इतर

पक्षांच्या संगतीत

(हळू हळू इतर पक्ष्यांचेही फोटो द्यायचेत म्हणून हे शिर्षक निवडले आहे.)

आमच्या पाठच्या कुंपणापलीकडे एक मोठे करंजाचे झाड आहे. त्या झाडावर गेले दोन-तीन वर्षे रातबगळे (नाईट हेरॉन) घरट करून स्थिरावले आहेत. ह्याला कारण कदाचीत पावसात शेतात साचून राहणार पाणी व त्यामुळे त्यात मिळणारा मांसाहार असावा. शेतात साधारण नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत काही प्रमाणात पाणी असत.

स्पर्धा का इतर?: 

हसवा फसवी (स्त्री पात्र) अभिनय

स्त्री पात्र निभावणे हे प्रत्येक पुरुष अभिनेत्याचे स्वप्न असते. मी काही स्वतःला अभिनेता मानत नाही. पण तरीही मला असे पात्र साकारता आले आणि ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले त्यांना ते आवडले याबद्दल मी स्बतःला अत्यंत भाग्यवान समजतो.

स्कीट -

मेकिंग ऑफ आरती देसाई पटेल लुबुंबा -

स्पर्धा का इतर?: 

नग्नचित्रे - एक दृष्टिकोन

"वेज ऑफ सीईंग" ह्या जॉन बर्गरलिखित पुस्तकातील प्रकरणाचे मराठी भाषांतर. हे पुस्तक लेखकाने बीबीसीवर सादर केलेल्या माहितीपट-मालिकेवर आधारित आहे.

स्पर्धा का इतर?: 

सुरंगी

होळीचा हंगाम आला की वेध लागतात ते सुरंगीच्या हळदी, सुगंधी वळेसरांचे/गजर्‍यांचे. मार्च- एप्रिल महिन्यांचा कालावधीत सुरंगीचे झाड दोन भरगच्च बहरात बहरते.

१)
Photo:

स्पर्धा का इतर?: 

डेटिंग कसे करावे?

रोवन अॅटकिनसन अर्थात मिस्टर बीनच्या नाट्यावर आधारित मुकाभिनय. मराठी अनुवाद मीच लिहिलाय.

स्पर्धा का इतर?: 

पुस्तक-प्रकाशनविषयक सल्ला.

येथील पुस्तकप्रेमी आणि चोखंदळ वाचकांकडून काही सल्ल्याची अपेक्षा आहे.

१) एखाद्या कॉफी-टेबल पुस्तकाला महाराष्ट्रात/भारतात कितपत मागणी असते? भाषा मराठी व/वा इंग्रजी. प्रकाशक मिळणे कितपत अवघड असते?
२) असे प्रकाशक कोण आहेत - प्रामुख्याने पुणे-मुंबई-महाराष्ट्रामध्ये.
३) पूर्ण पुस्तक मजकूर/फोटो/ले-आउट सह तयार करून दिले तर प्रकाशक मिळणे सोपे की अवघड?

येथे परदेशात बसून पुण्या-मुंबईतील प्रकाशक/पुस्तकविक्रेते/तत्सम अम्य व्यावसायिक ह्यांच्याशी चर्चा करता येत नसल्यामुळे येहेच काही मार्गदर्शन मिळते काय अशा अपेक्षेने ही चौकशी पाठवीत आहे.

ह्याविषयी काही सांगण्याजोगे असेल तर मला व्यनि केला तरी उत्तम.

स्पर्धा का इतर?: 

माझे पहिले क़्विल्ट

एक दिवस इंटरनेटवर असेच काहीबाही करता करता मला ‘क़्विल्ट’ या प्रकारचा शोध लागला. सुरवातीला ‘हा सगळा अमेरिकेतल्या ज्येष्ठ बायकांचा प्रांत, आपल्याला काय त्याचं?’ असं म्हणत मी मनात निर्माण होणारी आवड दाबून टाकत होते, पण जसजसे क़्विल्टचे वेगवेगळे पॅटर्न माझ्यासमोर उलगडू लागले, तसतशी मी या नव्या कलाप्रकारच्या प्रेमात पडू लागले. क़्विल्ट विषयीच्या वेगवेगळ्या साईट बघताना माझ्या लक्षात आले की क़्विल्टचे इथे अमेरिकेत ठिकठिकाणी क्लासेस असतात, फक्त क़्विल्टचेच सामान मिळेल अशी खास दुकाने असतात, त्यांचे आंतरराज्यीय स्तरावर प्रदर्शन आणि स्पर्धा होतात, टीव्हीवर शोज असतात.

स्पर्धा का इतर?: 

फोटोग्राफी कशी करावी

मिपावर फोटोग्राफीच्या थियरीबद्दल स्वॅप्स यांनी खूप छान मालिका लिहिली आहे, ती नक्की वाचा. आपण DSLR कॅमेरा उत्साहाने घेऊन येतो, खूप छानछान फोटो काढावेसे वाटतात. थोडीफार थियरी पण माहीत असते, पण बर्‍याचदा होते काय की आपण ऑटो मोडमध्येच अडकून पडतो. अशा लोकांसाठी थोडी तोंडओळख म्हणून हा लेख लिहित आहे. मी काही फार दिग्गज फोटोग्राफर नाही, पण प्रत्यक्ष उदाहरण देऊन फोटोग्राफी शिकवणारे लेख मराठीत तरी मी पाहिले नाहीत, म्हणून घाबरत घाबरत हा एक प्रयत्न करत आहे, कृपया गोड मानून घ्यावा.

नवशिका/नवशिकी फोटोग्राफर साधारणतः असा फोटो काढतात.

स्पर्धा का इतर?: 

और क्या एहेदे वफा होते है - एक अविस्मरणीय गीत

और क्या एहेदे वफा होते हैं । लोग मिलते हैं जुदा होते है। और क्या......... एहेदे वफा होते हैं ।

पंचम (आर डी बर्मन), आनंद बक्षी ,आशाताई(सोलो) आणि सुरेश वाडकर(सोलो) यांच्या प्रतिभेनी सजलेली एक मास्टरपीस संगीतकृती !

चांगुलपणा , चांगुलपणा म्हणजे काय? लोक एकत्र येतात आणि विभक्त होतात , जणू एकत्र येण्यातच विभक्त होण्याची बीजे रोवलेली असतात. जीवनात भेटणारे साठी केव्हा तरी विभक्त होतातच.
जवळच्या व्यक्तीला त्रास देऊन आणि रडवूनच सुख मिळते काय? प्रेम विसरण्याची जणू जगाला सवयच असते.
प्रेमातील उद्विग्नता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न !

स्पर्धा का इतर?: 

मी आणि माझी चित्रकला - हौशी चित्रकारांसाठीचा धागा

लहानपणी माझी चित्रकला चांगली होती ह्याला प्राथमिक शाळेतले निकालपत्र ह्याशिवाय दुसरा पुरावा नाही. माध्यमिक शाळेतला चित्रकलेचा तास हा केवळ ह्याच कारणासाठी आठवतो कि एक तर तो सलग दोन तास असत असे आणि दुसरे म्हणजे इतर तासांच्या तुलने निवांत असे, म्हणजे हे दोन तास चित्रकले व्यतिरिक्त काहीही केलं तरी चालत असे.

स्पर्धा का इतर?: 

पाने

Subscribe to RSS - इतर