लेखक
गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका : अरुण खोपकर
अरुण खोपकरांचं गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका हे पुस्तक अनेक वर्षं अनुपलब्ध होतं. अखेर त्याची नवी आणि देखणी आवृत्ती उपलब्ध झाली आहे. त्या निमित्तानं जुन्या आवृत्तीचा मी दिलेला परिचय पुन्हा प्रकाशित करतो आहे -
- Read more about गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका : अरुण खोपकर
- 5 comments
- Log in or register to post comments
- 7269 views
रिकामी घंटा, लोलक गायब
वरील शीर्षक माझे नसून एका कल्पक नाटककाराच्या डोक्यातून निघालेले हे घोषवाक्य आहे. नाटकाचे नांव आहे 'शेवग्याच्या शेंगा'. नाटकात विस्तार केलेली मध्यवर्ती कल्पना, 'एकटेपणा', खूपच चांगली आहे. स्वाती चिटणीस, संजय मोने सारखे गुणी कलाकार आहेत. पण....
रविवारी दुपारी आम्ही पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहात स्थानापन्न झालो आणि थोड्याच वेळांत, आमच्या मागे एक ग्रुप येऊन बसला. बसल्या क्षणापासून त्यांचा कलकलाट चालू झाला. त्यांत ते सहा जणांची सेल्फी काढत होते. आम्ही आपले, नाटक सुरु झाल्यावर तरी ही बडबड संपणार की नाही, या विवंचनेत होतो.
- Read more about रिकामी घंटा, लोलक गायब
- 11 comments
- Log in or register to post comments
- 8288 views
एक लेखक - एक वाचक!
आमच्या ‘वाचकघर’च्या एका मिटींगचा विषय होता -- ‘माझा आवडता पुरूष लेखक’. त्यानिमित्ताने मिलिंद बोकीलांच्या सर्व पुस्तकांचे एकत्रित वाचन अन अभ्यासच झाला तेव्हा!
सुरूवातीला ‘दुर्ग’, ‘एकम’ ह्या दिवाळी अंकांतील मिलिंद बोकीलांच्या कलाकृतींतून त्यांची ओळख झाली. ते लिखाण आवडले अन मग झपाटल्यासारखी त्यांची इतर पुस्तके वाचली गेली.‘शाळा’ तेव्हा नुकतीच प्रकाशित झाली होती. अन ती वाचावी की नाही, आपल्याला ती कितपत रुचेल अशा संभ्रमात होते.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about एक लेखक - एक वाचक!
- 23 comments
- Log in or register to post comments
- 9063 views
निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)
भाग १ | भाग २
ह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)
- 8 comments
- Log in or register to post comments
- 15602 views
निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग २)
सॉक्रेटिसनंतर शिवाजीराजांच्या पराभवांविषयीचा लेख आहे. शिवाजी महाराजांचं पराक्रमांनी भरलेलं जे आयुष्य नेहमी सांगितलं जातं त्याला छेद देण्याचा प्रयत्न इथे आहे. स्वराज्याचं स्वप्न पुरं होईल की नाही ह्याविषयीची सततची अनिश्चितता, वारंवार होणारे हल्ले आणि त्यातून बाहेर पडणारा शिवाजी ह्यात दिसतो. आदिलशाही आणि मोगल सत्ता ह्यांचं बलाढ्य सामर्थ्य आणि त्याला सामोरं जाणारी, त्या मानानं छोटी असणारी शिवाजीची सेना असा पट ते मांडतात.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग २)
- 15 comments
- Log in or register to post comments
- 17601 views
निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध
'नरहर कुरुंदकर' ह्या नावाला महाराष्ट्रामध्ये एकेकाळी एक वलय होतं; मर्यादित प्रमाणात आजही आहे. त्यामागे अनेक कारणं होती - त्यांचा मार्क्सवाद, त्यांचं नास्तिक असणं, शिवाजी किंवा मनुस्मृती अशा विषयांवरची त्यांची चिकित्सा, त्यांची साहित्यसमीक्षा, विद्यार्थीप्रियता आणि प्रभावी वक्तृत्व - अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. निजामाच्या राजवटीत जन्म आणि वाढ, समाजवादी वर्तुळात वावर, मराठवाड्यातल्या परंपराप्रिय ब्राह्मण घराची पार्श्वभूमी, मामा ना. गो. नांदापूरकरांचा लहानपणापासूनचा सहवास, हमीद दलवाईंशी मैत्री अशा अनेक घटकांनी त्यांच्या तीव्र बुद्धिमत्तेला पैलू पाडले. महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा विचारवंत म्हणून त्यांची ख्याती झाली. १९८२ साली अवघ्या पन्नासाव्या वर्षी झालेल्या त्यांच्या अकाली निधनानं त्यामुळे अनेकजण हळहळले.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध
- 26 comments
- Log in or register to post comments
- 22465 views
.
नाईफ - सलमान रश्दी
१२ ऑगस्ट २०२२ : ७५ वर्षांचा सलमान रश्दी एका ठिकाणी व्याख्यानाला गेला होता. अचानक प्रेक्षागृहातून चोवीस वर्षांचा एक तरुण समोर आला. अवघ्या सत्तावीस सेकंदांत त्यानं रश्दीच्या शरीरावर चाकूचे पंधरा वार केले. हल्ल्यातून रश्दी वाचेल का, याविषयी काहीच सांगता येत नव्हतं. त्या प्रकारावर रश्दीनं लिहिलेल्या 'नाइफ' पुस्तकाचा परिचय
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about नाईफ - सलमान रश्दी
- 5 comments
- Log in or register to post comments
- 1165 views
ॲलिस मन्रो
नोबेल पुरस्कारविजेती लेखिका ॲलिस मनरोचे नुकतेच निधन झाले. तिचा साहित्यिक वारसा काय आहे?
- Read more about ॲलिस मन्रो
- 5 comments
- Log in or register to post comments
- 1119 views
अशोक राणेः दृक्-श्राव्य कलांचे थरारक अनुभव पोचविणारा अवलिया
अशोक राणे हे नाव जाणत्या मराठी चित्रपट रसिकांना नवीन नसावे. चित्रपट गुरु, विकास देसाई यांनी तर त्यांना सिनेमा ‘जगणारा’ माणूस म्हणून गौरविले आहे. एक साधा प्रेक्षक, विद्यार्थी, फिल्म सोसायटीचा कार्यकर्ता, चित्रपट समीक्षक, शिक्षक, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ज्युरीचे सदस्य, कधी ज्युरीचे अध्यक्ष, चित्रपट महोत्सवांचे आयोजक-संस्थापक-संचालक-सल्लागार, टीव्ही मालिकांचे लेखक, चित्रपट कथा लेखक, पटकथा लेखक, माहितीपटाचे दिग्दर्शक,….
- Read more about अशोक राणेः दृक्-श्राव्य कलांचे थरारक अनुभव पोचविणारा अवलिया
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1361 views