ब्रेन इन अ व्हॅट!

ब्रेन इन अ व्हॅट!
क्वांटम फिजिक्सशी किंवा आईनस्टाईनशी थोडा परिचय असेल तर “थॉट एक्स्पेरीमेंट” हा काय प्रकार आहे हे नव्याने सांगायची गरज नाही. किमान “स्क्रोडिंजरचे मांजर” तरी माहित असणारच. “थॉट एक्स्पेरीमेंट” म्हणजे कल्पनेची उत्तुंग भरारी. कित्येक गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात अनुभवता येत नाहीत त्याबद्दल “खयालोमे” विचार करायचा. अशा कल्पनेच्या भरारीतून आपल्याला सिद्धांतांचे पुष्टीकारण मिळू शकते. “थॉट एक्स्पेरीमेंट” हे फक्त विज्ञानापुरते मर्यादित नाहीत, तर त्यांचा तत्त्वज्ञानातही सढळ वापर केला गेला आहे. उदाहरणार्थ देकार्तचा राक्षस- Descartes Evil Demon. किंवा प्लाटोचा “गुहेतील कैदी” दृष्टांत! ह्यांचा आधुनिक अवतार आहे “ब्रेन इन अ व्हॅट!”
कल्पना करा कि एखाद्या प्रतिभाशाली शास्त्रज्ञाने (किंवा अतिप्रगत परग्रह वासियांनी) तुमचा मेंदू तुमच्या कवटीतून काढून फिश बाउल मध्ये ठेवला आहे. ह्या भांड्यात मेंदूचे पोषण करणारा द्रव आहे. तो मेंदूला जिवंत ठेवतो. ह्या मेंदूचा मज्जा रज्जुशी संबंध तुटला आहे. त्या ऐवजी मेंदू तारांच्या सहाय्याने सुपर संगणकाशी जोडला गेला आहे.
आपल्याला संवेदना कशा होतात? आपल्या ज्ञानेंद्रियांकडून मेंदूला विद्युत संदेश पाठवले जातात. आपण चुकून एखाद्या गरम भांड्याला बोटाने स्पर्श केला तर बसलेल्या चटक्याचे विद्युत संदेशांत रुपांतर होते आणि हा संदेश मज्जा तंतुतून मज्जारज्जुतून मेदुला पोहोचवला जातो. मेंदू तत्काळ हात बाजूला घेण्याचा संदेश हाताच्या बोटाच्या स्नायूंना देतो.
समजा आपण संगणकाकडून “चटक्याचा” संदेश ह्या व्हॅट मधल्या एकाकी मेंदूला दिला तर त्या मेंदूची अशी कल्पना होईल कि आपण शरीरातच आहोत. आणि रोजचे जीवन जगत आहोत. शास्त्रज्ञ अशा एकाकी मेंदूबरोबर काहीही खेळ खेळू शकतील.
समजा हा प्रयोग पुणे विद्यापिठातल्या न्युरोलोजीच्या प्रयोगशाळेत चालला आहे. पण मेंदूला वाटतंय कि आपण मित्रांबरोबर वैशालीत गप्पागोष्टी करत इडली वड्यावर ताव मारत आहोत. किंवा मुंबईत मरीन ड्राईववर मैत्रिणी बरोबर हवा खात आहोत. इथच थांबू नका. आपण चंद्रावर, मंगळ ग्रहावर आहोत.
मनुष्याच्या कल्पना शक्तीला अंत नाही.
हे वाचताना तुम्हाला एलओएल होत असणार, तुम्ही म्हणत असणार ह्याची आता सटकली आहे. मला कल्पना आहे. पण ही हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट नाहीये.
तत्त्वज्ञानातील हा हॉट टॉपिक सुरु झाला रेने देकार्त पासून. (René Descartes in 1641 in the Meditations on First Philosophy,) त्याचे म्हणणे होते कि आपल्याला पंचेंदिरीयांतून जे ज्ञान प्राप्त होते ते खरे आहे कि तो निव्वळ भ्रम आहे. त्यतून ते सुप्रसिद्ध वाक्य आले, ‘Cogito, ergo sum’ (‘I think, therefore I am’).
१९७३ मध्ये गिल्बर्ट हार्मन ह्याला आधुनिक स्वरून दिले.आणि १९८१ साली हिलरी पुटनामने त्याच्यावर अधिक काम केले. BIV म्हणजे ब्रेन इन अ व्हॅट चा कंसेप्ट ह्या दोघानीच पुढे आणला.
मग आपण BIV मध्ये आहोत कि नाही? हे कसे सिद्ध करायचे? ह्यावर बरीच तात्विक चर्चा झाली आहे. ती केवळ ज्यांनी त्या विषयाचा कसून अभ्यास केला आहे त्यांनाच समजावी अशी आहे. अजून डोक्याला शॉट लावून घेण्यात अर्थ नाही.
विज्ञानकथा लेखकांची मात्र चंगळ झाली. ही कल्पना वापरून अनेक कथा लिहिल्या गेल्या. अनेक सिनेमे बनवले गेले. त्यांची यादी आपल्याला विकिवर मिळेल. (https://en.wikipedia.org/wiki/Brain_in_a_vat)
आपले कितीतरी आवडीचे सिनेमे ह्यात आहेत. ह्यात प्रमुख म्हणजे “द मॅट्रिक्स” ह्या सेरीज मधील तीन सिनेमे.
ह्या यादीतील मला आवडलेला म्हणजे “डोनोवान’स ब्रेन” ही कथा १९४२ साली लिहिण्यात आली. त्यावर आधारित एकूण तीन पिक्चर आले.
The Lady and the Monster (1944), Donovan's Brain (1953), and The Brain (1962). ह्या पैकी दोन The Lady and the Monster (1944), and The Brain आपण यू ट्युब वर बघू शकता. वेळ असेल तर अवश्य पहा.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एक कथा लिहित आहे. त्याची पार्श्वभूमी म्हणून हा लेख लिहिला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ब्रेन इन अ व्हॅट!' या शीर्षकाचा आणि त्या 'तरुण तुर्क आणि एक अर्क म्हातारा!' या दुसऱ्या शीर्षकाचा काही परस्परसंबंध आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हाट? द फक!
पण सांगतो.
Gentlemen prefer Arak over Vat!
Your body, your choice.
काहीही "घ्या" पण माझी "वाट" लाऊ(लावू) नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(माझी स्मृती जर मला दगा देत नसेल, तर) ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ची अगदी सुरुवातीच्या काळात (१९७०च्या दशकात, वगैरे) पेपरांतून जी जाहिरात छापून येत असे, तीत (का, कोण जाणे, परंतु) ‘व्हॅट ६९’च्या बाटलीचे चित्र असे.

(कदाचित तत्कालीन मराठी मानवाला तेवढी एकच (ऐकून) माहीत असावी. ती तुमची ती ग्लेनफिडिच नि सिंगल माल्ट न् काय काय ते ऐकून माहीत होण्याइतकी मराठी मानवाची प्रगती व्हायला बहुधा पुष्कळ काळ लोटावा लागला असावा. असो चालायचेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Vat ६९ ही भारतीय सिनेमा नाटकात त्या वेळी सर्वाधिक वापरली जाण्याचे कारण त्याच्या बाटलीचा त्या वेळचा वेगळा आकर्षक आकार हे होते असे वाटते. जादूच्या प्रयोगांत देखील तीच असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी तामिळनाडू मधे होतो तेव्हा तमिळ भाषेत "अरक"(अर्क) म्हणजे हातभट्टीची दारू असे ऐकले होते. ख खो दे जा. आता बघितले तर अर्क म्हणजे वाईन असा पण अर्थ बृहदकोशात मिळाला.
नाटक तसे बाई आणि बाटलीशी संबंधित आहेच.
मधुकर तोरडमल ह्यांचे नाटक आणि त्यांचा "आपला हा-ही-हू-हो' ची बाराखडी काढणारा म्हातारा प्रो. बारटक्के बघायचा योग तेव्हाच मिळाला.
...एका समीक्षकाने ठळकपणे म्हणले होते, ‘सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विशेषतः पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये’. पण झाले उलटेच. त्यानंतर रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला, मुली यांनी अक्षरशः रांगा लावून बुकिंगमध्येच नाटक हाऊसफुल्ल केले...
गेले ते दिवस. हो आणि एकदा "दिवस गेले" कि... परत थोडेच येणार?
श्रावण चालू आहे म्हणून एव्हढेच बस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0