Skip to main content

होळीची लावणी

काल खफवर धुळवड झाली. पण तुम्ही मिस करू नये म्हणून हा धागा काढते आहे. चला तर होऊन जाऊ द्या शिमगा.
बघता काय व्हा सामील. कल्पनाशक्तीचं वारू आणि काव्याचं तारू द्या भरकटू. होळी काय एकाच वर्षी परत परत येत नसते ;) तेव्हा जोर लावा न हो ऊन जाऊ द्या तर काय ;)
.
आबांनी सुरुवात केली,
.

तुम्हाघरच्या गुळाला सजना
आमच्या तुपात भिजवा
अन् राया चला, पिर्तीचा सांजा शिजवा

.
.
अभ्याने रंग भरले. ओयहोय!! भांडाभांडी काय, अन वाफकोंडी काय ;) बहार आणली.
.

फिलाडेल्फिया मधील नाटकांचा रस्ता

मी गेल्या महिन्यात कार्यालयीन कामानिमित्त अमेरिकेतील पूर्व भागात असेलल्या ऐतिहासिक अशा फिलाडेल्फिया(Philadelphia) शहरी काही दिवस गेलो होतो. पूर्वीही एकदा २०१४ मध्ये गेलो होतो. त्यावेळच्या अनुभवांबद्दल लिहायचे राहून गेले आहे, एक नाममात्र अपवाद सोडून, आईस हॉकीचा सामना, ज्याबद्दल पूर्वी लिहिले आहे. ह्या वेळेसही मला फिलाडेल्फियामध्ये भटकंती करायला बऱ्यापैकी सवड मिळाली. त्याबद्दल सविस्तर लिहीनच नंतर, पण येथे मी अनुभवलेल्या नाट्यसंस्कृती बद्दल लिहिणार आहे.

ललित लेखनाचा प्रकार

शिवाजी महाराजांविषयी

Taxonomy upgrade extras

खरडफळ्यावर झालेली शिवाजी महाराजांविषयीची प्रश्नोत्तरे वेगळ्या धाग्यात टाकली आहेत. पुढची चर्चा इथे करावी ही विनंती.

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८०

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००पेक्षा अधिक आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----

एकेकाळी मला बॉलीवूड मधली सर्जनशीलता संपुष्टात येण्याचं स्वप्न पडायचं. तर, माझा असा प्रश्न आहे की, ती संपली आहे का?

गिधाडगिरी

Taxonomy upgrade extras

डाव्या लोकांबद्दल जर काही सर्वात गोड असेल तर तो आहे त्यांचा समानतेचा आग्रह. म्हणजे सगळं काही सपाटच असावं असं नव्हे. एखादा मनुष्य किती का अक्षम वा गैरजिम्मेदार वा भाग्यहिन असेना, त्याला एक "किमान मानुष्यिक जीवन" मिळावं हा आग्रह गोड आहेच खरा. त्या सीमेपुढे मात्र व्यक्तिगत घटकांचा परिणाम होऊन विषम समाज असलेला चालावे.

क्षणभंगुरतेचा कॅथारसीस

आयआयसीयू
कॅन्सर हॉस्पिटल
मयतानंतर
स्मशानातून
आल्यावर
मनात उमटलेलं वैराग्य कायम राहो
नसलेल्या/असलेल्या
परमेश्वराच्या
चरणी
प्रार्थना

काही रोचक अनुभव - ३

साधारण ७५-७६ च्या सुमारास पुण्यात शिकायला होतो, तेंव्हाचीच गोष्ट. वेळ मिळेल तेंव्हा मुंबईला जाणे-येणे व्हायचेच. अशाच एका रविवारी संध्याकाळी, व्ही.टी. ला जाऊन, डेक्कन क्वीन मधे बसलो होतो. गाडी सुटायला साधारण पंधरा मिनिटे तरी अवकाश असेल. एक, माझ्यासारखाच मध्यमवर्गीय दिसणारा, गोरटेला तरुण माझ्यासमोर येऊन उभा राहिला.

"तुम्ही पुण्याला कुठे रहाता ? सदाशिव पेठेच्या जवळ आहे का ?" मी होकारार्थी मान हलवली. (आयला, म्हणजे आपणही सदाशिवपेठी दिसायला लागलो की काय?)

ललित लेखनाचा प्रकार

हल्लीच काय खरेदी केलंत ?

अमेझॉनकृपेने किंवा लोकल बाजारात काहीना काही खरेदी चालूच असते. रीटेल थेरपीचा वापर वाढतोच आहे.

एखाद्या अतिभव्य मॉलपासून ते गावच्या आठवडी बाजारापर्यंत कुठेही काहीतरी खास हवं असलेलं मिळून जातं अतीव समाधान किंवा भ्रमनिरास होतो.

कदाचित इकडेतिकडे चार रिव्ह्यूज टाकले जातात आणि ती वस्तू मागे पडते.

तर एकंदरीत आपण खरेदी केलेल्या सामानाबद्दल काही सांगावंसं वाटलं तर इथे नोंदवून ठेवावं अशी इच्चा आहे.

ही बातमी समजली का? - १४१

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.

अमेरिकेतील वंशिक हल्यांबद्दल भारत सरकारचं धोरण काय असाव?

* सरकारने फक्तं तात्पुरते गेलेल्या लोकांची (ह१ब, ल१ , विद्यार्थी,पर्यटक ,व्यवसायासाठी गेलेले ब१/ब२ वाले यांचीच काळजी करावी.
* वरील सर्व अधिक ग्रीन कार्ड होल्डर यांचीच काळजी करावी.
* वरील सर्व अधिक जे भारताचं नागरिकत्व सोडून अमेरिकेचे नागरिक झालेत त्यांची देखील काळजी करावी.
* सेकंड जनरेशन इमिग्रंत्सची (बोले तो abcd) यांची देखील काळजी करावी.