दिवाळी अंकासाठी आवाहन – २०२५
- Read more about दिवाळी अंकासाठी आवाहन – २०२५
- 5 comments
- Log in or register to post comments
- 144 views
एक चाळीशी.. हवीहवीशी ..
हा लेख गेल्या वर्षी लिहिलेला लेख!
***
गेल्या दोन तीन वर्षांपासून मला एका गोष्टीचं अत्यंत कुतूहल वाटतंयं. काळा जाड्या फ्रेमचा चष्मा आणि अर्थात त्यामागील ते मिश्किल, प्रेमळ, आणि हसरे डोळे.. म्हणजे इतकं की तुम्हाला काय व्हायला आवडेल असा एखादा निबंधाचा विषय दिला तर माझा विषय अगदी पक्का- तो जाडा काळा चौकोनी चष्मा किंवा त्यापलीकडची ती दृष्टी.. ती जादुई नजर.. .
- Read more about एक चाळीशी.. हवीहवीशी ..
- 4 comments
- Log in or register to post comments
- 76 views
Wormhole
त्रिमितीच्या तुरुंगात
घुसमटे जीव ज्यांचा
उघडीन त्यांच्यासाठी
मार्ग चवथ्या मितीचा
कळसा नंतर पाया
तिथे नियम असतो
कार्यकारण भावाचा
जाच जराही नसतो
स्थळ-काळात तिथल्या
पेव खाच खळग्यांचे
उतरवी वर्तमान
भूत वेडे भविष्याचे
दोर परतीचे मात्र
नाही कापणार नक्की
आपापल्या कोठडीची
खूण ध्यानी ठेवा पक्की :)
- Read more about Wormhole
- Log in or register to post comments
- 13 views
माउंटनहेड : टेकमोगल्सच्या अहंकाराचं शिखर
चार टेकमोगल एका पर्वताच्या टोकावरच्या आलिशान घरात भेटतात, त्यांच्या कुशीत असतात लाखो डॉलर्स आणि मनात जग जिंकायच्या अर्धवट कल्पना! गाजलेल्या ‘सक्सेशन’ मालिकेचा कर्ता जेस्सी आर्मस्ट्रॉंगच्या खोडकर शैलीतल्या धमाल सिनेमाचा परिचय.
- Read more about माउंटनहेड : टेकमोगल्सच्या अहंकाराचं शिखर
- 5 comments
- Log in or register to post comments
- 78 views
बुवाबाजीत करीअर करणाऱ्यांसाठी...
काही नतद्रष्टांच्या भांडाफोड उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक बुवा-बाबा-महाराज-माँ-देवी इत्यादींना सक्तीने निवृत्त व्हावे लागत आहे. काही जण जेलची हवा खात आहेत. काही जण तोंड दाखवू नये म्हणून कुठे कुठे तरी लपून बसलेले आहेत. बहुतेकांची दुकानदारी बंद झालेले आहेत. अधेमधे लुडबुड करणारे दलाल, बाबा-बुवापर्यत भक्तांना पोचविणाऱ्या सोई-सुविधांचे सोय करणारे सेवेकरी, जीप-कार्सचे व्यावसायिक, हॉटेलचे मालक इत्यादींचा धंदा बसला आहे. तरीसुद्धा काही अनुभवी बुवा-बाबांना हा धंदा पुन्हा तेजीत येईल व बुवाबाजीला लागलेली उतरती कळा संपून चांगले दिवस येतील, असेही वाटत असेल.
- Read more about बुवाबाजीत करीअर करणाऱ्यांसाठी...
- 23 comments
- Log in or register to post comments
- 237 views
सिस्टर मिडनाईट
एका सामान्य स्त्रीचं रूपांतर चांडाळणीत कसं होतं, ह्याचं स्थित्यंतर दाखविण्याचा विनोदी अंगाने केलेला प्रयत्न. चांडाळ-चांडाळणी ह्या उपमा त्या लोकांसाठी असतात, की ज्यांना परजीवांचं रक्त पिऊनच शरीर चालू अवस्थेत ठेवावं लागतं, प्राचीन काळापासून ही संकल्पना आहे, कुत्र्यांचं मांस अति चविष्ट असतं चांडाळांना, पाश्चिमात्यांतही अश्यांना व्हायम्पायर म्हणवले जाते, त्यांना कोल्ह्याचं सख्य जास्त असतं.
- Read more about सिस्टर मिडनाईट
- 1 comment
- Log in or register to post comments
- 18 views
अनश्रिंकिंग: केट मान
'वुड यू किल द फॅट मॅन?' केट मानच्या 'अनश्रिंकिंग: हाऊ टु फाईट फॅटफोबिया' या पुस्तकात 'लठ्ठपणा' मध्यवर्ती ठेवून समाजातल्या अनेक असमतोलांबद्दल सहज आणि साहजिक प्रश्न पुस्तकात उपस्थित केले आहेत आणि त्यांची उत्तरंही दिली आहेत.
- Read more about अनश्रिंकिंग: केट मान
- 5 comments
- Log in or register to post comments
- 61 views
भारतीय पुरुषत्वाचा समाजशास्त्रीय धांडोळा
लंडन विद्यापीठातील ब्रिटीश ॲकेडमी ग्लोबल प्रोफेसर संजय श्रीवास्तव यांच्या मॅस्क्यूलिनिटी, कन्झ्यूमरिजम ॲन्ड द पोस्टनॅशनल सिटी (केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, २०२२) या ग्रंथाचा परिचय.
- Read more about भारतीय पुरुषत्वाचा समाजशास्त्रीय धांडोळा
- 4 comments
- Log in or register to post comments
- 58 views
तियानानमेन चौरस्ता: 4 जून 1989 पासून काय शिकणार
आज सकाळी उद्यानात भ्रमंती करताना मला एका निवृत अधिकार्याने ने 4 जूनला तियानानमेन चौरस्त्यावर जमलेल्या लोकशाही समर्थकांवर चीन ने जी कठोर कार्रवाई केली होती, त्यावर माझे मत विचारले. मी त्याला उलट प्रश्न केला, जर चीन ने तेंव्हा कठोर कार्रवाई केली नसती तर, आज चीन आर्थिक आणि सैनिक दृष्टीने शक्तिशाली झाला असता का? चीनच्या लोकतंत्र समर्थकांना अमेरिका आणि यूरोपियन देशांची फूस होती. त्यांच्या उद्देश्य चीनचे केंद्रीय नेतृत्व कमकुवत करून जमले तर चीनचे तुकडे करण्याचा होता. पण चीनच्या कम्यूनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी स्वतचे निजी स्वार्थ विसरून देश हितासाठी कठोर कार्रवाई केली.
- Read more about तियानानमेन चौरस्ता: 4 जून 1989 पासून काय शिकणार
- 3 comments
- Log in or register to post comments
- 42 views
चुकलो का मी?
दिवास्वप्न पाहत असताना
अधांतराची भक्कम भूमी
सोडुनी थोडा भटकत गेलो
चुकलो का मी?
वायफळाचा मळा उन्हाळी
मृगजळ शिंपून वाढविला मी
पीक पाखरे खाऊन गेली
चुकलो का मी?
वृत्त, छंद, गण बेड्या तोडून
भ्रमरासम स्वच्छंदपणे मी
फिरता, रेखीव वाट विसरलो
चुकलो का मी?
विस्मरणाची गडद सावली
झाकोळत जरी होती तरी मी
स्मरणरंजनी वाहत गेलो
चुकलो का मी?
- Read more about चुकलो का मी?
- 1 comment
- Log in or register to post comments
- 17 views