बागेतून ताटात - प्रयोग ४ : टोमॅटो, बेसिल

बागेतून ताटात - प्रयोग १ : भोपळा
बागेतून ताटात - प्रयोग २ : पालेभाज्या
बागेतून ताटात - प्रयोग ३ : मायक्रो -ग्रीन्स

१. कच्च्या टोमॅटोची चटणी :
टोमॅटो तर आपला नेहमीच हक्काचा शिलेदार. ४-५ वर्षांपूर्वी माझ्या खाणेबल बागकामाची सुरुवातच टोमॅटोने झाली होती. तेव्हा कुंडीत असूनसुद्धा भरपूर फळं धरली होती.  तर ह्यावेळेस जमिनीत बिनधास्त येईल म्हणून १ बिग बॉय आणि एक बाजारातून आणलेल्या टोमॅटोचं बी पेरलं. फेब- मार्च मध्ये पेरायला हवं होतं खरंतर पण उशीर झाला - मेमध्ये पेरलं. दोन्ही रोपं मस्त वाढली. सुरुवातीला फुलं गळून गेली, नंतर फळं धरली पण दोन्ही झाडांत मिळून फक्त २०-२५ टोमॅटो मिळाले. बिग बॉय अजून आहे, फुलं येतात पण गेल्या महिन्याभरात एखादंच फळ मिळालंय. बघू. 
तर गम्मत अशी झाली, जेव्हा बिग बॉयला पाहिलं फळ धरलं तेव्हा रोज उठून ते पिकलंय का बघत होतो. गणपतीचे दिवस होते, म्हटलं पहिल्या फळाचा नैवेद्य दाखवू गणपतीला. एके दिवशी सकाळी फळ पिकलेलं दिसलं पण ते आमच्या आधी पक्ष्याला दिसलं होतं. अर्धा टोमॅटो पक्ष्याने खाऊन टाकलेला. म्हटलं किती छान - निसर्गाला नैवेद्य दाखवला गेला. 
पण मग असं वारंवार होऊ लागलं - टोमॅटो जरा केशरी/ लाल होऊ घातला की पक्षी खाऊन टाकायचे. म्हणून टोमॅटो कच्चे असतानाच काढले आणि कच्च्या टोमॅटोची चटणी केली. 
साहित्य :
कच्चे टोमॅटो, भाजलेल्या तीळाचं कूट, मिरची, मीठ, गूळ, तेल.
कृती:

 1. थोड्याशा तेलावर मिरची आणि कच्च्या टोमॅटोच्या फोडी परतून घेणे. 
 2. परतलेले मिश्रण तीळकूट, मीठ आणि गूळ घालून मिक्सरवरून वाटून घेणे. 
 3. आवडीनुसार किंवा उपलब्धतेनुसार कोथिंबीर घालणे. 

ही चटणी पोळीबरोबर किंवा नुसतीच इटुक-मिटुक चाटून खायला छान लागते. नंतर आमच्या बागेत येणारे पक्षी टोमॅटो खाऊन कंटाळले बहुतेक. झाडावर पिकलेले लाल टोमॅटो आमच्या घरातल्या छोट्या माणसाने आवडीने खाल्ले.  
1

२. बेसिलची चटणी - सॅण्डविच : 
ट्रेडर जोज् नावाच्या वाणसामान मिळणाऱ्या दुकानात बेसिलच्या कुंड्यापण विकतात. तिथून आणलेला बेसिल चांगला तग धरून आहे. आठवड्यातून एकदा त्याची पाने खुडते आणि सलाड किंवा सँडविचमध्ये वापरते. 
पेस्तोच्या मूळ रेसिपीत पाईन नट्स, ऑलिव्ह ऑइल वापरतात. हे माझं व्हर्जन : ताजाच करून ब्रेडला लावून खाल्ला जातो. 
साहित्य : 
१ कप बेसिलची पाने धुवून, २ मोट्ठे चमचे लसणाच्या पाकळ्या सोलून, अर्धी वाटी बदाम , मीठ, मिरीपूड, पाणी.  
कृती : 

 1. वरील सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकसारखं वाटून घेणे. 
 2. हव्या त्या ब्रेडचे ( मला सावरडो आवडतो ) स्लाइस करून त्यावर पेस्तो, टोमॅटो, बेसिलची पाने, अवकाडो, चीज इत्यादी रचून खाणे. 

2

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

खूपच आभार.

आमच्या घराजवळच्या चर्चात त्यांनी सार्वजनिक बागकामासाठी जागा भाड्यानं दिली असावी. ख्रिसमसच्या सुमारास इथले टोमॅटो, बाझिल वगैरे सगळे येशूला प्रिय झालेले असतात. ह्या बागेतली टोमॅटोची झाडंही अशीच गतप्राण झालेली होती. पण तिथे चिकार टोमॅटो झाडांवर होते. काही फळं अतिथंडीमुळे खराब झाले होते. पण जेवढे बरे दिसले तेवढे आम्ही दोघींनी घरी आणले. शिवाय खराब झालेले उचलून वाफ्यात टाकले. तेवढंच कंपोस्ट.

हे टोमॅटो किती, कसे पिकतील याबद्दल मला शंका आहे. त्यांची चटणी करून पाहते.

सध्या थंडीमुळेही तुमच्याकडे फार फळं धरत नसतील.

आमच्याकडे फार्मर्स मार्केटात पीकान आणि तेलाजागी पार्मेजान घालून पेस्तो मिळतो. आम्हांला आता त्याचीच सवय झाल्ये. तो पेस्तो आमचं तूप झालं आहे. खाईन तर त्याच पेस्तोशी...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वर सांगायचं विसरले, उरलेली चटणी फ्रिजात ठेव. माझी एकदा बाहेर राहिली आणि कडवट झाली. बाकी फार्मर्स मार्केट वगैरे "गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी" मध्ये जमा झालेय :) 

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

अजून एक म्हणजे कच्च्या टोमॅटोची कोशिंबीर पण चांगली होते. भिजवलेली मूग डाळ, मीठ-साखर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून. पाहिजे तर कढीपत्त्याची फोडणी देऊ शकतेस. 

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

पेस्तोमध्ये लसूण! शहारलो! Smile
लसणामुळे बेज़िलच्या वासावर कुरघोडी होत नाही?

मी करतो ती कृती अशी - बेज़िल पानं, पाइन अथवा अक्रोड, मीठ, मिरपूड, थोडं ऑलिव्ह तेल एकत्र वाटून घ्यायचं. पास्ता त्यात घोळवताना पारमाजान चीज़ भुरभुरवायचं.
----

बाकी ह्या बागताटमालिकेसाठी आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या फार्मर्स मार्केटातही लसणीसहित पेस्तोच मिळतो. ठ्ठासून बाझिलही असतो त्यात.

आता पाव वगैरे खायचे दिवस कमीच असतात. त्यामुळे टोमॅटोच्या कापांमध्ये मोझारेला सँडविच करायचं आणि मध्ये पेस्तो भरून खायचं, असा माझा रिवाज. बरा अर्धा खातो पावसुद्धा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ह्यावरून एक प्रसंग आठवला.
यूके टेलीवर This Morning नामक कार्यक्रमात हॉली आणि फिल हे दोघे सूत्रधार असतात. जीनो दाकाम्पो हा नावाजलेला इतालियाई आचारी त्या कार्यक्रमात त्याच्या मायदेशातल्या पाककृती दाखवतो. बरेचदा गमतीगमतीत इतालियाई खाद्यसंस्कृतीसंबंधीच्या अस्मिता चेतवल्या जातात. अशाच एका प्रसंगी जीनोने एक पास्ता बनवला तेव्हा हॉलीने 'ह्यात हॅम घातलं, तर चव ब्रिटिश कार्बोनारासारखी लागेल' म्हणल्यावर जीनोने काय म्हणाला ते पाहा. Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जिनोचा मूलभूत अपमान झालाय .... Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आवड आपली आपली Smile
मी इथून रेसिपी उचलली आणि त्यात थोडे बदल केले. 
पण खरंय. हा पेस्तो नाही आणि मी पास्त्यात घालून कधीच खात नाही. मी वर बेसिलची चटणी म्हणायला हवं  होतं. करते संपादन. 

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

टोमॅटोची चटणी करुन बघेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0