Submitted by नील on शनिवार, 01/01/2022 - 22:28
काल रात्री टॅक्सी घरीच असल्यामुळे आज मलबारहील ऐवजी आमच्या गव्हर्नमेन्ट कॉलनीतूनच सुरुवात केली.
हे सगळे कॉलनीतल्या टॅक्सी स्टॅन्डवरचे नेहमीचे टॅक्सीवाले.
टॅक्सी मिळवण्यासाठी जेव्हा मी आणि बिको जंग जंग पछाडत होतो तेव्हा आम्ही ह्या सगळ्यांचं मेजर डोकं खाल्लेलं त्यामुळे सगळे मला नीटच ओळखतात.
आज मला साक्षात टॅक्सीसकट आणि युनिफॉर्ममध्ये बघून सगळ्यांना आनंदच झालेला
इस्मायल, रफीकभाई, नौशाद, नजीम, सैदू, पट्टू, ओमान असे सगळे.
मिलेनियल्सच्या थोडा आधीचा जन्म असल्याने सेल्फी मला कधीच काढता येत नाहीत.
सो कातरलेल्या सेल्फीचे अपश्रेय पूर्ण माझेच.
Submitted by नील on सोमवार, 20/12/2021 - 02:19
दिनेशभाई त्यांच्या गावी गेले असल्यामुळे टॅक्सी पहिल्या शिफ्टच्या राजकुमारकडेच होती.
म्हणून ह्या वेळेस गाडी शनिवारी रात्रीच घरी आणून ठेवायचा प्लॅन होता.
म्हणजे उद्या जरा आरामात उठता आलं असतं.
राजकुमारकडून रात्री ९:३० च्या सुमारास गाडी उचलली. तडक घरी जायचाच प्लॅन होता पण भाडीच लागत गेली 
तीसुद्धा नाना चौक, नवजीवन सोसायटी, सँडहर्स्ट रोड, ऑपेरा हाऊस अशी
Submitted by देवदत्त on सोमवार, 20/12/2021 - 01:07
आज सकाळची गोष्ट.
मह्याचा नऊ वाजताच फोन आला, "भेंजो सद्गुरू स्टाॅलला ये पटकन. अर्जंट बोलायचंय."
"आई डोसे करतेय; खाऊन येतो. अर्ध्या तासात पोचतो."
मह्या पालीसारखा चुकचुकला. डोसा म्हणजे त्याचा वीक पॉइंट आहे.
एनीवे, मी डोसे हादडले आणि मग सद्गुरू स्टाॅलला पोचलो. मह्या लगेच बोलू लागला,
"ते बाजूचं रेस्टाॅरंट बघ. मी अर्धा तास काउन्ट करतोय. स्विगी आणि झोमॅटोचे एकोणीस जण येऊन गेले."
"बव्वं मग?" मी चहा पितापिता विचारलं.
"आता असा विचार कर. समज तू स्टेशनजवळ राहतोस आणि राबोडीच्या रेस्टाॅरंटमधून तू तंदूरी चिकन मागवलंस झोमॅटोनी."
Submitted by सामो on गुरुवार, 16/12/2021 - 19:37
काल रात्री बराच वेळ पडून, इन्स्ट्रुनेम्टल म्युझिक (https://www.youtube.com/watch?v=WxDJsMQCSzQ&list=PLo4u5b2-l-fBE7Yg_v5XWw...) ऐकलं. रागांमधलं काहीच कळत नाही पण नोट केलेले की 'हंसध्वनी' हा राग आपल्याला फार आवडतो आहे. कदाचित संस्कॄतप्रचुर नावाच्या मोहातच पडले असेन, त्यातही शुभ्र हंस इमॅजिन केल्याने दूधात साखर. ते काहीही असो पण मन खूप शांत झाले. बराच वेळ गेल्यानंतर आपोआप मनात एक विचार आला. जशी पाच इंद्रिये असतात तसे आपले सहावे इंद्रिय असते आपले मन.
Submitted by नील on सोमवार, 29/11/2021 - 00:22
आज सकाळी माझा टाइम्स ऑफ इंडियातर्फे टॅक्सीनामा प्रोजेक्टविषयी इंटरव्ह्यू झाला.
Techie Taxiwala
बऱ्याच जणांनी ती लिंक पाहिली आणि प्रेमाने पाठ थोपली, शिवाय आणखी लोकांत आवर्जून पसरवली हे मस्तच.
सगळ्यांचे आभार.
इंटरव्ह्यूमध्ये तसा बराच वेळ गेला.
मग थोडी फार भाडी मारून गाडी उभी करताना हे आमचे मलबार हिलच्या नाक्यावरचे नेहमीचे ड्रायव्हर रमण झा भेटले.
ह्यांच्याशी आज थोड्या गप्पा छाटल्या.
Submitted by देवदत्त on सोमवार, 08/11/2021 - 08:43
(मूळ प्रकाशन: "माहेर" दिवाळी अंक २०२०)
सायंकाळची वेळ होती. तिरपे सोनेरी सूर्यकिरण सारे माळरान उजळून टाकत होते. पक्ष्यांची सुस्वर किलबिल चालू होती.
गुहेबाहेरचा खडक सरकवून लांबनाक आत गेला. छोटूच्या ग्राफिटीकडे क्षणभर बघून तो स्वतःशीच हसला, आणि मग कोपऱ्यातील विस्तवाजवळ जाऊन काहीतरी शोधू लागला. तिथे सापडले ते पाहून (खरंतर सापडले नाही ते न पाहिल्यामुळे) त्याचा पारा चढला, आणि तो रागाने म्हणाला,
"बटरटरखभदरघरचरठब?"
Submitted by देवदत्त on शनिवार, 06/11/2021 - 18:22
मिसेस कोठारींना सॅनिटोरियमचा अगदी कंटाळा आला होता. म्हणजे मेडिटेशन, फिश स्पा वगैरे त्यांना आवडायचं. पण ग्लुटेन फ्री, डेअरी फ्री जेवण किती दिवस खायचं? शेवटी त्यांनी सॅनिटोरियममधून चार दिवस सुट्टी घेऊन जवळच राहणाऱ्या लेकीकडे जाऊन राहायचा निर्णय घेतला.
माॅर्निंग वाॅकमध्ये खंड पडू नये म्हणून चालतच जायचं असं मिसेस कोठारींनी ठरवलं. आणि एका प्रसन्न पहाटे, तहानलाडू भूकलाडू वगैरे न घेता, त्यांनी मार्गक्रमण केले.
शरद ऋतू होता. हवेत किंचित गारवा होता. मिसेस कोठारी जंगलातल्या पायवाटेवरून झपाझप चालत होत्या. अचानक पानांची सळसळ झाली, आणि एक धूर्त कोल्हा त्यांच्यासमोर अवतीर्ण झाला.
Submitted by नील on बुधवार, 27/10/2021 - 01:20
आज सोसायटीची मिटींग असल्यामुळे टॅक्सी उशीरा काढली.
त्यात अनंत चतुर्दशी असल्यामुळे मुंबईत बऱ्यापैकी सामसूम होती.
गव्हर्नमेंट कॉलनीतून चार यु. पी. चे मासेवाले घेतले.
आता यु. पी. चे मासेवाले कोळणींइतकेच एफिशियंटली मासे विकतात.
आणि त्यात यु. पी. चे मासेवाले, कोळणी किंवा आमच्या आई-बायकोसारखं मासेखाऊ पब्लीक ह्या कोणालाच प्रॉब्लेम नाहीये.
सो फालतू गोष्टींबद्दल रायता फैलावणाऱ्या लोकांनी शांतीलालचा पकडावा हेच बरं.
त्यांना दानाबंदर (मस्जिद बंदर) ला सोडायचं होतं.
त्यांतला एक फंटर त्याची माशाची रिकामी टोपली घेऊन पुढेच बसला.
Submitted by माचीवरला बुधा on मंगळवार, 26/10/2021 - 15:09
स. न. वि. वि.
गणितासंबंधी दर्जेदार लिखाण ऐसी वर होत आहे. त्या क्षेत्रातील काही मूलभूत प्रश्नांबद्दल तुमची मते जाणून घ्यायला आवडेल.
प्रश्न १: गणित हे मानवजातीस सापडलेले (डिस्कव्हर्ड) आहे, की ते मानवजातीने निर्मिलेले (इन्व्हेंटेड) आहे?
प्रश्न २: गणित निसर्गास इतक्या चपखलपणे लागू का पडत असावे? अर्थात, निसर्गाचे पुस्तक गणिताच्या भाषेत का लिहिलेले आहे?
Submitted by नील on गुरुवार, 07/10/2021 - 01:13
आज जरा गंमतच झाली.
बिकोला दिनेशभाईंना भेटायचं होतं म्हणून तीही आली बरोबर.
आम्ही जरा फोटो-बिटो काढले.


पाने