गद्य

भटकंती १

भटकंती -१

लहानपणी सायकल चालवता यायला लागली तो माझा पहिला प्रवास!
आपापलं, मनसोक्त, अकारण भटकणे!!

हळूहळू त्या प्रवासाची म्हणा, अथवा अनुभवाची, चटकच लागली. शाळेतून येताना, पुणे ३० ते गुलटेकडी, रोज नवीन रस्ता असो, वा गडकिल्ले असो, आजीच्या गावाला म्हशींच्या मागे जाणे असो वा शाळेतून गुंजवणी खोर्‍यात विविध उपक्रमांसाठी जाणे असो. मला मनापासून आवडणारी गोष्ट , भटकंती!!

वय (महाविद्यालयात प्रवेश) वाढलं (अक्कल नाही) तेव्हां हे सगळं म्हणजे काय नक्की आवडतंय, हा विचार सुरु केला.

- ह्यासाठी मेंदू इतका का झिजवायचा
- नवीन माणसं /नग /वल्ली भेटतात
- नवीन जागा पहायला मिळतात.
- असेच भटके लोक भेटतात.

ललित लेखनाचा प्रकार: 

पठाणकोटचे शहीद व आपण

पठाणकोटचे शहीद व आपण
.

पठाणकोटमधील घटनांमुळे संरक्षणमंत्र्यांना पत्रकारपरिषद घ्यावी लागावी यावरूनच सारे आलबेल नाही हे कळावे. अशा स्वरूपाचे दहशतवादी हल्ले थांबवणे हे लष्कराच्या आवाक्याबाहेरचे आहे. कारण कितीही नाही म्हटले तरी या दहशतवाद्यांना स्थानिक मदत मिळतेच. आताही पंजाबच्या एका उच्चपदस्थ पोलिस अधिका-याने दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले असे सांगितले. अतिरेकी अशा उच्चपदस्थ अधिका-याला जिवंत सोडतील यावर कोणाचा विश्वास बसावा?

ललित लेखनाचा प्रकार: 

मुलांची मने मारण्याची काही शिक्षकांची कला.

मुलांची मने मारण्याची काही शिक्षकांची कला.

+++

अमित शिंदे यांची "काही येत नाही" या शीर्षकाची खालील लघुकथा फार छान आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

कारगिलजवळची हरका बहादूर बॉर्डर पोस्ट

कारगिलजवळची हरका बहादूर बॉर्डर पोस्ट
.

कारगिलमध्ये रात्र काढल्यानंतर सकाळी लेहला जाण्यास निघालो, तर एकाने सुचवले की तेथून जवळच द्रासच्या दिशेने एक बॉर्डर पोस्ट आहे. ती तुम्हाला वाघा बॉर्डरपेक्षाही पहायला आवडेल. ती जरूर पहा.

तर श्रीनगरकडून कारगिलकडे जाताना कारगिलच्या थोडेच आधी डाव्या बाजुला नदीवर एक पूल आहे. हरका बहादूर ब्रिज असे त्याचे नाव आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

सातवा वेतन आयोग – मरा बाबू सव्वा लाख का

(कथेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत).

ललित लेखनाचा प्रकार: 

शोक

काय???" तो ओरडलाच मोठ्यांदा. दोन मिनिटं काहीच कळलं नाही त्याला. कसं,कुठे,कधी हे विचारायचंदेखील भान राहिलं नाही. त्याने फोन कट केला.
ती गेली? एवढयात? किती असेल वय? 24 पण नसेल अजुन. त्याला हळूहळू भूतकाळ आठवायला लागला. दहा मिनिटं तो तसाच सुन्न बसून राहिला.

तसं आता दोघांमध्ये काहीही नव्हतं. जवळजवळ एक वर्ष झालच होतं ब्रेकअप होऊन. सगळेच संबंध संपले होते. तिच्या मित्र मैत्रिणींशी देखील संपर्क तोड़लेला त्याने. दोन-तीन वेळा फोन केला होता तिला ' कशी आहेस ' विचारायला पण तिने उचलला नाही. बहुधा विसरली असावी सर्व काही. काय समजायचं ते समजून त्याने तो नाद सोडला.

ललित लेखनाचा प्रकार: 

निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या सर्वांसाठी

मला खरोखर कौतुक वाटतं तुमच्या पिढीचं. साधारण सत्तरीच्या दशकातील बालपण. स्वातंत्र्य मिळून अजून तीस वर्षेही नसतील झाली. घरात सुबत्ता अशी नसायचीच. मोठ्या भावाची पुस्तके लहान भावाने किंवा बहिणीने वापरायची असा अलिखित नियमच होता त्यावेळी. नवीन कपडेही वर्षातून एकदाच घेतले जायचे. आईस्क्रीम, चोकोलेट म्हणजे चैनीच्या गोष्टी. कधीतरी खायच्या. हॉटेलात खाणे तर जवळजवळ वर्ज्यच. फार फार तर एखादी आंबोळी खायला जायचं तेही अवघडच. कार, स्कूटर म्हणजे तर विचारायलाच नको.खूप दूरच्या गोष्टी त्या सगळ्या. सायकल चालवायला मिळायची हीच मोठी गोष्ट होती. कडक आणि कर्मठ आजी आजोबा.वडीलही तसे करारीच.

ललित लेखनाचा प्रकार: 

सफलतेचा मंत्र - विकल्परहित संकल्प आणि अखंड पुरुषार्थ

काल नवीन वर्षाचा पहिला दिवस होता, घरी आल्यावर सहज आस्था चेनल लावले. महर्षी रामदेव यांचे प्रवचन सुरु होते. जीवनात उद्दिष्ट लक्ष्य गाठण्यासाठी दोन सूत्र सांगितले -पहिला विकल्परहित संकल्प आणिक दुसरा अखंड पुरुषार्थ. त्याचेच विश्लेषण आपल्या अल्प बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

सफलतेचा मंत्र - विकल्परहित संकल्प आणि अखंड पुरुषार्थ

काल नवीन वर्षाचा पहिला दिवस होता, घरी आल्यावर सहज आस्था चेनल लावले. महर्षी रामदेव यांचे प्रवचन सुरु होते. जीवनात उद्दिष्ट लक्ष्य गाठण्यासाठी दोन सूत्र सांगितले -पहिला विकल्परहित संकल्प आणिक दुसरा अखंड पुरुषार्थ. त्याचेच विश्लेषण आपल्या अल्प बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

त्याचे असे झाले (भाग ३)

माणसाने बेडकाच्या मेजवानीची स्वप्ने बघितली तर ताटात झुरळसुद्धा येत नाही. त्यामुळे कलिंगडाच्या वाळलेल्या बियांचेच स्वप्न पाहावे, म्हणजे जे ताटात येईल ते गोड भासते अशी एक चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल. तत्प्रमाणे मी 'दीड तासाची झोप' अशा कलिंगडाच्या वाळलेल्या मूठभर बियांचे स्वप्न पाहिले. त्यातल्या बऱ्याचशा बिया मिळाल्या. काही हुकल्या. पण त्या खवट निघाल्या असत्या असे स्वतःचे समाधान करून घेतले.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य