अभिनेत्री सीमा देव : आदरांजली

"ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन" या शब्दांपैकी "ज्येष्ठ" ,"यांचं" हे शब्द खरं तर उपरे आहेत.

माझ्या लहानपणीं माझ्या आईबद्दलची पहिली कुठली अंधुक आठवण असेल तर ती अशी की तिचा आवाज गोड होता आणि जी काही गाणी ती खरंच फार सुंदर म्हणत असे त्यापैकी "सुवासिनी", "जगाच्या पाठीवर" या तत्कालीन गाजलेल्या चित्रपटांमधली गाणी. जेव्हा जेव्हा आईबाबा आम्हाला घेऊन आईच्या मैत्रिणींच्या ग्रुपबरोबर भेटायला घेऊन जायचे तेव्हातेव्हा हटकून आईच्या मैत्रिणी 'विजू ते सुवासिनी मधलं गाणं म्हण ना किंवा विकत घेतला श्याम म्हण ना" असा आग्रह (बहुदा कॉफीपानासमवेत ) करायच्या. (आईचं सासरचं नि माहेरची दोन्ही नावं मला खूप आवडायची. मात्र तिच्या "विजया" या मला आवडणाऱ्या नावाचा हा शॉर्ट फॉर्म मला कधी आवडला नाही Smile कुणाचं काय तर कुणाचं काय म्हणतात ना ! )

... सीमा देव म्हणजे आपल्या आईचं प्रारूप आहे किंवा आपली आई, तिच्या मैत्रिणी, तिच्या बहिणी या सर्व सीमा देवची प्रारूपं आहेत असं कुठेतरी माझ्या अबोध मनात झिरपत गेलं असणार.


seema-deo-png-image

"प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधु आई" इत्यादि मातृगुण गाणाऱ्या गाण्यांपेक्षा माझ्यामते ही अशी असोसिएशन्स, अशा मनात बांधलेल्या खूणगाठीं मला नेहमीच अर्थपूर्ण वाटत आलेल्या आहेत.

मला आठवतंय. आमच्या शेजारी एक कुटुंब होतं. त्यातली मुलं माझ्याच वयाची. त्यांचे बाबा खूप अकाली गेले होते. वडलांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांचे खूप घाबरलेले, दिङ्मूढ झालेले चेहरे आठवतात. मग त्यांच्या वडलांच्या मृत्यूनंतर काही महिन्यातच, वडलांना प्रचंड आवडणाऱ्या राज कपूरचं निधन झाल्याची बातमी आम्ही टीव्हीवर पाहात होतो. त्या वेळी अचानक ह्या मुलाच्या डोळ्यातून न थांबणारे घळाघळा अश्रू वाहताना मी पाहिले आणि तेव्हाच मला जाणवलं की आवडत्या राजकपूरच्या उमदेपणा, देखणेपणा, प्रेमळपणाच्या प्रतिमेमधे त्या माझ्या मित्राने आपले वडील पाहिले असणार.

आशा भोसलेने ६० च्या दशकात जी मराठी चित्रपटगीतं गायली त्यातून सीमा देव जशी लहानपणी दिसली, भावली तशी दुसरी कुणी कधी भावली नाही.
आता जिथे कुठे सीमा देव नावाची सुवासिनी आणि तृप्त गृहिणी तिच्या नवऱ्याला रमेश देवला जाऊन भेटली असेल तिकडे ती बहुदा हे गाणं गात असेल का?

या सुखांनो या
या सुखांनो या
एकटी पथ चालले, दोघांस आता हात द्या, साथ द्या

विरहांतीचा एकांत व्हा, अधीर व्हा आलिंगने
गाली ओठी व्हा सुखांनो, भाव वेडी चुंबने
हो‌उनी स्वर वेळूचे, वाऱ्यासवे दिनरात या, गात या

आमुच्या बागेत व्हा, लडिवाळ तुम्ही पाखरे
शयनघरच्या या छताची, व्हा रुपेरी झुंबरे
होऊ द्या घर नांदते, तुम्हीच त्यांना घास द्या, साथ द्या

अंगणी प्राजक्त व्हा, सौधावरी व्हा चांदणे
जोडप्याचे गूज जुईचे, चिमुकल्यांचे रांगणे
यौवनी सहजीवनी, दोन्ही मनांचे गीत व्हा, प्रीत व्हा

तर मित्रांनो आठवणी आणि असोसिएशन्स ह्या अशा असतात. सीमा देव आता आठवली की लहानपणी पाहिलेली ऐकलेली गाणी आणि सिनेमे आठवतातच. पण ते गालिब म्हणाला ना...."जिक्र उस परिवश का, और फिर बयान अपना"....तसं सौंदर्य तिचं होतं, तारुण्य तिचं होतं, पण ते वर्णन करणारा, आठवणीमधे रमणारा मी होतो, ते शब्द माझे होते...

भावपूर्ण आदरांजली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अगदीच मनापासून लिहिलं आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भावपूर्ण श्रद्धांजली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सीमा यांचे बरेच चित्रपट लहानपणी पाहिले. त्यातील सुंदर गाण्यांमुळे त्यांचा चेहेरा लक्षांत राहिला. लहानपणीच्या अनेक आठवणींबरोबरच त्यांच्या स्मृति निगडित रहातील. त्यांना मनापासून श्रद्धांजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0