण, हात, पाय हे सगळे जोडीजोडीचे अवयव बनवणाच्या पेशी याप्रमाणेच आपल्या कार्याला प्रारंभ करतात. या सर्वांना डावी बाजू कोणती व उजवी बाजू कोणती याचे भान असते आणि त्याबरोबरच सिमेट्रीचेही भान असते. हे भान त्यांना आपोआप येते. जाणिवेचा इथे काही संबंध नाही ! सृष्टिनियमानुसार ही सर्व मांडणी आपोआप होते. प्रत्येक अवयवाच्या पेशीच्या अर्धकांचा एकमेकांत काहीही संपर्क नसता त्यांना सिमेट्रिकल मांडणी कशा तहेने होईल हे आपोआप समजत असते ! कसलीही जाणीव नसताना हे आपोआप समजते ! |
एक डोळा' नावाचे इंद्रिय. त्याच्या घडणीसाठी शेकडो प्रकारच्या पेशी लाखांनी बनवायच्या;त्या योग्य जागी बसवायच्या,सप्त रंगांच्या तरंगांची लांबी ओळखू शकणारे शंकू व शलाका लाखावारी बनवून त्यांची व्यवस्थित मांडणी रेटिनावर करायची ही कामे करण्यासाठी लागणारे आराखडे डोळा बनू पाहणा-या पेशीच्या जीन्समध्ये आलेले असतात. संपूर्ण मनुष्यदेह बनवण्यासाठी लागणारे अब्जावधी आराखडे गर्भाशयातल्या फलित पेशीच्या क्रोमोझोम्सवर असतात, पण त्यांतून डोळ्यांसाठी आवश्यक तेवढेच आराखडे सॉर्ट करून डोळा-पेशीमध्ये घालण्याचे ज्ञान किंवा जाणीव कुठे वावरत असते ? डावा डोळा व उजवा डोळा यांची रचना एकसारखीच असते पण मांडणी कशी आरशातल्या प्रतिबिंबासारखी असते. ही अशी मांडणी करण्याचे भान नेमके कुठे असते ? सिमेट्री राखण्याची जाणीव कोण सांभाळते ? या सगळ्या अॅब्स्टरॅक्ट आयडियाज जर जीन्स सांभाळत असतील तर त्यांच्यात 'जाणीव' नाही हे कसे म्हणता येईल? जाणीव काय किंवा स्मृती काय,एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गर्भस्थ पेशीपुंजात या दोन्ही गोष्टी नाहीत, सर्व काही आपोआप होते या म्हणण्याचा अर्थ तरी काय?
‘आपोआप सर्व काही घडते हे उत्तर ज्योतिषी लोकांच्या सोयीचे आहे. शनीची पीडा कशामुळे होते ? तर ती आपोआप सृष्टीच्या नियमानुसार होते, असे उत्तर ते देतील तर तेही आता मान्य करावे लागेल !
सजीव पिंडाची वाढ पूर्ण होत आली की तिथे जाणीव आपोआपच निर्माण होते. असे शास्त्रीबुवा म्हणतात. पण पृष्ठ ५६ वर त्यांनी दुसरा सिद्धान्त सांगितला आहे तो असा की, संपूर्ण अभावातून सत् वस्तू उद्भवत नाही.एक सत् वस्तू दुसया कोणत्या तरी सत् वस्तूचीच बनलेली असते.
असे जर आहे तर मूळच्या मॉलिक्यूलमध्ये जीव नव्हता, तो नंतर निर्माण झाला किंवा मूळच्या पेशी-पुंजांत जाणीव नव्हती,ती नंतर निर्माण झाली हे म्हणताना तो जीव किंवा जाणीव कोणत्या सत् वस्तूतून निर्माण झाली हे नेमकेपणाने सांगायला हवे. जिवाचा आणि जाणिवेचा मूलस्रोत कोणता? या सत् वस्तू आपोआप सृष्टिनियमानुसार निर्माण होतात' हे या प्रश्नाचे उत्तर नव्हे. एका पेशीपासून प्रारंभ करून संपूर्ण मनुष्यदेह बनवण्याच्या प्रक्रियेत जाणीव या चीजेचा काहीही संबंध नाही.सर्व काही आपोआप होते हे म्हणणे म्हणजे एकतर्हे चा सांप्रदायिक
आग्रह आहे असे म्हणण्यावाचून पर्याय नाही.
माझे म्हणणे असे की, प्रत्येक वेळी अशी न पटणारी उत्तरे देत बसण्यापेक्षा, एकदाच हे मान्य करावे की जाणीव ही एक विश्वव्यापी सत्ता असून तिचा अंश सजीवात असतो.या सत्तेला मी ईश्वर,आत्मा वगैरे कसलेच नाव देत नाही.निसर्गातलीच ती एक एंटिटी आहे,बस्स,एवढेच !
दुसरी गोष्ट म्हणजे जिथे जाणीव आहे तिथे स्मृतीही आहेच म्हणून स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदू, हे अव्याप्तीचा दोष असलेले विधान ठरते असे माझे म्हणणे आहे. ।
भूत-भविष्य जाणणे कुणालाही शक्य झालेले नाही व होणार नाही असे विधान मी करणार नाही. अमुक गृहस्थ भूत-भविष्य जाणतात असा बोलबाला आपण पुष्कळदा ऐकतो.मी अशा तीन व्यक्तींची परीक्षा घेतली.एकालाही माझे भूत-भविष्य जाणता आले नाही.(जन्मकुंडलीचा संबंध यात खरोखरी काहीच नसतो, पण तसा थोडासा देखावा हे लोक करतात) माझा हा अनुभव माझ्यापुरता खरा आहे. दुस-या कुणाला निराळा अनुभव आला नसेलच हे मी कशावरून ठरवायचे?
जरी भूत-भविष्य जाणण्याची क्षमता कुठे, कुणात असलीच तरी ती त्या व्यक्तीपुरती असणार. त्या क्षमतेचे शास्त्र बनवून त्याचा प्रसार करणे शक्य नाही - जसा फलज्योतिषाचा प्रसार होत आहे. माझे उद्दिष्ट फलज्योतिषाचे अंतरंग एक्स्पोज करणे एवढेच आहे. भविष्य ‘जाणणायाला’ फलज्योतिषाची किंवा दुस-या कुठल्याच शास्त्राची गरज असू नये हा मुद्दा ध्यानात असू द्यावा.
-------------------------------------------------------------------------------------------------------

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कै.माधव रिसबूड एक कठोर फलज्योतिष चिकित्सक इथे त्यांच्या विषयी माहिती मिळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हे पुस्तक सप्टे १९९१ मधे प्रकाशित झाले आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

श्री कर्वे यांनी खरोखर माझा चेहरा पाहून माझी कुंडली तोंडपाठ तंतोतंत म्हणुन दाखवली होती.
माझ्या आजोबांनी (हौशी ज्योतिष) सांगीतलेले होते की हिचे आरोग्य ठणठणीत राहील. पण मला हे नक्की माहीत आहे ती त्यांची इच्छा होती. त्यांना नक्की कळले होते की माझ्या मागे बरेच आजार लागणार.
अजुन एक पु ना ओकांकडे एकदा कुंडली पाठवलेली असता त्यांनी सांगीतले की आरोग्याच्या अडचणी संभवतात.
एकाजणांना हात दाखवला असता ते म्हणाले होते की बरेच ड्रग्स घेणार तू (औषधे असतील की मादक द्रव्य ते त्यांना माहीत नव्हते) खरोखर मी ७-८ गोंळ्यांचे कॉकटेल रोज घेते.
_________________
आता मी पहाते तेव्हा सहाव्या घरात चार चार ग्रहांचे स्टेलिअम पाहून मला इतके कळते की सहावे घर हे रोगस्थान आहे व माझ्या नशीबाचा या जन्मी तिथे काहीतरी रोल आहे.
______________
आणि म्हणुनच मी म्हणते की मला ज्योतिषाचा कंटाळा आलेला आहे पण मी असे म्हणत नाही की ते फोल आहे. कंटाळा खरच आलेला आहे. बाकी ते कालसर्प योग , मंगळ वगैरे माहीत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

पुण्यातही ते होते का? शनिवार पेठेत चेहरा पाहून कुंडली सांगणारे? रिसबुड गेले होते त्यांच्या कडे. पण तो एक ठोकताळा होता असे त्यांच्या लक्षात आले. रिसबूडांची कुंडली ते मांडू शकले नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

चेहऱ्यावरून कुंडली मांडणे ही एक विद्या आहे. कर्नाटकांत बरेच आहेत असे म्हणतात. यांचे भविष्य मात्र बरोबर येतेच असे नाही.
काही ज्योतिषी फक्त मृत्यू सांगतात अचूक. पण ही मंत्रविद्या दु:खदायक उपलब्धि आहे.
गोचरी ग्रहावरून भविष्य आगामी एकदोन वर्षाचे सांगणारे मात्र खूप डिमांडमध्ये असतात कायम.
गायत्रीमंत्रसिद्ध ज्योतिषांकडे गुजराती व्यापारी लोकांचा फारच ओढा असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय प्रघा हेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

अन्य ठिकाणी दिलेली प्रतिक्रियाच इथे पुन्हा व्यक्त करतो.

एका पेशीला सजीवपणाची जाणीव नसते. पण अशा लाखो पेशी एकत्र आल्या की त्यांत जाणीवेचा अंश निर्माण होतो. हेच तत्व, अनेक प्रकारच्या संघटना, सेना, ब्रिगेडी काढणार्‍यांना माहीत असते का ? कारण एकत्र आल्यावरच, त्यांचे उपद्रवमूल्य वाढते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

श्री कर्वे - कुर्ला इथले?
लेख वाचला पण नक्की काय म्हणायचे आहे ते उमजत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय कुर्लावालेच.
ते एकदा इथे अमेरीकेत आले होते. तेव्हा माझ्या एका सहकारी परिचित स्त्रीच्या घरी उतरले होते त्यामुळे भेट घेता आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

लेख अतिशय आवडला. व्यक्ति आणि समूह यांचे जे नाते आहे तेच पेशी आणि पेशीपुंज यांचे असावे. व्यक्ति म्हणून एकलपणाने वावरतानाचे नियम वेगळे, वर्तन वेगळे, विचारप्रक्रिया वेगळी आणि समूहाने जगतानाची मानसिकता वेगळी. एकाच वेळी ही दोन्ही बले किंवा अशी अनेक बले कार्यरत असताना नक्की कोणती प्रेरणा वरचढ ठरते किंवा व्यक्तिगत आणि समूहगत अशा दोन्ही प्रेरणांपेक्षा एक वेगळीच प्रेरणा जागृत होते हे पाहाणे रोचक असावे.
(जमल्यास क्रमश: )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुस्तक वाचण्यासाठी इथे उपलब्ध केले आहे

सहज समजेल फलज्योतिष काय आहे... by on Scribd

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

लेखात शब्द मोघमपणे वापरून युक्तिवाद घसरलेला आहे. उदाहरणार्थ :

"या सगळ्या अॅब्स्टरॅक्ट आयडियाज जर जीन्स सांभाळत असतील तर त्यांच्यात 'जाणीव' नाही हे कसे म्हणता येईल? जाणीव काय किंवा स्मृती काय,एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत."

"जाणीव" आणि "स्मृती" हे शब्द लोक सामान्यपणे वापरतात, तेव्हा त्यांचा रोख "आपल्या मनात काय चालू आहे" असा असतो. पण लेखक म्हणतात जनुकांची रचना आणि पेशींची रचना समांतर असल्यास त्या समांतर असण्यालाही "जाणीव" म्हणावे. हे अर्थाचे वलय नेहमीपेक्षा वाढवलेले आहे. शब्दार्थ बदलले तर चालते, पण मग त्याच संवादात आदला-नवीन अर्थ असे मागे पुढे न-घसरण्याची काळजी घ्यावी लागते. नाहीतर युक्तिवाद बेमालूमपणे तर्कदुष्ट होतो, कारण अर्थ नवा की जुना या गोंधळात लेखकाला आणि वाचकाला तर्कातला दोष जाणवत नाही. जुन्या व्याख्येत असलेले गुण (मनुष्यांच्या मनातल्या घडामोडींचे गुण), नव्या व्याख्येत येणाऱ्या वस्तूंना (जनुकांपासून पेशी घडण्याच्या प्रक्रियांना) लागू असतील असे मानता येत नाही. तोच "जाणीव" शब्द, तोच "स्मृती" शब्द वापरला म्हणून आपल्या मनाचे अमुकतमुक गुण जनुकांत आहेत, असे स्पष्ट असल्यासारखे वाटून युक्तिवाद पुढे दामटताही हेत नाही.

व्याख्या-वगैरे पेक्षा हा वेगळा मुद्दा.

सारांश करताना लेखक व्यवहारात जरुरीचा तरतमभाव दाखवत नाही.

जरी भूत-भविष्य जाणण्याची क्षमता कुठे, कुणात असलीच तरी ती त्या व्यक्तीपुरती असणार. त्या क्षमतेचे शास्त्र बनवून त्याचा प्रसार करणे शक्य नाही

हे धोरण ठीक वाटत नाही. टप्पा खाणारा चेंडू, किंवा आकाशातील ग्रह भूतकाळात कुठे होता त्याचा ठिकाणा, भविष्यकाळात कुठे असणार त्याचे भाकित भौतिकशास्त्र अचूकपणे करते, ते व्यक्तीपुरते नसते. अशा अभ्यासाच्या क्षेत्रा-क्षेत्राची उदाहरणे आपण घेऊ शकतो. पार मनुष्यांच्या व्यवहाराच्या संभवनीयतेबद्दल आरोग्यशास्त्र आणि मानससास्त्र सुयोग्य वर्णन करते.
लेखक या युक्तिवादाचे फलित म्हणून ज्योतिषाच्या प्रसाराचा विरोध करतात : "शक्य नाही - जसा फलज्योतिषाचा प्रसार होत आहे". पण विरोध करताना "भूत-भविष्य जाणण्याची क्षमता असणारे कुठलेच शास्त्र शक्य नाही" असे नष्टविवेक धोरण चालणार नाही.

शास्त्रे भूतकाळाचे तपासण्या येण्याजोगे वर्णन आणि भविष्याची तपासण्यायोग्य भाकिते करतात. तपासून दिसू शकते की शास्त्रे कमीअधिक कार्यक्षमतेची असतात. त्यांची उतरंड लावता येते. त्यातल्या त्यात अधिक खात्रीलायक शास्त्रांकडून जी भाकिते मिळतात, त्या भाकितांचा आधार घेऊन रोजचा व्यवहार करण्यात फायदा असतो.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिला मुद्दा अगदी मान्यच आहे. असा गोंधळ या प्रकारच्या विवेचनांमधे वाचकांच्या मनात होत असतो
दुसरा मुद्दयाचा मतितार्थ असा कि फलज्योतिष नावाचे तथाकथित शास्त्र व भूत भविष्य "जाणणे" या गोष्टी भिन्न आहेत. एखाद्या ने भविष्य "जाणणे" ही गोष्ट शक्यच असेल तर ती व्यक्तिसापेक्ष बाब असून ती काही फलज्योतिषाच्या आधारे नाहीये. पण असे त्या प्रकरणात प्रतिबिंबित होत नाही हे खरे. ते पुस्तक वाचल्यानंतरचा अन्वयार्थ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/