कथा

कथा - माझा बहावा

कथा - माझा बहावा
-------------------------------------------------------------------------------------------------------------

वसंत ऋतूपासून बहाव्याची झाडे फुलू लागली आहेत .
त्या बहाव्यांना समर्पित .

वसंतात फुलावा- मनाचा बहावा ,
त्याचा बहर -कोणी डोळे भरून पहावा !
-------------------------------------------------------------------------------------------------------------

ललित लेखनाचा प्रकार: 

एकटेपणा

शशांक जाउन ८ महीने उलटले होते. सविता अजुनही त्याच्या जाण्याला सरावलेली नव्हती. अजुनही सकाळी डोळे उघडले की पहीली आठवण होइ ते त्याच्या नसण्याची आणि एक अतिशय जड, उदास भावनेचा ढग तिचे मन झाकोळून टाके. मग उठण्याचे ना त्राण राही, ना झोपून राहून बरे वाटे. हे खरे तर रोजचेच झालेल होते. सकाळी कसे बसे अंथरुणातून स्वत:ला फरफटवत काढुन, ती ऑफिसमध्ये जायच्या तयारीस लागे. घरातील प्रत्येक वस्तू, शशांकची आठवण करुन देण्यास समर्थ होती. इलेक्ट्रिक ब्रश - तिचा व त्याचा ब्रश आलटुन पालटुन चार्जिंगला ठेवणे, हे शशांकने आपण होउन स्वीकारलेले लहानसे काम होते. आता तिने जर चार्ज केला नाही तर तो ब्रश तसाच अनचार्जड राही.

ललित लेखनाचा प्रकार: 

गंमत

गंमत
-----------------------------------------------------------------------------------------

ललित लेखनाचा प्रकार: 

पेंटर

पेंटर

ललित लेखनाचा प्रकार: 

जाईजुई

जाईजुई

ललित लेखनाचा प्रकार: 

द टेल-टेल हार्ट : एडगर एलन पो: (अनुवाद)

The Tell-Tale Heart by Edgar Allan Poe

हे अगदी खरंय की मी तेव्हा अतिशय निराश होतो. आताही आहे म्हणा तसा. पण केवळ तेव्हढ्यामुळे तुम्ही काय मला वेडा म्हणणार आहात का? खरं सांगायचं तर या आजारपणामुळे माझी पंचेद्रियं निकामी वा कमजोर न होता अधिकच कार्यक्षम झाली आहेत. त्यापैकी सगळ्यांत सुधारली ती श्रवणशक्ती. मी आता या पृथ्वीवरच्या आणि स्वर्गातल्यादेखील सर्व गोष्टी ऐकू शकतो. इतकंच काय मला नरकातल्यासुध्दा अनेक गोष्टी ऐकू येतात. तरी मी वेडा म्हणे! आता हेच बघा ना, किती शांततेने, चित्त थार्‍यावर ठेवून मी ही गोष्ट तुम्हाला सांगणाराय ते‍!

ललित लेखनाचा प्रकार: 

३१ डिसेंबर (विज्ञान कथा)

या वर्षीच्या (२०१८) "संवाद" या दिवाळी अंकात छापून आलेली माझी विज्ञान कथा !!

दिनांक: 31 डिसेंबर, युरोपातील एका भूमिगत प्रयोगशाळेत -

"डॉक्टर कोहेन, खरं तर मी वेळ ही गोष्ट लांबी, रुंदी आणि उंची याप्रमाणे एक मिती आहे हे मानत नाही. वेळ ही मानवाने निर्माण केलेली गोष्ट आहे. घडलेल्या घटना क्रमाने स्मरणात ठेवण्यासाठी. पण काळ, अंतर आणि वेग यांच्यातल्या गुणोत्तराचा वापर मात्र मी वेगवान प्रवासासाठी करून घेणार आहे!', शास्त्रज्ञ डॉ. रमण म्हणाले.

ललित लेखनाचा प्रकार: 

मानाच्या पाहुण्या

धुरळा उडवीत आलेली होंडा सिटी ऐटदार वळण घेऊन पाटलांच्या बंगल्यासमोर थांबली. ड्रायव्हर गाडीतून उतरला आणि मागचे दार उघडून अदबीने उभा राहिला.

सनग्लासेस लावलेल्या दोन गौरांगना गाडीतून उतरल्या. पाटलीणबाई लगबगीनं त्यांच्या स्वागतासाठी आल्या, आणि पाहुण्यांना दिवाणखान्यात घेऊन गेल्या. म्हाताऱ्या चौकीदाराने दाराबाहेरून पाहणाऱ्या पोराटोरांना हाकलले, आणि तोही मान वळवून दोघींकडे पाहू लागला.

"वाटर? शुगर?" आपल्या मर्यादित इंग्रजीत पाटलीणबाईंनी पाहुण्यांना गूळ-पाण्याचा आग्रह केला. त्या दोघी मात्र एकमेकींच्या आणि पाटलीणबाईंच्या चेहऱ्याकडे आळीपाळीने पाहत राहिल्या.

ललित लेखनाचा प्रकार: 

डायनोसाॅर पार्क

मह्या आणि मी दोन महिने तयारी करत होतो. फायनली सुवर्णाक्षरात लिहायचा दिवस उगवला होता भेंजो.

प्रत्येकी दोन हजार रूपये नगद मोजलेल्या पन्नास जणांची बस घोलवडजवळ पोचली होती. मह्या उठून उभा राहिला, आणि पब्लिककडे बघत म्हणाला, "कृपया लक्ष द्या. सर्व सूचनांचे पालन करा. कोणीही बसबाहेर उतरू नका. बोलू, शिंकू किंवा खोकू नका."

ललित लेखनाचा प्रकार: 

देवाशी दुश्मनी

सावल्या पार पायाखाली आल्या होत्या.सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता.वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता.हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती.भरलेले घर रिकामं होऊ लागलं होतं.समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर हार घातलेला.शायनासरीत आताचं उठून बोलतेलं असा.फुटू पाहीला की नुसता पोटात जाळ उठायचा.तेव्ह जाळ काळीज जाळीत पारवर डोक्यापर्यंत जायचा.हुंदका नुसता नरडयातचं आडकून बसायचा.वरचा श्वास वर. खालचा श्वास खाली व्हायचा.आता डोळं नाही पाझरतं.डोळयातलं पाणीच आटून गेलं आसलं. धा-बारा दिसं झालं की दादानी फाशी घेतलेली. कव्हरं डोळ तरी वाहतेल ?

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - कथा