इतर

श्वानप्रेमी ‘ऐसी’करांसाठी

ऐसीच्या संस्थळावर किती श्वानप्रेमी असतील याची कल्पना नाही. परंतु या डॉगशोचे फोटोग्राफ्स कदाचित सर्वांना आवडतील म्हणून हे कलादालन.

वेस्टमिनिस्टर डॉगशो २०२२चे काही फोटोग्राफ्सची ही फोटोमालिका..

146व्या केनेल क्लब डॉग शोच्यासाठी सुमारे दोनशे वेगवेगळ्या जाती-प्रजातीच्या तीन हजार कुत्र्यांनी भाग घेतला होता म्हणे. त्यात ब्लडहौंड जातीच्या ट्रम्पेट या कुत्र्यानी प्रथम क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेतील काही फोटोग्राफ्सची धावती झलक.

स्पर्धा का इतर?: 

शिव-हरी जोडीद्वारे व्हायोलिनचा वापर

टीपः मी संगीततज्ज्ञ नाही. प्रश्न सामान्य रसिकाचा आहे.

स्पर्धा का इतर?: 

ब्लूज संगीत अल्प परिचय

ब्लूज संगीत अल्प परिचय

पाश्चात्य जगात समाजमान्य/रूढ, परंतु भारतात ज्या संगीतप्रकाराबद्दल फारशी माहिती नाही,अशा ब्लूज संगीताबद्दल सामान्य माहिती / तोंडओळख करून देण्यासाठी हे टिपण. या टिपणात क्लिष्ट सांगीतिक माहिती न देता, या संगीतप्रकाराचा उगम, कारणे, प्रसार व प्रभाव यावर थोडी माहिती देत आहे.

गेली किमान शंभर दीडशे वर्ष अस्तित्वात असणारा आणि गेल्या शतकभर पाश्चिमात्य संगीतातील अनेक संगीतप्रकारांवर प्रभाव टाकणारा संगीतप्रकार म्हणजे ब्लूज संगीत.

स्पर्धा का इतर?: 

झुंड ची प्रतिकात्मकता

मी चित्रपट समीक्षक नाही. चित्रपटाचा रसास्वाद कसा घ्यावा याचा कोणताही अभ्यासक्रम कधीही मला अभ्यासाला नव्हता. भारतियांचे चित्रपटाचे वेड आणि त्यातून प्रत्येकाचे असणारे आकलन असाच माझाही प्रवास झालेला आहे. अन्य समाजमाध्यमात झुंड कसा दिसला याबद्दल लिहीले आहे. तेच इथे डकवतो आहे.

नागराज सिनेमा कसा बनवतो ?

स्पर्धा का इतर?: 

ही माझी लता!

ही माझी आत्ताची आवडती लताची अकरा गाणी. - सांगताहेत हेमंत कर्णिक.

स्पर्धा का इतर?: 

वाकड्या अंगणात नाचली जाई पण तिला कुणी पाहिलं नाई....

लहानपणी "मला एक उत्तम नर्तिका बनाचेय" पासून, प्रौढपणी "आता स्वतःचे अंग सांडत आणि लवंडत फक्त नाचायचंय" या माझ्या छोट्याश्या नाच-प्रवासाचा आढावा.

स्पर्धा का इतर?: 

रुह से उठती हुई एक आवाज...

स्पर्धा का इतर?: 

बुशरा अन्सारी - पाकिस्तानी कलाकार

आधी हिंदू-मुस्लिम एकतेचे मोठे समर्थक

स्पर्धा का इतर?: 

वण्डरफुल मिनारी

मी लहान होते तेव्हापासून माझं एक स्वप्न आहे आपली स्वतःची चिकार मोठी जमीन पाहीजे शेती करण्यासाठी. मोठ्या शहरात रहायला लागल्यापासून मला याची जाणीव अधिकच होऊ लागली. आपण काहीकाळानं गावी परत जायचं आणि स्वतःची छोटीशी का असेना शेती करायचीच. मातीशी जोडलेली मूळं असल्यामुळं हे सतत अन् वारंवार वाटत राहतं. कामाच्या व्यापात आपल्या या इच्छेला थोडंसं मागे सारावं लागतं, पण कधीतरी काहीतरी निमित्त घडतं अन् आपल्याला याची परत आठवण होतेच. तसंच एक निमित्त काल घडलं, ते म्हणजे एक चित्रपट, मिनारी, अमेरिकन मेड कोरियन सिनेमा. एका कोरियन कुटुंबाची गोष्ट.

स्पर्धा का इतर?: 

Sthree - त्या तिघींची गोष्ट

Instagram वरच्या meet the flow या पेजवर या टीमने मिळून STHREE नावाचा हा दृकश्राव्य माध्यमातला प्रयोग केलाय.
मराठी वाङ्मयात ओवी हा काव्यप्रकार बराच जुना. तो म्हटला की आठवतं ते स्त्रियांनी त्यांची दैनंदिन कामं करताना गाण्यातून केलेली अभिव्यक्ती.
आभा सौमित्र या एका अशाच हुशार मुलीने आताच्या काळातल्या 3 मुलींना केंद्रस्थानी ठेवून 3 ओव्या लिहिल्यात. त्या त्यांच्या त्यांच्या activity मध्ये आहेत आणि त्यातूनच त्या प्रत्येकीची लयबद्ध गद्यात अशी गोष्ट सांगितलीये. प्रेम, तेज आणि शांती ही यातली तीन elements.

स्पर्धा का इतर?: 

पाने

Subscribe to RSS - इतर