उत्क्रांती
कत्तलीच्या वाटे झुंजती कोंबडे
पडलेले सडे जागोजागी
बोलरोंची रांग स्कॉर्पिओंची रांग
क्वार्टरींची रांग टेबलावरी
ब्रेस्लेटे रेबॅन आयफोन रेबॉक
विवेकाला बाक सुखे देऊ
श्रावणात गर्जे डॉल्बी दणादण
सत्यनारायण कॉर्पोरेट
पोपट बोलती पोपट ऐकती
कुंठलेली मती या ठिकाणी
चारचाकीमध्ये साईरामधून
राँगवेमधून दामटता
नवस बोलले नवस फेडले
पापांचे डबोले झाले रिते
काय भले बुरे मला काय त्याचे
धरु काये वाचे मग्रुरीही
रस्त्यावर थुंकी विष्ठा आणि बोळे
यातुनि उमाळे दिव्य सनातन
ओरबाडू आज ओरबाडू उद्या
शिकवू ही विद्या मुलाबाळां
- Read more about उत्क्रांती
- 14 comments
- Log in or register to post comments
- 9454 views
स्वत्वाचा शोध
अस्तित्वविषयक विषाद:
धाग्याचा प्रकार निवडा:
- Read more about स्वत्वाचा शोध
- 14 comments
- Log in or register to post comments
- 9947 views
निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध
'नरहर कुरुंदकर' ह्या नावाला महाराष्ट्रामध्ये एकेकाळी एक वलय होतं; मर्यादित प्रमाणात आजही आहे. त्यामागे अनेक कारणं होती - त्यांचा मार्क्सवाद, त्यांचं नास्तिक असणं, शिवाजी किंवा मनुस्मृती अशा विषयांवरची त्यांची चिकित्सा, त्यांची साहित्यसमीक्षा, विद्यार्थीप्रियता आणि प्रभावी वक्तृत्व - अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. निजामाच्या राजवटीत जन्म आणि वाढ, समाजवादी वर्तुळात वावर, मराठवाड्यातल्या परंपराप्रिय ब्राह्मण घराची पार्श्वभूमी, मामा ना. गो. नांदापूरकरांचा लहानपणापासूनचा सहवास, हमीद दलवाईंशी मैत्री अशा अनेक घटकांनी त्यांच्या तीव्र बुद्धिमत्तेला पैलू पाडले. महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा विचारवंत म्हणून त्यांची ख्याती झाली. १९८२ साली अवघ्या पन्नासाव्या वर्षी झालेल्या त्यांच्या अकाली निधनानं त्यामुळे अनेकजण हळहळले.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध
- 26 comments
- Log in or register to post comments
- 45252 views
अर्धांग
नोकरीने शोषलेले,
प्रवासाने शिणलेले
ते आमचे अर्धांग,
न्याहाळत असतो मी,
पैलतीरावरुन !
अधुन मधुन ओळख दाखवतं,
सटीसहामाशी,
कधी वाट्याला येतं
चिपाड बनून!
तेंव्हा डोळ्यांखालच्या काजळीत
शोधू लागतो मी काजळमाया
आणि शुष्क ओठांतली
उरली सुरली थरथर
प्रयत्न करुन!
मग जाणवतात
यंत्रवत प्रतिसाद,थंड गात्रे
एक उरकून टाकण्याची भावना
बहुतकरुन!
- Read more about अर्धांग
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3102 views
स्वत:च्या मातेसोबतही एकांतात बसू नये!
Taxonomy upgrade extras
वादग्रस्त साधू आसाराम बापू यांना एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून अटक झाली. आसाराम हे त्या मुलीला घेऊन दीड तास एकांतात होते, अशी माहिती तपासातून समोर आली. त्याचे समर्थन करताना, आसाराम यांनी म्हटले की, ‘‘आपल्या नातीच्या वयाच्या मुलीसोबत एकांतात बसण्यात वाईट ते काय?''
- Read more about स्वत:च्या मातेसोबतही एकांतात बसू नये!
- 68 comments
- Log in or register to post comments
- 29012 views
स्थापत्यशास्त्रावरील एक सहस्त्र वर्षांपूर्वीचा ग्रंथ
भारतीय उपखंडाचा इतिहास अभ्यासणार्यांना, गतकालातील एक प्रसिद्ध राजा म्हणून राजा भोज याचे नाव चांगलेच परिचित आहे. या राजाने मध्य भारतातील मालवा भागावर 11 व्या शतकाच्या सुरवातीपासून इ.स. 1055 पर्यंत राज्य केले. स्वत: एक अतिशय निपुण असा योद्धा असल्याने त्याने आपल्या गौरवशाली कारकिर्दीत अतिशय शक्तिमान आणि श्रेष्ठ अशा शत्रूंबरोबर केलेल्या अनेक लढाया गाजवल्या. यात सोमनाथ येथील देऊळ उध्वस्त करणार्या सुलतान महमुद गझनवी याच्या सैन्याबरोबर केलेले यशस्वी युद्धही मोडते. आपल्या राजधानीचे आक्रमकांपासून संरक्षण करत असताना या शूर वीराला रणांगणावरच मरण आले.
- Read more about स्थापत्यशास्त्रावरील एक सहस्त्र वर्षांपूर्वीचा ग्रंथ
- 6 comments
- Log in or register to post comments
- 8957 views
उसवला शर्ट नवीन पुन्हा – (विडंबन)
( चाल – उगवला चंद्र पुनवेचा )
“उसवला शर्ट नवीन पुन्हा,
मज देई शिवुनिया-“
उखडला पति तिचा ||
"काही सुया अशा घुसल्या,
सटकुनी अडकुनी तुटल्या,
मम बघा रुधिर क्षती बोचल्या-"
करुणरस तो गळु पडे,
खवळता, पत्निचा ||
.
- Read more about उसवला शर्ट नवीन पुन्हा – (विडंबन)
- Log in or register to post comments
- 2157 views
सध्या काय वाचताय? - भाग ६
Taxonomy upgrade extras
- Read more about सध्या काय वाचताय? - भाग ६
- 132 comments
- Log in or register to post comments
- 139863 views
तुझे प्रेम एक वनस्पती आहे
आत्ताचा एक रिकामटेकडा उद्योग.
गुगल ट्रान्सलेटर वापरून अनुवादित केलेली वर्डस्वर्थची एक कविता :
का तू मूक कला! तुझे प्रेम एक वनस्पती आहे
अशा कमकुवत फायबर त्या धोकेबाज हवा
अनुपस्थिती withers जाण्याचा एकदा म्हणून गोरा काय होते?
अदा नाही डेट, मंजूर नाही वरदान आहे का?
तुला सावध-गेले अद्याप माझे विचार आहेत
, अविरत काळजीपूर्वक तुझा सेवा बांधिल
मन च्या कमीत कमी उदार एक भिक्षू इच्छा
शून्य पण काय तुझा आनंद वाचवणे शकते.
बोला, तरी या मऊ उबदार हृदय, ठेवण्यासाठी एकदा मुक्त
एक हजार निविदा pleasures, फसवणूक आणि खाण,
अधिक भयाण, अधिक dreary थंड सोडले जाऊ
- Read more about तुझे प्रेम एक वनस्पती आहे
- 53 comments
- Log in or register to post comments
- 18714 views
आधुनिक शकुन - अपशकुन
प्रत्येक समाज वा संस्कृती पिढीजात काळापासून आलेल्या रूढी परंपरांचे शक्य होईल तितके पाळण्याच्या प्रयत्नात असतो. व अशा रूढी परंपरामध्ये श्रद्धा - अंधश्रद्धांचा वाटा फार मोठ्या प्रमाणात असतो. काही वेळा त्यांच्यातील फोलपणा स्पष्टपणे दिसत असूनसुद्धा त्यामुळे काही नुकसान तर होत नाही ना म्हणत त्या पाळल्या जातात. मांजर आडवे गेल्यास एक क्षण थांबून पुढे गेल्यामुळे अपशकुनाचा परिणाम होणार नाही याची खात्री असते. मानसिकता तशीच ठेवून सामान्यपणे त्या त्या काळातील जीवनशैलीप्रमाणे शकुन अपशकुनांचे आयकॉन्स बदलतात. बैलगाडींची पूजा करणारे आता मोटार गाड्यांची पूजा करतात.
- Read more about आधुनिक शकुन - अपशकुन
- 16 comments
- Log in or register to post comments
- 24179 views