गद्य
शरद जोशींचे निधन
शरद जोशींचे ऐंशीव्या वर्षी निधन झाले. म्हणजे अकालीही नव्हे आणि अति उशीराही नव्हे. तशीही गेले काही महिने त्यांची तब्येत त्रास देत असल्याच्याच बातम्या होत्या. त्यामुळे त्यांच्या निधनाने धक्का बसला असे म्हणता येणार नाही.
धक्के जोशीबुवांनी जिवंतपणीच भरपूर दिले!
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about शरद जोशींचे निधन
- 8 comments
- Log in or register to post comments
- 5465 views
कडेमनी कंपाऊंड
जी ए कुलकर्णींच्या स्मृतीस.....
कडेमनी कंपाऊंडमध्ये बसून एक माणूस लिहायचा.
अंगावर कातडी नसलेल्या माणसांच्या कथा त्याने इतक्या सोलीवपणे लिहिल्या,
कि अंगभर कातडी असूनही आम्हाला पुन्हा नव्याने आरशात पहावे लागले.
पुस्तके मनाचा आरसा असतात,
कि फुटलेल्या काचेतून आरपार जाणारे माणसाचे अंतर्मन असते!
पुस्तकांच्या नावापासूनच मनाचा
कुठला तरी कोपरा धरधरीत अंधारात गळपटायचा.
‘रमलखुणा’ म्हटलं कि,
आजही वाळूवर कुणीतरी काही गूढ लिहून गेलंय,
त्याचा अर्थ लावता लावता माणसं परागंदा होतात,
असं वाटतं.
‘काजळमाया’ आणि ‘पिंगळावेळ’
आयुष्याच्या मध्यरात्रीही दचकून जागे करतात.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कडेमनी कंपाऊंड
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1576 views
हडळीचा आशिक
हडळीचा आशिक
जपानमध्ये हितोशी नावाचा एक माणूस रहायचा. तो एका पाषाणरह्रद्यी बाईच्या प्रेमात पडला. तिला राजी करायला त्याने भलते कष्ट उपसले. ती म्हणजे त्याला सर्वस्व वाटायची. तिच्या वाचून त्याला स्वतःचे आयुष्य फोलफोल वाटायचे. शेवटी एकदाची ती बया त्याच्यावर प्रसन्न झाली. त्याच्याशी लग्न करायला तयार झाली. पण हाय! नेमक्या त्याच दिवशी, आपण एका असाध्य रोगाने ग्रस्त आहोत, आपण काही फार दिवस जगणार नाही, हे तिच्या लक्षात आले. तरी आपला हिरो तिच्याशी लग्न करतो. तिचे शेवटचे दिवस सुखात जावेत म्हणून आटापिटा करतो. पण, मृत्यू शय्येवर असताना मात्र हि बया त्याला म्हणते,
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about हडळीचा आशिक
- 7 comments
- Log in or register to post comments
- 3545 views
जंटलमन्स गेम - ६ - वर्ल्ड सिरीज
१९७५ चा फेव्रुवारी महिना....
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about जंटलमन्स गेम - ६ - वर्ल्ड सिरीज
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3265 views
जंटलमन्स गेम - ५ - बॉयकॉट, बोथम आणि चॅपल!
१९६५ चा सप्टेंबर महिना...
लॉर्ड्सच्या ग्राऊंडवर जिलेट कप या वन डे टूर्नामेंटची फायनल सुरु होती.
प्रतिस्पर्धी होते सरे आणि यॉर्कशायर!
सरेचा कॅप्टन मिकी स्टुअर्टने टॉस जिंकून फिल्डींग घेतली होती. यॉर्कशायरच्या बॅट्समननी केलेली कमालिची संथ सुरवात स्टुअर्टचा हा निर्णय सार्थ ठरवणार अशीच चिन्हं दिसत होती! पहिल्या १४ ओव्हर्समध्ये केवळ २२ रन्स निघाल्या होत्या! वन डे क्रिकेट बाल्यावस्थेत असलं, तरी इतक्या संथ सुरवातीची अपेक्षा कोणालाच नव्हती!
विशेषतः यॉर्कशायरचा कॅप्टन ब्रायन क्लोजला!
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about जंटलमन्स गेम - ५ - बॉयकॉट, बोथम आणि चॅपल!
- Log in or register to post comments
- 1214 views
जंटलमन्स गेम - ४ - फायर इन बॅबिलॉन
१९७६ चा फेब्रुवारी महिना...
गयानामधल्या आपल्या घरी बसून तो विचारात बुडून गेला होता..
नुकताच अत्यंत दारूण पराभव त्याच्या पदरी पडला होता!
चाणाक्षपणे लावण्यात आलेल्या एका मोठ्या सापळ्यात सापडल्याने अक्षरशः वाताहात झाली होती..
काय करावं?
या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं?
आपल्या पराभवाला नेमकं कोण कारणीभूत ठरलं असावं?
आपले डावपेच चुकीचे ठरले! त्यांनी बरोबर आपली शिकार साधली!
एकदा!
फक्तं एकदाच! पुन्हा कधीही अशी संधीही कोणाला द्यायची नाही!
ज्या तंत्राचा वापर करुन त्यांनी आपला पराभव केला तेच तंत्रं आपण वापरलं तर कोणालाच आपल्यापुढे उभं राहणं जमणार नाही!
येस! ठरलं!
कोण होता तो माणूस?
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about जंटलमन्स गेम - ४ - फायर इन बॅबिलॉन
- 3 comments
- Log in or register to post comments
- 1969 views
एक शेपूट... दोघांचं
मधुरा आणि चारुता एकदा चेकाळल्या की त्यांना आवरणं कठीण जातं. चारुताच्या घरी आम्ही जमलो होतो तेव्हा आमच्या गप्पा थांबवून तिने आवर्जून कबड्डीची मॅच लावली.
"कोणाची मॅच आहे?" उगाच आपल्याला रस आहे हे दाखवण्याचा प्रयत्न. लहानपणापासूनच मी कबड्डी वगैरे खेळांपेक्षा कॅरम आणि बुद्धिबळ यांसारख्या सुरक्षित खेळांचा चाहता आहे.
"मला काय माहीत!" चारुता म्हणाली.
"म्हणजे?"
"कोणी का खेळत असेना. मी बघते." तिने मधुराकडे किंचितकाही कटाक्ष टाकला. त्या दोघी आचरट हसल्या.
"..." मी त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं.
"थांबरे जरा... ए.. बघ बघ, तो कसला आहे ना!" चारुता मधुराला म्हणाली.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about एक शेपूट... दोघांचं
- 7 comments
- Log in or register to post comments
- 3093 views
भुरकुंडीचे शहाणे
महाराष्ट्रात समुद्रकिनाऱ्याला जवळपास समांतर अशी सह्याद्रीची रांग आहे, सह्याद्रीच्या आणि समुद्राच्या मधल्या पट्टीला 'कोंकण' असे म्हणतात, सह्याद्रीच्या मूळ रांगेला काटकोन करून काही दुय्यम/तिय्यम रांगा समुद्रापर्यंत पोचतात, कोंकणात खूप पाऊस पडतो इत्यादी गोष्टी सर्वांना माहीत आहेतच.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about भुरकुंडीचे शहाणे
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6086 views
राव सांगता...
सकाळचे जेमतेम नऊ वाजत होते. परंतु सूर्य ३१ मार्चला तडफेने देयके मंजूर करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या (अथवा महापालिका अथवा अन्य 'खाण्या'सारख्या खात्यातल्या) कारकुनासारखा झटून कामाला लागला होता. डांबराचा काळेपणा त्याकडे पाहताच थेट मस्तकाला भिडत होता.
देवळात लगबग सुरू होती. फुलांचा, धुपाचा, तेलाचा, नारळांचा असे संमिश्र वास दरवळत होते.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about राव सांगता...
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2336 views
अजरामर वटवृक्ष
सळसळणारा, विशाल आणि डेरेदार असा तो वटवृक्ष, वार्या पावसाला थंडीला तोंड देत युगानुयुगे मोठ्या दिमाखात ऊभा होता.किती युगे लोटली तो जन्मून ते एक तो जाणत होता किंवा मग ब्रह्मदेवाच. त्याची पाळेमूळे जमिनीत खोलवर आणि दूरदूरवर पसरली होती तर शाखाविस्तार दूरदूरवर तसेच ऊंचच ऊंच असा आकाश भेदून विस्तारला होता. त्याचा पसाराच इतका मोठा होता की अनेक पक्षी-पोपट, बुलबुल, चंडोल,चक्रवाक, चिमण्या, कोकीळांनी त्याचा आसरा घेतला होता.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about अजरामर वटवृक्ष
- 9 comments
- Log in or register to post comments
- 5892 views