गद्य

१५०

रात्रीच्या शांत काळोखात तुम्ही कधी 'धडाम्' असा आवाज ऐकला आहे काय? झोपेत असतानाही हा आवाज कधी कधी ऐकू येतो. मी जिथे राहतो तिथून जवळूनच एक हायवे गेलाय. आणि असे आवाज आम्हाला नेहमी ऐकायला येतात. थरकाप उडतो. तो नक्की ट्रक, टेम्पो, लक्झरी की अजून काही. मी एका झोपड्यात राहतो. झाडी तशी बरीच आहे. आणि हायवे इथून फारसा लांब नाहीये. कधी आवाज आलाच तर मी झोपड्याबाहेर येऊन दुरुनच कानोसा घेतो. आवाज तसा लहानच असतो. पण कधी कधी जमीन हादरते. आणि पुन्हा सगळे चिडीचूप. शांत. भयाण काळोख. आणि मग पुन्हा 'सायरन'चे आवाज. रात्रभर.

ललित लेखनाचा प्रकार: 

त्याचे असे झाले (भाग २)

दोन तासांनी मी उठलोच.
हे थोडेसे लाक्षणिक अर्थाने घ्यावे. डोळेमिटल्या अवस्थेत दिवा न लावता आपल्या घरात तीन फुटांच्याहून कमी उंचीच्या कायकाय गोष्टी आहेत त्याचा स्वतःच्या पायाची नडगी वापरून शोध घेणे म्हणजे 'उठणे' म्हणायचे असेल तर हरकत नाही.
शेवटी तीन छोटी स्टुले (त्यातले एक दोनदा), एक खुर्ची (या गोष्टी झोपायच्या खोलीत हव्यातच का?) आणि एक पलंगाखाली ठेवलेला पेला (तो मीच ठेवला होता) इतक्या गोष्टी 'शोधून' झाल्यावर अखेर डोळे उघडले. मग पुढची नैमित्तिक कृत्ये फारसा घोळ न घालता पार पाडली.

ललित लेखनाचा प्रकार: 

त्याचे असे झाले (भाग १)

तो दिवसच असा कसा उगवला होता देव जाणे. किंबहुना उगवण्याआधीच त्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. आदला दिवस कार्यालयात 'प्रकल्प व्यवस्थापक' (Project Manager) या बिरुदाबरोबर येणाऱ्या डोकेदुख्या (अनेकवचन बरोबर नसेल, पण भावना जाणून घ्या) मिटवण्यात गेला होता. आणि हे सगळे कधी नव्हे ते वेळेत पूर्ण करून 'संध्याकाळी घरी लौकर येण्याचा' सनातन वायदा पूर्ण होण्याचा इरादा दिसायला लागताच वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक नावाचा असुर जागृत झाला.

ललित लेखनाचा प्रकार: 

नोकरीसाठीची मुलाखत (मराठीत इंटरव्ह्यु) - एक कला

नोकरीसाठीची मुलाखत (मराठीत इंटरव्ह्यु) - एक कला
.

नोकरीसाठीची मुलाखत (मराठीत इंटरव्ह्यु) घेणे ही एक कला आहे.
.
एका प्रकारच्या अनामिक दडपणामुळे आत्मविश्वास असणा-या वाघांचेही कोकरू झालेले असते, तेथे इतरांची काय कथा? पण त्या मुलाला/मुलीला आधी शांत करणे आणि मग प्रश्न विचारायला सुरूवात करणे हे फारच कमी लोकांना जमते.

ललित लेखनाचा प्रकार: 

भेरू आणि तांबू

एखाद्या लहरी माळ्याने हाताला हेलकावे देत झारीने पाणी घालावे तसा पाऊस शितडून जात होता. आला आला म्हणेस्तोवर तो नाहीसा होई, आणि नाहीसा झाला म्हणून छत्री मिटावी तर परत त्याचा ताशा तडतडू लागे. त्यामुळे बाजारातल्या माणसांची 'पाऊस नसूनही छत्री उघडून फिरणारे' आणि छत्री असूनही पावसात भिजणारे' अशी विभागणी होऊन गेली होती.

ललित लेखनाचा प्रकार: 

जंटलमन्स गेम - डॉलिव्हिएरा अफेयर

जॉन अरलॉट गंभीरपणे आपल्या समोरील पत्रं वाचत होता.

हिरव्या शाईने लिहीलेलं ते पत्रं शेकडॉ मैलांचा प्रवास करुन त्याच्या डेस्कवर येऊन पडलं होतं. पत्रं लिहीणारा सुमारे अठ्ठावीस - तीस वर्षांचा एक तरुण होता. आपल्या अंगी असलेल्या गुणांचं चीज व्हावं यासाठी आपल्याला एक संधी मिळवून द्यावी अशी त्याने अत्यंत विनम्र सुरात अरलॉटला पत्रातून विनंती केली होती!

हे पत्रं म्हणजे एका अत्यंत वादळी प्रकरणाची नांदी ठरणार होतं!

ललित लेखनाचा प्रकार: 

काही आठवणी

या इयत्ता चौथीतल्या काही आठवणी आहेत. क्वचित काही पाचवीतल्याही असतील. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा या तालुक्याच्या गावच्या.

कधीतरी कुठल्यातरी गोष्टी लक्षात राहतात. त्याच का राहतात, इतर का नाही याला काही कारण नसते.

ललित लेखनाचा प्रकार: 

इच्छा नसतानाही तुमच्यापर्यंत पोहोचणारी जात

इच्छा नसतानाही तुमच्यापर्यंत पोहोचणारी जात
.

जात नाही ती जात हे तर एव्हाना आपण सर्वांनी ऐकले असेल. हा किस्सा मात्र तुमची इच्छा नसतानाही एखाद्याची जात तुमच्यापर्यंत जबरदस्तीने कशी पोहोचते याचा.

परभणी जिल्ह्यातल्या पण नांदेडला जवळ असलेल्या गावात असतानाची गोष्ट. गावातील एका सरपंचाकडे जेवण्यासाठी आमंत्रण होते. पुरूषांचे जेवण झाल्यावर बायकांची पंगत बसली. जेवण झाल्यावर सरपंचांच्या पत्नीने माझ्या आईला तिचे ताट धुवून ठेवायला सांगितले. दुसर्‍या दिवशी माझ्या वडलांनी हा विषय सरपंचांकडे काढला. की फक्त माझ्याच आईला तसे का करायला सांगितले? काय झाले ते विचारून घेतो असे सरपंच म्हणाले.

ललित लेखनाचा प्रकार: 

निरोप

सगळ सामान भरून झालं तरी त्याचा रूममधुन पाय निघत नव्हता . समोरच्या झाडावरच गरुडाच घरट त्याने अजून एकदा डोळे भरून बघुन घेतलं . समोरचा एरवी राग आणणारा 'मनुस्मृती ' नावाचा बंगलापण आज राग आणत नव्हता . शेवटचा दिवस माणसाला काय काय करायला लावतो . एरंडवण्यातल्या गच्च झाडीमधल्या आउटहाऊसमध्येच आपण कायम राहणार आहोत अशी समजूत त्यानं करून घेतली होती . तीन वर्ष चार महिने आणि सत्तेचाळीस दिवस . त्याला तिथ राहायला जाम आवडायचं . त्या बाकी जगापासून तुटलेल्या आणि हिरव्यागार झाडांमध्ये लपलेल्या आउटहाऊसने त्याला जी स्पेस दिली होती तशी त्याला कुठेच मिळाली नव्हती . तो तिथे एकटाच राहायला . बराच वेळा .

ललित लेखनाचा प्रकार: 

किट्टू

दुधाचा ट्रक गुरगुरत समोर थांबला तेव्हा डेअरीच्या पायरीवर झोपलेल्या किट्टूची झोप खाड्कन उडाली. तशी त्याची झोप फारच अलवार होती. कुठेही खुट्ट झाले तरी तो सजगपणे कानोसा घ्यायला तयार असे. त्याच्या या गुणामुळे त्याने कुठल्याही दुकानाच्या पायरीवर पथारी पसरली तरीही कुणाची हरकत नसे. किंबहुना त्याने रोज आपल्या दुकानाच्या पायरीवर झोपावे म्हणून त्याला काही देऊ करण्याचा विचारही दुकानमालकांच्या मनात रुंजी घालून जाई. पण किट्टूची किरकोळ शरीरयष्टी आणि सदैव भांबावलेली अवस्था पहाता त्याचा फारसा उपयोग होणार नाही हे ध्यानी येऊन ते गप्प बसत.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य