Skip to main content

T minus ४ महिने

आमचा चिरंजीव उणे ४ महिन्याचा असताना (म्हणजेच गर्भात असताना लिहिलेला लेख इथे पोस्ट करत आहे. केवळ करमणूक म्हणून घ्यावा. धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश्य नाही).
======

नमस्कार !
आजपासून देवाने मला ऐकण्याची शक्ती दिली. खरंतर देवाने वैगेरे काही दिली नाही, पण तसं म्हटल्याशिवाय तुम्ही लोकं पुढं वाचणार नाही.

बहुतेक Take off ची वेळ जवळ येतेय. तुमच्यात Take off कशाला म्हणतात माहित नाही पण आमच्यात तर यालाच Take off म्हणतात.

काय विचारताय....?

ही बातमी समजली का? - १२८

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं. अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
____

काळे पहाड आणि दुष्टभू- साउथ डाकोटा

मिनेसोटा राज्यातून कार धावत होती. धावत्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मेपल्स, ओक्स, फर्स आणि इतर उंचउंच झाडांची दाटी, नेटकी शेतं, त्यातल्या फार्महाऊसेस आणि बार्न्सच्या भोवती गर्द झाडी बहुतेकवेळा असणारच. आणि मग विस्तीर्ण अशी मक्याची, सोयाबीनची शेते. लालस भुरकट तुऱ्यांखाली मक्याच्या हिरव्या धांड्यांच्या रांगा आणि गर्द हिरवे सोयाबीन अशी दुरंगी शेते मैलोगणती पसरलेली. मिनेसोटा राज्यच ‘लेक’रवाळे. त्यामुळे अनेक तळी, तलाव, सरोवरे... नजरेला थंडगार स्पर्श सतत जाणवत रहातो त्यांचा. मिसिसिपीची महानदी आणि तिच्या सख्या अधूनमधून दिसत रहातात. मधूनमधून लागणारी छोटी देखणी, आखीवरेखीव टुमदार नगरे...

राकुगो

मध्ये काही कारणामुळे मला, पुण्यात मी पाहिलेल्या एका जपानी कार्यक्रमाची, आठवण झाली. मी काही वर्षांपूर्वी(२००४) पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून भारतविद्या(Indology) शिकत होतो. त्यावेळेस समजले की तेथे जपानी भाषेचे अभ्यासक्रम आहेत. अगदी BA, MA वगैरे देखील आहेत. पुणे आणि जपान मध्ये, भाषेच्या निमित्ताने म्हणा, ओद्योगिक क्षेत्रातील सहकार्यामुळे म्हणा, बरीच देवाणघेवाण होत असते. त्यामुळे जपा संबंधित प्रदर्शने, किंवा इतर कार्यक्रम नेहमीच होत असतात. २०११ मध्ये आमच्या ग्रुप मध्ये एक निरोप आला की जपानी कलाकाराचा एक कार्यक्रम होणार आहे.

ललित लेखनाचा प्रकार

"अमेरिका द ब्युटिफुल"

एक मर्दानी, आक्रमक मेक्सिकन
गवत कापण्याच्या गाडीवर बसून गाडी
रिंग रिंग रिंग सर्वत्र फिरवीत असतो.
भिरभिरणारी सहा फुटी पाती बेडकांच्या , उंदरांच्या
पोटातून सफाईदारपणे जातात ,
व्हॅक्यूम होताना गवतावर
रक्ताचे थेम्ब उमटलेले दिसतात .
कॉर्पोरेट मैदानावर फिरताना कापलेल्या गवताचा
ताजा वास दरवळत रहातो.
अमेरिका रेखीव बनते .
मग सुंदर स्त्रिया येतात
नाजूक बोटांच्या चिमटीत
स्कर्ट उचलून
हिरवळीवर तरंगत फिरतात .
त्यांच्या ओठावरची लिपस्टिक
त्यांचे मॅचिंग लालचुटुक बूट
त्यांचे किणकिणणारे हास्य
नजर ठरत नाही.
---

कॅनडाची थंडी – स्टँडअप स्क्रिप्ट

ऑक्टोबर २०१४ मध्ये मी पहिल्यांदा स्टँडअप केलं होतं. त्याची स्क्रिप्ट आणि विडीयो टाकत आहे. कृपया टिप्पणी करावी. माझे मराठी एवढे चांगले नाही, पण विनोदी लिखाणाची आवड आहे. आणि कॉमेडी सुधारण्याची इच्छा आहे.

सर्जिकल स्ट्राईक: आधी, नंतर आणि आजूबाजूने

Taxonomy upgrade extras

माझी गृहीतकं: नुकताच भारतीय लष्कराने एल.ओ.सी. पार आम्ही केला, असा दावा केलेला 'सर्जिकल स्ट्राईक' खरंच केलेला आहे.
वैचारिक इशारा: काही विधाने मोदीभक्तासारखी वाटण्याची शक्यता आहे.

लक्ष्यभेदी हल्ला (सर्जिकल स्ट्राईक) : चर्चेचा खरडा

काही बातम्या वाचनात आल्या -

पाकिस्तानने उड़ी१ येथे केलेल्या हल्ल्यात भारताचे १८ जवान मारले गेले. ह्याचा निषेध म्हणून भारताने केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्याच्या (सर्जिकल स्ट्राईक)च्या निमित्ताने काही लेखन वाचनात आलं. उदाहरणार्थ, कालच्या लोकसत्तात हुसेन हक्कानी ह्यांचे विचार.