इतर

वर्ड प्रॉब्लेम्स - एक दुर्लक्षित प्रकार

The twin goal of mathematics education is the development of critical thinking and problem-solving skills and abilities.
(गोष्ट पुढे लिहिणार आहे, पण थोडा ब्रेक म्हणून एक जुना लेख ... )
...

ललित लेखनाचा प्रकार: 

'मोगँबो का भतीजा हूं, आया हूं तो कुछ तो लेके जाऊंगा'

पूर्वार्ध -

अमेरिकेत आल्यावर मुद्दामहून भारतीय लोकांशी ओळख काढण्याची मला गरज नव्हती. मुलं नसली आणि देवाधर्मावर विश्वास नसला की गरजा आपसूक खूपच कमी होतात. पण साला कोव्हिडचा फेरा आला. तोवर मी फक्त बाहेर बागकाम करायचे, पण आता घरातली झाडंही गोळा केली. त्या पाठोपाठ स्थानिक फेसबुक ग्रूप आले. मग तिथे भारतीयही आले.

ललित लेखनाचा प्रकार: 

घर

मध्यंतरी एका सिनेमात सॅन अँटॉनिओचा उल्लेख आला आणि नवरा म्हणाला - सॅन अँटॉनिओ! तुझं घर. मी त्याला उत्तर दिलं - तुम्ही दोघं जिथे आहात ते माझं घर. बाकी ठिकाणचं नाईलाजाचं वास्तव्य. आपणच आपल्याला चकित करतो असे काही क्षण असतात. हा क्षण त्यातलाच एक. मला घराचा तो मुद्दा माहीतच नव्हता ... निदान मूर्त मनाने तसा कधी विचार बोलून दाखवला नव्हता. अमूर्त मनातूनही काही उद्गार उमटतात का? फ्रॉईडने म्हटलेले आहे - स्लिप ऑफ टंग असे काही नसते. पटकन निघणारे चूकीचे उद्गारही - अमूर्त मनाच्या पातळीवरील काही वैशिष्ट्ये बरोबर घेउन येतात.

ललित लेखनाचा प्रकार: 

ऋषिकेश डायरीज्

कालच्या ५ तारखेला आकाशातून टपकलो आणि तसं अलगद इथल्या गुलाबी थंडीने मला कुशीत घेतले आहे. पावसाने हालहाल पछाडलेल्या मुंबईपासून मला तरी पाठ सोडवता आली. इथला हिरवा परिसर मनोवेधक आहे, सारे मळभ पुसून टाकणारा आहे. ऋषिकेशला पाहून मनात चमकून गेले की, आपली मानवजातसुद्धा निसर्गावर आलेली एक कीड आहे, खरंतर कीड ही कल्पना मानवाचीच, जे मानवाला घातक ते तो कीड म्हणून ठरवतो, पण निसर्गाला आपणच घातक ठरत आहोत, असं समजायला नको का.. बेमोसमी पावसाने, अतिउष्ण तापमानाने निसर्ग आपल्याला एखादी कीड नष्ट करावी तसा त्रास देत आहेच.

ललित लेखनाचा प्रकार: 

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १६: २१ फेब्रुवारी २०२१

आजकाल मी प्रियदर्शनी-पार्क समोरच्या हैद्राबाद हाऊसवरून टॅक्सी घेतली की सरळ हँगिंग गार्डनला लावतो.

मुंबईच्या टकल्यावरच्या ह्या सुंदर बागेत दोन तीन चालत चकरा मारतो...

मग गार्डनमधल्या छान पायऱ्यावाल्या उतारावरच्या सुलभमध्ये मुत्तूकोडी मारतो...

आणि मग खुष होऊन भाडी शोधायला लागतो.

असंच खाली आल्यावर ग्रॅण्ट-रोड स्टेशनचं भाडं मिळालं.

बहुतेक गुजराथी मध्यमवयीन नवरा बायको होते.

मी खुषीत हँगिंग गार्डन वरून सरळ पुढे केम्प्स कॉर्नरच्या दिशेनी टॅक्सी काढली.

उतारावरून केम्प्स कॉर्नरला आलं आणि तिकडून राईट मारून सरळ-ग्रॅण्ट रोड स्टेशन.

ललित लेखनाचा प्रकार: 

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १५: (१४ फेब्रुवारी २०२१)

आज रविवार असूनही व्हॅलेंटाईन डे थंडाच होता सगळीकडे.

भाडं शोधत शोधत गाडी चर्चगेट स्टेशनला आणली.

आता गाड्या पार्शली का होईना पब्लीकला चालू झाल्याने मागच्या महिन्यापेक्षा जास्त गर्दी होती.

भाडी पटापट मिळत होती.

एक कपल घेतलं त्यांना गेट-वेला जायचं होतं.

मला वाटलं V- डे सेलिब्रेट करत असतील

मुलगी गुजरातीत बोलत होती...

(आता मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाला गुजराथी बऱ्यापैकी समजून येतेच.)

त्यांचा ब्रेकअप होत होता.

मुलगी प्रचंड प्रॅक्टीकल आणि आयुष्याबद्दल क्लॅरिटी असलेली होती. तर मुलगा सेंटी.

ललित लेखनाचा प्रकार: 

लायब्ररी ऑफ थिंग्ज

आमच्या बंड्यामामांचं - त्याच, फ्रेंच एक्स्पिरिअन्सवाल्या सागर डिलक्सवाल्या - टुमदार कुटीर आहे. म्हणजे तसा जुना वडिलोपार्जित बंगला आहे, पण त्याला बंड्यामामा "आमची पर्णकुटी" वगैरे म्हणतात. चांगल्या सिमेंटच्या भिंती आणि एव्हरेस्टची कौलं आहेत तरीही.

ललित लेखनाचा प्रकार: 

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १४: (३ जानेवारी २०२१)

आज नव्या वर्षात पहिल्यांदा टॅक्सी काढली.
टॅक्सी चालवायला लागून वर्षापेक्षा अधिक काळ झाला. टॅक्सी दिवस १: ८ डिसेंबर २०१९

१३ महिन्यांत १४ सेशन्स म्हणजे प्रगती फारच हळू आहे.
अर्थात लॉक-डाऊनमुळे जवळ जवळ ६ महिने बाहेर पडताच आलं नाही.
तशीही ३० सेशन्स पूर्ण करायची फिक्स्ड टाइमलाईन ठेवली नाहीये सो जेवढा वेळ लागेल तो लागेल.

तर...

एका "सौधिंडियन" काकूंना नाना चौकात भाजी मार्केटला सोडलं.

लॉक-डाऊनमुळे चांगली भाजी मिळत नाहीशी झाल्याची तक्रार करत होत्या.

ललित लेखनाचा प्रकार: 

असुराचा पराभव

मजल दरमजल करत वीरसेन एका अपरिचित नगरीजवळ पोहोचला. सायंकाळचा समय होता. सोबतच्या भाकरतुकड्याचे सेवन करून, निर्झराचे मधुर जल प्राशन करून वीरसेनाने नगरीत प्रवेश केला. एका कनवाळू रहिवाश्याची त्याच्या ओसरीत झोपण्याची परवानगी घेऊन वीरसेनाने अंथरूण पाहून हातपाय पसरले.

ललित लेखनाचा प्रकार: 

नवीन बिझनेस

दिवाळीच्या जरा आधीची गोष्ट. यंदाची दिवाळी नाही, गेल्या वर्षीची.

मह्या संडेला सकाळीसकाळी आमच्या घरी आला. "काकू, हा सगळा फराळ खाऊन कसा वाटतो ते सांगा," असं बोलत त्यानी अॅल्युमिनियमचा मोठ्ठा डबा आईकडे दिला, आणि सोफ्यावर फतकल मारून बसला.

"अरे हे काय महेश, दिवाळीला अजून चिकार वेळ आहे. आणि एवढा सगळा फराळ मी एकटी कशी खाणार?" आईने फराळ दोन प्लेटमधे वाढून आम्हाला आणून दिला, आणि ती भाजी आणायला गेली.

"खा भेंजो, आणि कसा वाटतोय सांग" मह्या बोलला. मग मी आणि तो दहा मिनटं न बोलता शिस्तीत खात होतो.

"चकली ९/१०, रवा लाडू १०/१०, शंकरपाळी ९/१०, करंजी ८/१०, चिवडा ९/१०" मी बोललो.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - इतर