बखरीच्या पानाआड
बखरीच्या पानाआड
पाहिले मी क्षणभर
दडपल्या वास्तवाचे
छिन्नभिन्न कलेवर
प्रचलित इतिहास
तुझ्या माझ्या मेंदूतून
अज्ञाताच्या शक्यतांना
टाके पुरता पुसून
जेत्यांचाच इतिहास
रुळे मग माझ्या मुखी
पराजितांचा ठरतो
इतिहास अनोळखी
बखरीच्या पानाआड
वास्तवाचा भग्न गड
त्याच्या झाकल्या गूढाचे
मला भुलवी गारूड
- Read more about बखरीच्या पानाआड
- 1 comment
- Log in or register to post comments
- 20 views
त्यजली एक भावना..
त्यजली एक भावना..
सुट्टीचा दिवस नुकताच सुरू होत होता. साहजिकच आराम होता. कामं आटोपती घेण्याची घाई नव्हती. कानांवर एकाएकी जर दुर्मिळ पक्ष्याचं गुंजन पडलं, तर त्याचा निसर्गाच्या सान्निध्यात वेध घ्यावा इतका वेळ हातात होता. सुंदर दिवस जाण्याची संभावना होती. अशाच वेळी नेमकी अघटीत काही घडण्याची धाकधूक मनात जागृत होत असते. दचकण्याची इतकी सवय जडलेली असते की, वरवर कुणाला तसे दिसूनही येणार नाही.
- Read more about त्यजली एक भावना..
- Log in or register to post comments
- 10 views
श्री. सुधीर फडके : स्वरसम्राटाचा अविस्मरणीय वारसा
भारतीय संगीतसृष्टीतील एक अजरामर नाव म्हणजे श्री. सुधीर फडके, अर्थात ‘बाबूजी’. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. आज त्यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या संगीतमय जीवनाचा आणि अमूल्य योगदानाचा मागोवा घेणार आहोत.
बालपण व संगीताची सुरुवात
- Read more about श्री. सुधीर फडके : स्वरसम्राटाचा अविस्मरणीय वारसा
- 9 comments
- Log in or register to post comments
- 116 views
‘प्रिन्स ऑफ डार्कनेस’ ऑझी ऑसबॉर्न
जगभरातल्या लाखो चाहत्यांचा लाडका, हेवी मेटल संगीताचा अनभिषिक्त सम्राट ‘प्रिन्स ऑफ डार्कनेस’ ऑझी ऑसबॉर्न याचं ७६व्या वर्षी निधन झालं आहे. त्याचा हा अल्पपरिचय.
- Read more about ‘प्रिन्स ऑफ डार्कनेस’ ऑझी ऑसबॉर्न
- 2 comments
- Log in or register to post comments
- 32 views
आपरेशन सिंदूर : ट्रंप तात्या कोमात
ओपेरेशन सिंदूर नंतर ट्रंप तात्या कोमात गेले असे वाटू लागले आहे. तात्या एखाद्या मतिभ्रष्ट माणसासारखे बरगळू लागले आहे. नुकतेच ते म्हणाले भारत-पाक युद्धात अनेक जेट पडले. पण कोणाचे ते मात्र सांगू शकले नाही. अमेरिकेचे शेकडो आकाशात गमन करत हेरगिरी करणारे उपग्रह आणि सीआयए त्यांना खरी माहिती देऊ शकले नाही. बहुतेक खरी माहिती मिळाल्यानंतर त्यांना कळून चुकले असेल की भविष्यात भारताला ब्लॅक मेल करणे संभव नाही याचा मानसिक धक्का बसला आहे, हे मात्र निश्चित.
- Read more about आपरेशन सिंदूर : ट्रंप तात्या कोमात
- 20 comments
- Log in or register to post comments
- 218 views
कवितेच्या वाटेवरती
कवितेच्या वाटेवरती
कधी झुलतो मोरपिसारा
मोहविती पांथस्थांच्या
पाणवल्या, दिपल्या नजरा
कवितेच्या वाटेवरती
कधी विफल, विरागी राख
दडलेले त्यात कधीचे
धुमसते निखारे कैक
कवितेच्या वाटेवरती
अर्थाचा वर्ख निखळतो
शब्दांचा अचपळ पारा
वाटेवर विखरुनी जातो
- Read more about कवितेच्या वाटेवरती
- 2 comments
- Log in or register to post comments
- 40 views
कतरिना कैफ : सौंदर्य, मेहनत आणि अभिनयाची चमक
सिनेसृष्टीतील सौंदर्य, आकर्षण आणि कष्टाच्या गाथेत कतरिना कैफ हे नाव अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आज तिचा ४१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिला समस्त हत्ती परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. जीवेत शरदः शतम. १६ जुलै १९८४ रोजी हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या कतरिनाचा प्रवास भारतीय सिनेसृष्टीत तितकाच रोमहर्षक आहे, जितका तिच्या अभिनयातील बदल व नवतेने भरलेला आहे. तिची आई इंग्लंडमधील असून वडील काश्मिरी मुस्लिम आहेत. बालपणीच कतरिनाच्या पालकांचा घटस्फोट झाला आणि ती आईसोबत जगभर विविध ठिकाणी राहिली.
- Read more about कतरिना कैफ : सौंदर्य, मेहनत आणि अभिनयाची चमक
- 34 comments
- Log in or register to post comments
- 363 views
वार्तालाप: संपन्न बनण्याचा मार्ग
जाणपण निरूपण समासात समर्थांनी आध्यात्मिक प्रगती सोबत संसारात संपन्न आणि वैभवशाली बनण्याचा मार्ग ही सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात, समाजात आर्थिक आणि सामाजिक विषमता नेहमीच असते. अजाणते पणे लोक राजकीय व्यवस्थेला दोष देतात, काही प्रारब्धला दोष देतात. भारतात अनेक राजनेता सामाजिक विषमतेचा उपयोग जातीय, भाषिक आणि प्रांतीय आधारवर प्रजेत भेद टाकून निवडणूक जिंकण्यासाठी करतात. समर्थांच्या शब्दांत नेणता अर्थात अज्ञानी माणूस यातच गुरूफटून जातो. जसे आजकाल महाराष्ट्रात भाषा विवादात प्रजा गुंतली आहे.
- Read more about वार्तालाप: संपन्न बनण्याचा मार्ग
- Log in or register to post comments
- 15 views
सांगली साताऱ्यातला शेरलॉक
सांगली साताऱ्यातला शेरलॉक
- Read more about सांगली साताऱ्यातला शेरलॉक
- 15 comments
- Log in or register to post comments
- 179 views
आरोग्यपूर्ण वृद्धत्व
सत्तरी पार केलेल्या वृद्धांच्या बरोबरीच्या संवादातील पहिला प्रश्न “आपण कसे आहात?”... हा असतो व संवादाचा शेवट “तब्येतीचा काळजी घ्या.” या वाक्याने होत असते. कारण वृद्धत्व नेहमीच त्रासदायक असते. वृद्ध व्यक्ती आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी योग्य प्रकारे घेत नसल्यास कुटुंबाला व पर्यायाने समाजाला श्रम, वेळ व पैशाच्या स्वरूपात फार मोठी किंमत द्यावी लागते. वृद्धालासुद्धा आपले जिणे नको नकोसे वाटू लागते. अनेक वृद्धांना 80 हे वय एक अभेद्य भिंत वाटू लागते.
- Read more about आरोग्यपूर्ण वृद्धत्व
- 3 comments
- Log in or register to post comments
- 48 views