जी-८ रहस्यकथा (मीर बहादुर अली) : एक धावती ओळख

#संकल्पनाविषयक #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

जी-८ रहस्यकथा (मीर बहादुर अली) : एक धावती ओळख

- धनंजय

मीर बहादुर अली यांची "जी-८ रहस्यकथा" दुहेरी विधा (genre) लेखनाचे उदाहरण आहे. एक विधा आहे पत्रव्यवहार (epistolary) कथा, दुसरी विधा आहे रहस्यकथा (mystery). आजच्या काळात वैयक्तिक कागदोपत्री पत्रव्यवहार नाहीसा झालेला आहे. त्यामुळे कादंबरीचे प्रकरण व्हावे असे मोठाले विवरणात्मक पत्र आजकाल कोणी लिहीत-वाचत नाही. परंतु आजही बराचसा वैयक्तिक संवाद लेखीच असतो. जवळच्या मित्रांमध्येसुद्धा आमोरासमोर भेटीगाठी-फोनसंवाद कमी, मेसेजिंग-चॅट अधिक होतात. त्यामुळे खऱ्याखुऱ्या आयुष्यात बित्तंबातमीची देवघेव लेखी संवादातून झाली असेल, यावर आपण सहज विश्वास ठेवू शकतो. मेसेजिंग त्रोटक असते, तशा तुटपुंज्या आलेखातून वाचकापर्यंत कथानकाचे सूत्र पोचवणे कठिण आहे. अधूनमधून एखाद्या लांब कार्यालयीन रिपोर्टवजा ईमेलने स्थल-काल-परिस्थितीचे वर्णन करण्याची लेखकाची युक्ती डोकेबाज आहे.

रहस्याचा गौप्यस्फोट न करता कथावस्तू अशी आहे : २०२० सालाच्या सुरुवातीला पुण्यातील भाषाशास्त्राचा एक प्राध्यापक एका परिषदेकरिता अमेरिकेला जातो. सोय म्हणून बॉल्टिमोर येथील आपली डॉक्टर बहीण आणि पशुवैद्य मेहुण्याच्या घरी त्याचा मुक्काम असतो. कोव्हिड-१९ साथीच्या सुरुवातीला विमानसेवा तडकाफडकी बंद झाल्यामुळे तो तिथेच काही काळासाठी अडकतो. त्याने आपल्या भारतातील मित्राला लिहिलेल्या मेसेजेसमधून वाचकाला कथा समजते. मेहुण्याच्या अश्ववैद्यकाच्या प्रॅक्टिसच्या संदर्भात एक अनाकलनीय घटना -- एक अजब अफरातफर घडते. रेसच्या घोड्यांचे प्रजनन नरमादीच्या प्रत्यक्ष शरीरसंबंधानेच घडले पाहिजे, या नियमाला अमेरिकन जॉकी क्लबने कोव्हिड-१९ इमर्जन्सीकरिता अपवादा‍त्मक सूट दिलेली असते. ___च्या अमीराच्या घोड्याच्या पागा मेरीलँड राज्यात असतात, तिथला नर (GeeAteExpectaction, "G-8") अनेक कर्मचाऱ्यांसह दूर केंटकीला नेण्याऐवजी कृत्रिम वीर्यसेचनाची (artificial inseminationची) अनुमती दिलेली असते. मात्र काही महिन्यांनी त्या वीर्यातून फलन झालेले शिंगरू जन्मल्यावर हा धक्कादायक शोध लागतो की ते अमीराच्या मेरीलँडमधल्या घोड्याचे जनुकीय अपत्य नसतेच! तोतया वीर्यदाता घोडा, वीर्याच्या ट्यूबची अदलाबदल, मादी व शिंगराच्या मालकाकडून खोटेपणा, वगैरे, अशा अनेक सबळ शक्यतांचा पाठपुरावा उत्कंठावर्धक, तरी निष्फळ ठरतो. तरी भाऊ-बहीण-मेहुणा परस्परपूरक ज्ञान एकत्र आणून शेवटी कोडे सोडवतात. (शेवटी कोडे सुटते, असे इतके मोघम सांगणे हे स्पॉयलर नाही.)

कथानकातले काही तपशील अपरिहार्यपणे कोव्हिड-१९ साथीशी गुंतलेले आहेत. तरी ही कोव्हिड-कथा आहे, असे म्हणणे वावगे ठरेल. रेसच्या घोड्यांच्या प्रजननाचे बाजारशास्त्र आणि जनुकशास्त्र या दोहोंची तत्त्वे कथेतल्या गुन्ह्याच्या आणि तपासाच्या मुळाशी आहेत -- आणि सध्याच्या ज्ञानानुसार घोड्यांना कोव्हिड-१९ रोगाची लागण होत नाही! त्यामुळे कोव्हिड-१९चे आज जळजळीत वाटणारे संदर्भ उद्या जेव्हा शिळे होतील, तेव्हाही रहस्यकथा म्हणून ही स्वतंत्रपणे टिकू शकेल.

दुहेरी विधा या कथेचे बलस्थान आहे, की लेखकाने बळेच अंगावर घेतलेले ओझे आहे? याबाबत मी अजून हो-की-नाही यांच्यात झुलतो आहे. भारतातला मित्र गुन्ह्यात किंवा उकलीत भाग घेत नाही – पत्रव्यवहारतला भागीदार म्हणून भाव खाणारे पात्र रहस्याच्या कथानकाचे कितपत पोषण करते? असा प्रश्न मला आधी पडला. तरी या मित्राशी स्वतंत्र संवाद केल्यामुळे निवेदकाचे पात्र खुलते; मित्राच्या पात्राचे हे मोठे मूल्य मान्य केलेच पाहिजे.

पत्रव्यवहारात केवळ उल्लेखाने अवतरणारी, रहस्यकथेकरिता प्रमुख असणारी बहीण-मेहुण्याची पात्रे द्विमिती (flat 2-dimensional) उतरतात का? असा प्रश्न एखाद्या वाचकाला पडेल. पण असा प्रश्न अस्थानी आहे. रहस्यकथेच्या विधेमध्ये डिटेक्टिव्हला थोडीच पण ठळक स्वभाववैशिष्ट्ये असतात, हा पायंडा शेरलॉक होम्सच्या आधीही, एडगर ॲलन पो याच्या कथांपासून आजतागायत अबाधित आहे.

तरीसुद्धा या कथेने रहस्यकथा विधेचा साचा काही प्रमाणात मोडला आहेच. आर्थर कोनन-डॉयलचे शेरलॉक-वॉटसन म्हणा, आगाथा क्रिस्तीचे प्वारो-हेस्टिंग्ज म्हणा –- एकाची चतुराई उजळण्यासाठी दुसरा मठ्ठ असतो. पण या कथेत भाऊ-बहीण-मेहुणा तिघेही हुशार आहेत. वेगवेगळ्या विषयांत तज्ज्ञ असल्यामुळे एकमेकांना पूरक आहेत.

या त्रिकुटाच्या आणखी रहस्यकथा वाचायची माझी इच्छा आहे. पण कोव्हिड-१९ लॉकडाऊनचे निमित्त नसल्यास तिघांना एकत्र आणण्यासाठी लेखक काय सबब वापरेल, त्याबाबत कुतूहल वाटते.

***

ता. क. : या कृतीत काही प्रतिसादांचे धागे सुद्धा समाविष्ट आहेत. या धाग्यातील पूर्वनियोजित संदेश आता रंगीत पार्श्वभूमी वापरून वेगळे दाखवलेले आहेत. पूर्वनियोजित संभाषणे करणारी पात्रे या कृतीचा भाग आहेत. संपादन आणि तांत्रिक साहाय्याकरिता ऐसीअक्षरे व्यवस्थापनाचे आणि सदस्य नंदन यांचे आभार.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

प्रतिक्रिया

रहस्यकथेचा लेखक आणि रिव्ह्युचा लेखक एकच आहे का? म्हणजे "मीर बहादुर अली" हे धनंजय यांचेच टोपणनाव आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनंजय हे होर्हे लुईस बोर्हेस चे पंखे आहेत, आणि बोर्हेसच्या एका कथेतल्या लेखका सारखेच या लेखका चे नाव मीर बहादुर अली आहे, म्हणुन म्हणता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी तसा डाउट आला होता, कारण बोर्हेसच्या “अल्मुत'आसिमचा शोध” कथेचा फिक्शनल लेखक मीर बहादुर अली आहे. -- पण अल्मुत'आसिमच्या शोधाचा या कथेशी काहीही संबंध वाटत नाही. त्यामुळे आता वाटते की योगायोग असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संबंध तपासायला पाहिजे. काही संबंध असू ही शकेल. रहस्यकथेत शोधल्यास बरीच "easter eggs" सापडतील. उदाहरणार्थ घोड्याचा मालक एक अरब अमीर आहे, आणि बुद्धिबळांत जी-८ घरात काळ्या राजा चा घोडा असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनंजय हे ‘ऐसी अक्षरे’ स्थळाचे जुने सदस्य आहेत, त्यांनी अंकासाठी हे लेखन पाठवले. रहस्यकथेचे लेखन कोणी केले आहे, किंवा ते टोपणनाव आहे की खरे नाव? ही ऐसीअक्षरे संकेतस्थळाची जबाबदारी नाही.
धनंजय यांनी आणखी खुलासा केला आहे, की हे समीक्षण नाही, ओळख वा रसग्रहण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर रहस्यकथेचे लेखक धनंजयच असतील तर हे समीक्षण/ओळख/रसग्रहण नाही, ही जाहिरात आहे. ऐसीअक्षरे दिवाळी अंकाच्या तत्त्वांत जाहिरात बसते का?
ता.क. : या लेखाच्या खाली आधी पुस्तकाच्या विक्रीचा दुवा होता, तो आता दिसत नाही. टेक्नीकली आता ही जाहिरात नाही. पण प्रकाशक/पृष्ठसंख्या/किंमत यांचा उल्लेख काढणे हा उलट्या दिशेने अतिरेक झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या त्रिकुटाची आणखी एक रहस्यकथा मी वाचलेली आहे. कथावस्तू अर्धी दक्षिण अमेरिकेत आणि अर्धी कलकत्त्यात घडते. खलनायकाचं नाव ‘जलवा’ (बंगाली उच्चारांप्रमाणे Jolubo).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

ही समीक्षा लेखकाच्या जिहादी अजेंड्याकडे मुद्दामुन डोळेझांक करते. भाऊ-बहीण-मेहुणा यांची नावे समीक्षेत का दिलेली नाहीत? भाऊ कार्तिक वैशंपायन, त्याची बहीण गार्गी तर मेहुणा जहांगीर फरीदी! आणि लग्न घडवुन आणणारा लेखक मीर बहादूर अली! आपल्या मुलींना मुसलमान तरुणांनी फूस लावुन त्यांचे धर्मांतर केले तर या पुरोगामी समीक्षकांना आनंदाच्या उकळ्या फुटतात.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ1

I suspect Dhananjay did not mention the names of the characters to avoid exactly these kinds of flames. This is a toxic Islamophobic comment. I think we have got to take this cancer head-on. To that extent, I agree that Dhananjay should have mentioned the multicultural character names, just to get all of these bigots out of the woodwork; expose them for what they are.
In fact, this cowardice in writing the review probably comes from repressed homophobia. The review completely glosses over the hints that Kartik and his correspondent in India, Cyrus, are romantic partners. It is high time that the Marathi literature of the 21st century has sympathetic LGBT characters, so that this section of our society gets full representation in our popular culture.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे मराठी संस्थळ आहे. याची आठवण करून देण्यासाठी तेवढा प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Abhi_Purohit म्हणतात "कार्तिक आणि सायरस प्रियकर आहेत" तसं मला जाणवलं नाही. त्यांचा हृद्य संबंध आहे, इतकं च जाणवलं.
इतका पत्रव्यवहार होण्यासाठी त्यांची रोज गप्पा मारण्यासारखी मैत्री पाहिजेच – हा epistolary लेखनाचा structural element आहे. मूळ लेखकाला अभिप्रेत नसलेला homoerotic content सर्वत्र शोधणं ही Queer literary studies पद्धत इथे नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या कथालेखकाचा धनंजयांच्यामुळे पहिल्यांदाच परिचय झाला. वाचण्याची फार इच्छा आहे.
यांच्या एकदोन कथासंग्रहांची नावे सांगावीत अशी धनंजय सरांना विनंती आहे.
तसेच, मीर बहादुर अली यांच्या कथा जर मूलतः मराठीत नसतील तर त्या मराठीत आणण्यासाठी प्रयत्न करता येतील.
**
.
.

किंवा धनंजयांचे हे रसग्रहण वाचून त्याबरहुकुम एखादी कथाही मीर बहादुर अली लिहू शकतील.
किंवा धनंजयांचे हे रसग्रहण वाचून त्याबरहुकुम काही कथाही मीर बहादुर अली या नावाखाली अन्य काही लेखक लिहू शकतील आणि त्यांचा एक संग्रह "रसग्रहण एक, कथा अनेक" या नावाने प्रकाशित करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनंजय, तुम्ही हे समीक्षण आधी इंग्रजीत लिहिले होते का? आणि ऐसीअक्षरेकरिता भाषांतर केलेले आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही, असे काही नाही. तुम्हाला असे का वाटले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या वाक्यांची रचना इंग्रजीतून विचार करून मग मराठीत भाषांतर केल्यासारखी वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी तशी लिहिण्याची पद्धत नाही, पण एखादे उदाहरण देऊ शकता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तशा बऱ्याच जागा आहेत; पण उदाहरण द्यायचे तर हे घ्या -- "कृत्रिम वीर्यसेचन” -- मराठीत याला "कृत्रिम रेतन" म्हणतात. https://www.krushisamarpan.com/artificial-cattle-breeding-insemination-k...
किंवा आणखी एक : “रेसच्या घोड्यांच्या प्रजननाचे बाजारशास्त्र आणि जनुकशास्त्र या दोहोंची तत्त्वे कथेतल्या गुन्ह्याच्या आणि तपासाच्या मुळाशी आहेत” -- हे वाक्य इंग्रजीत लिहिल्यासारखे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून विचार करतो, पण हे वाक्य मला इंग्रजी विचार क्रमाचे तरी वाटत नाही : Racehorse breeding market economics and genetics, the principles of both of these are for this crime and its solution the root? -- पदांचा हा क्रम इंग्रजीत मुळीच जमत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...बोले तो, हा सगळा प्रकार माझ्या डोक्यावरून गेला, हे मी मान्य करतो; परंतु, ते महत्त्वाचे नाही. मात्र, या निमित्ताने अनेक नवनवे आयडी प्रतिसाद देण्याकरिता निर्माण होऊन टपकू लागले, हेही नसे थोडके.

बहुधा 'ऐसी'वाल्यांना जुन्या सदस्यांचा कंटाळा येऊ लागला असावा. (Would it not in that case be simpler/for the management/To dissolve the membership/And install another? ब्रेश्टच्या दिवंगत आत्म्याची अर्थातच क्षमाबिमा वगैरे मागून...)

(अतिअवांतर: ही ट्रिक बहुधा जुनीच असावी. (चूभूद्याघ्या.))

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"साचा काही प्रमाणात मोडला" म्हणून मन्वंतर विशेषांकासाठी हा लेख उगाचच घेतला आहे. शेरलॉक होम्सचे "Hound of the Baskervilles" मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहारातून लिहिलेले आहे – त्यामुळे epistolary रहस्यकथा हा प्रकार अगदी जुना आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक चतूर आणि एक मठ्ठ अशीच जोडी असली पाहिजे असा काही नीयम नाही. आणि दोन चतूर डिटेक्टिव्हची जोडी तर हार्डी बॉईजपासून आहे. या बाबतीतही हे मन्वंतर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत. नव्या अमेरिकन शेरलॉक मालिकेत जोन वॉटसन ही स्वतःहून उत्तम डिटेक्टिव्ह असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्रोटक ट्विटर संदेश = एक-एक प्रकरण अशा ट्विटर कादंबऱ्याही नव्या नाहीत.
https://noveltotweet.blogspot.com/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पितृत्वाच्या जनूकीय चाचण्या आता चांगल्या सुस्थापित झाल्या आहेत. हा काही O J Simpsonच्या खटल्याचा जुना काळ नाही. जनूकीय चाचणीत काही घोटाळा असू शकतो, हे प्रकार आजच्या काळात कसे काय पटू शकतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जनुकीय चाचण्यांतील जीवरसायनशास्त्रांसंबंधित बाबी चुकल्या आहेत, असं वाटत नाही. नराचे वीर्य मिळवणं आणि मादीचे कृत्रिम रेतन करणं, शिंगराच्या रक्ताची चाचणी, या सगळ्या घटनांच्या साखळीत कुठेही दोष नव्हता, तरी केंटकीतले अपत्य मेरिलँडमधील नराचं नसल्याचंच दोघांच्या चाचणीतून समजलं.. हीच तर रहस्यकथेची गोम आहे. याचं उत्तर द्यायचं तर “स्पॉयलर अलर्ट” द्यायला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Seriously? YOu have this question in the age of CRISPR?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही, या कथेचे रहस्य नुसते "CRISPR" म्हणून सुटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Agreed. Just finished reading it. Cre-Lox needed.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही इंग्रजी अक्षरांची कूटलिपी वापरली तर इथल्या सामान्य वाचकांना शष्प कळणार नाही. Crisper म्हणजे एखादी बटाट्यांच्या वेफर्सची कंपनी असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

CRISPR (Crisper नाही)
https://en.wikipedia.org/wiki/CRISPR

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

CRISPR = clustered regularly interspaced short palindromic repeats. या तंत्रज्ञानाला (म्हणजे ते विकसित करणाऱ्या वैज्ञानिकांना) २०२०मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले.
हे CRISPR-Cas9 विकर (enzyme) मुळात बॅक्टेरियामध्ये असते. बॅक्टेरियाला बाधा करणाऱ्या विषाणूचे डीएनए वेगळे ओळखून त्या डीएनएचा नायनाट करणे हे या विकराचे मूळ काम आहे. डीएनएच्या अक्षरांचा विवक्षित क्रम ओळखून नेमका त्याच ठिकाणी बदल घडवायचे तंत्रज्ञान तिथून आले आहे. पूर्वी जनुकांमध्ये बदल घडवण्यासाठी पेशींवरती मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्ग वा रसायनांचा मारा करत. मग करोडो पेशींमध्ये करोडो यादृच्छिक (random) बदल (mutation) होत; त्यापैकी एखाद्या पेशीत आपल्याला हवा तो बदल झाला, तर लॉटरी लागली. त्या यादृच्छिक ‘उपसंपादकांच्या डुलक्या’ प्रक्रियेपेक्षा CRISPR म्हणजे कुशल व नेमके संपादन (DNA editing) आहे. टेस्ट ट्यूबमधील भ्रूणांमधले आनुवंशिक डीएनए दोष काढून मुद्रितशोधन (proofreading) करण्याबाबत आजकाल संशोधन पुष्कळ पुढे गेले आहे. माणसाच्या डीएनएत असा बदल करणे अजून अनैतिक मानले जाते (https://www.nature.com/articles/d41586-020-00001-y), पण पशुवैद्यकात हे प्रयोग सफल झालेले आहेत (https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/29150007/).
मात्र या रहस्यकथेसाठी CRISPR तंत्रज्ञान पुरेसे नाही. कारण CRISPR ने झालेले जनुकीय बदल पूर्ण भ्रूणाच्या सर्व पेशींमध्ये होऊ शकतात. त्यामुळे अशा भ्रूणापासून उपजलेल्या घोड्याच्या रक्तातील डीएनए त्याच्या वीर्यातील डीएनएशी जुळून येईल. या कथेत मात्र मेरिलँडमधील घोड्याचे रक्त आणि वीर्य यांचे स्रोत निराळे आहेत, हे उघड आहे; म्हणून वीर्यातून निपजलेले शिंगरू बापाच्या रक्ताशी अपत्य म्हणून जुळत नाही. त्यामुळे कथेला Cre-Lox तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागतो (https://en.wikipedia.org/wiki/Cre-Lox_recombination). हे तंत्रज्ञान आता काही दशके जुने आहे. Cre-Loxसुद्धा तसे "डीएनए संपादन" करणारे आहे, पण CRISPR च्या मानाने "कुठले जनुक" याबाबतीत नेमके नाही (inaccurate). पण या Cre-Loxचा एक वेगळा फायदा असा, की यातील जनुकीय बदल भ्रूणाच्या यच्चयावत पेशींमध्ये न करता विवक्षित इंद्रियामध्ये घडवता येतो. ही दोन्ही तंत्रज्ञाने एकत्र वापरली तर नेमक्या पितृत्व सिद्ध करणाऱ्या जनुकांमध्ये बदल होतील (CRISPR द्वारा), पण ते घोड्याच्या रक्तात नव्हे, फक्त वीर्यात (Cre-Lox द्वारा)! असे रहस्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sorry. Marathi font madhye typing azun jamat nahi. pan Chimerism ya naisargik prakriyet hi rakta ani virya yanchyat farak asu shakto. What do you think?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टंकन साहाय्य : https://aisiakshare.com/typing_help

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Chimerism ने सुद्धा रक्त आणि वीर्याच्या जनुकीय चाचण्यांमध्ये तफावत शक्य आहे, अर्थातच. पण ती कथा वेगळीच झाली असती. (Chimerism https://en.wikipedia.org/wiki/Chimera_(genetics) म्हणजे गर्भात मुळात दोन भ्रूण असतात, ते मिसळून एक भ्रूण होतो, आणि एकच अपत्य जन्मते. त्या अपत्यात काही अवयव मूळच्या पहिल्या भ्रूणातले असतात, काही अवयव मूळच्या दुसऱ्या भ्रूणातले. अशा प्रकारे, वेगवेगळ्या अवयवांत डीएनए वेगळे असू शकते.)

इथे कथानक वेगळे आहे. जी-८ घोड्याचा बाप Bevantheterrible हा अमेरिकेतल्या तीन सर्वात मोठ्या शर्यती - ट्रिपल क्राऊन – जिंकलेला होता. त्यामुळे जी-८ घोड्याच्या वीर्याची किंमत खूप जास्त होती. जी-८शी प्रत्यक्ष शरीरसंबंध होऊन निपजलेल्या शिंगराच्या पितृत्वसंबंधाबाबत काहीच शंका नसती. पण ते शिंगरू मोठे झाल्यावर, त्याची जनुके या CRISPR-Cre-Lox युक्तीमुळे वेगळी असती. म्हणून त्याच्या वीर्याला भविष्यात फारशी किंमत नसती. पण ही युक्ती काही वर्षे trade secret म्हणून गुप्त ठेवायची जी-८च्या मालकाची योजना होती. कोव्हिड लॉकडाऊनच्या काळातील अपवादात्मक कृत्रिम रेतनामुळे लगेच पितृत्वाची जनुकीय तपासणी झाली, म्हणून गोची झाली. वीर्यदात्या घोड्याच्या मालकाला मुळात सूट नकोच होती, पण मादीच्या मालकाला विलंब नको होता आणि त्याने सूट मिळवली.

Monsanto कंपनीने पिकांच्या बियाण्यासाठी काहीसे असेच व्यापाराचे मॉडेल वापरले होते. एका पिकासाठी बियाणे चांगले; पण त्या पिकातून पुढच्या पिकासाठी बियाणे साठवले, तर पुढच्या पिढीत बियाणे निरुपयोगी. (https://cases.open.ubc.ca/monsanto-and-terminator-seeds/)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या त्रिकुटाच्या आणखी रहस्यकथा वाचायची माझी इच्छा आहे. पण कोव्हिड-१९ लॉकडाऊनचे निमित्त नसल्यास तिघांना एकत्र आणण्यासाठी लेखक काय सबब वापरेल, त्याबाबत कुतूहल वाटते.

(आणखी एखादा) दिवाळी अंक?

(किंवा, तितके जर थांबायचे नसेल, तर पुढेमागे लवकरच ‘ऐसी’ व्यवस्थापन एखादा फॉर-व्हॉटेवर-एक्स्क्यूज़-विशेषांक काढेलच की!)

(अवांतर: (एका-दगडात-दोन-पक्षी-स्पेशल कल्पना/सुचवण/फर्माइश.) ‘ऐसी’ने जर (पुन्हा एकदा) पॉर्न-विशेषांक काढला, तर त्या निमित्ताने त्यात या त्रिकूटाची (आणखी) एखादी (रहस्य)कथा घुसडून देता येईल. (कदाचित ‘Ménage à trois’ नावाची?) तितकेच अनायासे (साधेसुधे स्ट्रेट-पॉर्न न राहता) बायसेक्शुअल- (+ ग्रूप-) पॉर्न वगैरे होईल. (मागच्या वेळेच्या ‘विशेषांका’त ही उणीव राहून गेली होती.) म्हणजे, ‘ऐसी’वाल्यांचा छापण्याचा (आंबट)षौकही पुरा होईल, लेखकाची खाजही भागेल, नि वाचकाची/समीक्षकाची हौसही फिटेल. एकदम विन-विन-विन सिच्युएशन!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आणि त्यावर नवनव्या (साधारण जालीय वय २ दिवस) आय.डींनी दिलेल्या प्रतिक्रिया - हा प्रयोग आहे का?
बाकी डोक्यावरून गेला, क्षमस्व.

  • ‌मार्मिक4
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रयोग आहे का?

नाही. निव्वळ फालतूपणा आहे.

'ऐसी'ची वाट लागणे जवळजवळ १००% पूर्ण झाल्याची लक्षणे आहेत.

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही. निव्वळ फालतूपणा आहे.

तुमचं वय झालं याचं तर हे लक्षण तर नाही ना? Wink असो चालायचेच.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गूगलवर शोध घेतला असता मीर बहादूर अली नावाचा लेखक किंवा जी-8 अशी रहस्यकथा वगैरे काही सापडले नाही. कृपया या पुस्तकाचा (असल्यास) दुवा द्यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही इतपतच दिसले :
(शोधदुवा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे पुस्तक नसावे:

G 8: A Suspense Thriller
by Mike Brogan (Author)
Donovan Rourke, a CIA Special Agent, discovers a man named Katill will assassinate the world’s eight most powerful leaders at the G8 Summit in Brussels in three days. ...

आणि हा निर्माता नसावा :
मीर बहादुर अली हुसैनी
(पुस्तकाचे प्रकाशन १८०३)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून हे दळण चालूच आहे का?

आता बास करा हा फाजीलपणा!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ1

मागे एकदोन वेळा ऑफिसात अशा घटना घडल्या : कोणत्याशा सार्वजनिक ईमेलवर कोणी एकाने सर्वांना "मला या ईमेल यादीतून काढून टाका" असे उत्तर पाठवले. मग त्यावर कित्येक लोकांनी "मलाही काढून टाका" उत्तरे सर्वांना पाठवली. मग "हा धाग्यावर रिप्लाय-ऑल करू नका" असे रिप्लाय-ऑल करून सांगणाऱ्या प्रतिसादांची लाट आली.
मग हे "थांबवा, थांबवा!" प्रतिसाद ऑल-कॅप्समध्ये (ओरडून) येऊ लागले. जुन्या जाणत्यांच्या प्रतिसादांत त्यांच्या नेहमीच्या शैलीपेक्षा तिखट भाषा, शेलक्या शिव्या वाचायला मिळाल्या.
त्या घटनांची आठवण आली. त्या मानाने हे सौम्यच, म्हणावे. प्रतिसादांची संख्याही, आणि आणि ऑल-कॅप्स/जाड ठसाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“अस्तित्वात नसलेल्या पुस्तकाची समीक्षा” हे मूळ लेखामागचे “गिमिक्” तत्वत: रोचक असले, तरी इथे ते साफ फसले आहे. हे लक्षात घेऊन हे पुराण आणखी लांबवणे आता थांबवावे. याबाबतीत ‘न’बा यांचे मत प्रातिनिधिक आहे असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

"अस्तित्वात नसलेल्या पुस्तकांची चर्चा" हे या कृतीचे गन्तव्य नाही.
लेखनाचा/कथेचा हा प्रकार होर्हे लुईस बोर्हेस याने कित्येक दशकांपूर्वी घडवला. लेख त्या genreचा आहे हा निर्देश पहिल्या दिवशीच्या पात्र-प्रतिसादातच स्पष्ट आहे.
कृतीतील प्रतिसादांना वेगळा रंग देऊन वेगळे काढून "ही रहस्यकथा वाचल्याचे म्हणणारे संवादक काल्पनिक पात्रे आहेत" हेसुद्धा स्पष्ट केलेले आहे.
मन्वंतर विशेषांकाला संकल्पनाविषयक ठरावे, असे काल्पनिक कथेच्या रसग्रहणात काही नाही, हा स्पष्ट निर्देश सुद्धा कृतीत आहे.

अर्थातच हे सर्व निर्देश असूनसुद्धा "नसलेल्या पुस्तकांची समीक्षा" हे गिमिक कृतीचे सर्वस्व आहे, हे वाचक म्हणून तुम्हाला जाणवले तर वाचक म्हणून तो तुमचा अधिकार आहे. तरी याविरुद्ध कृति-अंतर्गत निर्देश मी नम्रपणे दाखवले.

'न'वी बाजू यांनी यात फालतूपणा काय आहे त्याबाबत काहीच मुद्दा दिलेला नाही. तुम्ही मुद्दा सांगितला म्हणून त्यांचा प्रतिवाद दिला. त्यामुळे 'न'वी बाजू यांना कृतीचा रोख कळलेला आहे, आणि तो रोख त्यांना फालतू वाटतो असा अर्थ मी लावतो. मुद्दे न सांगति एखादी कृती नावडते, सर्वस्वी फालतू वाटते, हासुद्धा वाचकांचा अधिकारच आहे. पण जर "अन्य लोकांनी संवाद थांबवावा, इतका हा फालतूपणा समाजविघातक आहे" असे म्हणायचे असेल तर काही मुद्देसूद युक्तिवाद हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या कृतीत "अस्तित्वात नसलेल्या पुस्तकांचे समीक्षण" हे गन्तव्य गिमक नाही हे वरील प्रतिसादात सांगितले आहेच.

पण हा लघुकथेचा प्रकार/genre बोर्हेसने घडवला, आणि हे तंत्र कित्येक कथांमध्ये वापरले. तर हे तंत्र बोर्हेसनेच अती लांबवले काय? हा वेगळा प्रश्न माचीवरचा बुधा यांच्या टीकेतून उद्भवतोच.
या तंत्राचे समर्थन बोर्हेस करतो; त्याच्या Ficciones कथासंग्रहाच्या १९४१ प्रकाशनाच्या प्रस्तावनेत तो सांगतो :

The composition of vast books is a laborious and impoverishing extravagance. To go on for five hundred pages developing an idea whose perfect oral exposition is possible in a few minutes! A better course of procedure is to pretend that these books already exist, and then to offer a resume, a commentary.."

यावरून असेच दिसते, की खुद्द बोर्हेसही "अस्तित्वात नसलेल्या पुस्तकाची समीक्षा" हा मुद्दा लांबवत नव्हता, तर अशा संभाव्य पुस्तकात विशद केलेल्या तत्त्वांना (idea) थोडक्यात चर्चेत घेणे, हा त्याचा हेतू असे. "काल्पनिक पुस्तकांचे समीक्षण" हाच विचारप्रयोग अधिक-अधिक खोलात चालू ठेवण्याचा त्याचा हेतू नसेच.

अर्थात या कृतीची हेतूच वेगळा असल्यामुळे बोर्हेसच्या अनेक कथांमधीक तात्त्विक हेतू इथे थेट लागू होतच नाही. (असा हेतू असल्याचा साहित्यात इतिहास आहे, इतपत आडवळणाने लागू झाला, तर झाला.) त्यामुळे बोर्हेसचा [त्याच्या कथांतील] हेतू सुद्धा इथे फसला, ही टीकाही इथे गैरलागू आहे.

परंतु माचीवरचा बुधा यांना बोर्हेसच्या लेखनाविषयी कुतूहल वाटल्यास, त्याचे स्वतःपुरते "अस्तित्वात नसलेल्या पुस्तकाची समीक्षा"बाबत समर्थन इथे दिले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या कृतीत "अस्तित्वात नसलेल्या पुस्तकांचे समीक्षण" हे गन्तव्य गिमक नाही हे वरील प्रतिसादात सांगितले आहेच.

आपल्या कृतीचा लोकांवर काय परिणाम होतो, हे बघणं हा सुद्धा कलाप्रकार आहे. सदर लेखातला धाग्यातला प्रयोग काही लोकांना आवडेल, काहींना आवडणार नाही, हे अपेक्षितच.

मला हा प्रकार (दिवाळी अंकाचं काम करत असल्यामुळे) आधीच माहीत होता, आणि ती कल्पना ऐकूनच फार मजेशीर वाटली होती. मग लेखन वाचून आणखी मजा वाटली; ती लोकांच्या प्रतिक्रिया वाचून वाढली. मात्र 'हा प्रकार थांबवा,' हे फारच झालं; त्यात विनोदही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धागा .
फालतू पना.
फ्रिक्शन वर आधारित कथा आहे .काय त्या मध्ये वाईट आहे.
आता जे सत्य समजत आहात ते उद्या साफ खोटे ठरेल
अतिरेक करू नका विज्ञान म्हणजे तुमचीच मालमत्ता आहे.
जगात एका पेक्षा एक हुशार लोक आहेत
फ्रीक्शन मुळेच मानव प्रगती करू शकला आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक2
  • पकाऊ0

तुम्ही काही मह्त्त्वाचा मुद्दा सांगत आहात, पण मला त्यातील कळीचा "फ्रिक्शन/फ्रीक्शन" शब्द समजलेला नाही.
Friction/घर्षण असा अर्थ आहे का? म्हणजे विज्ञानाच्या संदर्भात काही घर्षण होते, बेबनाव होतो, आणि मानव प्रगती करू शकला -- असे काही तुम्हाला म्हणायचे आहे काय?
की fiction/काल्पनिक कथा असा अर्थ आहे? म्हणजे "विज्ञानाचा मालमत्ता म्हणून अतिरेक होतो, तसा होऊ नये, पण काल्पनिक कथांनी मात्र मानव प्रगती करू शकला -- असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?
थोडे स्पष्ट करू शकाल का?

("फ्रिक्शनवर आधारित कथा वाईट असते" असे समीक्षालेखात वा पुढील धाग्यात कुठे सुचवले आहे, त्याबाबत उद्धरण देऊन निर्देश केला, तर समजायला खूप सोय होईल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Noise मधे signal शोधण्याच्या तुमच्या प्रयत्नाला दाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

पटले नाही.

एलियन/एक्स्ट्रा-टेरेस्ट्रियल ट्रान्स्मिशन्समधून अर्थ लावण्याच्या प्रयत्नांनासुद्धा असेच म्हणाल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पक्षांना बघून आपल्याला पण आकाशात उडता आले पाहिजे अशी पहिली कल्पना केली गेली .
आणि त्या मुळेच विमानाचा शोध लागला.
माणसाच्या मेंदू ची कल्पना करण्याची जी प्रचंड ताकत आहे तीच ताकत माणसाच्या प्रगती चा पाया आहे .
सद्य स्थिती ल बिलकुल मॅच न होणाऱ्या कल्पना माणूस करतो त्याचे स्वागत च करावे.
ती कल्पना आता सत्य स्थिती शी विपरीत असेल पण पुढे तेच सत्य असू शकत
बाकी कोणाच्या पोस्ट ल विरोध करण्याचा माझा बिलकुल हेतू नाहीं.
फिक्शन आणि फ्रिक्शन् ह्या दोन शब्दात गफलत झाली चूक झाली .
तुम्ही ती दाखवून दिलीत ह्या बद्धल धन्यवाद.
अवांतर आहे तरी.
मी कोण .
ह्याचे उत्तर आज माहीत असलेल्या विज्ञान नुसार आपका मेंदू.
स्मृती,विचार करण्याची पद्धत,त्या नुसार निर्माण होणारा स्वभाव.
हे मेंदू वर च अवलंबून आहे.
मी कोण ? मी म्हणजे मेंदू.
मग शारीरिक आजारावर उपाय,उपचार शोधण्यात माणूस फुकट वेळ व्यर्थ घालवत आहे.
मेंदू ची प्रत्येक कृती ,त्याची क्षमता कॉपी करून फक्त शरीर बदलत गेले तरी .
मी हा मीच राहणार.
मानवी शरीर लॅब मध्ये तयार करणे काही अवघड नाही.
ना मृत्यू ना कोणता आजार.
वय झाले की शरीर बदला.गंभीर आजार झाले की ते बरे करण्यात वेळ वाया घालवू नका शरीर बदला.
हो माझी कल्पना आहे.
आज ही मूर्ख पणाची कल्पना वाटत असेल पण उद्या हेच उत्तर असू शकतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा विचार तुम्ही चांगला समजावून सांगितला आहे. बरेच पटण्यासारखे आणि मनन करण्यासारखे मुद्दे तुम्ही सांगितलेत. धन्यवाद.

तुमच्या या विचारांना या ठिकाणी चालना कशी मिळाली त्याबद्दल कुतूहल वाटते. शिंगराचे पितृत्व न-कळले, तरी कृत्रिम रेतनाद्वारे त्या शिंगराच्या शरिरात पूर्वीच्या घोड्याला नवीन शरीर मिळाले... तद्वतच मनुष्यालाही भविष्यात... अशी काही तुमच्या विचारांची साखळी होती का?

तुमचा हा विचार इथे चर्चेत आला, तर तितपत तरी लेखा-प्रतिसादांच्या संवादाचे यशच म्हणावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0