खूप कचरा आहे
मागे श्याम मनोहर म्हणालेत 'खूप लोक आहेत'. तसाच खूप कचराही आहे. पण ट्रॅशबद्दल 'ऐसी अक्षरे'मध्ये लिखाण मागवताना काल्पनिक नावामागे लपणाऱ्या संपादकीय फळीने फार दूर बघायलाच नको होते. त्यांच्या 'संघा'तच अनेक ट्रॅश बोलणारे आहेत. कुणीही इतर काय लिहिणार? ना उजवे, ना डावे, ना करडे, ना मऊ! छे हो कसलं काय, गरीब गाय आणि पोटात काय, तू काहून करते मग हाय हाय. मग हाय काय अन नाय काय, सब कूच येकुन येकच हाय, नाय काय आन होय काय ? ते 'मुळशी पॅटर्न'मधला राहुल म्हणाला तसे थेट 'प्लास्टिक आहेत'. तेव्हा ते कुठल्याही फिसलपट्टीवरून उडी मारतात, कुठेही विक्षिप्तपणा दाखवतात. मनाला येईल तिथे ट्रोलिंग करतात. तर बाबांनो, तुम्हाला इतर कुणी इथे का लिहावे असे वाटते? दहा-बारा जण संपादकीय भूमिकेत आहेत. तुम्हीच लिहा, तुम्हीच चालवा, तुम्हीच एकमेकांच्या लेखावर टिप्पणी करा. कहता भी दिवाना, सुन्ता भी दिवाना ! ह्यात काही बरे, काही ओळखीचे, काही मित्र म्हणून 'जाऊ दे रे' अशी भूमिका घेतात. पण हा सगळा प्रकार ब्राह्मणी आहे, चावट आहे, हे आतापर्यंत इथे लिहिणाऱ्या अनेक ज्ञानपिपासू जंतूंना माहीत असणार. कुणी कधी एक्दम 'छोटी बच्ची हो क्या' रूप घेते, कधी कोणी 'फार महत्त्वाचं, फारच महत्त्वाचं लिहिलंय' अशी पितृत्वाची पावती देते.
चित्रे म्हणालेत - 'तुक्या रांडेच्या!' तशा नाही मी तुम्हाला प्रेमाने शिव्या देणार. समाजातला सगळा खरा गाळ हा इथे नव्हे, अनेक अशा संस्थळावर आहे. तो फिल्टरबबलिंग करतो, म्हणजे समाजात व्यक्त होण्याच्या प्रक्रियेत काही विचारांचे केंद्रीकरण केले, इतर वैचारिक ट्रॅफिकला वाट मिळत नाही. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा होतो, तसे हे फिल्टरबबलिंग काम करते. मुळात ह्यालाच ब्राह्मणीपणा म्हणतात. जे व्यक्त होत आहे ते आमच्या चष्म्यातून व्हावे नाहीतर आम्ही त्याला लगेच क्लिष्ट, बोजड, अवघड म्हणू. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. दुसरा एक प्रकार - 'काय लिहिलंय यार - क्या बात है? परत जरा शांतपणे वाचतो, आणि कळवतो' आणि मग कधीच काहीच ना कळवणे. संपादक 'संघा'ने काही संस्कार केले नाहीत, असे संपादकांचे मित्र- मैत्रीण म्हणणार.
पहा ब्वा! कसले लिबरल आणि फ्रँक आहेत खरे हे लोक. एकमेकांनासुद्धा सोडत नाहीत. क्या बात है ! इतके तीव्र सूर, इतके कडक स्वभाव, मान्या मैं तुम लोगोकु! सर आणि मॅडम छद्मी आहेत.
छद्मीपणावर खास ब्राह्मणी मक्तेदारी आहे. कारण एखाद्याच्या भाषेवरून उडून लोकांची मजा घेतात संघातले लोक. तुम्हाला ह्यॅ-ह्यॅ करून हसायचं आहे तर बसा तुमच्या त्याच त्याच आय-आय-टीच्या त्याच त्याच मंडळींसोबत... जसे सो-कुल एन-आय.डीवाले बसतात तोच बाबाजी-की-बुटी वाला टी-शर्ट हजार वेळा बनवूनसुद्धा त्याच त्याच प्रॉडक्ट डिझाईनच्या चर्चा करीत. पण नाही, आपण गटातल्या बाहेरच्या लोकांना बोलवून त्यांची मजा घेऊ यात, अशी खाष्ट भूमिका आहे. मी ज्यांच्यामुळे लिहिले त्यांची नसेल. पण जो अतिरेक चालू आहे तो ते इतके वर्ष पाहत आलेत तर आजही तुम्हाला भूमिका नाही घ्यायची म्हणजे काय?
मला वाटायचे ट्रोलिंग हा जरा उजवा प्रांत आहे. पण नाही हे छद्मी वागणे काकूबाई लेवलचे गॉसिप नेटवर्क आहे. कसले फालतू नावांमागे लपता, लिहा कोण आहेत ते. का नाव आपला बामनीपणा दाखवेल... अशी भीती वाटते का ? तुम्हाला सवय नसेल आणि माहीतही नसेल आपण ब्राह्मणी आहोत हे मान्य करायची. आपल्या आजूबाजूला रक्तात पेटलेले अगणित सूर्य असतील तरी आपल्याला फालतू चक्कलस करायची आहे. आपला आपण करावा विचार, ठेवू नये भार देवावरी ! बालगंधर्व कुणालाही मूर्खासारखे 'देवा!' म्हणायचे ना, तसले हे संघातल्या देवांनो. छापणार आहे आपल्या ब्राह्मणीपणाची हकिगत ?
ब्राह्मणीपणाचे अजून एक लक्षण - आपल्याला आपल्यापलीकडे काही दिसत नाही. आपले आपल्या जातीवर, आणि देहावर भयंकर प्रेम असते. त्यामुळे आपण स्वतःला इतके उच्च मानतो की आपल्याला कुणी स्पर्शच करू शकत नाही. काही शिवला तर लगेच आपली ओंगळ अंघोळ... हातात दिवा आणि ओंजळ ! म्हणजे संघातले सगळे नसतील करत हे सगळं, पण मुद्दा हालचाली, रूढींचा नाही. संरक्षणवादाचा आहे.
तुम्ही म्हणाल आता म्हणालास एक्दम तीव्र भूमिका घेतात आणि आपल्या गटातल्या मॅन आणि वूमनला पण सोडत नाहीत (bourgeois, पांढरपेशी व्याकरणाच्या जाळ्यात अडकवून ठेवतात.) आणि आता म्हणतोस .. संरक्षणवादी आहेत. महाराज बम्मन मे वो मोबिलिटी है वो कभी भी कूच भी हो सकता है! उदारमतवादी असणे ह्यासाठी एका हेकेखोरपणाची गरज असते ती गुणवत्ता आय. आय. टी छाप 'ग्लोबल ब्राह्मणां'मध्ये सहज उपस्थित असणार. उपस्थित कारण प्रस्थापित! ते तुम्हाला आग्रह करून आपल्या आग्रहारात बोलवून... जे तुम्ही लिहिलंय त्याची मस्करी करतात... कारण ते मस्करी करू शकतात. आणि हा खेळ चालू राहणार कारण ह्या ब्राह्मणीपणाचे सगळे अस्तित्व त्या मस्करीवर अवलंबून आहे. दुसरा कूच मूव्ह नही है उसके पास! समे-इच चीझ करते रहेंगे ये लोग ! और हरबार, बारबार, लगातार - नया बकरा चाहिये, हलाल करनेकु. क्यूकी ब्राह्मण खुदको दुसरे को अलग रखके डिफाइन करता है. कातडीबचावपणा बोलते उसको ! तरी बरं संस्थळाचे नाव 'ऐसी अक्षरे' आहे.. फुल्ल २ सेक्युलर! सबको ऍक्सेस. फिर कचरा भी आयेगाईच ना!
जाऊ द्या खूप कचरा आहे.
अती
अती डावे आणि अती उजवे ह्या दोन्ही जमाती जगासाठी धोकादायक आहेत.
मानव आणि मानवता दोघांचे शत्रू आहेत.
जग सुखी हवं असेल तर.
अती डावे आणि अती उजवे दोन्ही विचारांच्या लोकांवर नियंत्रण ठेवून त्यांचे समजातील अस्तित्व कमजोर करणे गरजेचे आहे
हे जे संपादकीय ट्रॉल आहेत ,
हे जे संपादकीय ट्रॉल आहेत , ते कशाचे अती करतात ह्याबद्दल काही शेरा टोला, टीका टिप्पण नाही का ?
मार्मिक. अचुक. टोकदार.
मार्मिक. अचुक. टोकदार.
हा लेख (खरंतर प्रतिक्रिया) छापून , "कित्ती गं बै (बाई) मी खिलाडू, कित्ती गं बै मी रामशास्त्री..." असा मिरवणार कि काही बदल करणार? हे तर त्या समाजवादी बामनासारखं झालं (मोजके अपवाद सोडून) आडनावाच्या ऐवजी आई-बापाचं नाव लावायचं, आणि या भाबडेपणात 'खालीमुंडी' राह्यचं, आपल्याआपल्याची टोळी बनवून, त्यातच रोटी-बेटी करत राह्यचं...
टोपणनावामागे जाऊ दे कार्पण्य 'मी'चे... असाच उद्दात्त विचार आहे काय? खरी तर सुरवात इथूनच आहे.
पाठीवर मारा, पोटावर मारा पण अनुल्लेखाने नको, बरें!
आरे आरे. ब्राह्मण-बनिया
आरे आरे. ब्राह्मण-बनिया कॉम्प्लेक्स
.
.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले
तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे . हे इतर जे महामहिम उपटसुम्भ आहेत त्यांच्या ब्राह्मणी बेगडीपणा विषयी ! सगळ्यांना वाटतं आपल्याविषयीच आहे. कमाल !
.
.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
देईन की त्यात कायय य य य ssss
देईन की त्यात कायय य य य ssss ?
इथे वाट बघतोय.
https://www.aisiakshare.com/comment/193925#comment-193925
इथे
वाट बघतोय.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
मालक मी तुमची नोकरी करत नाही.
मालक मी तुमची नोकरी करत नाही. उत्तर तिथे द्या ! मी जे प्रश्न विचारतो त्याला तुम्ही कुणीच उत्तर देत नाही. हा छान स्ट्रॅटेजिक सायलेन्स आहे आपला . तुम्ही सगळे एकमेकांचा सायलेन्टली बचाव करता.
.
.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
तुमचे ससंथाळीचे नियम पाळायला
तुमचे ससंथाळीचे नियम पाळायला नाही लिहीत मी .. व्यक्त होण्यासाठी लिहितो . हे इंग्रजीत लिहू नका . अमके करू नका .. तमके करू नका. हाच आपला अग्रहार आहे. हेच बामणी आहे.
.
ओके शक्तिमान.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
मी पण आलोच ना?
त्यांचा रोख तुमच्यावर नसावा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
शहाणपण देगा देवा! पहा अजूनही
शहाणपण देगा देवा! पहा अजूनही तुम्हाला ट्रॉल मंडळींबद्दल काहीच भूमिका घ्यायची नाही आहे. ही मंडळी तुमच्या संपादकीय संघात आहेत ना ! Strategic silence !मला Silence is golden म्हणालात म्हणून म्हटलं. तूम्ही ह्या वाह्यातपणा बद्दल भूमिका घेत नाही ...कोण किती मूर्ख आहे हे माहीतच आहे.
छुपा रुस्तम
हा लपविलेला id का ठेवितात इकडे लोक ? काय विनोद आहे ? असेल तर मला कळला नाही. बामणी असेल तर अजूनच कळला नाही . सांगाल का मला कारण ? कि ज्याने सगळे ह्या मूर्खपणात सामील होतात.
Zoomu या
एक वेळ ठरवू. तुम्हाला मला .. आणि इतर सगळ्यांना जमेल अशी.. तुमचे काय जे प्रश्न असतील ते विचार एकदाचे. उत्तर मी देईन . पण इतर सगळी झुंड घेऊन या !
काही शंका
नाही म्हणजे, परंपरेनुसार त्या दुसऱ्या लेखावर काय वाटेल त्या ट्रोलात्मक प्रतिक्रिया आल्या असतील (यात माझाही सहभाग अर्थात आहेच), परंतु:
१. जात येथे नक्की कोणी काढली? (प्रस्तुत लेखक वगळता येथे जात कोणी काढल्याचे निदान माझ्या तरी दृष्टिपथास आले नाही.)
२. प्रस्तुत लेखकाचा हा लेख म्हणजे या संस्थळावरील निव्वळ तिसरा सहभाग. दुसरा सहभाग म्हणजे प्रस्तुत दिवाळी अंकातील लेख. पहिला सहभागसुद्धा अगोदरच्या एका दिवाळी अंकातील लेखच, तीसुद्धा ‘ऐसी’ने लेखकाची स्वतः जाऊन घेतलेली मुलाखत. म्हणजे, प्रस्तुत लेखक हा (१) ‘ऐसी’चा नेहमीचा योगदाता नाही, तथा (२) आमंत्रित/स्पॉन्सर्ड लेखक आहे, या निष्कर्षात काही चूक आहे काय?
३. स्पॉन्सर्ड लेखकांकरवी वाचकांवर (विशेषेकरून ब्राह्मण वाचकांवर/ब्राह्मणांवर) विनाकारण, विना-आगापीछा आगपाखड कर(वि)ण्याची ‘ऐसी’(च्या व्यवस्थापना)ची परंपरा तशी नवी नाही. (‘(अ)ब्राह्मणी प्रबोधन’ काय, ‘ब्राह्मणी पितृसत्ताक’ काय, नि काय काय.) त्यामुळे, याही लेखाचे खरे तर आश्चर्य वाटत नाही. प्रश्न एवढाच उरतो, की हे (पक्षी: बाहेरचे लेखक आणून त्यांच्याकरवी येथील वाचकांवर/वाचकांतील ब्राह्मणांवर/ब्राह्मण वाचकांवर विनाकारण, विना-आगापीछा आगपाखड करविणे) ‘ऐसी’चे अधिकृत धोरण वा अजेंडा आहे काय? ‘ऐसी’च्या व्यवस्थापनमंडळीची यास (मूक अथवा व्यक्त) सहमती आहे काय, अथवा यात (निष्क्रिय अथवा सक्रिय) सहभाग आहे काय?
४. हाच जर अजेंडा असेल, तर लेको, इतके जे (योगायोगाने – किंवा कदाचित नॉट-सो-योगायोगाने – बहुसंख्येने) ब्राह्मण सदस्य जे इथे आहेत, ते तरी कशाला हवेत मग? किंबहुना, सार्वजनिक संस्थळ तरी हवे कशाला? काढा ना मग खाजगी क्लब/गूगलग्रूप, नि करीत बसा दिवसभर ब्राह्मणांच्या नावाने शंख! की, लाइव टार्गेट असल्याशिवाय मजा येत नाही?
५.
(अवांतर – किंवा कदाचित नॉट-सो-अवांतर – कुतूहलात्मक शंका: प्रस्तुत लेखक हा बायेनीचान्स चिंतातुर जंतूंचा पित्थ्या (protégé अशा अर्थाने) आहे काय?)चिंजंच्या (अस्वल यांना दिलेल्या) अनाहूत/वकिलीछाप प्रतिसादाने शंकेचे निराकरण झाले.असो चालायचेच.
जात काढली नाही. ब्राह्मणीपणा
जात काढली नाही. ब्राह्मणीपणा हा तुमची माझी जात काय आहे .. आज ती कोणी काढली असा नाही . आपण काय छापतो . आपण छापतो ते नेटके असावे ... आनंदाने वाचावे , आणि वाचून आपण पैजा जिंकतो .. रसिके मिळवतो ! पण त्याला आपल्या अरे बेट्या ग्रुप च्या पलीकडे जाता येत नाही . हा ब्राह्मणीपणा आहे. मी म्हणतोय अशी प्रमाण भाषा मोडत का नाही आपण .. जर नाव ऐसी अक्षरे आहे. ट्रॉल ट्रॅश करणार हे जणू आपण मान्यच करून चाललात . म्हणजे त्यात काही गैर नाही का ?
रोख ब्राह्मणीपणा वर आहे. ब्राह्मणांवर तो जातो कारण ते तसे सपशेल वागतात. लेख का लिहिला आहे लेखात काय आहे त्या पेक्षा तो स्पॉंसरड आहे का नाही . लेखक सतत तुमच्या संस्थळावर लिहितो कि नाही .. ह्याचीच तार तोडत बसलात तुम्ही.
तुम्ही हे जे लिहिले आहे त्यावरून स्पष्ट होते की आपल्याला जात आणि तिचे राजकारण घंटा कळत नाही.
शंख नाही.. आणि फोडणे नाहीच नाही. ही प्रतिमा पण ब्राह्मणी आहे. कळतंय का .. इतकी आत भिनली आहे जात... की आपले शब्द , आपल्या प्रतिमा पण तशाच होतात . मंजुळे कॅमेरा का फोडतो फंद्रीच्या शेवटी ? विचार करा थोडा !
तुम्ही सगळे अंदाज बांधा कुणाचे काय राजकारण आहे आणि काय कारस्थान .. मी म्हणतोय लेखाबद्दल चर्चा करताना ट्रॉलिंग का करावेसे वाटते ? आपण लहान आहोत का ? ह्या खोट्यानावामागे आपण का लपत राहता ? एखादे उत्तर इंग्रजीत दिले तर आकाश कोलसते काय ? माझ्या प्रश्नाची तुम्ही कुणीच उत्तरे देत नाही .
हम्म्म्म्म्… रोचक प्रश्न!
आता मला काय ठाऊक? मुळात त्याने कॅमेरा फोडला, हे काही तो मला सांगायला आला नव्हता. सबब, त्याने कॅमेरा फोडला, हेच जेथे मला ठाऊक नव्हते, तेथे त्याने तो का फोडला, ते मी काय सांगणार, कपाळ!
तरीसुद्धा, विचार करा म्हटलेत, तर करून पाहतो बापडा. कदाचित त्याला जुन्या कॅमेऱ्याचा कंटाळा आला असेल, नि नवीन घ्यायला निमित्त हवे असेल. कदाचित त्याला पैसे वर आले असतील. किंवा, जुना कॅमेरा बिघडला असेल नि त्याला त्याची विल्हेवाट लावायची असेल. अनेक शक्यता आहेत. शेवटी कॅमेरा त्याचा आहे; त्याचे त्याने काय करायचे नि का करायचे हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे, नाही काय? त्याबद्दल आपण त्याला काय नि कोणत्या हक्काने सांगणार?
मंजुळेने कॅमेरा फोडला म्हणून आपण प्रमाणभाषा मोडायची… हे लॉजिक काही समजले नाही बुवा.
शंख फोडत नाहीत. शंख करतात. परंतु अर्थात तुम्हाला हा बारकावा ठाऊक असण्याचे काही कारण नाही, त्यामुळे सोडून देऊ.
असो, चालू द्या.
ह्या खोट्यानावामागे आपण का
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
.
शीर्षकाशी (फक्त शीर्षकाशीच!) सहमत आहे.
बामानीपणात लोक फक्त नाव
बामानीपणात लोक फक्त नाव शीर्षकच वाचतात.
आपण काय,…
…सीकेपी वाटते! (असाच एक रँडम अंदाज.) तर मग बामणीपणाची लक्षणे सांगितलीत, तशीच (उदाहरणादाखल) सीकेपीपणाचीसुद्धा लक्षणे सांगणार काय? (तेवढाच तुलनात्मक अभ्यास अनायासे होऊ शकेल.)
असो, चालू द्या.
#MeToo
शीर्षकाशी (फक्त शीर्षकाशीच!) सहमत आहे.
#MeToo
आर्वीकरांना द्यावयाचा प्रतिसाद
हा लेख आणि तुमचा संकल्पनाविषयक लेख आणि या दोन्हीवरच्या प्रतिक्रिया वाचत आहे.
सर्वप्रथम, या वेबसायटीच्या स्थापनेनंतर काही काळातच सर्वसंमतीने, काहीएक ध्येयथोरणं आखून ती पाळायचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्याचा संदर्भ म्हणजे हा धागा : https://aisiakshare.com/node/10
"जोवर शिष्टपणाची मर्यादा पाळली जाते, आणि कोणाविषयी बदनामीकारक, कायदेबाह्य, अगर संस्थळाला हानिकारक ठरू शकेल असे लिखाण होत नाही तोपर्यंत लेखकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न केला जाईल. कुठल्याही जाती, धर्म, देश, प्रांत, लिंग किंवा तत्सम समूहाबद्दलच्या द्वेषमूलक/विद्वेषपूर्ण विधानांना (Hate speech) ऐसी अक्षरेवर अभिव्यक्तीस्वातंत्र्य समजलं जात नाही." हा यातला एक महत्त्वाचा भाग.
-----
आता थोडं "आयडीं"च्या मागच्या गोपनीयतेविषयी : आय्डीमागच्या व्यक्तीची ओळख पटेल, किंवा पटणार नाही. ज्यालात्याला आपली ओळख गुप्त ठेवण्याचा हक्क किंवा किंवा प्रदर्शित करण्याची मुभा आहे. अनेक सदस्यांचा रोख कमीअधिक प्रमाणात खवचट असताना दिसतो. उपरोल्लेखित ध्येयधोरणांशी वर्तन असलं तर सर्व प्रकारची टीका - मग ती बऱ्याचदा बोचरी आणि कुत्सित स्वरूपाची असते - ती करण्याचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य इथे आहेच. (प्रसंगी यातली मोठ्या प्रमाणातली टीका ही 'ऐसीअक्षरे' हीच कशी भंपक गोष्ट आहे अशा अर्थाची असते. अशा स्वरूपाच्या प्रतिक्रियांवर इथल्या विश्वस्तांचं विशेष प्रेम आहे असं मानलं जातं.)
असो. तुम्ही मांडलेला ब्राह्मणी चेहरामोहरा असण्याचा आरोप - ज्याचं स्वरूप जातीयवादाचा आरोप असं नसून ब्राह्मणी इस्थेटीक अशा अर्थाने आहे असं मी समजतो - ते मला बऱ्यापैकी पटल्यासारखं वाटतं. असो.
तुमच्या लेखावर ट्रोलिंग झालं का? तर हो. ते ट्रोलिंग कायद्याच्या, ध्येयधोरणांच्या कक्षेत येणारं आहे का? हो. अति ट्रोलिंग वाईट आहे का? अर्थातच.
मात्र, तुमच्या संकल्पनाविषयक लेखावर (विशेष करून अस्वल सारख्यांनी) उत्तम प्रश्न विचारून, त्यांच्या उत्तरांमार्फत तुमचा मूळ मुद्दा अधिक चांगल्या पद्धतीने पुढे आला का? तर माझ्यामते होयच. आणि ते या अशा वेबसायटींचं यश आहे - असं मला व्यक्तिश: वाटतं.
तर इथे आहे हे असं आहे. बऱ्यापैकी वात्रट वातावरण. नको तितकी कुत्सितता. ती असण्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणें आले. मात्र त्याला वेबसायटीच्या कर्त्याधर्त्यांची फूस आहे असं मानू नये अशी विनंती.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
लोक काहीही बोलतात. कशावरही.
लोक काहीही बोलतात. कशावरही. ही चर्चा इतकी सुमार आहे त्याने तुम्हा सगळ्यांना काही मिळाले असेल तर उत्तम , मला काहीच मिळाले नाही. थोड्यात मी देशपांडे आणि रणदिवे ह्यांना विचारे - ह्या बिनडोक लोकांसोबत काय करता तुम्ही ? ह्यांनी वाचावं म्हणून कुणी का लिहावे ? काय मिळते कुत्सित होऊन ? ट्रॉलिंग करून ? त्यापेक्षा एंगेजमेंट करणे जास्त बरे नाही का ?
बोंबला .. हे सगळे परत ससंथाळांचे यश .. बरोबर महाराज ! आपल्याच बामानीपणात अडकून राहणारे लोक इतका ट्रॉलिंग का करतात हे लेखात समजावले आहेच.
तुम्ही सगळे लोक सिनिकल ! तुमची एकमेकांची गुलामगिरी मुबारक !
मी अगदी किरकोळ वेळेला लिहिलं
मी अगदी किरकोळ वेळेला लिहिलं आहे परंतु मी ऐसी अक्षरे वाचतही असतो.
समजा लिहिणार्यांनी एखाद्या टेकडीकडे बोट दाखवले तर प्रतिक्रिया म्हणून तुमचे बोट टेकडीकडे नसून भलतीकडेच आहे, तुमचे बोटच वाकडे आहे इत्यादी इत्यादी अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया येतात व लिहिणाऱ्या चा हिरेमोड होतो.
राजन बापट यांनी म्हटल्याप्रमाणे बोचरी आणि कुस्थित स्वरूपाची टीका करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य येथे आहे.. परंतु तेवढे आणि तेवढेच करून कसे चालेल.. तो टेकडीकडे का बोट दाखवत आहे त्याला काय म्हणायचे आहे हे समजून घ्यायला नको का? टीका, उपहास, विडंबन देखील मान्य असायला कोणाची हरकत नाही पण केवळ ते आणि तेच कसे आवडेल?
कधी कधी मला वाटते की, जे कदाचित चूकही असेल, इथले बहुतांश सभासद हे विकसित देशांमध्ये, किंवा इथल्याच मोठ्या शहरांमध्ये आपापल्या क्षेत्रात काम केले आहे किंवा करीत असतील व व त्यांना एकमेकांची व इतरांची चेष्टा करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म हा उपलब्ध झाला आहे, म्हणून हव्या अशा कॉलंट्या उड्या मारण्यासाठी आयडी गुप्त ठेवण्याची प्रोव्हीजन केली असावी!!
म्हणून हव्या अशा कॉलंट्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वाढदिवसाच्या शुभेच्छा...
वाढदिवसाच्या शुभेच्छा... समजल्या नाहीत.
राकु भाऊ आले
भाऊ आले !!!