सध्या काय वाचताय? - भाग २९

बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते; एखादा दीर्घ लेख आवडतो; वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते; पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.

field_vote: 
0
No votes yet

भास्कर चंदावरकरांनी लिखित ' चित्रभास्कर ' वाचायला घेतले आहे .
अरुण खोपकर लिखित प्रदीर्घ प्रस्तावना ( ज्याला खोपकर प्रस्तावना न म्हणता ' संकल्पना ' म्हणत आहेत ) वाचूनच खुश झालो .
कारण ,मराठीत " छान मराठीत " लिहिलेले या /अशा विषयांवरचे ग्लोबल विषयांना /संकल्पनांना सहजस्पर्श करून जाणारे वाचण्यात फार येत नाही.
( इतर पब्लिक अजून कुठे कुठे अडकून बसले आहे वगैरे टांगउप्पर सक्काळ सक्काळ करत नाही )
मज्जानु टैम अहेड .
पुस्तकाबद्दल लिहीनच ... वाचून झाल्यावर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरुण खोपकर लिखित प्रदीर्घ प्रस्तावना ( ज्याला खोपकर प्रस्तावना न म्हणता ' संकल्पना ' म्हणत आहेत ) वाचूनच खुश झालो .

झैरात मोड १
झैरात मोड २

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चित्रभास्कर फार जुने आहे का? मी एकदा कोणे एके काळी बहुतेक वाचले होते. ((टांगउप्पर विनम्रपणा आवडला.))
----
तेंडुलकर जबरी माणूस आणि लेखक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचक विषयावरील रोचक पुस्तक -
इंडिका - अनुवाद नंदा खरे

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ओरिजिनल घ्यावे की अनुवाद घ्यावा ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओरिजिनल घ्यावे की अनुवाद घ्यावा ?

अशा विषयावरच्या पुस्तकाचा मराठीत खप व्हावा अशी प्रामाणिक इच्छा आहे. इंग्रजीत खप होत राहतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

१. नंदा खरेंची मराठी अतिशय साधी, सोपी आहे.
२. कारण, विषय समजल्याशिवाय खरे त्याबद्दल बोलणार नाहीत; म्हणजे भाषा वापराबद्दल शंकाच नकोत.
३. माझा स्वतःचा मराठी वाचनाचा वेग इंग्लिशपेक्षा बराच जास्त आहे, अजूनही.
४. शिवाय मराठीतून लिहायचं तर मराठी वाचनाला पर्याय नाही. डोक्यात उलट भाषांतर होत राहतं, मराठी -> इंग्लिश, त्याचाही लिहिताना उपयोग होतो.

मी दोन्ही पुस्तकं वाचलेली नाहीत. पण मी खऱ्यांचंच वाचेन.

वाढीव प्रतिसाद - पुस्तक किंडलवर आहे असं दिसतंय. म्हणजे सहज मिळवून वाचता येईल.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इंडिका - कॉफी टेबल बुक ( मराठीत ?) वाटत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय अभ्यासपूर्ण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चांगलं दिसतंय पुस्तक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुस्तक घरी आले. सुंदर प्रिंट. झकास चित्रे! स्वतःहून शोधून नक्कीच मागवायला गेलो नसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मंगळवार, 10/11/2020 - 18:40.
प्रणय लाल'चं ओरजिनल घेतलं.
रॉक फार्मेशन, पाणी आणि निरनिराळे धातू पृथ्वीवर कसे आले ते पहिल्या प्रकरणात आहे। साइनोब्याक्टिरिया उर्फ ओक्सीजन निर्माण करणारे सेलसपर्यंत आलो. मजेदार.

---------------;

वाचून झालं. फार चांगलं आहे.
डाइनोसोर वगैरे प्रचंड मोठ्या प्राण्यांची हाडं, सापळे, अंडी भारतात नर्मदा परिसरात मिळाली. मोठ्या हत्तींचे सुळे अंबाला, कुरुक्षेत्र, हिमाचल भागात मिळतात. आनंद झाला. पहिल्या वहिल्या मानवाचे अवशेष मात्र नाही सापडले. फक्त गारगोटीची हत्त्यारे मिळतात त्यावरून आफ्रिकेतून आलेल्या मानवाचा मार्ग मिळतो का शोध चालू आहे. भारतातल्या आणि अंदमान निकोबारच्या रहिवाशांचे आणि आफ्रिकन जमातींच्या लोकांचे डिएनए जवळपास एकच आहेत! आणि माकडांपेक्षा चिंपाझी,गोरीलांच्या अधिक जवळ आहोत. तरी नक्की कुणापासून पहिला मानव - दोन पायांवर उभा चालणारा प्राणी निर्माण किंवा विकसित झाला हे गुप्तच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कालच घरी आले पुस्तक.
अतिशहाणे यांच्याशी सहमत.
अति शहाणे भारतात आले काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या पुतणीला (वय 9 वर्षे ) भेट म्हणून घेतो. बघू आवडत का !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतीय अर्थव्यवस्थेवर काही पेपर्सचा आधार घेऊन काही मांडणी करणारा एक ब्लॉग सापडला :
Untangling India's Distinctive Economic Story

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

#2020books

सध्या गाजत असलेलं The Silent Patient (लेखक Alex Michaelides) भिक्कार आहे.

सध्या काय 'इन' आहे त्याचा विचार करून अक्षरशः 'शिवलेलं' कथानक आहे. स्त्रीवादी हिरविण, मनोविश्लेषण करणारा हिरो, (spoiler) unreliable narrator, शेवटाकडे ट्विस्ट(चा प्रयत्न), वगैरे.

मेह(न)तामय अनुवाद लौकरच आल्यास आश्चर्य वाटणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

https://www.buzzfeednews.com/article/scaachikoul/kashmir-hindus-muslims-...
साची कॅनडात जन्माला आलेली व वाढलेली आहे. भारताचा, काश्मीरचा जो इतिहास ती जाणते तो म्हणजे आई-बाबांनी भावनिक कढ येत सांगीतलेला. साची विचारी आहे, ६ व्या वर्षी भले मी आई-बाबांनी सांगीतलेल्या प्रत्येक गोष्टीवरती डोळे झाकून विश्वास ठेवला - पण आता २८ व्या वर्षीही मी तेच करायचं का? असा प्रश्न विचारण्याचे वैचारिक स्वातंत्र्य व प्रगल्भता तिच्यामध्ये आहे.
या लेखात तिचे मत आहे की आपण काश्मिरी पंडीत हुसकाउन लावलो गेलो ते ' ethnic cleansing' पण आता मुसलमानांबद्दल तेथे तेच चाललेले आहे ते मात्र 'exodus'.
त्यांनी आपली गाय मारली असेलही पण आपण वासरु मारायचं का?
______________
खरं तर हा अतिशय जटील प्रश्न आहे. पण या प्र्श्नावरती स्वतंत्र विचार करुन ती काही एक स्टँड घेतेय हेच मुळी कौतुकास्पद आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मानसशास्त्र आणि राजकारणाचे अभ्यासक आशिष नंदी यांची दिल्लीमधील दंग्यांच्या पार्श्वभूमीवर मुलाखत :
Ashis Nandy: It’s very difficult to go back to pre-violent days after you’ve once participated, killed

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लोकसत्तेतले परीक्षण वाचून वाचावे वाटले.
लोकसत्ता परीक्षण
620 चे पुस्तक किंडलवर 80(!!!) रुपैत मिळाले. पहिली forgotten (?) केस वाचली. खूप खूप खूप रंजक पुस्तक असणार ताबडतोब खात्री झालीये. गुडरिड्स मधले तपशील:

Can a state Legislature imprison a critic and summon a high Court judge to appear before it? Are religion-based personal laws above fundamental Rights? Why did the Punjab police organize a band to celebrate the defeat of the state in a case of sexual harassment? Is it legal for the government to arm untrained private citizens to participate in counter-insurgency operations? How did Parliament come to pass the first Amendment to the Constitution allowing for caste-based reservations? And why did the Supreme Court acquit a rape accused on the basis of the victims sexual history? In this book, constitutional expert chintan chandrachud takes us behind the scenes and tells us the stories of ten extraordinary and dramatic legal cases from the 1950s to the present day that have all but faded from public memory. Written in a lively, riveting style, this book has a cast of characters that includes the who’s who of the Indian legal system. It also paints an unexpected picture of the Indian judiciary: the Courts are not always on the right side of history or justice, and they don’t always have the last word on the matters before them. This entertaining book is an incisive look into the functioning of Indian institutions.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकत घ्यायला पाहिजे! (भलतेच रोचक प्रकरण दिसतेय.)

620 चे पुस्तक किंडलवर 80(!!!) रुपैत मिळाले.

आमच्या इथे ३२.९५चे ८ डॉलरांत विकताहेत. तरीही नॉट बॅड.

----------

घेतले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बऱ्याच दिवसांपासून ऑपरेशन ब्लू स्टार आणि त्याआगे-मागे घडलेल्या घटनांवर वाचायचं होतं.
मार्क टुली/टली/टल्ली (असो) आणि सतीश जेकब ह्या बी.बी.सी.च्या पत्रकाराद्वयीने लिहिलेलं हे पुस्तक त्या मालिकेतलं पहिलं पुस्तक आहे.

१९७९-१९८४ अशी पंजाबमधल्या घटनांची विस्तारपूर्वक दखल लेखकांनी घेतली आहे. ब्लू-स्टार ही काही एखाद वर्षात झालेल्या घटनेची परिणीती नव्हे तर त्यामागे बऱ्याच घटनांची साखळी होती- जी पुस्तकात स्पष्ट केली आहे.
-------------
मुळात पंजाबात १९८०पासूनच जे काही खदखदत होतं त्याला गांधी-अकाली दल ह्यांच्या राजकारणातून आणखी पाठिंबा दिला गेला. ह्या राजकारण्यांच्या रस्सीखेचेत दोघांनीही लोकानुनय करण्यासाठी "भिंद्रनवाले" ह्या संताला वापरून घेतलं. - निदान त्यांचा असा समज होता.
पण पुढे भिंद्रनवाले इतके शिरजोर होतील ह्याचा अंदाज येऊनही त्याला गांधींनी आवरला नाही, अखेरपर्यंत त्याचा उपयोग होऊ शकेल - अशीच भूमिका केंद्राची राहिली.
------------------
१९८०-८४ ह्या काळात भिंद्रनवाले आणि इतर पंजाबी कट्टरपंथी अतिरेक्यांनी शेकडोंनी बळी घेतले. खुलेआम लोकांच्या हत्या केल्या, बसगाड्या जाळल्या, अतिशय निर्घृण खूनही झाले. केंद्र सरकार + पंजाब राज्य सरकार हे सगळं आटोक्यात आणू शकलं असतं पण एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात भिंद्रनवाले दुर्लक्षित झाले आणि पार सुवर्णमंदिरातच ठिय्या देऊन बसले.
------------------------

पुस्तक वाचून बऱ्याच गोष्टींचा खुलासा झाला. पंजाबच्याच नव्हे तर स्वतंत्र भारताच्या इतिहासातली बहुधा सर्वात मोठी घटना असूनही ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल चित्रपट/मालिका/पुस्तकं- ह्यात खूप कव्हरेज दिसत नाही. सुवर्णमंदिरात रणगाडे आणणं, त्यानंतरची २ दिवस चाललेली लढाई, निरपराधांची हत्या, सैन्यातल्या २ तुकड्यांनी नंतर केलेलं बंड, आणि नंतरच्या खलिस्तान अतिरेक्यांनी केलेले हल्ले - अशी मालिका ८०च्या दशकात चालूच होती. कदाचित पंजाबी चित्रपट किंवा मालिका असाव्यात ह्या विषयावर, पाहिलं पाहिजे.
-----------------------
आता कुलदीप शिंग ब्रार ह्यांचं पुस्तक वाचतोय. ऑपरेशन ब्लू स्टार - सैन्याच्या नजरेतून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज एक फार रोचक लेख वाचण्यात आला- https://www.scientificamerican.com/article/blood-sisters-what-vampire-ba...
कार्टर हे वटवाघळांचा अभ्यास करत आहेत. त्यांनी नीरीक्षण केले की - 'रक्तपिपासू वटवाघळे' माद्या या ८-१० अशा कोंडाळ्यात रहातात तर नर हा एकएकटा असतो व आपल्या आपल्या मालकीच्या भागाचे रक्षण करतो. आता या माद्या काय करतात तर आपल्या अन्य नातेवाईक व मैत्रिणी, त्यांची पिल्ले यांना स्वतः रक्त पिउन, उरलेले रक्त देतात. म्हणजे त्यांना हवं तेवढं रक्त मिळाल्यानंतर उरलेले रक्त परत तोंडातून बाहेर काढून अन्य भुकेल्या त्यांच्या गटातील वाघळांना देतात. उत्क्रांतीच्या दॄष्टीने आपण एकवेळ समजू शकतो की स्वतःची गुणसूत्रे पुढे नेण्याकरता त्या आपापल्या नातेवाईकांना जगवत असतील पण मग त्या नातेवाईकांखेरीज अन्य वाघळांनाही हे रक्त का पाजतात तर - मैत्री = Risk pooling, म्हणजे स्वतःकरता त्या Safety net बनवितात, ज्यायोगे त्यांचे अस्तित्व अधिक बळकट होइल. hungry bats often rely on their food donors.
“Friendship is complicated in that we don’t understand it scientifically,”
वाघळांचा मेंदू शरीराच्या मानाने मोठा असतो विशेषतः neocortex. याचे मुख्य काम असते क्लिष्ट, गुंतागुंतीची असे सामाजिक नाती जोपासणे व तत्सम.
perhaps friendship serves as a safety net for a variety of animals.
मैत्रीचा सेफ्टी नेट म्हणुन उपयोग आपण करुन घेतो पण त्याचा अर्थ १००% फुकटेपण आपण सहन करतो असेही नाही. कुठेतरी परताव्याची अपेक्षा असतेच.
सर्व मुद्दे समजून घेण्याकरता वरती दिलेल्या दुव्यावरती लेख वाचावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Evolutionary Psychology नावाचं David Buss ह्यानं लिहिलेलं पाठ्यपुस्तक तुला आवडेलच. संशोधकांचं म्हणणं, मनुष्यांमध्ये स्त्रियांचीही उत्क्रांती अशाच प्रकारे झाली. त्यातून त्यांनी अशा पद्धतीनं आपली शिकार वाटून घेणाऱ्या नरांनाच - सब मिल-बांट के खायेंगे - निवडलं, त्यातून नैसर्गिक निवड होत गेली.

(हे वाचायला छानच वाटतं. पण ह्या समजूतदारपणामुळे, माझ्या मते, बायका जास्त इमोसनल ब्लॅकमेलिंग करून घेतात. उदाहरणार्थ, कन्यादान म्हणजे शब्दशः वस्तुकरण नाही, असल्या फोलपटांनाही भाव देतात.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'ग्रंथाच्या सहवासात' हे पुस्तक वाचले. त्यात जयवंत दळवींच्या लेखात हे आढळले:

सगळे कवी मला चालतात. मर्ढेकर, इंदिरा, विंदा, पाडगावकर, बापट, बोरकर, आरती प्रभू, शांता शेळके, ग्रेस, सदानंद रेगे! यांचे एखादे पुस्तक काढून चाळत राहातो. वेळ बरा जातो. काही कविता समजल्या नाहीत, तरी काही बिघडत नाही. उलट न समजणाऱ्या कविता परत परत गुणगुणाव्याशा वाटतात.

मर्ढेकरांची 'पिपात मेले ओल्या उंदिर' ही कविता अशीच मी कितीतरी वेळा गुणगुणतो. ती न समजण्यातही समजल्यासारखे काहीतरी वाटते आणि बरे वाटते. पण ही प्राध्यापक मंडळी तो आनंद मिळू देत नाहीत. विजया राजाध्यक्ष झाल्या, प्रभा गणोरकर झाल्या आणि आता प्रा. म. वा. धोंड! आमच्या कोकणात काही शेतकरी बायका अंगणात बसून हातोडा घेऊन काथ्या कुटत राहतात आणि त्यातून सुंभ वळतात. ही प्राध्यापक मंडळी असाच हातोडा घेऊन ही कविता कुटत बसतात याचे वाईट वाटते. त्या बायकांच्या हाती वळायला सुंभ तरी असते. यांच्या हाती काहीच नाही. म. वा. धोंडांनी तर कहरच केला आहे. त्यांनी विजया राजाध्यक्ष आणि प्रभा गणोरकर यांनी या कवितेचे लावलेले अर्थ रद्दबातलच ठरवले आहेत. इतकेच नव्हे, तर स्वतःच १९६७ साली 'सत्यकथे'त लिहिलेला लेखही रद्द करून त्यावेळी आपण चुकीचा अर्थ लावला होता, अशी कबुली दिली आहे. आणि या लेखात कंटाळवाण्या पद्धतीने नवीन अर्थ लावला आहे. पुढील वर्षी (किंवा त्या आधीही!) ते पुनश्च आणखी एक लेख लिहितील आणि या वर्षी लिहिलेला या कवितेचा अर्थ चुकीचा होता, असा नवा शोध लावतील, या आशेवर मी दिवस काढतो आहे! या प्राध्यापकांपासून बचावण्याचा दुसरा काहीच मार्ग दिसत नाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

The Stand आधीच वाचलंय. रिचर्ड मेथसनचं I Am Legend वाचलं. एका साथीच्या रोगामुळे सगळे लोक व्हॅम्पायर झाले असतात आणि रॉबर्ट नेव्हील नावाचा एकटाच व्यक्ती शिल्लक राहिला असतो. गोष्ट पूर्ण बदललेला विल स्मिथचा एक टुकार टिपिकल झोंबीपट येऊन गेलाय. पुस्तक मात्र टिपिकल मारधाडीपासून बहुतांशी लांब राहतं. भविष्याबद्दल नेव्हीलचे विचार, रोगावरच त्याच संशोधन , नेव्हीलचे तात्विक चिंतन वगैरे एकदम मस्त रंगवलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुस्तक तसं लहान आहे. झटपट वाचून झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोकसत्ता मधील संहिता जोशी यांचा हा लेख वाचला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>>>मी ऑफिसात जाऊन जाहीर केलं.. ‘तिशीतली ती स्त्री म्हणजे मी नाही.’ तिन्ही श्रोते हसले. >>>>>> हाहाहा!!! तू ना Smile
>>>>ऑफिसात गेले काही आठवडे आम्ही चौघं पैजा लावत होतो की, ऑफिसात पहिल्यांदा कुणाला लागण होईल. वरच्या पदांवरचे बरेच लोक कामासाठी फिरत असतात. आम्ही त्यांच्याबद्दल बोलत होतो>>>>> ROFL ROFL
'तिथे पाव मिळाला नाही म्हणून केक आणून खाल्ला.' . 'तेव्हा सार्वजनिक कवायतीसारखे दोघांनी हात लांब केले.' वगैरे वाक्यांनी लेख खुसखुशीत झालेला आहे.
.
एकंदर परिस्थिती मस्त मांडलीयेस. शेवटचा पॅरा आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्त्रीला वय विचारु नये असं म्हणतात पण तीने स्वतः सांगीतलयास हरकत नाही Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या वाक्याचे अर्थ -

१. मी तिशीतली नाही.
२. मी स्त्री नाही.
३. मी करोनाग्रस्त नाही.
४. मी ती स्त्री नाही ... ह्यांतले काहीही किंवा सगळे असू शकतात.

पाव नव्हता म्हणून केक खाल्ला; हा विनोद मुळात बऱ्या अर्ध्यानं केला. जंत्वाग्रहामुळे तो लेखात आला.

सामुदायिक कवायत हा माझ्या भावाचा, बराच जुना विनोद आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या लहान मुलांचा वेळ कसा घालवायचा हा प्रश्न असेल तर प्लुटो मासिकाचा हा अंक पाहा :
फ्लिप-बुक आवृत्ती
पीडीएफ आवृत्ती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लहान मुलांसाठी 'चकमक' नावाचं हिंदी मासिक आहे. त्याचा ताजा अंक इथे वाचता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ब्रेक्झिटविषयीची एक मनोरंजक आणि हलकट कादंबरी - द कॉक्रोच : इयन मक्यूवन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

In a small New England town, in the early 60s, a shadow falls over a small boy playing with his toy soldiers. Jamie Morton looks up to see a striking man, the new minister. Charles Jacobs, along with his beautiful wife, will transform the local church. The men and boys are all a bit in love with Mrs Jacobs; the women and girls – including Jamie’s mother and beloved sister – feel the same about Reverend Jacobs. With Jamie, the Reverend shares a deeper bond, based on their fascination with simple experiments in electricity.

Then tragedy strikes the Jacobs family; the preacher curses God, mocking all religious belief, and is banished from the shocked town.

Jamie has demons of his own. In his mid-thirties, he is living a nomadic lifestyle of bar-band rock and roll. Addicted to heroin, stranded, desperate, he sees Jacobs again – a showman on stage, creating dazzling ‘portraits in lightning’ – and their meeting has profound consequences for both men. Their bond becomes a pact beyond even the Devil’s devising, and Jamie discovers that revival has many meanings. Because for every cure there is a price…

This rich and disturbing novel spans five decades on its way to the most terrifying conclusion Stephen King has ever written. It’s a masterpiece from King, in the great American tradition of Nathaniel Hawthorne and Edgar Allan Poe.

उत्कंठावर्धक कादंबरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किरण नगरकरांच्या पुस्तकांबद्दल ऐकलं होतं. मुंबईत फोर्टात मिळाली नव्हती.

आता online epub/pdf free downloads मिळाली.
इतर लेखकांचीही मिळालीत.
*खुशवंत सिंगची बरीच. म्हणजे अगदी history of Sikhs 1 and 2 खंडसुद्धा. हे खंड पाच वर्षांपूर्वी फुटपाथवर मिळत होते दोनशे रुपयांना, पण घेऊन वाचून झाल्यावर काय करणार हा प्रश्नच पडतो. मग नाही घेतले.
* चर्चिल विन्स्टन ( दुपारची झोप घेणारच्चवाला ) - world war II , दोन्ही खंड. हे वाचलेत ब्रिटिश कोन्सल लाइब्रीतून '७२ साली पण आता पुन्हा वाचणारे.
मोबाईलमध्ये वाचायला आणि ऐकायला जमतं. पण पूर्वी हा कुणी तासनतास मोबाइल घेऊन बसलेला दिसणे म्हणजे घरातल्यांच्या कपाळावर आठ्या पडायच्या. तसा मी काही काम करत नव्हतोच पण किती मोबाईलच्या आहारी जायचं ते? पण आता करोना लाकडाऊन काळ सुरू होऊन चार महिने झाले. काय पण करा पण बाहेर भटकायचं नाही याचा फायदा होत आहे.

तर श्यामची आई, साने गुरुजी.
seven sixes are fortythree - nagarkar,
Ravan and Eddie - nagarkar.
संपवली.
Cuckold - nagarkar. - वाचायला घेतलं आहे. या पुस्तकाला एक प्राईजही मिळालंय म्हणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वि. का. राजवाडे चरित्र - पाडुरंग सदाशिव साने. हे ओस्मानिया ओपन युनि लाइब्रीतून मागेच उतरवले होते ते एका मेमरी कार्डावर सापडले. ते वाचायला घेतलंय. आता बरेच महिने झाले ती oudl site ओपनच होत नाहीये.
नगरकरांचे cuckold वाचायला वेळ लागणार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आंद्रे अगासीचे आत्मचरित्र "ओपन" वाचलं. काही भाग अगदी संजू सिनेमा टाइप वाटला. पण काही भाग एकदम मस्त रंगवलाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आंद्रे अगासीचे आत्मचरित्र "ओपन" वाचलं. काही भाग अगदी संजू सिनेमा टाइप वाटला. पण काही भाग एकदम मस्त रंगवलाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स.मा. गर्गे यांचे "स्वप्न आणि सत्य" हे पुस्तक वाचले. ऑक्टोबर १९६० च्या सुमारास गर्गे पत्रकार मेळाव्यासाठी रशिया आणि पूर्व युरोपला गेले होते. तेव्हा प्रवासात टिपलेले प्रसंग आणि त्या अनुषंगाने त्या देशातील विविध प्रश्नांचे विवेचन, विश्लेषण आहे.लेखकाच्या शब्दात सांगायचे तर "रशिया आणि पूर्व युरोपातील काही देशांचा प्रवास करताना जे प्रत्यक्ष पाहिले,
अनुभवले आणि जाणवले त्यांचे हे सटीप निवेदन आहे. रुढ अर्थाने हे प्रवासवर्णन असेल अथवा नसेल; पण त्यातील प्रसंग, चर्चा आणि मुलाखती मात्र यथातथ्य सादर करण्याचा मी प्रयत्न केला आहे. रशियातील केवळ नवी जुनी स्थळे पाडून प्रवाशाची जिज्ञासा पूर्ण होत नाही, निदान होऊ नये. तसेच, त्या देशाच्या प्रवास वर्णनासबंधी जिज्ञासू वाचकांच्या अपेक्षाही केवळ अशा स्थळांची माहिती मिळविण्या पुरत्याच मर्यादित नसाव्यात असे मला वाटते. रशियातील महान् क्रांती, त्यानंतरचा मार्क्स वादाचा अभिनव प्रयोग, स्टालिनची प्रदीर्घ हुकुमशाही राजवट, आर्थिक नियोजन, त्यातून उद्भवलेले प्रश्न आणि प्रसंग, नव्या राजवटीचे बदलते स्वरूप या सर्वाच्या संदर्भात सोव्हिएट समाजजीवनाचा परमार्थ घेतल्याशिवाय त्या देशाच्या यात्रेची सांगता होऊ शकत नाही. अशा परामर्षाचे स्वरूप प्रवाशाच्या मनोभूमिकेवरही अनेकदा अवलंबून असते. माझी भूमिका भक्ताची नाही, तशीच भंजकाची ही नाही. याच भूमिकेवरून मी रशियातील परिस्थिती आणि प्रगती, सत्य आणि सत्ता, वास्तव जीवन आणि प्रचार यांच्या मूल्यमापनाचा प्रयत्न केला आहे."

खुर्श्चेव्ह त्यावेळेस रशियाचा सर्वसत्ताधीश होता, मार्शल टिटो चा युगोस्लाविया व रशिया यांच्यात वैचारिक मतभेद उफाळून आले होते. खुद्द टिटोची मुलाखत लेखकाने घेतली होती. लेखकाने कम्युन (सहकारी सामुदायिक शेती), रशियन कारखाने व प्रावदा प्रेस यांचा दौरा केला होता. प्रावदाच्या(सरकारी वृत्तपत्र) राजकीय संपादका सोबत झालेल्या वादविवादाचा तपशीलही वाचण्यासारखा आहे.
दीनानाथ दलाल यांचे सुंदर चित्र मुखपृष्ठावर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झकास! कुठे वाचायला मिळेल? ई-प्रत आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मी लायब्ररीतून आणून वाचले. सोविएत रशियाचे कामगार विषयक धोरण व स्टालिनच्या मृत्यूनंतर चे सत्तांतर या पुस्तकातील काही इंटरेस्टिंग गोष्टी.
स्टालिन चा मृत्यू 1953 साली झाला. स्टालिनच्या मृत्यूनंतर रशियाचे सत्तांतर कसे झाले असेल याचा अंदाज लावण्यात या पुस्तकातील काही पाने खर्ची झाली आहेत. लेखकाचा प्रवास 1960 सालचा व पुस्तक प्रसिद्धी 1965 ची.लेखक खुद्द पत्रकार.
पण इतक्या वर्षानंतरही याबद्दलची कथा बाहेर न पडणे यावरून रशियाचा माहितीवर असलेला कंट्रोल लक्षात यावा. या विषयावरचा डेथ अॉफ स्टालिन हा किंचित सटायर असलेला चित्रपटही पाहण्यासारखा आहे.
दुसरे म्हणजे कामचुकारपणा , अकार्यक्षमता, कमी उत्पादन क्षमता हा आपल्या डाव्या कामगार चळवळीतला गुण म्हणजे कम्युनिस्टांची देणगी असा माझा समज होता. पण सोव्हिएत धोरणात कामगारांना प्रेरित कसं करावे, कामचुकार कामगारांना शिक्षा कशा कराव्यात, संपाला बंदी वगैरे गोष्टींचा उल्लेख आहे. म्हणजेच कामगारांच्या अतिश्रमातून वरकड मूल्य तयार व्हायला सोव्हिएत रशियाचा आक्षेप नव्हता. केवळ हे वरकड मूल्य उर्फ नफा खाजगी व्यक्तीच्या हातात न जाता सोवियेत जनतेच्या हातात जातो म्हणून ते हराम न होता पवित्र होतं अशी भूमिका दिसते. म्हणजे आपल्याकडे दिसणारा कामचुकारपणा ही ओरिजनल डाव्यांची देण नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यावरून 'राशा' हे पुस्तक आठवले. १९८० च्या सुमारास लेखक व्यवसायासाठी रशीयाला जात असत. त्याकाळी भारतातून रशियात बेसिक वस्तू निर्यात होत असत. तसा काहीसा करार दोन देशांमधे होता.
https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4838539944846199228
rasha

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्या परत महाभारत वाचतोय. याधीही तीन चारदा सर्व वाचून झालंच आहे. पण तरीही दरवेळी नव्यानं काहीतरी गवसतं. सध्या द्रोणपर्व सुरु आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नुकतेच वाचायला सुरुवात केलेली आहे पण अजुन काही इतर पुस्तक घुसखोरी करत असल्याने अजुन चालना मिळत नाहीये. दुसरी जी घुसखोर आहेत त्यात सध्या शॅडो पर्सनॅलीटी ही जी मुळ संकल्पना कार्ल गुस्ताव युंग यांची आहे. या विषयावर आधारीत त्यांचे सोडुन इतरांची पुस्तके वाचतोय त्यात embracing our selves, hal stone. हे पुस्तक नंतर dark side of bright chasers debbie ford यांचे पुस्तक वाचलेत. यात डेबी फोर्ड चे पुस्तक फारच शॅलो आहे. त्यामानाने स्टोन यांचे पुस्तक कैक पटीने सरस आहे. त्याहुन अधिक ॲकॅडमिक म्हणजे meeting the shadow हे connie zweig यांनी संपादीत केलेल एक नंबर आहे. यात या विषयावरील विविध पैलुंवर अनेकांनी लिहिलेल्या लेखाचा संग्रह आहे.
मुळ संकल्पना फार महत्वपुर्ण आहे. आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तित्वामध्ये अनेक् शॅडो पर्सनॅलिटी असतात्. ज्यांचे आपण दमन केलेले असते. अनेक स्व चे मिळुन आपण एक बनलेलो असतो. या स्व ना ओळखणे जाणुन घेऊनन त्यांना आपलेसे करणे. त्यासाठी त्यांच्याशी व्हॉइस डायल्लॉग च्या माध्यमातुन संवाद साधणे अशा सर्व दमन केलेल्या सावली स्व चे इंटीग्रेशन करणे वगैरे वगैरे फार जबरदस्त रोचक
व स्व चा शोध घेतांना उपयुक्त असे काहीसे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता online epub/pdf free downloads मिळाली.
इतर लेखकांचीही मिळालीत.
>. शरद जी साईटचे नाव सांगता येईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

Libgen. (Library genesis). गूगल मारून बघा. सापडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोल्डन ब्राऊन,
https://z-lib.org

>>> Click on Books.
>>> https://b-ok.asia
( ५ पुस्तके फ्री डाउनलोड)
>> रेजिस्ट्रेशन फ्री (इमेल, ) केल्यावर अनलिमिटेड फ्री डाउनलोड्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मागे नबांमुळे जॉर्ज मिकेश या लेखकाची ओळख झाली होती. त्यावर एक चरित्रात्मक पुस्तक मराठीत प्रकाशित झालं आहे.

https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4693486602099379721?BookN...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अखेर महाराष्ट्राने या लेखकाची दखल घेतली, म्हणायची! Smile

पुस्तकाच्या दुव्याचा पत्ता eBooks म्हणतोय, परंतु प्रत्यक्षात मात्र त्या दुव्यावर केवळ छापील आवृत्ती विक्रीस आहे. ई-आवृत्ती असती, तर (कुतूहल म्हणून का होईना, परंतु) ताबडतोब विकत घेण्याचा इरादा होता. (पावणेदोन डॉलर म्हणजे काही खिशाला जड नाहीत.) मात्र, पावणेदोन डॉलरच्या पुस्तकाला सव्वीस डॉलर टपाल हशील देऊन विकत घेण्यात हशील नाही. पुढेमागे जर ई-आवृत्ती निघाली, तर अवश्य पुनर्विचार करू.

इन द मीनव्हाइल, या लेखकाचे (बोले तो, जॉर्ज मिकॅशचे. द. भा. करंदीकरांचे नव्हे.) 'हौ टू बी सेव्हन्टी' नावाचे एक आत्मचरित्रवजा पुस्तक आहे. (त्याच्या जवळपास सर्वच पुस्तकांप्रमाणे आता बहुधा औट-ऑफ-प्रिंट असावे.) ॲमेझॉनवर (वा इतरत्र) एखादी सेकंडहँड कॉपी रास्त भावात मिळू शकल्यास अवश्य वाचावी, असे सुचवू इच्छितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुस्तकाच्या दुव्याचा पत्ता eBooks म्हणतोय

बुकगंगेच्या मते ebooks म्हणजे ई-पद्धतीने विकली जाणारी कोणतीही पुस्तके. मग ती शून्य आणि एकच्या इलेक्ट्रॉनिक भाषेत लिहिलेली असोत, किंवा कागदावर लि अ, किंवा भूर्जपत्रावर लि अ, किंवा दगडावर को अ.

"खरी" ईबुक्स शोधायची असतील तर यूआरएलमध्ये शेवटी "&EB=1" (without quotes) असं टैप करावं. क्रिपा हो जायेगी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

'मधुश्री'चे प्रमुख शरद अष्टेकर फेसबुकवर असतात. त्यांना आबाच्या प्रतिसादाची लिंक पाठवत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्हाट इज मधुश्री?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

व्हाट इज मधुश्री?

उपरोल्लेखित मराठी पुस्तकाचे प्रकाशक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कॉस्मॉपॉलिटॅनिजम (लेखक: क्वामि अँथनी अथय्या) या तत्त्वशाखेचा आढावा. ग्लोबलायजेशनचे तात्त्विक बुड म्हणता येईल अशी फिलॉसॉफि. देशीवादाच्या एकदम उलट. हे पुस्तक मी २०१० मध्ये घेतले पण वाचले नाही. आजकाल कोविड आणि ग्लोबॅलिजमचा यांचा परिपाक म्हणून वाचायला घेतले. चांगले आहे. पण निव्वळ विसरण्यासारखे. अमर्त्य सेन वगैरे लोकांनी एकमेकांना समजलेल्या गोष्टी आपापसातच कायम बोलत बसल्यासारखे. प्रोफाउण्ड पण काय उपयोग.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

३_१४ विक्षिप्त अदिती
नमस्कार
थोडा गोंधळ दूर करावा म्हणून.
हंगेरीयन विनोदकार जॉर्ज मिकेश हे पुस्तक पुण्याच्या मधुश्री प्रकाशनने प्रकाशित केले आहे. मधुश्री प्रकाशन संस्था १९७७ पासून पुण्यास कार्यरत आहे. श्री पराग लोणकर हे मधुश्रीचे मालक आहेत. ह्या मधुश्री प्रकाशनची वेब साईट आहे. तसेच फेसबुक पान हि आहे.https://www.facebook.com/pg/madhushree-prakashan-171484243036902/posts/

नाशिक येथे मधुश्री पब्लिकेशन नावाची संस्था गेल्या काही वर्षांत सुरु झालेली असून त्याच्या प्रकाशकांचे नाव अष्टेकर आहे/असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे पुस्तक कुठल्या मधुश्रीचं आहे, किंबहुना दुसरं मधुश्री प्रकाशन आहे हेच मला माहीत नव्हतं. अष्टेकरांना ह्या प्रतिसादाचा दुवा पाठवला तर ते फार खुश झाले! Smile

ह्या हिशोबात, 'ऐसी अक्षरे' छापणारे बेलवलकरही खुश होत असतील का? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बरेच दिवस बकेट लिस्ट मध्ये ठेवलेला ह्या विषयावर मनोहर पारनेरकरांची तीन भागांची सुरेख लेखमाला रविवारच्या लोकसत्तामध्ये आली होती. त्नियांनी निवडून दिलेल्या टॉप टेन रचना म्हणजे आमच्या सारख्या नवोत्सुकांना मेजवानीच

https://www.loksatta.com/lokrang-news/western-music-sangto-aika-dd70-226...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गूगलवरून साभार
इथल्या व्यक्ती पाहिल्या, की वाटतं, ‛ही कसली भारी, दर्जेदार माणसं आहेत. कसलं भारी लिहितात, वाचतात, बोलतात. त्यामुळे मला फार इथं बोलवत नाही. हां, हल्ली इथं होत असलेल्या चर्चा, लेख पाहून तसं बोलायचं बळ मिळतंच. पण अनामिक (उच्च-उच्च?) भीती राहतेच. त्यामुळे इथं आपलं तोडकं-मोडकं, लहरी, छपरी वाचन टाकणं तसं दुर्मीळच. पण आज तसं धाडस करून छो होतो. तर ‛कोरोनाच्या कृष्णछायेत’ हे पुस्तक सध्या वाचतो आहे. अर्थात ‛डॉ. मृदुला बेळें’नी ते लिहिले असल्याने मी ते सोडूच शकत नव्हतो. तर या पुस्तकात माणसं माणसांची काळजी (मृत्यूच्या टोकावर असतानाही) ज्या पोटतिडकीने घेतात ते थरारक वाटेल असं मांडलं आहे. काहीएक व्यवस्था जगालाही कशा घाईकुतीला आणू शकतात हे आपण पाहिले आहे. (अर्थात नसेल तर इथे पाहता येईलच.) पण त्या व्यवस्थेलाही पुरून वर उठत काही माणसं धडपडतात. देश वाचला पाहिजे, जग वाचलं पाहिजे या भावनेने ती काम करतात. हे सगळं इथं/ह्यात पाहिला मिळतं. बस्स. इतकंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

इथल्या व्यक्ती पाहिल्या, की वाटतं, ‛ही कसली भारी, दर्जेदार माणसं आहेत. कसलं भारी लिहितात, वाचतात, बोलतात

दिसतं तसं नसतं!

इथले लोक विदा-विंदा-गोविंदा अशा सगळ्या विषयांत रूची ठेवून असतात!
त्रिकाल-त्रिदेव-त्रिमूर्ती आवडणारे आहेत इकडे लोक्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विदा-विंदा-गोविंदा

मी गेल्याच आठवड्यात 'इंडियन मॅचमेकिंग'ही बघितली. एकीकडे मनात 'ई, किती घाण' सुरू होतं, पण पूर्ण पहिला सीझन बघितला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.


इथले लोक विदा-विंदा-गोविंदा अशा सगळ्या विषयांत रूची ठेवून असतात!


रोचक.

विदा-विंदा-गोविंदा


अतीव रोचक. आवडलं बुवा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

अशोक बँकर यांनी लिहिलेल्या लॉर्ड ऑफ द रिंग्ज स्टाईल रामायणाचा पहिला भाग वाचला.(प्रिन्स ऑफ अयोध्या). ब्लोविंग औट ऑफ प्रोपोर्शन पद्धतीने (funnily enough, राम सोडून) सर्व पात्रं रंगवली आहेत. उदा- कैकेयी फक्त स्वार्थी नाही, तर दारुडी, आळशी, क्रूर पण आहे, मंथरा फक्त काड्या करणारी नाही, तर चेटकीण आणि रावणाची सेविका आहे, रावण डार्क लॉर्ड सॉरॉन आहे, विश्वामित्र/वशिष्ठादी गँडॉल्फ सारखे आहेत. या तुलनेत रामच सामान्य वाटतो. लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्यात आणि रामाच्या पात्रात काही फरक वाटला नाही.

५३२ पानांमध्ये गोष्ट फक्त त्राटका वधापर्यंत आली आहे. त्यामुळे पुढचा भाग वाचायची शक्यता कमी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिमणराव
शुक्रवार, 23/10/2020 - 10:46

पुस्तक वाचन सुरू आहे. कोह इ नूर - डर्लिंपल ( जयपूर फेस्टवाला) संपवलं. या अवलक्षणी हिऱ्याच्या इतिहासावर चांगलाच उजेड पाडला आहे. संदर्भांची पन्नासेक पानांची सूची आहेच. हा दगड पुरुष सत्ताधाऱ्यांना लाभत नाही, पण आता राणी एलिझाबेथ द्वि. सुद्धा आणि तिचे स्त्री वारसही वापरायला घाबरतात.

अंधश्रद्धा घातकी असेल तर बोलायला ठीक पण परीक्षेला बसणार कोण?

- - -
चिमणराव
शुक्रवार, 23/10/2020 - 10:49
तरीही भारत,पाकिस्तान,अफगाणिस्तान, इराण,देश आणि पंजाब,ओडिशा या राज्यांनी ब्रिटिश सरकारकडे मागणी केली आहे "मोठ्या मनाने परसंस्कृतीचा आदर राखायचा म्हणून आमचा दगड आम्हाला परत करा."

- -
अगडबंब हत्ती
शुक्रवार, 23/10/2020 - 13:36
ओडिशा ने कोहिनूर साठी का मागणी केली असावी?

- -
चिमणराव
शुक्रवार, 23/10/2020 - 14:09
रणजितसिंहाकडे होता हीरा. आजारी झाला, पक्षाघात झाला. दानधर्म करत सुटला. महाभारतातील स्यमंतक मणि आणि जगन्नाथ द्वारकाधिश याची गोष्ट बिंबवली गेली. हाच तो मणि. पुरीच्या जगन्नाथाला पाठवण्याची आज्ञा सुटली. महामंत्री कौटिलीय शास्त्र प्यायलेला. त्याने विचार केला हीरा पंजाबाबच्या राजा धारण करत असला तरी ती राज्याची संपत्ती. पुढचा राजा धारण करेल. हीरा पाठवला नाही पण ही वार्ता मात्र पुरीला पोहोचली होती.
ओडिशातील पुरीच्या पंडितांनी त्यावर हक्क सांगितला आणि लंडनला पत्र पाठवले.

- -
अगडबंब हत्ती
शुक्रवार, 23/10/2020 - 14:31
बरीच रोचक गोष्ट दिसत आहे.

- -
न'वी बाजू
शनिवार, 24/10/2020 - 05:49
कोहिनूर हिऱ्याप्रमाणेच आपल्या शिवाजीमहाराजांची भवानी तलवारसुद्धा अद्याप इंग्रजांच्याच तावडीत आहे ना? मागे खूप पूर्वी आपले विसाव्या शतकातले शिवाजीमहाराजांचे अवतार श्रीवर्धनचे श्री.
अब्दुल रहमान अंतुले ती परत आणणार म्हणाले होते. त्यानंतर आजतागायत त्याबद्दल काही ऐकले नाही, नि कोणीही काही बोललेही नाही.

की 'भवानी तलवार, भवानी तलवार' नाही म्हटले, तरीसुद्धा कोठल्याही अंतू बरव्याच्या पिंडाला कावळा शिवल्याशिवाय राहायचा नाही, ही खात्री असल्यामुळेच ही अनास्था? (आणि, त्या तुलनेत, कोहिनूर हिऱ्याला अधूनमधून - निष्फळ नि वरवरची, दिखाव्याची का होईना, परंतु - ओरड करण्याइतपत भाव?)

आणि, केवळ 'परसंस्कृतीचा आदर' म्हणून इमोशनल ब्लॅकमेल केल्याने का राणी लगेच खिशातून कोहिनूर हिरा काढून देणार आहे, की बाळांनो, हा घ्या, पण आपसात भांडू नका; सारख्या आकाराचे तुकडे करून शहाण्या मुलांसारखे वाटून घ्या म्हणून?

इंग्लंडच्या राणीकडून येनकेन प्रकारेण तो हिरा हस्तगत करण्याचा संभाव्य मार्ग यांच्यापैकी एकाजवळही नाही. नुसत्या अधूनमधून मागण्या करायला जातेय काय? डोमेस्टिक कंझंप्शनसाठी दिखावा नुसता!

(आणि, हस्तगत करायच्या अशा एखाद्या वर्केबल मार्गाअभावी, Finders Keepers, Losers Weepers हे इंग्रजी सुभाषित या मंडळींपैकी कोणीही ऐकलेले नाही काय?)

नाही, पण सीरियसली... हा कोहिनूर हिरा सपोज़ेडली इतका अभद्र आहे ना? की जेणेकरून तो धारण करणाऱ्याला लाभत नाही, नि रसातळाला नेतो? मग हवाय कशाला आपल्याला हा हिरा? त्यापेक्षा, ते पाकिस्तान त्यावर दावा करते आहे ना? मग घेऊ द्यात की पाकिस्तानला! आपण वाटल्यास त्यांचा दावा उचलून धरू! डायरेक्टली सुंठीवाचून खोकला जाईल. पाकिस्तानला हवा असलेला कोहिनूर मिळेल, नि आपलाही परस्पर प्रॉब्लेम सुटेल. दोघांकरिताही एकदम विन-विन सिच्युएशन!

- -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यानंतर पाकिस्तानने तो हिरा चीनला द्यावा असा दबाब पाकिस्तानवर आणता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टाकलं आहे. कुणी वाचलं आहे का?
Inner World by Sudhir Kakkar.
- The Inner World: A Psychoanalytic Study of Hindu Childhood and Society (Oxford India Paperbacks) | Sudhir Kakar |
( Why do Indian men make such lousy lovers?)
download link
https://b-ok.asia/book/980696/72ccae

----------------------------------
Socialite Evening s - Shobha De.
वाचलं. अती श्शरीमंतांचे आयुष्य आणि प्रश्न. लग्न हे एक. पारट्या, कपडे, चालवत ठेवलेली लफडी. ठीक. शोभाचं हे पहिलं पुस्तक. सेक्स हा विषय आलाच पाहिजे. स्वत:बद्दलही लिहिलंय पण ओटोबायो म्हणावे का?
नंतर बरीच लिहिलीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२० वर्षांपूर्वी, मला शोभा डे चं 'सल्ट्री नाईटस' आवडल्याचं आठवतय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गेले अनेक आठवडे ऑडिओ बुकवर अभिजीत बॅनर्जी आणि एस्थेर दुफ्लोंचं 'Good Economics for Hard Times' वाचत्ये. तांत्रिक विषयांवर पुस्तक लिहावं तर ह्या दोघांसारखं. आपली बांधिलकी तळागाळातल्या लोकांशी आहे, आणि सत्ताधारी, पैसेवाले, बुद्धिवादी, हस्तिदंती मनोऱ्यांत राहणाऱ्या लोकांशी नाही, आपणही ह्या लोकांमधले एक असलो तरीही, हा त्यांच्या पुस्तकांचा एक स्थायीभाव. 'Poor Economics'मध्येही ते दिसतं.

त्यांची पुस्तकं फक्त अर्थशास्त्राबद्दल नाहीत. शिकलेल्या लोकांनी आपल्या बुद्धी आणि त्यातून मिळालेल्या सत्तेचा कसा वापर करावा, ह्याची उत्तम उदाहरणं आहेत.

(सध्या इतर काही कामांमुळे पुस्तक पूर्ण करायला वेळ लागतोय. आणखी ८-१० दिवसांत ती परिस्थिती सुधारावी.)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रविवार, 08/11/2020 - 21:14.
Economists do not really write books, least of all books human beings can read. - प्रस्तावनेत आहे.
हे आवडलं.
Economists do not really write books, least of all books human beings can read. - प्रस्तावनेत आहे.
हे आवडलं.
--------------;
वाचलं. आवडलं. इकॉनॉमिक्स विषयावर हे पहिलंच पुस्तक वाचतोय त्यामुळे तुलना वगैरे इतर पुस्तकांशी करता येणार नाही. ओक्टोबर २०१९ मध्ये प्रकाशित आणि तोपर्यंतच्या घटनांचा उल्लेख आहे. युएस, युअरोप देश,चीन,भारत, बांगलादेश, मेक्सिको देशांत केलेल्या सर्वेक्षणांची आणि इकॉनमींची चर्चा आहे. ( क्यानडा,सो रशिया, ओस्ट्रेलिया नाही.) राजकीय योजनांबद्दलही लिहिले आहे. गरीबी हटाव साठी कोणते देश काय करत आहेत, काय योजना जाहीर झाल्या, किती यश आले हे विवरण आहे. लेखक अभिजित आणि एस्थर अशा एका गरीबी हटाव योजनेला वाहिलेल्या संस्थेसाठी ( J -PAL) कामही करतात आणि २०१९चे नोबल पारितोषिक(एस्थर आणि एक सहकारीसह) मिळाले आहे. पुस्तकाची भाषा, छोटी प्रकरणं यामुळे वाचनीय झाले आहे. कामासाठी देशांतरण, त्याचा स्थानिक जनतेच्या कामावर परिणाम डिमांड-सप्लाई तत्वाला छेदतो का हे आहे. देशांच्या इकॉनमी, ग्रोथ, परस्पर व्यापार , वाढते उद्योग आणि ग्लोबल वॉर्मिंग आणि भवितव्य तपासले आहे. देशांतर्गत उद्योग कसे चालतात किती नफ्यातोट्यात चालवले जातात याची तुलना दिली आहे. गरीबी दूर करण्याचे उपाय आणि ट्याक्सेशन किती परिणामकारक झाले तेही आहे. गरीबी हटवण्याच्या उपायांकडे गरीब लोक कसे पाहतात हे आहे. रोखीची मदत योग्य का वस्तुंची?
एकूण पुस्तक भारी.
-----
अभिजितच्या वडलांचे नाव विनायक ?दिपक? यात गोंधळ वाटतोय. (पुस्तकाशेवटी आणि विकिपानही.)
------------
पुस्तक सुचवल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचलाच नव्हता पूर्वी. मस्त लिखाण आहे. If only they could talk सुरु केलंय, त्यात इंग्लंडच्या निसर्गरम्य खेड्यात राहणाऱ्या व्हेटर्नरी डॉक्टरच्या मदतनीसाचे गमतीशीर अनुभव आहेत, लहान लहान पीस मध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे डोक्याला ताप नाही. इतर पुस्तकांच्या अधेमध्ये वाचायला म्हणून भारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्या नरेंद्रसिंग सरीला याचं "the shadow of the great game" हे भारताच्या फाळणीवरचं रोचक पुस्तक वाचतोय. फाळणी हे मध्यपूर्वेतील तेल साठे नियंत्रणाच्या लालसेने रचले गेलेले आंतरराष्ट्रीय कारस्थान होते असा साधारण निष्कर्ष दिसतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता

Sounds like a conspiracy theory!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

India Today magazine, 30 November 2020 issueमध्ये पुस्तक परिचय आला आहे.

The Loss of Hindustan , The invention of India. By
Manan Ahmed Asif.
Harvard University press.
Publication date 20 November 2020.
ISBN 9780674249844
9780674249845
9780674249868

z-lib.org वर pdf आहे.

(जम्बुद्वीप - भरतवर्ष -) हिंदुस्तान - हिंदुस्थान - ब्रिटिश इंडिया - इंडिया - भारत हा प्रवास कसा झाला हे आहे. हे वाचातो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी सध्या पी. साईनाथ यांचं Everybody Loves a good drought वाचते आहे.
त्यात सरकारी प्रकल्प राबवताना काय काय होतं याची अनेक उदाहरणे आहेत. खरंतर या पुस्तकाचं नाव "The Book of Irony" असं असायला पाहिजे होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नुसत्या बोटे,कोथळा,हत्ती, घोडे, इत्यादींच्या वीररसप्रधान गोष्टी म्हणजे इतिहास या समजात बरीच वर्षे वाया गेली. ऐतिहासिक घटना सनावळ्या तोंडपाठ असण्यापेक्षा त्या काळाचे, घटनांचे interpretation करणे म्हणजे इतिहास हे थोडे उशिरा कळले.
परवा संजय शुभ्रमण्यम यांनी संपादित केलेल्या "The Mughal State" या पुस्तकातला Karen Leonard यांचा "The Great Firm Theory" हा लेख/शोधनिबंध वाचला. भन्नाट आहे !! (प्रामुख्याने) मुघल, मराठा सत्तांचे पतन आणि इस्ट इंडिया कंपनीचा उदय यासाठी अनेक कारणे दिली जातात, लष्करी, सामाजिक, वैज्ञानिक, सम्राट आणि सरदार वर्गातले संबंध, वगैरे. पण लेखिकेने या सत्तांच पतन आणि तत्कालीन कर्जे देणारे सावकार, बँकिंगच्या पूर्वसुरी म्हणता येतील अश्या पतपेढ्या, यांचा परस्परसंबंध उलगडून दाखवलाय.
मुघल किंवा इतर सत्ताना या खाजगी सावकारांकडून वेळोवेळी कर्ज घ्यावे लागे. जोपर्यंत राजकीय स्थिरता होती तोपर्यंत सत्ता आणि सावकार यांच्यात सुरळीत चालले होते. लेखिकेच्या मते मुघल साम्राज्य आर्थिकदृष्ट्या १६५० -१७५० या कालावधीत खिळखिळे होत गेले. वाढत्या लष्करी मोहिमात साधनसामुग्रीवर ताण येत असे किंवा ती ताब्यात असणारे गट (इथे बंकेर्स) strong होत. शिवाय या बँकर्सना नव्याने उदयाला येणाऱ्या सत्ता (मराठा, इंग्रज) हे पर्याय पण उपलब्ध झाले. त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढून मुघल नोकरशाही त्यांच्यावर अधिक अवलंबून राहू लागली.
मुघल राज्यात जशी अनिश्चितता, परतफेडीची खात्री वाटेनाशी झाली तसे या पेढ्या मुघल राज्यातून दुसरीकडे स्थलांतर करून तेथील स्थानिक सत्ताधीश(मराठा, नवाब) यांच्याशी जुळवून घेऊ लागल्या. याचे सणसणीत उदाहरण म्हणजे महाराजांच्या सुरतेवरच्या स्वाऱ्या. औरंगजेब आपले रक्षण करू शकत नाही या भावनेने इतरत्र स्थलांतर होऊ लागले. महाराजांनी सुरात लुटताना एवढा खोलवर विचार केला होता कि नाही हे माहित नाही पण जर केला असेल तर त्यांना दाद द्यावी लागेल.
सावकार आणि सत्ता यांच्यातील बदलत्या संबंधांचे उदाहरण द्यायचे झाले तर, १७०२ साली औरंगजेबाने मागितलेले बिनव्याजी कर्ज द्यायचे या पेध्यानी नाकारले. पुढच्या काळात या पेढ्याना करवसुलीचे अधिकार मिळाले परिणामी सत्तेचे त्यांच्यावरील नियंत्रण अधिक कमजोर झाले. हे लोक राजकीय प्रक्रियेत भाग घेऊ लागले. जगतसेठ ने इंग्रजांना बंगाल घेण्यासाठी कशी मदत केली हे उदाहरण आहेच.एत्तत्देषीय सत्तांपेक्षा इंग्रजांशी संबंध ठेवणे यांना अधिक सुरक्षित वाटू लागले परिणामी भांडवल पुरव्ठ्याभावी त्यांना लुटालूट करण्यावर अधिका अवलंबून राहावे लागू लागले. राजकीय अस्थिरता वाढली.
त्या काळात चीन मध्ये पण अशा पेढ्या होत्या पण तेथील सत्तेने त्यांना स्ट्रिकट कह्यात ठेवले होते. त्यांच्या 'flying money (हुंडी सदृश्य) या व्यवहारावर कडक नियंत्रण ठेवले. परिणामी अश्या फर्म्स ह्या त्यांच्या प्रशासन प्रणालीचा भाग बनून राहिल्या. मुघल मराठा सत्तांनी या व्यापारी फोर्सेसना कह्यात ठेवण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे इंग्रज इथे स्थिरावले. इंग्रजांनी काही वर्षात या बँकिंग फर्म्सचे अधिकार मर्यादित केले.

आपल्या इथे राजवाड्यांपासून बेडेकर यांच्यापर्यंत इतिहासकारांची दैदिपयमान परंपरा आहे. कष्ट बुद्धिमत्ता झोकून काम करणे यात हे लोक अजोड आहेत. पण महाराष्ट्रातील इतिहास लेखनाला जात धर्म व प्रादेशिक अस्मिता यांचा एक रंग असतो(तसा असायला आपली काही हरकत नाही) या मोठ्या माणसांनी केलेलं काम वाचण्याबरोबरच ज्याला सैलपणे ग्लोबल म्हणता येईल(मी ह्या शब्दप्रयोगाबद्दल निसचिंत नाही) अशा धारणेतून लिहिलेला इतिहास वाचला तर आपलं इतिहासच भान अधिक व्यापक होईल का असा एक प्रश्न मनात येऊन गेला. See lessMugha Statel

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक3
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता

आपल्या इथे राजवाड्यांपासून बेडेकर यांच्यापर्यंत इतिहासकारांची दैदिपयमान परंपरा आहे. कष्ट बुद्धिमत्ता झोकून काम करणे यात हे लोक अजोड आहेत. पण महाराष्ट्रातील इतिहास लेखनाला जात धर्म व प्रादेशिक अस्मिता यांचा एक रंग असतो(तसा असायला आपली काही हरकत नाही) या मोठ्या माणसांनी केलेलं काम वाचण्याबरोबरच ज्याला सैलपणे ग्लोबल म्हणता येईल(मी ह्या शब्दप्रयोगाबद्दल निसचिंत नाही) अशा धारणेतून लिहिलेला इतिहास वाचला तर आपलं इतिहासच भान अधिक व्यापक होईल का असा एक प्रश्न मनात येऊन गेला.

- Submitted by छिद्रान्वेषी.

मराठी पुस्तक प्रकाशन आणि खप याविषयात प्रकाशकांचा अनुभव वेगळा असल्याने शुद्ध सांगोपांग इतिहास पुस्तक छापणे आतबट्ट्याचे ठरत असणार.शिवाय राजकीय विरोध भयानक आणि एकांगी ठरतो.
जेम्स लेन याने भांडारकर संग्रहालयातल्या कागदपत्रांवरूनच नोंदी केलेल्या पुस्तकास विरोध होऊन जाळपोळही झाली. शहाजी - जिजाऊ पत्रव्यवहार सापडला नव्हता. तशी नोंद केली ती आवडली नाही म्हणतात. पुस्तक मी वाचले नाही पण काही बातम्यांतून तसे कळले.

बाकी इंग्रजी लेखकांची पुस्तकं आहेत या घराण्यांची भरभराट आणि पडझडीवर उजेड पाडणारी. त्यासाठीचे आधार ASI च्या दिल्लीच्या संग्रहालयांतूनच मिळतात. William Dalrymple ( जयपूर फेस्टिवलवाला) हे एक नाव. सतत वीसेक वर्षं तिथे जातो. एकदा खूप कागदपत्रं भिजलेली वरांड्यात वाळत घातलेली. जागा कमी म्हणून कपाटं बाहेर आणि वरांडा उघडा. दिल्लीच्या बेरहमी पावसाने भिजवून टाकली - पंधराव्या सोळाव्या शतकातील. गेली बिचारी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एडा लवलेस बद्दल एक छोटेखानी -सतरा पानांची - पुस्तिका
https://ia801609.us.archive.org/33/items/AdaLovelace-PoetOfScience-Marat... इथून डाऊनलोड करून वाचली.
Thanks to Mr Prabhakar Nanavati Sir

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बुकगंगेवर मुशाफिरी करताना हे रत्न सापडलं.
केवळ ट्रेलर वाचला आहे, पण पुस्तक संग्राह्य वाटतंय.
https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5033591362126621350

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कसं मिळालं हे रत्न?त्यासाठी एखादा 'कांधे का तिल' असतो का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शरंदाम्पत्य ! अर्थात serendipity

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

औट ऑफ ष्टॉक आहे. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

'आजचा सुधारक'मधला आशिष महाबळचा शेतमालाच्या जनुकीय तंत्रज्ञानसंबंधित लेख वाचण्यासारखा आहे. शेतीचे आणि पर्यायाने आपले भवितव्य

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आजपासून लोकसत्ताच्या शनिवारच्या बुकमार्क विभागात नवं पाक्षिक सदर सुरू झालं आहे - अवकाळाचे आर्त. विषय आहे डिस्टोपियन साहित्य. नंदा खरे आणि सोबत मेघना भुस्कुटे, आदुबाळ, नंदन, मी आणि इतर काही जण काही अभिजात पुस्तकांविषयी लिहिणार आहेत. पहिला लेख आज प्रकाशित झाला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सखाराम बाइंडर, (तेंडुलकर)
सागत्ये ऐका,
उचल्या,(माने)
Down and out in London, ( Orwell)
The white tiger ( Adiga ),
कोणत्या प्रकारात येतील?
.लोकसत्ता लेख वाचला.
उपक्रम आवडला.
.लेखातले पुस्तक (ecotopia)उतरवले. वाचेन लवकरच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सखाराम बाइंडर, (तेंडुलकर)
सागत्ये ऐका,
उचल्या,(माने)
Down and out in London, ( Orwell)
The white tiger ( Adiga ),
कोणत्या प्रकारात येतील?

ही पुस्तकं एकत्र पाहण्यामागचा मुद्दा कळला नाही. डिस्टोपियन साहित्यात ही येणार नाहीत. त्या वर्गवारीत बसण्यासाठीचे निकष विकीपीडियावर असतील बहुतेक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मला वाटलं ही बसतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'Merissmatic' केलं नसतं तर Ecotopia बोरिंग आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटलं ही बसतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Submitted by चिमणराव on गुरुवार, 11/02/2021 - 17:44 नारळीकर मंडळ अध्यक्ष या बातमीने आणि त्यास विरोध हे बाजूस ठेवून त्यांची काही पुस्तकं ,कथा वाचायला घेतल्या आहेत.
रिटन ओफ वामन, लाइटर साइड ओफ ग्रावटी.
------------
रिटन ओफ वामन - काही खास वाटलं नाही. खूप गडबड गोंधळ आणि सस्पेन्स , नाविन्य वाटले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

JNU STORIES
( लेखांचे संकलन, जेएनयु, ६६०पाने,दोनशे+ चित्रे, Aleph - Rupa प्रकाशन २०२०) योगेंद्र यादव, अभिजित बानर्जी,कन्हैया यांचेही लेख आहेत. रिव्यु - India Today 15 Feb अंकात)
वाचायला घेतलं आहे.

जेएनयु बांधण्याअगोदरची जागा, आराखडा इत्यादी पासून ते आतापर्यंतचा आढावा , फोटो आहेत. परिसरातल्या पक्ष्यांचेही फोटो आहेत.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजच्या 'लोकसत्ता'च्या लोकरंग पुरवणीत माझा लेख आला आहे - भाषेचं राजकारण आणि विदाविज्ञान

संशोधक आणि 'ब्लॅक एआय' चालवणारी तिनमित गेब्रू, आणि एमिली बेंडर आणि त्यांच्या समूहानं घेतलेल्या संशोधनाच्या आढाव्याची ही मराठीत करून दिलेली ओळख.

मूळ पेपरचा दुवा - Stochastic Parrots

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पलिकडचा विषय आहे. सोडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठी साहित्य .....
http://marathisahitya.blogspot.com/?m=1
पुढे लेखकाने दुसरी उघडली का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिरकस आणि चौकस: दि पु चित्रे
झुंडीचे मानसशास्त्र: विश्वास पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

ॲन अमेरिकन सनराइझ पोएम्स - हे पुस्तक वाचते आहे.

The heart is a fist.
It pockets prayer or holds rage.

- इंडिअन अमेरीकन पोएट लॉरीएट - जॉय आर्जो (पुस्तक - ॲन अमेरिकन सनराइझ पोएम्स्)

What we speak always returns,
With a spike of barbs Or
the sweet taste of berries in summer

- इंडिअन अमेरीकन पोएट लॉरीएट - जॉय आर्जो (पुस्तक - ॲन अमेरिकन सनराइझ पोएम्स्)

जॉय आर्जो. तिच्या कविता आवडतात. निसर्ग, स्पिरिच्युॲलिटी आणि वेदनेचा प्रवास. तिला विचारले की कोणत्या कवितेपाशी तू दर वेळी येउन थबकतेस? तेव्हा तिने सांगीतले - ॲड्रिअन रिच यांची Diving into the Wreck
म्हणुन मग मी ती कविता वाचली. आणि मला कळलं - हे जे जहाज फुटलेले आहे, हा जो जहाजाचा भग्न अवशेष आणि पसारा आहे तो आहे - अमेरीकन इंडिअन यांचा इतिहास, परकियांनी आक्रमण करुन त्यांना पळवुन लावले, त्यांच्या मुलाबाळांवर अत्याचार झाले, त्यांच्या मुलाबाळांवरती परकीय धार्मिकता थोपली गेली, त्यांना बेघर केलं गेलं. तो wreck. हे मला फक्त ॲड्रिअन यांची कविता वाचून कधीच कळलं नसतं. आणि कदाचित ॲड्रिअन रिच यांनी त्या कॉन्टेक्स्ट मध्ये ती कविता लिहीलीही नसेल.पण जॉय आर्जो यांनी त्या कवितेला ज्या संदर्भाची चौकट दिली त्यामुळे ती कविता उठावदार झाली, स्पेशल!

I came to explore the wreck.
The words are purposes.
The words are maps.
I came to see the damage that was done
and the treasures that prevail.

______________
वरिल पुस्तकातील - A REFUGE IN THE SMALLEST OF PLACES कविता या लिंकवरती सापडेल. सुंदर आहे. एक जरी कविता कळली तरी छान वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल हा ब्लॉग सापडला. ब्लॉगर टॅलंटेड आहे, सध्या तोच वाचते आहे. एकदम हटके स्टाइल आहे. तिच्या काही टेस्टीमोनिज इतक्या मस्त आहेत , कपल ऑफ देम -

“Andrea is both the forest fire and firefighter. A revelation, she’s a living, breathing hug for your heart. ........'

'“Word Weaver. Magic Maker. Divine Guru. Deep Diver. Community Builder. The very best blend of beauty and brains and sizzling creative anarchy..................'

Beastly thing! Andrea will raid your closet and wear all your stuff. She’ll march right into your head, grab your best sweater, stretch it all out, and hang it up in her own Rebelle Society closet; and then have the audacity to magic-marker your name on the neck tag! .............

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नुकतेच द स्पाय अँंड द ट्रेटर हे पुस्तक वाचून(ऐकून) संपवले. शीतयुद्धाच्या काळात फितूर झालेल्या एका रशियन गुप्तहेराची अत्यंत थऱारक कहाणी. गुप्तहेरकथा, राजकारण किंवा टाईमपास स्वरुपाचे लेखन आवडणाऱ्या माझ्यासारख्या वाचकांनी अवश्य वाचण्यासारखे पुस्तक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. किंडलस्वरूपात उपलब्ध आहे काय?
२. असल्यास, केवढ्याला आहे?
(३. लेखक कोण आहे?)

(या जॉन्रचा खास शौकीन जरी नसलो, तरी, कधीमधी वाचायला आवडू शकतात. खास करून जर स्पाय सटायर प्रकारातील असतील तर - जसे, 'अवर मॅन इन हवाना', किंवा 'द स्पाय हू डाइड ऑफ बोअरडम', वगैरे - पण कधीमधी रेग्युलर हेरकथासुद्धा वाचायला आवडतील, असे वाटते. मात्र, ऑडियोबुक हा प्रकार जमेलसे वाटत नाही. तितके कॉन्संट्रेशन मजजवळ नाही, आणि पन्नासदा लक्ष विचलित झाल्याने मधला हुकलेला भाग परत ऐकण्यासाठी ऑडियोमध्ये पुढेमागे करण्याइतका पेशन्स नाही. शिवाय तसे करावे लागले तर मग रस उडतो. त्यापेक्षा छापील किंवा किंडल बरे. खरे तर छापील आदर्श - कारण त्यात मग आमच्या लाडक्या रँडम ॲक्सेस पद्धतीने वाचता येते - परंतु हल्ली किंडलकडे कल वाढलेला आहे. एक तर ताबडतोब मिळते, सदैव जवळ असते, नि कोठे जागच्या जागी ठेवावे लागत नाही. असो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे पाहा. $15 मध्ये मिळेल. कदाचित तुमच्या लायब्ररीत फुकटात उपलब्ध असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार.

----------

(घेतले.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कसे वाटले ते वाचून झाल्यावर सांगा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी दोन महिन्यापूर्वी ऑडिबल वर क्रिस बेलीचे हायपर फोकस हे पुस्तक ऐकले. ऑडिबलमुळे नॉन फिक्शन कॅटेगरीतल्या पुस्तकांचे चालायला जातान, इतर कामं करताना, झोपण्यापूर्वी रॅपिड रिडींग/लिसनिंग चांगले जमते. पण खोलात जाऊन वाचायचे असल्यास छापिल पुस्तक / किंडल लागते. कारण काही वेळ मुद्दा कळायला २-३ पानं पुन्हा मागे जाऊन, थोडं थांबून, विचार करावा लागतो. तेव्हा कुठे मुद्दा समजतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0