कृतांतकटकामलध्वज जरा जरी पातली (#)
केस पांढरे तरी हा
डाय लावतो हिरवा
पाखरांनो सावधान
घुमे टेचात पारवा
केस पांढरे तरी हा
डाय गुलाबी लावतो
पाखरांनो उडलात
तरी पिसे हा मोजतो
केस पांढरे तरी हा
काळा कलप लावतो
पाखरांनो सावध हा
दाणे दुरून टाकतो
केस पांढरे तरी हा
अंतर्यामी अतरंगी
पाखरांनो नका भिऊ
निर्विष याची हो नांगी
(#)माझ्यासारख्या विविधरंगी केश-भूषित साठी-पार युवकांनी कृपया हलक्यात घ्यावे :)
- Read more about कृतांतकटकामलध्वज जरा जरी पातली (#)
- 2 comments
- Log in or register to post comments
- 25 views
नारायण धारप : भयकथांचा महारथी
मराठी साहित्यविश्वात भयकथांना एक स्वतंत्र आणि प्रतिष्ठेचे स्थान देणारे नाव म्हणजे नारायण धारप. विज्ञानकथा, गूढकथा आणि भयकथा यांचा संगम घडवून वाचकांच्या अंगावर रोमांच उभे करणारा हा लेखक मराठी वाचकांच्या हृदयात अजूनही जिवंत आहे. साधे, ओघवते पण तितकेच प्रभावी लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य. आज त्यांची जन्मशताब्दी आहे. त्या निमित्ताने समस्त हत्ती परिवाराच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन.
- Read more about नारायण धारप : भयकथांचा महारथी
- 2 comments
- Log in or register to post comments
- 60 views
Being Sentimental.
Being Sentimental.
Being Sentimental.
मी आपला खुशाल सकाळचा चहा नाश्ता करण्यासाठी टपरीवर बसलो होतो. चहावाल्याने रेडिओवर हिंदी सिनेगीत लावलं होतं. मूड एकदम मस्त जमला होता. पण तुम्ही तुमच्या धूनमध्ये आनंदात आहात हे लोकांना आवडत नाही, देव सुद्धा त्यांच्या मदतीला धावतो.
कसं ते पहा.
मी चहाचे घुटके घेत होतो तर “सैय्या बेईमान...” हे गाणं वाजत होतं. तर आलाच तो. चुरगळलेला झब्बा पायजमा, डोळे तारवटलेले. झोप झाली नसणार. माझ्याच शेजारी येऊन बसला. जब गीदड़ की मौत आती है तो वह शहर की ओर भागता है
- Read more about Being Sentimental.
- 2 comments
- Log in or register to post comments
- 33 views
उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १९
आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती?
- Read more about उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १९
- 14 comments
- Log in or register to post comments
- 150 views
विष्णु नारायण भातखंडे : भारतीय शास्त्रीय संगीताचा शिल्पकार
भारतीय शास्त्रीय संगीताचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. वैदिक ऋचांपासून ते आजच्या रंगमंचापर्यंत या परंपरेने अनेक टप्पे गाठले आहेत. मात्र या प्रवासात एक गंभीर अडथळा होता — संगीताची लिखित, शास्त्रीय आणि पद्धतशीर मांडणी अभावानेच होती. बहुतेक ज्ञान हे तोंडी परंपरेत गुरुकडून शिष्याकडे जात असे, आणि घराण्यांच्या चौकटीबाहेर ते पोहोचणे कठीण होते. या मर्यादा ओलांडून संगीताला सर्वसामान्यांपर्यंत पद्धतशीर पद्धतीने पोहोचवण्याचे ऐतिहासिक कार्य पं. विष्णुनारायण भातखंड्यांनी केले. आज त्यांची १६५वी जयंती आहे. त्यानिमित्त समस्त हत्ती परिवाराकडून त्यांना विनम्र अभिवादन.
- Read more about विष्णु नारायण भातखंडे : भारतीय शास्त्रीय संगीताचा शिल्पकार
- 11 comments
- Log in or register to post comments
- 139 views
द मेझनीन
नाड्या बांधणे, बांधता येणे, बांधलेल्या नाड्या सोडता येणे (हे जास्त महत्त्वाचं आहे), गरज पडल्यास नाड्या आवळता येणे - या सगळ्याचा आपणच विचार केला आहे असं वाटून स्वतःच्या या (निरुपयोगी) निरीक्षणशक्तीबद्दल अनभिज्ञपणे समाधानी असताना माझ्या हातात ‘द मेझनीन’ हे निकोलसन बेकरचं पुस्तक पडलं. तुम्हाला जर रोजच्या आयुष्यातल्या अतिशय फालतू गोष्टीचा खोलात जाऊन अतिविचार करायची सवय असेल तर हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल.
- Read more about द मेझनीन
- 10 comments
- Log in or register to post comments
- 90 views
वाहवा वाहवा
काही वर्षांपूर्वीची गोष्ट.
"अहो सिंधुआज्जी, ही सुटाबुटातली माणसं आलीयेत दोन. तुमच्या घरी यायचं म्हणताहेत," सोसायटीच्या वाॅचवुमनचा फोन आला.
"सुटाबुटातल्या माणसांना प्रवेश निषिद्ध!" सिंधुआज्जींनी उत्तर दिलं, आणि स्वतःशीच गगनभेदी स्मितहास्य करून मग पुस्ती जोडली, "पण बूट बाहेर काढले तर सुटातल्या माणसांचं स्वागत आहे."
पाहुण्यांचं स्वागत झालं. चहा झाला. नवलकोल आणि बेळगावी कुंदा झाला. आणि मग चर्चेला सुरूवात झाली.
- Read more about वाहवा वाहवा
- 1 comment
- Log in or register to post comments
- 34 views
ठकीशी संवाद : नाटकाचा अनुभव
अलीकडेच (खरं तर काही महिन्यांपूर्वी) ठकीशी संवाद बघण्यात आलं. नाटक बघणे, कळणे ह्यामध्ये पुष्कळच कमी पडत असल्याची जाणीव झाली. त्यास कारण पुढील गोष्टी:
1 नाटकातले सुटे सुटे शब्द कळले. वाक्ये कळली नाहीत. अर्थ नीटसा लागला नाही.
2 दोन चार वर्षे ललित कला केंद्र अन काही वर्षे NSD Delhi अन सोबतीला FTII मधले कोर्सेस केले तर कदाचित नाटक समजलं असतं
- Read more about ठकीशी संवाद : नाटकाचा अनुभव
- 9 comments
- Log in or register to post comments
- 126 views
समाजहिताच्या आंदोलनात भाग घेतलेल्या कामत जोडप्यांचे कार्यचरित्र
या कॉफी टेबल टाइप कन्नड भाषेतील पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ. ए आर वासवी यानी विचारल्याप्रमाणे २१व्या शतकातील समाजहितासाठीच्या चळवळी व आंदोलनं यशस्वी होण्यासाठी परंपरागत क्रांतीकारी सिद्धात व त्यासाठी चोखाळलेल्या नेहमीच्या मळलेल्या वाटा पुरेसे ठरतील का? नवीन तंत्रज्ञान व त्यास अनुसरून बदलत असलेली समाजाची मानसिकता व दैनंदिन व्यवहार यांच्यासाठी नेमके काय करता येईल? भांडवली जगात वावरत असताना कार्यकर्त्यांचे वैयक्तिक जीवन कसे असावे? वंचित, दलित, कष्टकरी, इत्यादी आर्थिकरित्या मागासलेल्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या चळवळीत परिणामकारक लवचिकता कशी आणता येईल?
- Read more about समाजहिताच्या आंदोलनात भाग घेतलेल्या कामत जोडप्यांचे कार्यचरित्र
- 1 comment
- Log in or register to post comments
- 40 views
असुर : जपानी स्लाईस ऑफ लाईफ
तुम्हाला जपानी फूड आवडतं? आणि जेन ऑस्टेनच्या नायिका? मग ही मालिका बघाच.
- Read more about असुर : जपानी स्लाईस ऑफ लाईफ
- 12 comments
- Log in or register to post comments
- 94 views