ट्रेन ड्रीम्स: एक शांत, पण अस्वस्थ करणारी अनुभूती
काही चित्रपट हे केवळ पाहण्यासाठी नसतात, तर अनुभवण्यासाठी असतात. नेटफ्लिक्सवर नुकताच आलेला आणि सध्या ऑस्करच्या शर्यतीत असलेला 'ट्रेन ड्रीम्स' हा असाच एक चित्रपट आहे.
- Read more about ट्रेन ड्रीम्स: एक शांत, पण अस्वस्थ करणारी अनुभूती
- Log in or register to post comments
आपला हत्तीखाना जेमिनी ए.आय वर
सध्या ए.आय ची इतकी चर्चा चालू आहे तेव्हा जेमिनी ए.आय चे आपल्या हत्तीखान्यावर काय मत आहे हे बघायला मी "हरचरणसिंग हुडा ऐसीअक्षरे हत्ती" असे टाईप केले. आपल्या सगळ्यांना माहितच आहे की एका अनुप्रासात हरियाणातील हिस्सारच्या हरचरणसिंग हुडा नावाच्या काल्पनिक व्यक्तीच्या हलकल्लोळसिंग नावाच्या हत्तीचा उल्लेख आहे. त्यावर जेमिनी ए.आय ने दिलेले उत्तर आणि त्यावर पुढे झालेली चर्चा रोचक आहे.
- Read more about आपला हत्तीखाना जेमिनी ए.आय वर
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3 views
तुटे वाद संवाद तो हितकारी
व्यर्थ वाद–विवाद मनुष्याचा जन्म वाया घालवतात आणि संशय व दंभ वाढवतात. अहंकारामुळे विद्वानांचे ही पतन होते, म्हणून मनाने अहंकाराचा त्याग करून परमेश्वरात रमावे. फुकट बोलणे आणि गर्व निरर्थक आहेत; त्याऐवजी आत्मशोध करावा. खरा संवाद तोच जो वाद तोडतो, विवेकाने अहंकार बदलतो, बोलणे आणि आचरण यांचा मेळ घालतो आणि कर्म भक्तिपंथाकडे वळवतो. अशा हितकारी संवादानेच संसारात ही माणसाला वैभव प्राप्त होते आणि मन शुद्ध होऊन मोक्षमार्ग सुलभ होतो.
- Read more about तुटे वाद संवाद तो हितकारी
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6 views
दोन विडंबने
१) काटा रुते कुणाला, यावरुन सुचलेले हे विडंबन आहे. माझ्यासारख्या खादाड रिकामटेकड्या रिटायर्ड म्हातार्यांचे हे दु:ख आहे.
खा खा सुटे तुम्हाला
म्हणते कुटुंब सारे
मज भूक आवरेना
हा खाद्यभोग आहे
फडताळ शोधु पाहे
कळ आतल्या जिवाची
चिरतोबरे भरावे
मज शाप हाच आहे
शोधु डबे पहातो
पडुनि अनर्थ होतो
नजरा अबोल सार्या
विपरीत अर्थ होतो
तो मान संपला की
काहीच आकळेना
- Read more about दोन विडंबने
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4 views
..वर्क फ्रॉम होम..
वर्क फ्रॉम होम मी ..
सुटीच्या दिवशी..
कामाच्या बहाण्याने..
लॅप टॉप वर ..
टाईम पास करत असताना
वर्क फ्रॉम होम ती..
गहु निवडताना..
गव्हात आलेला एक खडा..
माझ्याकडे..
तिरपा कटाक्ष टाकुन..
तिने असा काही फेकला कि..
कि.. मी लगोलग..
खुर्ची टेबल सोडुन..
तिच्यासमोर फतकल मारुन..
मटर सोलु लागलो..!!
समटाईम्स..
अॅक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स...
है सौ(!) टक्का खरे आहे..
एकदम पटेश..
+योगेशु
- Read more about ..वर्क फ्रॉम होम..
- 9 comments
- Log in or register to post comments
- 1 view
माधव गाडगीळ : लोकाभिमुख वैज्ञानिक
पर्यावरणशास्त्रज्ञ आणि विचारवंत अशी ओळख असलेल्या गाडगीळांनी भारतात पर्यावरणीय अभ्यासाची पायाभरणी केली आणि सहा दशकं ते सातत्याने ठसवत राहिले, की पर्यावरण जपण्याची सुरुवात मानवी समुदायांकडूनच होणं आवश्यक आहे.
- Read more about माधव गाडगीळ : लोकाभिमुख वैज्ञानिक
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2 views
"म आं-जा" च्या संक्षेपांची यादी-भाग (१)?
"रच्याकने" जाता जाता कविता पाडली
"पुलेशु"च्या पावसात टंकून टाकली
" कृ ह घ्या" च्या उपदेशे माझी सटकली
" डू आयडी" ची पिल्ले तेव्हा जन्माला घातली
"हा का ना का", "हा का ना का" नेहमी वाटले
"ह ह पु वा", "ह ह पु वा" क्वचितच झाले
"म आं-जा" च्या संक्षेपांची यादी आटपली?
"पु भा प्र" च्या आशेवर आठोळी संपली :)
~~~~~~~~~~~~~~~~
शब्दार्थ:
म आं-जा= मराठी आंतर-जाल
- Read more about "म आं-जा" च्या संक्षेपांची यादी-भाग (१)?
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2 views
एका क्राईम रिपोर्टरची सुरस आणि चमत्कारिक मुलूखगिरी : भाग ७
“मला एका व्यक्तीकडून कॉल आला, तो म्हणत होता की तो दाऊद इब्राहिमच्या वतीने बोलत आहे.”
य.दि.फडके , एक बौद्धिक हत्ती
य. दि. फडके : विवेकशील इतिहासबोधाचा दीपस्तंभ
महाराष्ट्राच्या आधुनिक वैचारिक इतिहासात य. दि. फडके हे नाव केवळ एक इतिहासकार म्हणून नव्हे, तर समाजाच्या आत्मपरीक्षणाची सवय लावणारा विचारवंत म्हणून कोरले गेले आहे. इतिहास म्हणजे भूतकाळाची केवळ गौरवगाथा नव्हे, तर समाजाने स्वतःकडे आरशात पाहण्याची प्रक्रिया—हा दृष्टिकोन त्यांनी सातत्याने मांडला. त्यामुळेच त्यांचे लेखन कालातीत ठरते.
- Read more about य.दि.फडके , एक बौद्धिक हत्ती
- Log in or register to post comments
- 5 views
एका क्राईम रिपोर्टरची सुरस आणि चमत्कारिक मुलूखगिरी : भाग ६
मुंबईतल्या टोळीयुद्धात अडकलेल्या विमानकंपन्या आणि हरीश नांबियार यांना आलेले अनुभव
- Read more about एका क्राईम रिपोर्टरची सुरस आणि चमत्कारिक मुलूखगिरी : भाग ६
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2 views