Skip to main content

ही बातमी समजली का - भाग १९७

News News News 98/365

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

----
आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

सुनील Fri, 20/12/2019 - 11:05

In reply to by चिंतातुर जंतू

"संस्कृत शिकणेपासूनचे फायदे" ह्या विषयावर एक पुस्तिका (रेडी रेकनर) काढायला हवी सरकारने. तूर्तास सगळी विचारमौक्तिके विखुरलेली आहेत.

चिमणराव Fri, 20/12/2019 - 16:22

In reply to by चिंतातुर जंतू

हैदराबाद घटनेच्या वेळी फ्रान्स 24 न्यूज चानेल बातम्या ऐकल्या होत्या. त्यांनी Uber ड्रायवरांविरुद्धचे किती हजारो गुन्हे आहेत ते सांगितलेले. ल्याटीन शिकून काही फायदा होईल का?

'न'वी बाजू Fri, 20/12/2019 - 23:24

In reply to by चिमणराव

ल्याटीन तितकी पावरफुल भाषा नाही. त्यामुळे, ल्याटीन शिकल्याने फ्रान्समधील बलात्कारांच्या प्रमाणावर काहीही परिणाम होणार नाही.

मात्र, ल्याटीन शिकल्याने फ्रान्समधील मधुमेह आणि रक्तदाब यांचे प्रमाण किंचित घटू शकेल, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

सामो Fri, 20/12/2019 - 23:30

In reply to by चिंतातुर जंतू

>>>> बलात्कार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा : राज्यपाल>>>>>
का तसा फायदा होउ शकतो वगैरे कारणमिमांसा नाहीच नुसतीच 'उचलली जीभ अन लावली टाळ्याला.'

चिमणराव Sat, 21/12/2019 - 07:05

In reply to by चिंतातुर जंतू

तरुणवर्गाचे लक्ष आणि शक्ती गुन्हे प्रवृत्तीपासून वळवण्यासाठी किंवा राजकारणापासून दूर नेण्यासाठी चांगल्या खेळांकडे वळवलं पाहिजे. रोम राज्य याबाबत जरा जास्तीच पुढे गेलेलं होतं म्हणे.
पूर्वी शिकार हा नाद होता .

तिरशिंगराव Fri, 20/12/2019 - 11:11

संस्कृत बोलताना जिभेचेच इतके मैथुन होते की अन्य मैथुनांचा विसर पडतो, असे काहीसे मनांत असावे त्यांच्या!

चिंतातुर जंतू Fri, 20/12/2019 - 11:14

इंटरनेट बंद करण्यात आता भारत सर्वात पुढे आहे :
India Adopts the Tactic of Authoritarians: Shutting Down the Internet

India tops the world — by far — in the number of internet shutdowns imposed by local, state and national governments. Last year, internet service was cut in India 134 times, and so far this year, 93 shutdowns have occurred, according to SFLC.in, which relies on reports from journalists, advocacy groups and citizens.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 21/12/2019 - 19:46

हरयाणा आणि मागासपणा, स्त्रीभ्रूणहत्या वगैरे गोष्टी आपल्या परिचयाच्या आहेत. आता ही गंमत -
Haryana: Parineeti Chopra dropped as ‘Beti Bachao’ ambassador? Cong questions, govt mum

Parineeti Chopra had tweeted, “It this is what’s gonna happen everytime a citizen expresses their view, forget #CAB, we should pass a bill and not call our country a democracy anymore! Beating up innocent human beings for speaking their mind? BARBARIC.”

चिमणराव Mon, 23/12/2019 - 06:35

फसल बीमा योजना
प्रधान मंत्री फसल बीमा योजना अडचणीत. एखाद्या तालुक्या,जिल्ह्यातील पीक नुकसानीत गेले तरी इतर जिल्ह्यांत उत्तम येत होते आणि विमा कंपनी/योजना याचे गणित बिघडत नव्हते. या वेळी मात्र देशभरातील सर्वच/बरेच ठिकाणचे पीक नष्ट झाले पावसाने.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 25/12/2019 - 01:09

मुकुल केसवन 'ऐसी'च्या वाचकांना माहीत असतील. त्यांच्या एका लेखाचं भाषांतर ऐसीच्या विनोद विशेषांकात प्रकाशित झालं होतं (दुवा). केसवन जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात शिकवतात. तिथल्या हिंसेबद्दल त्यांनी लिहिलेला लेख. काही उद्धृतं मला महत्त्वाची वाटलेली -

they (some students) tried to film the mayhem below as policemen surrounded the library and then attacked and evicted university students who had provoked them by studying indoors.

The police spokesperson blandly claimed that they had followed ‘miscreants’ off the main road that bisects Jamia into the campus buildings to maintain order and suppress violence. But there was no violence on the main road abutting the university. The burnt bus that was flagged as a symbol of violent protest lay kilometres away. The police made it clear that no Jamia student had been arrested for either arson or violence.

And yet this same police force managed to trash a Central university’s library to the tune of Rs 2.5 crore according to the university authorities. Nothing was spared by these violent vandals, not even a glazed display case featuring a large book about the prime minister with his face on its cover. That too was wantonly smashed. And it wasn’t just the physical violence; what the students remembered even more vividly was the verbal abuse, the obscenities, the communal rage that animated those uniformed men.

In solidarity: Jamia and the fight for India’s soul

चिंतातुर जंतू Thu, 26/12/2019 - 14:52

राज्यात स्थानबद्धता छावणी उभारण्याबाबत केंद्राचा पत्रव्यवहार

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने ९ जानेवारी २०१९ रोजी सर्व राज्यांच्या गृह विभागांच्या सचिवांना पत्र पाठवून स्थानबद्धता छावण्या उभारण्याबाबतच्या योजनेची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे ९ व १० सप्टेंबर २०१४ आणि ७ सप्टेंबर २०१८ रोजी केंद्र सरकारतर्फे राज्य सरकारशी याच संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार १६ ऑगस्ट २०१६ रोजी राज्याच्या गृहविभागाने सिडकोच्या व्यवस्थापैकीय संचालकांना पत्र पाठवून केंद्र सरकारच्या ९ जानेवारी २०१९ च्या आदेशाने राज्याच्या गृह विभागाने सिडकोकडे तात्पुरती स्थानबद्धता छावणी उभारण्याकरिता नेरुळ येथे जागा मागितली होती. त्याचबरोबर कायमस्वरूपी छावणी उभारण्यासाठी सिडकोकडे ३ एकर जागा नवी मुंबईत उपलब्ध करण्यास सांगितले होते.

चिमणराव Thu, 26/12/2019 - 20:22

सर्व पुरातत्व जागा, वारसा जागेच्या तिकिटांवर रहिवास पुरावा आवश्यक लिहिलं आहे. तिथे कधीही अमलबजावणी सुरू करतील. जे काही सामान्य लोक येतात तेही त्या ठिकाणी जाण्याचं टाळतील.

महाराष्ट्रात तर मुद्दाम विरोध होईल असं वाटतय. एकूण कठीण आहे.

'न'वी बाजू Fri, 27/12/2019 - 00:09

बातमी

आता बनारस हिंदू युनिव्हर्सिटीत ('भू'त), आयुर्वेदिक अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना भूतविद्या शिकविणार.

भूतबाधा झाल्याचा अथवा भूत पाहिल्याचा दावा करणाऱ्या मनोरुग्णांना आयुर्वेदिक उपचार कसे करावेत, याबद्दल हे प्रशिक्षण आहे, असा संबंधितांचा दावा असल्याचे कळते.

एनी टेक्स?

गवि Fri, 27/12/2019 - 00:59

In reply to by 'न'वी बाजू

भूतबाधा झाल्याचा अथवा भूत पाहिल्याचा दावा करणाऱ्या मनोरुग्णांना आयुर्वेदिक उपचार कसे करावेत,

तुम्हाला प्रत्यक्ष पाहिलेला मनुष्य सापडणे अवघडच दिसते..

'न'वी बाजू Fri, 27/12/2019 - 01:10

In reply to by गवि

... उपचारांची गरज पडते ना!

लोकांना भास होतात, मग मला पाहिल्याचा दावा करतात, मग उपचारांसाठी वैद्याकडे न्यावे लागते. अंधश्रद्धा हो सगळी!

भटक्या कुत्रा Fri, 27/12/2019 - 21:56

In reply to by 'न'वी बाजू

आयुर्वेदीच्या ८ शाखा आहेत शल्य,शालाक्य,कायचिकित्सा,कौमारभृत्य,अगदतंत्र,रसायनतंत्र,वाजीकरण,भूतविद्या.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 27/12/2019 - 08:00

In reply to by 'न'वी बाजू

... मी खगोलशास्त्रज्ञ होते तेव्हा भारतात दुचाकीचं लायसन काढायला गेले. ह्या वेळेस एजंट वगैरे भानगड नसल्यामुळे तिथल्या सरकारी अधिकाऱ्यानं 'तुझं नाव काय' ह्यापलीकडे प्रश्न विचारले. त्यात एक प्रश्न होता, मी काय करते. मी खगोलाचा उल्लेख केल्यावर मामा पेटले! कुंडली वाचायला शिकवतात का, हात बघून भविष्य सांगायला शिकवतात का, वगैरे सुरुवात केली.

मी नाही म्हणल्यावर मामांना माझी दयाच आली. तुम्हाला हे सगळं शिकवलं पाहिजे; तुम्ही नाही शिकलात तर ही भारतीय शास्त्रं कोण शिकणार; वगैरे वगैरे बरीच सहानुभूती दाखवली. अशा सगळ्या रिकाम्या लोकांना आता चिकार आनंद झाला असणार!

चिमणराव Fri, 27/12/2019 - 10:46

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लोकांच्या पोटापाण्याचे प्रश्न सोडवता येत नाहीत ते ज्ञान काय उपयोगाचं हे त्यांनी पटवलं.

मारवा Sun, 05/01/2020 - 22:04

आनंद हर्डीकरांनी फादर दिब्रीटोंना लिहीलेले पत्र रोचक आहे ते पुर्ण इथे डकवण्याचा मोह आवरत नाही. यावर फादर चे म्हणणे काय आहे ? जाणुन घेण्यास उत्सुक आहे. पुर्ण पत्र
माझे जुने स्नेही आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना सुमारे काही महिन्यांपूर्वी मी एक पत्र पाठवले होते. मी त्या पत्रात फादर दिब्रिटो यांच्या साहित्यिक वैचारिक भूमिकेबद्दल काही गंभीर प्रश्न, काही परखड आक्षेप मांडले आहेत; त्यांच्या-माझ्यातील परस्परचर्चेत मी ते यापूर्वीही अनेकदा - काही वेळा जाहीरपणेसुद्धा - मांडले आहेत. त्या प्रश्नांबद्दलची त्यांची उत्तरे समजून घ्यायला मी तयार असतानाही त्यांनी सुमारे तेरा वर्षे मला ताटकळत ठेवले. त्यामुळे नाइलाजाने आणि 'विरोधकांशी वाद-प्रतिवाद-संवाद करायला मी तयार आहे,' अशा खुद्द फादर दिब्रिटो यांनीच दिलेल्या जाहीर आश्वासनाचा आधार घेऊन मी ते पत्र जसेच्या तसे आपल्यासमोर ठेवतो आहे. समाजमाध्यमांवर हे पत्र यापूर्वीच बर्‍यापैकी प्रसारित झाले असले, तरी खुद्द फादरनी किंवा त्यांच्या विरोधात टोकाची अतिरेकी भूमिका घेणार्‍या विघ्नसंतोषी अनामिक गटांचा 'यथेच्छ समाचार' घेणार्‍या आघाडीच्या प्रसारमाध्यमांनीही त्याची दखल घेतलेली नाही. म्हणूनच दै. 'मुंबई तरुण भारत'च्या सहकार्याने मी आता आपल्यापर्यंत ते पत्र पोचवतो आहे. कुणाला माझ्या या कळकळीच्या आवाहनात आव्हान दडले आहे, असे वाटले तर नाइलाज आहे. आपल्या या संदर्भातील प्रतिक्रिया समजल्या, त्या निमित्ताने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या संदर्भातील हा तिसरा पक्ष थोड्याफार प्रमाणात तरी चर्चिला गेला, तर समाजाला आवश्यक अशी थोडीफार वैचारिक घुसळण होऊ शकेल, अशी माझी माफक अपेक्षा आहे.

 
 

प्रिय मित्रवर्य फादर फ्रान्सिस दिब्रिटो,

 

सस्नेह नमस्कार...

 
आज मुद्दाम हे पत्र पाठवतो आहे.

तसे पाहिले, तर ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून आपली महामंडळातर्फे बिनविरोध निवड झाल्यानंतर आपण दोघे परस्परांना भेटलो आहोत. पुण्यात 'मसाप'तर्फे आपला सत्कार होता. त्या दिवशी 'राजहंस'च्या कार्यालयात दिलीप माजगावकरांना आपण आवर्जून भेटायला आला होतात. त्यावेळी आपली थोडीफार अनौपचारिक चर्चासुद्धा झाली. तथापि तेवढ्याने माझे समाधान झाले नाही म्हणून हे पत्र. आता आपण विविध ठिकाणच्या सत्कार-सोहळ्यांमध्ये किंवा वार्तालाप-कार्यक्रमांमध्ये दंग राहणार आणि प्रत्यक्ष संमेलन होण्यापूर्वी आपल्याशी सविस्तर भेट वा चर्चा होण्याची शक्यता धूसरच राहणार, हे गृहीत धरून मी हे पत्र पाठवीत आहे.

 

आपल्या अध्यक्षतेखालील संमेलन उधळू पाहणार्‍या किंवा आयोजकांना हिंसाचाराच्या धमक्या देणार्‍या गटाचा मी प्रतिनिधी नाही, हे आपण जाणता. 'संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची, 'पोप दुसरे जॉन पॉल : जीवनगाथा', 'सृजनाचा मळा' या आपल्या पुस्तकांच्या निर्मितीत थोडाफार संपादकीय भार उचलणारा मी 'सुबोध बायबल' या सांस्कृतिक सेतुबंधनाच्या 'राजहंसी' प्रकल्पात प्रदीर्घ काळ आपल्या बरोबर सहभागी झालो होतो, तो आपल्या लाघवी लेखनशैलीचा आणि स्वागतशील गुणग्राहकतेचा प्रभाव पडल्यामुळे. त्याच जोडीला आपली अध्ययनशीलता तर मला अनुकरणीयही वाटत आली आहे. त्या सार्‍याच प्रक्रियेत अकृत्रिम स्नेहाच्या धाग्यांनी आपल्यातल्या वैचारिक मतभेदांवर केव्हाही मात केली. उत्तर भारताच्या तीर्थयात्रेत हरिद्वारला असताना आपण माझ्यासाठी प्रभू येशूकडे प्रार्थना केली होती आणि एक जपाची माळही मला आणून दिली होतीत. ही आपली स्नेहभरली आठवण आज मुद्दाम करून द्यावी, असे एवढ्याचसाठी वाटते की, आपल्या वैचारिक भूमिकेबद्दल यानंतर जे मी लिहिणार आहे, ते अनुत्तरित ठेवू नये. जो वाद-प्रतिवाद-संवाद करायला तयार असल्याचे आपण ताज्या संदर्भातील विरोधकांना सांगता आहात, तो माझ्यासारख्या वैचारिक आक्षेपकाशी करायचे यापुढे तरी टाळू नये. थातुर-मातुर उत्तरे देऊन किंवा सोयीस्कर मौन बाळगून माझा अपेक्षाभंग करू नये!
 
प्रिय फादर,

एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो, वसईत आणि परिसरात पर्यावरणरक्षणासाठी आपण जो लढा दिलात, त्याबद्दल तूर्त मला काहीच म्हणायचे नाही. मात्र, त्या चळवळीत आपल्याला 'माफिया'ने त्रास दिला होता, याचे भांडवल करून आणि आपल्या प्रत्येक आक्षेपकालाही त्याच पठडीत बसवून वैचारिक-साहित्यिक क्षेत्रात विनाकारण सहानुभूती खेचून घेऊ नये. असो. 'ओअ‍ॅसिसच्या शोधात' या आपल्या पुस्तकाच्या अखेरच्या प्रकरणात (तुकोबाची माळ) आपण अमेरिकेतल्या वास्तव्यामधील एक प्रसंग वर्णन केलेला आहे.

 
दि. ६ ऑगस्ट हा दिवस 'हिरोशिमा दिन' म्हणून तिकडे साजरा केला जातो. त्या निमित्ताने एका चर्चमध्ये आयोजित केलेल्या प्रार्थना सभेत प्रवचन करताना आपण म्हणाला होतात की, “हिरोशिमावर बॉम्ब टाकण्याचे पाप अमेरिकेने केले, आता त्याच दिवसाचे निमित्त करून 'हिरोशिमा दिन' पाळला जातो आहे. हा दांभिकपणा नाही का?“ त्याबद्दल एका अमेरिकन महिलेने आपल्या वरिष्ठ धर्माधिकार्‍यांकडे लेखी तक्रार नोंदवली होती. साहजिकच आपल्याला समज दिली जाणार, अशी आपली अपेक्षा होती; पण वरिष्ठ धर्मोपदेशकांनी उलट आपल्याला शाबासकीच दिली होती. दांभिकपणाला असणारा आपला विरोध आपण किती प्रभावीपणे व्यक्त केला आहात!

 
'त्या' प्रसंगामुळे आपली जी प्रतिमा एक वाचक म्हणून माझ्या मनात निर्माण झाली, तिच्यामुळेच तर मी आपल्याशी आपल्या पुस्तकांच्या आशयाच्या संदर्भात खडाजंगी चर्चा करण्यात पुढाकार घेतला. 'राजहंस'मधील वैचारिक स्वातंत्र्य आणि दिलीप माजगावकरांनी उपलब्ध करून दिलेली संपादकीय स्वायत्तता यांच्या जोरावर तर मी अनेक वेळा ख्रिस्ती धर्मशास्त्रापासून आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत विविध विषयांवर आपल्याशी साधकबाधक चर्चा केली आहे. त्याआधारे आपण संहितेत काही बदल, दुरुस्त्या वा सुधारणासुद्धा केल्यात. तथापि आता अनेक वर्षांच्या आपल्याबरोबरच्या चर्चेतून पुढे आल्यावर फादर, मला आपल्याच दांभिकपणाबद्दल प्रश्न पडू लागला आहे.

 

आपण इतके कसे बदललात? उदाहरण म्हणून आपले अगदी ताजे, मुंबईच्या पत्रकार संघातल्या वार्तालापाच्या वेळच्या वक्तव्याचेच घ्या! 'धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ धोकादायक' असल्याचे मत आपण व्यक्त केलेत आणि 'धर्माचा राजकीय शिडी म्हणून वापर नको,' असा सल्लाही दिलात. कुठल्याही पक्षाचे वा नेत्याचे आपण नाव घेतले नसले, तरी आपला रोख कुणावर आहे, हे कुणालाही सहज समजू शकते. आणि पुढे जाऊन आपण असेही म्हणालात की, 'तशी सरमिसळ झाल्यास, राजकारणात धर्माचा वापर झाल्यास धर्माचे अवमूल्यन होते.'
 

'पोप दुसरे जॉन पॉल : जीवनगाथा' हे पुस्तक लिहिणारे फादर फ्रान्सिस दिब्रिटो किती वेगळे होते? त्या पुस्तकाची निम्म्याहूनही अधिक म्हणजे जवळजवळ शे-सव्वाशे पाने 'त्या' पोपमहाशयांच्या जागतिक राजकारणात - विशेषत: पोलंडसारख्या त्यांच्या मायदेशात साम्यवादी सरकार उलथवून टाकण्याच्या ऐतिहासिक प्रक्रियेतसक्रिय सहभागाबद्दलच्या तपशीलवार वर्णनाने भरलेली आहेत. त्या पुस्तकाच्या निमित्ताने साम्यवादी राजवटींत, प्रामुख्याने सोव्हिएत युनियनमध्ये स्टालिनची राजवट असताना, कॅथलिक चर्चला कसा आणि किती छळ सोसावा लागला होता, हे मी आपल्याला ऐकवले होते. 'इन गॉड्स अंडरग्राउंड' आणि 'टॉर्चर्ड फॉर ख्रिस्त' ही फादर रुम्ब्राण्ड्ट यांची पुस्तके मी वाचली-अभ्यासली होती, हे समजल्यावर आपल्याला आश्चर्य वाटले होते. माझ्यासारखा एक हिंदुत्ववादी, धर्मस्वातंत्र्यासाठी दीर्घकाळ तुरुंगवासातील यमयातना भोगणार्‍या ख्रिश्चन धर्मोपदेशकांबद्दल भरभरून बोलतो आहे, याचा अनपेक्षित अनुभव घेतल्यामुळेच आपल्या दोघांमधील त्यानंतरच्या खुल्या चर्चेला वाव मिळावा म्हणून आपणही प्रयत्न केलेत. 'त्या' पुस्तकाच्या मनोगतामध्ये माझ्या अल्प-स्वल्प 'व्यासंगा'चा आपण उल्लेखसुद्धा केलात.
 

'सॉलिडॅरिटी'सारख्या कामगार संघटनेमागे चर्चची ताकद उभी करून सोव्हिएत युनियनला शह देण्यापासून दक्षिण अमेरिकेतील ब्राझील-अर्जेंटिना यांच्यासारख्या दोन ख्रिश्चनबहुल देशांमधील विकोपाला गेलेल्या वादात मध्यस्थी करण्यापर्यंत चर्चने जी भूमिका बजावली होती, ती आपण त्या पुस्तकात गौरवास्पद मानली होती. त्यामुळे कॅथलिक चर्चचे किंवा ख्रिस्ती धर्माचे अवमूल्यन झाले, असे आपण दूरान्वयानेसुद्धा म्हटले नव्हते.
 
एवढेच नव्हे, तर साम्यवादी चीनबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या व्हॅटिकनच्या इच्छेला चिनी नेते प्रतिसाद देत नाहीत, या संदर्भातील 'त्या' पुस्तकातला आपला मजकूर ख्रिस्ती धर्मसंस्थेच्या राजकीय हस्तक्षेपाचे समर्थन करणाराच होता. व्हॅटिकनच्या धर्मोपदेशक नेमण्याच्या अनिर्बंध सर्वाधिकाराला चिनी नेते जुमानत नाहीत; तो त्या देशातल्या सरकारचा अधिकार असला पाहिजे, असा आग्रह धरतात; बायबलच्या चिनी भाषेतील अनुवादाच्या प्रतींची चोरटी आयात रोखून धरतात...

 
या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केली होती. 'टाइम', 'न्यूजवीक', 'एशियावीक' या साप्ताहिकांनी चीनमधील भूमिगत कॅथलिक चर्चबद्दल बरेच काही प्रसिद्ध केले होते. मी ती कात्रणे आपल्याला वाचायला दिली आणि 'याबाबत चिनी सरकारची भूमिका सर्वार्थाने पटत नसली, तरी बहुतांशी समर्थनीय वाटते,' असे सांगितले. 'चीनमधील ख्रिश्चनांच्या निष्ठा दुहेरी असू नयेत; व्हॅटिकन हे केवळ एक धर्मपीठ नाही, तर ते एक स्वतंत्र राज्यही आहे; पोपमहाशय हे निव्वळ धर्माचार्य नाहीत; तर ते राज्यप्रमुखही आहेत; अशा परक्या राज्यप्रमुखाने आमच्या देशातील धार्मिक व्यवहारात ढवळाढवळ केलेली आम्ही खपवून घेऊ इच्छीत नाही... हे चिनी सरकारचे म्हणणे रास्तच आहे. भारतातल्या ख्रिश्चन समाजाच्या केवळ आध्यात्मिक आकांक्षांची पूर्ती करणारे धर्मपीठ कधीही स्वागतार्ह आहे; तथापि, त्या समाजाच्या बारीकसारीक बाबीसुद्धा नियंत्रित करणारे परके राज्यप्रमुख वा त्यांचे प्रतिनिधी मात्र नकोसे आहेत, ही भूमिका आपल्या देशातही बहुसंख्य समाजाची आहे,' असे मी आपल्याला सांगितले.

 
'चिनी सरकार आपल्या देशातले ख्रिस्ती धर्मोपदेशक नियुक्त करण्याचा अधिकारही आपल्याच हातांत राहावा, असा आग्रह लावून धरते. भारतात मात्र तशी व्यवस्था अस्तित्वात यावी, असे हिंदुत्ववाद्यांना वाटत नाही; त्याबाबत देशी धर्मयंत्रणेला पूर्ण स्वायत्तता मिळावी, असाच त्यांचा विचार आहे,' हेसुद्धा मी आपल्याजवळ अनौपचारिकपणे बोललो होतो. साम्यवादी चीनबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित व्हावेत, म्हणून व्हॅटिकनतर्फे केले जाणारे राजकारण आपल्याला खटकले नव्हते आणि 'लिबरेशन थिऑलॉजी' ही लॅटिन अमेरिकेतील ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी सुरू केलेली डाव्या विचारांची चळवळसुद्धा आपल्याला आक्षेपार्ह वाटली नव्हती. एका हातात बायबल आणि दुसर्‍या हातात कार्ल मार्क्स या विचारवंतांचे 'दास कॅपिटल' हे पुस्तक घेऊन सुरू झालेल्या त्या राजकीय चळवळीमुळे ख्रिस्ती धर्माचे अवमूल्यन झाले, असे आपण खरोखरच मानता का? आणि जर तसे मानत नसाल, तर आपल्या ताज्या वक्तव्याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ स्पष्ट आहे की, कॅथलिक चर्चने जर राजकारणात विशिष्ट भूमिका पार पाडली, तर त्याबाबत आपला आक्षेप नाही. मात्र, हिंदुत्ववादी धार्मिक संघटनेने मात्र राजकारणातून चार हात दूरच राहिले पाहिजे, असा आपला आग्रह आहे. आपली ही भूमिका एकांगी तर आहेच, पण दांभिकपणाचीही आहे, असे जर मी म्हटले तर फादर, आपण काय म्हणाल? आपले म्हणणे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.

 
प्रिय फादर,

आपल्या दुटप्पीपणाचे आता एक जुने उदाहरण पुन्हा एकदा आपल्यासमोर विचारार्थ ठेवतो. 'जुन्या करारा'त मोझेसने ज्या दहा आज्ञा दिल्याचे वर्णन आहे, त्या जगप्रसिद्ध आहेत. त्या आज्ञांमध्ये 'मूर्तिपूजकांना धोंडमार करून ठार मारा!' या आज्ञेचाही समावेश आहे, हे आपण जाणताच. 'सुबोध बायबल'च्या महाप्रकल्पावर आपल्याबरोबर मी जेव्हा काम करीत होतो, तेव्हा याबाबत आपल्या दोघांमध्ये खूप खडाजंगी चर्चा झाली होती. मूर्तिपूजा हा चोरीमारी, दरोडेखोरी, व्यभिचार अशा दंडनीय गुन्ह्यांसारखाच एक गुन्हा मानून त्याबद्दल तशी पूजा करणार्‍या व्यक्तीलाच नव्हे, तर तिच्या कच्च्या-बच्च्यांनाही दगडधोंड्यांनी ठेचून ठार मारा! अशी आज्ञा देणार्‍या मोझेसचा 'राष्ट्रपुरुष' म्हणून आपण गौरव केला होता. मोझेस चरित्राला लिहिलेली आपली प्रस्तावना वाचून मी आपल्याला थेट प्रश्न विचारला होता की, “आपण अनेकदा विनाकारण हिंदुत्ववाद्यांना 'मनुवादी' ठरवून त्यांच्यावर टीका करता आणि धोंडमार करण्याची आज्ञा देणार्‍या मोझेसचा मात्र 'राष्ट्रपुरुष' म्हणून गौरव करता, हा दुटप्पीपणा का?' मूर्तिपूजेला विरोध असणे मी समजू शकतो; तथापि, मूर्तिपूजा हा व्यभिचारसदृश गुन्हा समजून त्यासाठी मृत्युदंड ठोठावणे हा घोर अन्याय नाही का?

 
आपण दिलेले थातुरमातुर उत्तर समाधानकारक वाटले नाही म्हणून मी 'सुबोध बायबल'च्या वसईत झालेल्या जाहीर प्रकाशनसमारंभातही त्याबद्दलची माझी खंत बोलून दाखवली होती. आपल्यालाही हे चांगले आठवत असेल की, मी आर्चबिशप यांच्या उपस्थितीत एका ख्रिश्चनबहुल मेळाव्यात मूर्तिपूजक हिंदू समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून अशी जाहीर विनंती केली की, 'खुद्द ख्रिश्चनांकडून माता मेरी, बाल जीझसपासून क्रूसावर मरण पत्करणार्‍या येशूपर्यंत अनेक मूर्तींबद्दल श्रद्धाभाव बाळगला जात असताना, जुन्या करारातील 'ते' विधान आक्षेपार्ह मानून धर्मग्रंथातून काढून टाकण्यात यावे. मूर्तिपूजा म्हणजे व्यभिचारसदृश दंडनीय गुन्हा ठरवणारे ते आक्षेपार्ह विधान रद्द करणे, हे सांस्कृतिक सेतुबंधनासाठी आवश्यक मानले जावे. दुसर्‍या व्हॅटिकन धर्मपरिषदेने जसे अनेक सुधारणावादी विचार मांडले, तसेच या बाबतीतही केले जावे.'

 
फादर,

आपण माझी ती जाहीर विनंती आजपर्यंत अनुत्तरितच ठेवली आहे. 'धर्माधर्मात पूल बांधू या!' असे आपले ताजे आवाहनअंतःकरणापासूनचे आहे, असे मी कसे मानू? मङूपलहळपसफ या इंग्रजी शब्दाचे दोन प्रकारे भाषांतर केले म्हणजे असा पूल बांधला जाईल का? मोझेसने 'लिंचिंग'ची आज्ञा दिली, असे सांगताना त्याने शत्रूच्या निर्दालनाची आज्ञा दिली, असे म्हणायचे आणि देशात घडणार्‍या अलीकडच्या 'लिंचिंग' गुन्ह्यांचा उल्लेख मात्र 'झुंडहत्या' या शब्दाने करायचा, ही अनुवादामधील चलाखी सांस्कृतिक सेतूची पायाभरणी करू शकेल, असे आपल्याला वाटते का? 'चलाखी' हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो आहे. 'सुबोध बायबल'च्या प्रस्तावनेत आणि 'नाही मी एकला' या आपल्या आत्मचरित्रामध्येही आपण या संदर्भातील अनर्थाचा उल्लेख केला आहे. 'जुन्या करारा'तल्या एका स्तोत्रात 'शत्रूचा नाश व्हावा, त्याची मुले पोरकी व्हावीत,' अशी शापवाणी उच्चारलेली असे, ती आपण उल्लेखिली आहे आणि त्याबद्दलची सारवासारव करीत असा खुलासा केला आहे की, 'पूर्वी संहितेची नक्कल हाताने तयार करीत असत. तशी नक्कल करताना 'हराम' या शब्दाऐवजी 'हराग' असा शब्द लिहिला गेला. 'हराम' या शब्दाचा अर्थ आहे - 'मूर्तिपूजकांना बहिष्कृत करावे!' आणि 'हराग'चा अर्थ आहे - 'मूर्तिपूजकांचा संहार करा!' असा हा 'ध'चा 'मा' झाल्यामुळे हत्याकांडे होऊन अनेकांना हकनाक प्राणाला मुकावे लागले आहे. बायबल-अभ्यासकांनी या गोष्टीची प्रांजळ कबुली देऊन योग्य दुरुस्ती केली आहे.'

 
तथापि प्रिय फादर,

आपल्या या खुलाशानंतरही - जरी तो पूर्ण समाधानकारक नसला, तरीही तो ग्राह्य मानून - मूळ प्रश्नाला उत्तर मिळत नाही ते नाहीच. 'मूर्तिपूजकांना बहिष्कृत करा!' अशी आज्ञा देणारा मोझेस 'राष्ट्रपुरुष' म्हणून आपण गौरवता, त्याचे काय? एखादा धर्मविचार वा धर्मरीत पटत नाही म्हणून ती अनुसरणार्‍या व्यक्तीला तिच्या कुटुंबासह बहिष्कृत करणे हे जर आपल्याला अपेक्षित असणार्‍या सहिष्णू संस्कृतीत बसत नसेल, तर तसे करण्याचा आपल्या असंख्य अनुयायांना आदेश देणारा 'तो' आदर्श म्हणून गौरवण्याचे कारणच काय? मनूची निंदा आणि मोझेसचा गौरव अशा दुहेरी मांडणीच्या आधारे आपण सांस्कृतिक सेतू कसा काय उभारणार, हा माझा प्रश्न आपण आता तरी अनुत्तरित ठेवू नये. या पत्रात आणखी एकच मुद्दा मांडतो आणि तोसुद्धा आपल्याच अलीकडच्या एका वक्तव्याच्या अनुषंगानेच मांडतो. घटनेने दिलेल्या आविष्कारस्वातंत्र्याचा उल्लेख करून 'मी ते वापरणारच!' अशा राणा भीमदेवी थाटात आपण मुंबईच्या वार्तालापात बोलल्याचे वृत्त आहे.

 
पण फादर, खरे सांगा, आजपर्यंत आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आली आहे का? पर्यावरणरक्षणाचा आपला लढा तूर्त बाजूला ठेवू या. आपल्या लेखनावर वेळप्रसंगी कडक टीका झाली असेल; मे. पुं. रेगे यांच्यासारख्या तत्त्वचिंतकाने आपल्या लेखनातील मुद्द्यांचा प्रतिवाद करताना 'आपण कालकूट विष ओकता आहात,' अशा जळजळीत शब्दांचा भडिमार केला असेल; पण आपल्या 'तशा' लेखनानंतरही या महाराष्ट्राने आपल्या लेखनकर्तृत्वाचा यथोचित सन्मानच केला आहे. ज्या विचारसरणीवर आपण वर्षानुवर्षे टीका करीत आलात, त्याच विचारसरणीच्या पक्षाचे सरकार असताना आपण 'ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारा'ने गौरवले गेले आहात आणि त्या समारंभातही हाडीमाशी खिळलेल्या सवयीनुसार आपण त्या विचारसरणीवरच आडूनआडून टीका करू लागल्यानंतरही आपले भाषण कुणी बंद पाडले नाही, हे लक्षात असू द्या!

 
तथापि मला मनापासून असे जाणवते आहे की, आपल्या अभिव्यक्तीवर बंधने आहेत, असे जे आपल्याला वाटते आहे, त्यात थोडेफार तथ्य आहे. फक्त गंमत अशी आहे की, जी बंधने आपल्याला जखडून ठेवत आली आहेत, त्यांचे स्वरूप आपल्याला पुरते जाणवलेेले नाही. ख्रिस्तप्रेमापोटी चर्चची जी बंधने आपण स्वीकारली आहेत, ती आपल्याला काचत नाहीत, जाचत नाहीत आणि त्यामुळेच ती तोडून टाकावीशीही वाटत नाहीत.

 
प्रिय फादर,

आपण भारतीय संविधानाचा वेळोवेळी अभिमानाने उल्लेख करता, त्या संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याचा उपयोगही करता. तथापि आपण आणखी एका संविधानकाची दखल घ्यायला हवी. दि. 7 डिसेंबर १९६५ रोजी पोप सहावे पॉल यांच्या स्वाक्षरीनिशी जारी झालेले कॅथलिक चर्चचे संविधानक! ते सर्व कॅथलिकांना बंधनकारक असणारे संविधानक आपल्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधन घालत आले आहे. आपल्याला जे पटले असेल, ते सारेच्या सारे लिहायला-बोलायला आपण मोकळे नाही. आपण जे लिहिता, ते प्रसिद्ध होण्यापूर्वी चर्चमधील कुणीतरी 'सेन्सॉर' ते वाचून मंजूर वा नामंजूर करतात.

 
ही वस्तुस्थिती जगजाहीर नाही आणि म्हणूनच डॉ. गणेश देवींपासून डॉ. कौतिकराव ढाले-पाटील यांच्यापर्यंतच्या आपल्या ताज्या समर्थकांनाही ठाऊक नाही. पण, मला ती चांगली ठाऊक आहे. 'सुबोध बायबल'च्या निमित्ताने 'त्या' सेन्सॉरशिपचा परिणाम मला प्रत्यक्ष जाणवला आहे. 'त्या' महाप्रकल्पाच्या अधिकृत संपादकपदावरून मी घेतलेली सपशेल माघार ही त्या सेन्सॉरशिपचीच तर माझ्याकडून व्यक्त झालेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. मी तसा निर्णय ऐकवल्यानंतर आणि आपल्या 'मनोगता'मधून माझ्यासंबंधीच्या भावना व्यक्त करणारा परिच्छेद काढून टाकल्यानंतर आपल्याला मनापासून दुःख झाले होते आणि तरीही आपण ते दुःख जवळ केलेत, कारण चर्चचा शब्द प्रमाण मानण्यात आपले आयुष्य गेले होते.

 
त्या सार्‍या पार्श्वभूमीवर फक्त मी आणि मीच आपल्याला एक आवाहन करू शकतो आणि मला असे वाटते आहे की, हीच ती वेळ आहे. कदाचित काल मी हे आवाहन केले असते, तर ते योग्य वेळेपूर्वी केले, असे मानून आपण दुर्लक्षित केले असते आणि उद्या जर मी हे आवाहन केले, तर कदाचित उशीर झाला म्हणून आपण दोघे हळहळत बसू!

 
फादर,

माझे आपल्याला कळकळीचे आवाहन आहे की, चर्चची तशी बंधने द्या झुगारून आणि त्या धर्मसंस्थेच्या या देशातील इतिहासाचे चिकित्सक वृत्तीने परखड विश्लेषण करा. जर काही हिणकस आढळले, तर ते जाहीरपणे मान्य करा. 'तांडव'सारख्या कादंबरीतले ऐतिहासिक वास्तव जर खरोखरच आपल्या मनाचा थरकाप उडवणारे ठरले असेल, तर ते स्वीकारून पुढे त्याबद्दलची खंत व्यक्त करताना कचरू नका! 'होलीयर दॅन दाऊ' ही आजवरची भूमिका सोडून खर्‍याखुर्‍या संवादाला सिद्ध व्हा! 'त्या' तशा स्वातंत्र्यलढ्यासाठी आपल्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा!

स्नेहांकित,

आनंद हर्डीकर

अधिक माहिती साठी बघा
https://www.mahamtb.com/Encyc/2020/1/4/an-open-letter-to-Father-Dibrito…

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 05/01/2020 - 22:56

In reply to by मारवा

गेली काही वर्षं साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष जे कोण असतात ते बहुतेकांना माहीत नसतात. श्रीपाल सबनीस हे नाव आता जेमतेम आठवलं. लोक ह्या प्रकरणाबद्दल 'कोण हे, काय लिहिलंय ते माहीत नाही. कोण, कुठले माहीत नसलेले लोक आणून बसवतात' म्हणून चर्चा करतात आणि सोडून देतात.

आता मात्र हिंदुत्ववादी पेटलेले आहेत. त्यांचं सरकारही पुन्हा निवडून आलं आहे. त्यामुळे इतर धर्माशी संबंधित कुणाला मराठी भाषेचा, किंवा हिंदू बहुसंख्येशी संबंधित काही गोष्टींचा मक्ता मिळाल्याची शंका आली तरी ते लगेच टणटणाट करतात. हे उजव्यांचं नेहमीचं आहे. जिंकले तरी रडारड सुटत नाही. गेल्या वर्षीचे कोण ते अध्यक्ष होते, त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नव्हतं, त्यांनीही कुणाला तरी दमदाटी केली होती, वगैरेंकडे ते दुर्लक्ष करतात.

पत्राच्या मजकुरात तसं फार काही आक्षेपार्ह नाही. पण फादर ख्रिश्चन आणि त्यात धर्मगुरू आहेत म्हणून लगेच ही चिकित्सा सुरू झालेली आहे. एवढी चिकित्सा प्रत्येक अध्यक्षांची आणि त्यांच्या लेखन-वर्तनाची केली तर कदाचित मराठी भाषा आणि समाजाचं भलं होईल. एरवी हे फक्त हिंदुत्ववाद्यांच्या हाती ट्रोल होणं ठरेल.

काय दिसतं, ते बघणं सोपं आहे. काय दिसत नाही, आणि ते का दिसत नाही, असे प्रश्न विचारले नाहीत तर हिंदुत्ववादी माज असाच राहणार.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 06/01/2020 - 04:44

Watch: Horrifying violence in Delhi’s Jawaharlal Nehru University as masked mob attacks campus

JNUSU - विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष ऐशे घोष गंभीररीत्या जखमी झाल्याच्या बातम्या आहेत. अभाविप, आरेसेसच्या लोकांनी हल्ले केल्याच्या, तोडफोड केल्याची सुरुवातीला चर्चा आहे.

Violence at JNU campus: Who said what

BJP spokesperson Nalin Kohli said violence in any form needs to be condemned but added that it is equally important to note that a certain group of people in JNU subscribe to a "mindset that calls for dismemberment of India and considers death sentence of a known terrorist by the Supreme Court to be an act of murder".

कोणाच्या तरी घोषणा देण्याची तुलना भीषण, शारीरिक हिंसेशी करून खोटं, लटकं साधर्म्य शोधण्याचे, तयार करण्याचे प्रयत्न हिडीस आहेत. हे आमचे आजचे राज्यकर्ते आहेत!

चिंतातुर जंतू Tue, 21/01/2020 - 16:50

'न्यू यॉर्क टाइम्स'ने डेमोक्रॅट पक्षाच्या दोन महिला उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. इकडच्या एनआरआय किंवा आरआय लोकांचं काही मत?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 22/01/2020 - 09:53

In reply to by चिंतातुर जंतू

सध्या तरी फार मत नाही. मागे 'द न्यू यॉर्कर'मध्ये एलिझाबेथ वॉरनबद्दल वाचलं होतं. तेव्हापासून तिच्याबद्दल कुतूहल होतं. नंतर वेल्स फार्गोच्या संचालकांना तिनं फाडून खाल्ल्यावर ती आवडायलाच लागली. पण अजूनही एवढे स्पर्धक आहेत की मत बनवण्यात काही हशील नाही. ती तात्यांना हरवू शकेल का, ह्याबद्दल अजून काही मत नाही! लेखातही हे उल्लेख आहेतच.

एमी क्लोबुशारबद्दल अजिबातच काही माहिती नाही.

चिंतातुर जंतू Tue, 21/01/2020 - 17:36

आजची WTF बातमी -
No time to verify ID proofs: Cops on migrant workers

What makes the Sunday demolition tragic is the fact labourers in the shanties in Kundalahalli, Tubarahalli and Kariyammana Agrahara, who play a major role in keeping the city clean, claim that they possess all the citizenship documents, including NRC.
However, the police claim that they cannot spend lakhs of rupees and send a team to West Bengal to verify the documents.

चिंतातुर जंतू Wed, 29/01/2020 - 16:11

अर्नब गोस्वामीशी कथित गैरवर्तन केल्याच्या प्रकारावरून स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरावर इंडिगो, एअर इंडिया, स्पाईस जेट आणि गो एअर या कंपन्यांनी बंदी घातली आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 30/01/2020 - 08:22

In reply to by चिंतातुर जंतू

लवकरच एयर इंडियाला माहिती अधिकाराच्या कायद्याखाली ह्याची माहिती द्यावी लागेल, अशी चिन्हं दिसत आहेत.

काय पण चिंधी लोक आहेत! कुणा पुरुषाशी बोलणं हे म्हणे गैरवर्तन म्हणून कामरावर बंदी. आणि मुली-बायकांशी कसेही वागा, त्यांच्या नातेवाईक, वकील, डॉक्टरांना चिरडून टाका, तर काही नाही. उलट लोक भक्त बनतात!

चिमणराव Thu, 30/01/2020 - 13:23

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तक्रार करणे महत्त्वाचे आहे.
( **राव *धी* यांनाही गैरवर्तनासाठी बंद केले होते. जुनी गोष्ट आहे, शोधावं लागेल. ) आता #मिटु मुळे कित्येकांना जरब बसलीच. खासगी संस्था प्रकरणे आतल्या आत मिटवतात आणि चर्चा होऊ देत नाहीत. अगदी आताचे - सोनी हिंदी - इंडियन आइडॉल जजचे.
याचा मी अनुभव घेतला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 02/02/2020 - 21:43

In reply to by चिंतातुर जंतू

कुणाल कामरानं आता इंडिगो एयरलाईनला नोटीस बजावली आहे.

Kunal Kamra Issues Legal Notice To Indigo Airlines Against Travel Ban; Demands Rs. 25L Compensation [Read Notice]

आणि चारचौघांत लाज काढणं सुरू आहेच -

अतिशहाणा Sat, 08/02/2020 - 09:00

In reply to by चिंतातुर जंतू

कॅशलेस इंडीयाशी असलेला संबंध समजला नाही ब्वा. गुगलचा प्रॉब्लेम आहे हा.. उगीचच काहीतरी.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/02/2020 - 04:01

किंडल आणि किंडलची ॲप वापरल्यावर ॲमेझॉनला आपण काय वाचतो, कधी वाचतो सगळं समजतं. छापील पुस्तकं परत फॅशनीत येतील का?

'They know us better than we know ourselves': how Amazon tracked my last two years of reading

ओंकार Tue, 11/02/2020 - 11:41

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

छापील पुस्तकं विकत घेताना ॲमेझॉन वापरले तरी त्याला आपल्याला काय वाचायचे होते हे कळते. त्यामुळे दुकानात किंवा फूटपाथवर घेण्याची फॅशन परत आली पाहिजे.

- ओंकार.

यडमाठराव Tue, 11/02/2020 - 17:25

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/delhi-r…

हा मोदी-शहांचाच करिष्मा !!! त्यांच्या प्रचारामुळेच जागा दुपटीपेक्षा जास्तीने वाढल्या ! हे खरे नेते.

राहुल गांधींच्या झंजावाती प्रचारामुळे काँग्रेसची एकही जागा कमी झाली नाही. लै भारी ना !

'न'वी बाजू Tue, 11/02/2020 - 21:14

In reply to by यडमाठराव

विनोदी द्यायची, ती मार्मिक दिली आहे.

हा मोदी-शहांचाच करिष्मा !!! त्यांच्या प्रचारामुळेच जागा दुपटीपेक्षा जास्तीने वाढल्या ! हे खरे नेते.

हे लॉजिक थोडेसे आमच्या घासकडवींच्या 'पर कॅपिटा बलात्कार' लॉजिकसारखे झाले. असो.

राहुल गांधींच्या झंजावाती प्रचारामुळे काँग्रेसची एकही जागा कमी झाली नाही. लै भारी ना !

हे मात्र खरे. :-)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/02/2020 - 20:25

(हा प्रतिसाद जुमलेंद्रांना उपप्रतिसाद म्हणून द्यायचा तो इथे दिला. सगळ्यांचीच मतं हवीत म्हणून.)

फेसबुकवर एक मतप्रवाह दिसला की मराठी वर्तमानपत्रं दिल्लीचं राजकारण आणि केजरीवाल ह्यांना फार भाव देत नाहीत. तुमचं काय मत?

'न'वी बाजू Tue, 11/02/2020 - 21:04

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

केजरीवालांचे माहीत नाही. परंतु, 'दिल्लीचे राजकारण' बोले तो दिल्लीचे स्थानिक राजकारण अशा अर्थाने म्हणत असाल, तर मराठी वर्तमानपत्रे त्याला तशीही कधी भाव देत होती?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/02/2020 - 20:34

In reply to by चिंतातुर जंतू

हेच ते थोर, कर्तव्यतत्पर, देशभक्त, सुजाण लोक, जे कुणाल कामरा नावाच्या भलत्याच लोकांना विमानप्रवास करू देत नाहीयेत.

चिमणराव Thu, 13/02/2020 - 08:55

In reply to by चिंतातुर जंतू

भारताचे स्वत:चे क्लाउड स्टोरेज कुठेतरी आंन्ध्रातल्या/ तेलंगणातल्या /ओडीशातल्या दुष्काळी भागात जमीनीखाली करायला हवे.(( म्हणजे तसे असेलही पण असलेच तर केपसिटी वाढवायला हवी.))

चिंतातुर जंतू Wed, 12/02/2020 - 10:14

हा घटनात्मक बदल झालेला आहे. जर सवलती काढून घेतल्या तर हे संजय गांधीच्या नसबंदीसारखं होईल का? आणि आधीच गाळात चाललेल्या सेक्स रेशोवर काय परिणाम होईल?
Shiv Sena MP floats Bill in Rajya Sabha promoting Two-Child Policy to tackle population control
[Read the Bill]

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 14/02/2020 - 00:27

'न्यू यॉर्क टाईम्स'मधली बातमी
Mumbai Police Play a Trick on Honking Drivers
It involves a red light hooked to a decibel meter, and the timer resets when harsh horns get too loud. Now, other cities are inquiring.

मला ह्याची विदा बघून हसायला फार आवडेल. आंतरिक दुष्टपणाचा योग्य वापर होईल.

चिंतातुर जंतू Fri, 21/02/2020 - 15:03

In reply to by नितिन थत्ते

असले बरेचसे लेख परदेशी नियतकालिकांमध्ये आले तरी ते भारतीयांनीच लिहिलेले असतात.

कोणत्या अंगाने लेख हवा हा निर्णय संपादकीय असतो आणि अनेकदा स्थानिक संदर्भ कळण्यासाठी स्थानिक लोकांना लिहायला सांगतात.

अनुप ढेरे Mon, 24/02/2020 - 13:35

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही उबर वापरता का? वापरत असाल तर सुझन फाऊलरच्या छळाला आर्थिक बळ पुरवत आहात -

"तुम्ही उमेरिकेत राहाता का? तुम्ही जगभर युद्ध आणि आतंकवाद फायनान्स करत आहात." असं म्हणण्यासारखे आहे हे.

अतिशहाणा Mon, 24/02/2020 - 19:48

In reply to by अनुप ढेरे

सुझान फोलारचे एक पुस्तक येते आहे म्हणे, प्रसिद्धी करण्यासाठी ह्या बातम्या आता परत सुरू झाल्यात.
(उबरविषयी काही विशेष प्रेम नाही)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 24/02/2020 - 20:41

In reply to by अनुप ढेरे

ढेरेशास्त्री, तुम्हाला देश, लोकशाही आणि कंपनी, भांडवलशाही ह्यांतले मूलभूत फरक समजत असतील असं वाटलं होतं. हरकत नाही.

अस्वल Wed, 04/03/2020 - 02:06

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या माहितीप्रमाणे -
उबरचा जुना सीइओ आता घरी गेला आहे. एक्स्पिडियाचा जुना सीइओ आता उबरमधे आहे.
त्याने गेल्या गेल्या उबरच्या कंपनी संस्कृतीची गंभीर दखल घेतली (किंबहुना ते सुधारायलाच त्याला बोलावलं होतं.)
२ वर्षांपूर्वी उबर एक कंपनी म्हणून कामगारांसाठी जशी होती तशी आता राहिली नाही.

तेव्हा ही बातमी लेटेस्ट आहे की त्या जुन्या उबरला उद्देशून आहे?
====

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 04/03/2020 - 07:01

In reply to by अस्वल

ट्रॅव्हिस कलानिकच्या काळात तिनं ब्लॉगपोस्ट लिहिलं. मग नवा इरानी सीईओ आला. तोवर तिनं उबर सोडल्याला काळ लोटला होता. मात्र त्यानंतरच्या काळात ह्या छळाच्या गोष्टी घडल्याचं लेखातून दिसतंय. लेखाची तारीख आहे, १७ फेब्रुवारी २०२०. सदर लेख पुस्तक प्रकाशित होण्याच्या एक दिवस आधीचा आहे; पुस्तकाची ओळख करून देणं हाच लेखाचा उद्देश आहे.

लेखाच्या शेवटी लिहिलंय -

Three years have passed since I published that blog post and shared the story of what I experienced at Uber. The company hired former U.S. Attorney General Eric Holder to investigate its culture, which ultimately led to CEO Travis Kalanick’s departure—and just months later, my story became part of a watershed movement against sexual misconduct.

त्यावरून माझा समज असा झाला की कलानिक गेल्यानंतरही तिचा छळ सुरू होताच. आणखी तपशिलांसाठी पुस्तक विकत घ्यावं लागेल.

नितिन थत्ते Wed, 04/03/2020 - 08:40

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मग आता

तुम्ही उबर वापरता का? वापरत असाल तर सुझन फाऊलरच्या छळाला आर्थिक बळ पुरवत आहात
-

हे व्हॅलिड विधान आहे की नाही?

अतिशहाणा Wed, 04/03/2020 - 15:39

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

~~आणखी तपशिलांसाठी पुस्तक विकत घ्यावं लागेल.

त्या लेखाचा उद्देश उबरचे काळे रूप दाखवणे हा नसून ' माझे पुस्तक विकत घ्या ' हे सांगणे हाच होता.

'तुम्ही उबर वापरून तिचा छळ करण्यात मदत करत आहात' वगैरे इमोशनल डार्क पॅटर्न पावशेर टाकली आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 24/02/2020 - 20:45

In reply to by चिंतातुर जंतू

आज NBCवर सकाळच्या बातम्यांत म्हणत होते, की डॉनल्ड ट्रंपसाठी जमलेल्या लोकांपैकी हा सगळ्यात मोठा जमाव, प्रतिसाद आहे. आजवर त्याच्यासाठी एवढे लोक कुठेही जमा झाले नव्हते.

आता ट्रंपतात्या त्यावर काही बोलताहेत का ह्याबद्दल कुतूहल आहे. (हल्लीच त्यांना भलत्या संदर्भात ट्विटर वापरण्यावरून तंबी मिळालेली आहे.)

यडमाठराव Tue, 25/02/2020 - 11:04

https://www.jagran.com/entertainment/bollywood-a-r-rahman-has-commented…

मौका काय शोधताय रहमानजी. अहो भारतात सगळ्याच गोष्टींचं स्वातंत्र्य आहे. घ्या एकदा मौका आणि चालू करा बुरखा घालायला. आपको बुरखेमे देखना (हमेशा?) हम भी पसंद करेंगे :)

चिंतातुर जंतू Wed, 26/02/2020 - 15:23

दिल्लीतल्या दंगलींविषयी परदेशी प्रसारमाध्यमांत आलेलं काही वार्तांकन -
Barkha Dutt: With Trump visiting, India’s politics of hate erupt for all the world to witness - The Washington Post
Delhi rocked by deadly protests during Donald Trump's India visit

सामो Wed, 26/02/2020 - 19:05

महाराष्ट्रामधील, प्रत्येक शाळेत आता मराठी अनिवार्य केलेले आहे. ज्या शाळा हा कायदा मोडतील त्यांना १ लाख दंड. तसेच प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पणे मराठी बोलण्यास आडकाठी करता येणार नाही. तसे फलकही लावत येणार नाही.

चिंतातुर जंतू Tue, 03/03/2020 - 12:37

दिल्लीतल्या दंगलींविषयी परदेशी प्रसारमाध्यमांत आलेलं आणखी काही वार्तांकन -
The Real Objective of Mob Violence Against Muslims in India
Inside Delhi: beaten, lynched and burnt alive
Why Delhi Police Did Nothing to Stop Attacks on Muslims - न्यू यॉर्क टाइम्स

अस्वल Sun, 22/03/2020 - 23:36

In reply to by चिंतातुर जंतू

परिस्थिती मार्चपासूनच गंभीर होती, ज्याक्षणी परदेशी प्रवाशांना भारतात बंदी लागू झाली तेव्हापासूनच lockdown ची तयारी सुरू होती असं दिसतंय.
प्रसंगाचे गांभीर्य लोकांपर्यंत पोचायला वेळ लागतोय, नाईलाज आहे.
Stay home, stay safe.

मारवा Sun, 22/03/2020 - 22:31

मार्खेजची एक जबर कादंबरी love in the time of cholera यातला जिगरबाज जिद्दी वृद्ध प्रेमी अखेर आपले प्रेम प्राप्त करतो. त्या गोष्टीशी साम्य दाखवणारी ही बातमी आणि या बातमीचे शीर्षक कॉलरा व कोरोना शी साम्य
https://www.dawn.com/news/1542073
दुसरा दुवा सापडत नाहीये.

मारवा Sun, 22/03/2020 - 22:40

मार्खेजची एक जबर कादंबरी love in the time of cholera यातला जिगरबाज जिद्दी वृद्ध प्रेमी अखेर आपले प्रेम प्राप्त करतो. त्या गोष्टीशी साम्य दाखवणारी ही बातमी आणि या बातमीचे शीर्षक कॉलरा व कोरोना शी साम्य
https://www.dawn.com/news/1542073
दुसरा दुवा सापडत नाहीये.

चिंतातुर जंतू Mon, 23/03/2020 - 16:39

आज पाच वाजल्यापासून पुण्यात वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे पुणे पोलिस आयुक्तांचे आदेश -

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 23/03/2020 - 19:47

In reply to by चिंतातुर जंतू

कालच्या करोनोत्सवाच्या मिरवणुका बघून ही शंका आलीच होती. दोन-पाच टक्के लोकांनी असला मूर्खपणा केला तरी संपूर्ण समाजाचं कंबरडं मोडायला पुरेसं ठरेल, अशी सध्याची लक्षणं दिसत आहेत.

आज सकाळी एनबीसीच्या बातम्यांमध्ये आकडे दाखवत होते: १८-५४ वयातल्या साधारण ४०% बाधितांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागत आहे, आणि ह्या वयोगटातले १२% लोक (४० टक्क्यांतले १२% नाही; १००बाधितांमधले १२) हॉस्पिटलांत जाऊन गंभीर परिस्थितीत होते. तरुण आणि निरोगी आहोत, त्यामुळे आपल्याला फार काही होत नाही, असला माज महागात पडणारा आहे. अडाणीपणातून आलेला माज करून ह्या लोकांना संसर्ग होणार आणि ते लोक इतरांना प्रसाद देणार.

दोष कुणाचा वगैरे कवित्व सुरू राहीलच. पण मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 23/03/2020 - 19:52

सरकारी निर्देशांकडे दुर्लक्ष करून स्प्रिंग ब्रेकच्या पार्ट्या करणाऱ्यांना 'डेल'च्या मायकल डेलचा दणका -

Michael Dell tells spring break video coronavirus skeptics not to apply to work at his companies

चिमणराव Tue, 14/04/2020 - 08:23

इंडिया टुडे ( हाउ टु बस्ट ए बँक इश्यु) -

१) येस बँकेच्या वाढत्या एनपीए वरून जागे होऊन तिरुमलै बालाजी देवस्थानाने २०१९ओक्टोबरात रु १३०० कोटी काढून घेतले होते. पुरी देवस्थानाने ५५० कोटी काढले नाहीत.
२) वायनाडकरांनी लोकसभेवर पाठवल्याचे मा. राहुलबाबांनी फारच मनावर घेतले आहे. नऊ महिन्यात १९ प्रश्न सभेत विचारले. २००४ पासून पंधरा वर्षांत तीन विचारले होते.